चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गु सी पाहिला. प्रचंड स्लो आहे. उत्तर प्रदेशचे वातावरण व लोकांची मानसिकता उत्तम उभी केलीय. पण कथाबीज ओढून ताणून तयार केलेय. पटत नाही. शेवट आवडला.

समीक्षकांनी नावाजलेला Room - एका तरुण मुलीला किडनॅप करून रेप करून एकाकी शेडमध्ये 7 वर्षे बंद करून ठेवलेलं असतं. तिला तिथेच मुलगा होऊन तो ही त्याच छोट्याशा रूममध्ये 5 वर्षांचा होतो. कॅप्टर (मराठी शब्द माहीत नाही) अगदीच बेसिक गरजेच्या वस्तू पुरवत असतो. त्या छोट्याने TV सोडता बाहेरचं जग, माणसं, निसर्ग कधीच पाहिलेलं नसतं, आणि एके दिवशी .......

ही अशीच कथा एकदा क्राईम पॅट्रोल मध्ये पाहिली होती.

बम्बैरिया पाहिलाय का कुणी? किचकट व गुंतागुंतीची कथा आहे पण एकदा पाह्यला चांगला आहे. आदिल हुसैन चं काम उत्तम.

गुलबो सीताबो मोठया अपेक्षेने बघितलं, आणि पूर्ण निराशा. अतिशय छोटं कथाबीज खेचता येईल तितकं खेचलय. क्लायमॅक्स नंतर सुद्धा चित्रपट अलमोस्ट २० २५ मिनिटे रेंगाळतो. बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतच नाहीत. मुळात चित्रपटात सांगायचंय काय? असा प्रश्न पडतो.

गु सी मधे अमिताभचा मेकअप बघायला फारच खटकला. त्या जाड भिंगाच्या चष्म्यामुळे आणि मोठ्या नाकामुळे चेहर्‍यावर काहीच भाव दिसत नाहीत.
लालची, बेरकी म्हातारा (इथे साळसूद मधला भार्गव(दिलीप प्रभावळकर) खूप आठवला) मस्त उभा करता आला असता.

anne hathaway आणि robert de niro चा the intern पाहिला अमेझॉन प्राईमवर
मस्त चित्रपट आहे . हलकाफुलका .
दीपिका पदुकोण आणि ऋषी कपूरचा हिंदी रिमेक येणार होता यावर . पण आता बारगळल अस दिसतेय.

Rajkumar rao cha..TRAPPED pahila..hero eka band bldg..madhlya flatmadhe..barech mahine adkun padto..to jivant rahanyasathi kay kay karto te baghun angavar kata ala....

गुलाबो सिताबो १० मिनिटाच्यावर नाही बघू शकले. अमिताभ चे डायलॉग काहीच समजत नव्हते तोंडातल्या तोंडात. पुढे बघायला काही इंट्रेस्टच नाही आला. इथले कमेंट्स वाचून बरंच वाटतंय नाही पाहिला ते.

लालची, बेरकी म्हातारा (इथे साळसूद मधला भार्गव(दिलीप प्रभावळकर) खूप आठवला) मस्त उभा करता आला असता.>>>>

मूर्ख म्हातारा वाटतो, लालची व बेरकी अजिबात नाही..
पूर्ण आयुष्य फुकट घालवतो उगीच Happy Happy .

Rajkumar rao cha..TRAPPED pahila..hero eka band bldg..madhlya flatmadhe..barech mahine adkun padto..to jivant rahanyasathi kay kay karto te baghun angavar kata ala....>>>> बरेच महिने नहिये तो अडकुन पडलेला, आठवडा भरच अडकलेला असतो.

मला आवडला गुलाबो सिताबो.

शूजित सरकारचा म्हणून जरा जास्त अपेक्षा होती. तेवढी पुर्ण नाही झाली. यावेळेस जरा अनावश्यक पात्रे आणि त्यांच्या कथा आल्या आहेत असे वाटले.

Piku, October, vicky donor, madras cafe सारखी गोळीबंद मांडणी नाही.

पण तरी चित्रपट आवडला. गेली कित्येक महिने दुसरं काही बरं म्हणण्यालायक पण बघण्यात आले नसल्यामुळे असेल कदाचित.

Trapped मध्ये एखादा आठवडा च अडकून पडतो. चित्रपट आणि राजकुमार चा अभिनय सुरेख, त्या परिस्थितीत कुणीही random व्यक्ती वागेल तसाच वागतो तो त्यामुळे खूप नैसर्गिक वाटला.
बादवे, गुलाबो सिताबो अगदीच बोरिंग, ना धड कथा, ना धड शेवट, acting म्हणावी तर बरेचदा अमिताभ चे संवाद ऐकूच येत नाही स्पष्टपणे. आयुष्यमान बहुदा यूपी side च्या रोल मध्ये प्रतिमाबद्ध होणार लवकरच...

