नियोवाईज धूमकेतू

Submitted by च्रप्स on 21 July, 2020 - 15:31

नियोवाईज कॉमेट फोन मधून घेतलेला फोटो...
अचानक दिसला रात्री...

9515A5A4-C927-4A4F-8C9F-375E9B2BE2CE.jpeg

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!

पुन्हा 6800 वर्षांनी दिसणार आहे... तेंव्हा आपण असू नसू काय ग्यारंटी... अजूनही बघून घ्या... आज रात्री...
नॉर्थवेस्ट आकाशात...

मस्त.
६८०० वर्षांनी आपण असू?? किती पुनर्जन्म झाले असतील काय माहित.. Wink

छान आलाय फोटो.
वॉलपेपरला ठेवा.

पुन्हा 6800 वर्षांनी दिसणार आहे.
>>>>>
या माहितीसाठी धन्यवाद
तेव्हा यावर धागा मी काढणार .. मी पाहिलेला धूमकेतू Happy

जोक्स द अपार्ट,
लॉकडाऊनने वातावरणातले प्रदूषण फार घटलेय. उद्या गच्चीवर जाऊन ट्राय मारतो दिसतोय का..

आज प्रयत्न करणार नीट दिसतोय का पहायचा. सुर्यापासुन लांब जातोय म्हणुन धूसर होतो आहे. छान फोटो. फोनमधुन इतकं सगळं दिसलं म्हणजे विशेष.

इथे ढग आणि इमारती. क्षितिजापासून 30- 35अंशांपर्यंत काही दिसत नाही. अनेक वेळा प्रयत्न केला. अगदी पहाटे चार वाजता उठूनही. गेल्या आठवड्यात भरपूर पाऊस होता. उगीच भिजणे मात्र झाले.

भारतातून जुलै 22 आणि 23 ला चांगला दिसेल म्हणत आहेत..... नक्की बघेन. फोटो मस्तच. शेअर केल्याबद्दल धन्यवाद .

अगदी पहाटे चार वाजता उठूनही.>>>>>

सूर्यास्तानंतर फक्त 20 मिनिटे दिसतो.

बाकी भिजत होता म्हणजे आकाशात ढग होते, मग कसा दिसणार? इतर तारे दिसत होते का?

चरपस परदेशात राहतात बहुतेक. देशी लोकांना दिसणे कठीण. माझ्याकडे गेले दोन दिवस दिवसाचे ऊन होते पण संध्याकाळी 5 नंतर सर्वत्र धुके व आकाश अभ्रच्छादित होत होते. त्यामुळे मी आता आशा सोडलिय.

6,800 वर्षानंतर बघते जमतंय का ते.

आम्ही पण प्रयत्न केला , सप्तर्षी पासून वायव्येला दिसतोय नं...तिकडे काही तरी हलताना , वरच्या दिशेने जाताना दिसले पण खात्री नाही वाटली, कुठे पहावे सांगता का च्रप्स ?

होरायझन क्लियर दिसायला हवा... गावाबाहेर एखादा तलाव वगैरे असेल तर तिथे ट्राय करा अस्मिता जी आणि साधना जी ... नॉर्थवेस्ट आकाशात...

बहुतेक पहाटे चार ला देखील दिसतो... न्यूज मध्ये वाचलेले आठवतंय...

सुरवातीला दिसत होता म्हणे, पण आता नाही. मी पर्वापासून रोज प्रयत्नात आहे पण आकाश नेमके संध्याकाळी खूप ढगाळ होते.

मीही परवा संध्याकाळी आठच्या सुमारास बायनॉक्युलरमधून पाहिला. इथे आकाश चांगलं स्वच्छ होतं परवा. (मी बंगळूरला राहते). फोटो मात्र काढता आला नाही. काल परत प्रयत्न केला पण काल थोडे ढग होते त्यामुळे दिसला नाही.
च्रप्स, तुम्ही काढलेला फोटो मस्तच आलाय!

धूमकेतूचा नाही, पण गुरू ग्रह आणि त्याच्या उपग्रहांचा फोटो काढता आला परवा.
DSCN5973.JPG

Pages