एक वाटी काबुली चणे, २ मध्यम आकाराचे कांदे, एक मोठा टॉमेटो, एक इंच आल्याचा तुकडा, २-३ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, १ चमचा गरम मसाला, १ चमचा जीरेपुड, २ चमचे छोले मसाला, एक चमचा आमचुर पावडर, हळद, मीठ
काबुली चणे रात्रभर भिजवत ठेवावेत. सकाळी साधारण: १५-२० मिनीट कुकरमध्ये मीठ घालून कमी पाण्यात शिजवून घ्यावेत.
एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा, टॉमेटो, हिरव्या मिरच्या आणि आलं काढावं. त्यात हे शिजलेले चणे अर्धवट मॅश करून घालावेत. आता बाकीचे सगळे मसाले कपभर पाण्यात मिक्स करून छोल्यांमध्ये घालावे. गरज असेल तर थोडं मीठ घालावं. गॅसवर ठेवून कमी आचेवर १५-२० मिनीट किंवा त्यापेक्षा जास्तही शिजू द्यावे.
मधून अधून हलवत रहावं. पाणी आटल्यास वरून अजून थोडं पाणी घालता येईल. याची कन्सिसटंसी पावभाजीच्या भाजीसारखी असते. जितका जास्तवेळ गॅसवर हे शिजेल तितकी छान चव येते. वरून कोथिंबीर घालायची. हवं असल्यास कच्चा कांदा उभा चिरून वर घालता येईल.
हे असे छोले इथे कुलच्यांबरोबर खायला मिळतात. बॉन या कंपनीचे रेडीमेड कुलचे बेकरी सेक्शनमध्ये मिळतात. (मला औरंगाबादला पण मिळाले होते. ) तव्यावर बटर लावून हे कुलचे गरम करायचे आणि त्याबरोबर हे छोले खायचे. सोबत मिठी किंवा नमकीन लस्सी आणि किसलेल्या मुळ्याची कोशिंबीर.
हे छोले करताना तेल अजिबात घालायचे नाही. याची चव हे जसंजसे शिजत जातात तसतशी वाढत जाते. बाहेर हे चोले ज्या भांड्यात बनवतात ते पुर्णवेळ गॅसवर असते.
मसाल्याचं प्रमाण चव घेवून कमी जास्त करता येतं.
मसाला मिक्स करून शिजवताना गॅसऐवजी मायक्रोवेव्हमध्ये शिजवले तर १०-१५ मिनीटं लागतात.
हरभरे वापरून असंच लागेल का
हरभरे वापरून असंच लागेल का
काल करून पाहिले. इथे
काल करून पाहिले. इथे म्हणल्याप्रमाणे तेल घातले नाही असे अजिबात जाणवले नाही. खाण्याच्या नादात फोटो काढायचा मात्र राहून गेला. पाककृतीसाठी धन्यवाद.
हरबऱ्याची (की हरभऱ्याची)
हरबऱ्याची (की हरभऱ्याची) मुळात चव वेगळी असते आणि छोलयांची चव वेगळी.
पण छान लागेल.
मी हा प्रयोग काबुली चणे आणि
मी हा प्रयोग काबुली चणे आणि मागच्या कुठल्यातरी पानावर (याच धाग्यात) मंजूडीनी केल्याप्रमाणे चवळ्यांवर केला आहे. दोन्हीही धान्ये या प्रकारानी शिजवून उ त्त म लागतात.
देशी हरबर्यांवर प्रयोगही चांगला लागेल असं वाटतं आहे.
हरबरे या पद्धतीने केले
हरबरे या पद्धतीने केले
थोड़े कॉर्न घातले होते
हरब्रे आधी शिजवून घेतले, कॉर्न तसेच टाकले
मस्त दिसतंय रंगीबेरंगी ताट
मस्त दिसतंय रंगीबेरंगी ताट
मस्त फोटो .
मस्त फोटो .
तो पापड डायरेक्ट गॅस वर भाजला काय ?