हाऊस नेक्स्ट डोअर पाहा. रविवारी पाहिला तर अजूनच उत्तम ... सूर्यग्रहण असल्याने जास्तच प्रभावी वाटेल.

मूर्ख म्हातारा वाटतो, लालची व बेरकी अजिबात नाही..>> होना. लालची, बेरकी दाखवता आला असता. पण फक्त मूर्ख वाटला.
अजून आहेच का, अजून किती उरलाय, आता फक्त ५ मि. करत चित्रपट(३ दिवसात) संपवला.

आज नेफ्लि वर बुलबुल पाहिला. कुणाची रेको नव्हती पण टॉप 10 ट्रेंडिंग मध्ये दाखवत होते म्हणून पाहिला. मुव्ही जबरदस्त आहे, एकतर पिरियड फिल्म आहे 1880 च्या काळातली. आणि टिपिकल बंगाली वातावरण, हवेल्या, घोडेगाड्या, स्वातंत्र्यपूर्व वातावरण भारावून टाकतं. आणि त्यात कथाही बांधीव आहे.

सुशांत सिन्ग चा ब्योमकेश बक्षी बघितला .
लहानपणापासून रजत कपूरचा बोब्म्केश डोक्यात आहे . त्यामुळे सुरुवातीला त्रास झाला . Happy
पण ठीक आहे . जुनं बंगाल बघायला आवडला .
सगळे धागे जुळवताना दमछाक होते , पण करमणूक झाली .

न्यूटन : भारी सिनेमा. राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अंजली पाटील, रघुवीर यादव. स्टोरी झकास, लोकेशन्स झकास. काही मार्मिक सीन्स मजा आणतात.

कारवां : इरफान खान, दलकेर (उच्चार?) सलमान, मिथिला पालकर :
सिनेमा स्क्रिप्टमध्ये गंडलेला वाटला. आणखी क्रिस्प आणि वेगवान हवा होता. इरफानचं पात्रही जरा गंडलेलं आहे. मि.पा.ला फारसं काम नाही.
पण द.सलमानचं अ‍ॅक्टिंग खूप आवडलं. त्याचा स्क्रीन प्रेझेंस झकास आहे. तो साऊथचा हिरो आहे हे माहिती नव्हतं. त्याला हिंदीत चांगल्या भूमिका मिळायला हव्यात.

गर्लफ्रेंड (मराठी) : बर्‍याच दिवसांनी मराठीत काहीतरी वेगळं आणि फ्रेश बघायला मिळालं. स्टोरी ट्रीटमेंट आवडली. कॅमेरावर्क, दिग्दर्शन छान आहे. अमेय वाघने फक्त सिनेमे करावेत. सई ताम्हनकरचं पात्र जरासं गूढ ठेवलं आहे. तिनेही चांगलं काम केलंय. पण आधीच्या सिनेमांपेक्षा यात तिचा चेहरा ओढलेला वाटला.

हे तीनही सिनेमे प्राइमवर पाहिले.

मामूटी चे लांग फॉर्म मोहम्मद कुट्टी>>>>> मग???

मामुटी कित्येक वर्षे आवडता आहे. मामुटी व मोहनलाल हे दोघेही प्रचंड आवडतात. टीव्हीवर दुपारी प्रादेशिक भाषेतलय चित्रपटांमुळे यांची ओळख झाली.

दलकेर सलमान तिकडचा सुपरस्टार आहे. काम छान करतो. महानटीमध्ये पाहिलाय.

प्रत्येक दाक्षिणात्य अभिनेता तिकडचा सुपरस्टार आहे असं म्हणायची फॅशन आहे आजकाल ....
डुलकर सलमान सुपरस्टार वगैरे काही नाहीय...
फ्युचर सुपरस्टार ?? मेबी...

"प्रत्येक दाक्षिणात्य अभिनेता तिकडचा सुपरस्टार आहे असं म्हणायची फॅशन आहे आजकाल ....
डुलकर सलमान सुपरस्टार वगैरे काही नाहीय..." --> त्यांंच्या फिल्म्स मधे आपलेपणा वाटतच नाही यार... रजनीकांत पर्यंत ठीक होतं. नंंतरचे सगळे हीरो तसलीच पोकळ हाणामारी करायाला लागले. मला तर एकही नाही आवडत. आयला सोलापूरच्या कोणी वाचलं, तर अक्खि तलगू गॅंग घरात घुसून मारलं मला ! पण खरय ते खरय त्यांचे अ‍ॅक्टर्स फारच रफ आहेत हा!हा! हा!
एकालाही धड रोमॅन्स येत नाय.
त्यामानाने कान्नड मुव्हीज प्रेफर करेन!! त्यातले लोक खरी अ‍ॅक्टिंग करतात

Pages