हो
हो
मला ते लाल चणे पुढच्यावेळी
मला ते लाल चणे पुढच्यावेळी विकत आणावे लागतील. यम्म
आज केले, आवडले. सोपे आहेत
आज केले, आवडले. सोपे आहेत करायला. धन्यवाद अल्पना.
छोले बनताना
छोले बनताना
छोले आणि लच्छा पराठा(डेकोरेशन केलेले नाहीय, घरात काही नाहीये )
राजमा सुरु आहे
राजमा सुरु आहे
गेल्या आठवड्यात छोले
गेल्या आठवड्यात छोले बनवण्याचा बेत केला .
मी काहीतरी कामात अडकले , जेवायला उशीर होईल म्हणून साबानी तोपर्यन्त कांदा टोमॅटोची पेस्ट बनवून ठेवली .
त्या फोडणीला घालणारच होत्या पण मी म्हटलं राहू दे मी करते .
ती पेस्ट तेलावर वगैरे न परतता तशीच मिक्स केली आणि शिजवले. छोले तितकेच मस्त बनले .
मला मसालेदार , तर्रीवाले छोले आता आवडतच नाहीत .
Swasti, kandyachi peat ugra
Swasti, kandyachi peat ugra laht nahi ka
मस्तच बिनतेलातील रेसिपी! मी
मस्तच बिनतेलातील रेसिपी! मी बिनतेलातील करतो पण जरा वेगळ्या प्रकारे.
आज या पद्धतीने छोले केले.
आज या पद्धतीने छोले केले. आवडले, म्हणजे याला रिपीट व्हॅल्यू आहे इतके आवडले
Swasti, kandyachi peat ugra
Swasti, kandyachi peat ugra laht nahi ka >>> नाही देवकी . मलाही तीच भिती होती .
पण अजिबात कच्ची लागत नाही .
O.k.
O.k.
लिंक त्या बटाट्याच्या
लिंक त्या बटाट्याच्या भाजीच्या धाग्यात दिसली. छोले होतेच घरी तर काल करून पाहिली. एकदम भन्नाट झाले. जवळ जवळ १ तास रटरटत ठेवली होती. बायडीच्या सजेशन नुसार नंतर बटर घातले - स्वर्गीय.
अल्पना, काल मी तुमच्या या
अल्पना, काल मी तुमच्या या कृतीने छोले केले. छान चव आली.
आधी कांदा आणि टोमॅटो शिजेल की नाही असे वाटत होते. म्हणून 45 मिनिटे शिजवले. नीट शिजले होते.
वेगळी चव आवडली.
आमच्याकडे ही रेसिपी हमखास
आमच्याकडे ही रेसिपी हमखास होते हल्ली.
साधारणपणे यात थोडी चहापावडर
साधारणपणे यात थोडी चहापावडर उकळुन (कोरा चहा) ते पाणी पण टाकतात नॉर्थकडे.
आमच्याकडे ही रेसिपी मधून मधून
आमच्याकडे ही रेसिपी मधून मधून घडत असते
छान. करून बघेन. आता सगळ्याच
छान. करून बघेन. आता तज्ञ मंडळींना सरका सांगून सगळ्याच डाळी अशापद्धतीने करायला हव्यात.
मी मधे एकदा टीव्ही वर बघून छोल्याची डाळ (आमटी) केली होती. रेसिपी साधारण वरच्यासारखीच पण उकडलेले छोले, कांदा टोमॅटो मिक्सर मधून बारीक करून घेतल होत. आणि मला सगळ्या पदार्थात मिरी टाकायला आवडते म्हणून तीही टाकली होती.
सुपर टेस्टी झाली होती. सर्व तज्ञ मंडळींनी तोंडात बोट घातली होती.
विक्रमसिंह, अगदी बरोबर! मी
विक्रमसिंह, अगदी बरोबर! मी मध्यंतरी रात्रभर भिजवलेली चवळी मातीच्या भांड्यात अशा प्रकारे शिजवली होती. वेळ लागला पण मस्त झाली होती.
छोल्याची डाळ रेसिपी येउद्या.
छोल्याची डाळ रेसिपी येउद्या.
Pages