अमृतसरी छोले

Submitted by अल्पना on 20 June, 2011 - 06:14
amritsari chhole
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

एक वाटी काबुली चणे, २ मध्यम आकाराचे कांदे, एक मोठा टॉमेटो, एक इंच आल्याचा तुकडा, २-३ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, १ चमचा गरम मसाला, १ चमचा जीरेपुड, २ चमचे छोले मसाला, एक चमचा आमचुर पावडर, हळद, मीठ

क्रमवार पाककृती: 

काबुली चणे रात्रभर भिजवत ठेवावेत. सकाळी साधारण: १५-२० मिनीट कुकरमध्ये मीठ घालून कमी पाण्यात शिजवून घ्यावेत.

एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा, टॉमेटो, हिरव्या मिरच्या आणि आलं काढावं. त्यात हे शिजलेले चणे अर्धवट मॅश करून घालावेत. आता बाकीचे सगळे मसाले कपभर पाण्यात मिक्स करून छोल्यांमध्ये घालावे. गरज असेल तर थोडं मीठ घालावं. गॅसवर ठेवून कमी आचेवर १५-२० मिनीट किंवा त्यापेक्षा जास्तही शिजू द्यावे.

मधून अधून हलवत रहावं. पाणी आटल्यास वरून अजून थोडं पाणी घालता येईल. याची कन्सिसटंसी पावभाजीच्या भाजीसारखी असते. जितका जास्तवेळ गॅसवर हे शिजेल तितकी छान चव येते. वरून कोथिंबीर घालायची. हवं असल्यास कच्चा कांदा उभा चिरून वर घालता येईल.

वाढणी/प्रमाण: 
४ जण
अधिक टिपा: 

हे असे छोले इथे कुलच्यांबरोबर खायला मिळतात. बॉन या कंपनीचे रेडीमेड कुलचे बेकरी सेक्शनमध्ये मिळतात. (मला औरंगाबादला पण मिळाले होते. ) तव्यावर बटर लावून हे कुलचे गरम करायचे आणि त्याबरोबर हे छोले खायचे. सोबत मिठी किंवा नमकीन लस्सी आणि किसलेल्या मुळ्याची कोशिंबीर.

हे छोले करताना तेल अजिबात घालायचे नाही. याची चव हे जसंजसे शिजत जातात तसतशी वाढत जाते. बाहेर हे चोले ज्या भांड्यात बनवतात ते पुर्णवेळ गॅसवर असते.

मसाल्याचं प्रमाण चव घेवून कमी जास्त करता येतं. Happy

मसाला मिक्स करून शिजवताना गॅसऐवजी मायक्रोवेव्हमध्ये शिजवले तर १०-१५ मिनीटं लागतात.

माहितीचा स्रोत: 
जाऊ
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी नेहमी असेच छोले बनवते. पण त्यांना अमृतसरी छोले म्हणतात हे मला माहिती नव्हतं Proud
माझ्या एका हिमाचली मैत्रीणीने मला ही रेसिपी दिली होती.
खाताना सांगितल्याशिवाय कळतही नाही की यात तेल वापरलेलं नाही. Happy

ऑस्सम होतात हे अमृतसरी छोले! अनेक धन्यवाद अल्पना.
(आता छोल्यांच्या जागी सगळी कडधान्ये करून पाहणार आहे. चवीबाबत इथे नंतर अपडेट देईन.)

अल्पना: हा प्रकार घरी जबरदस्त म्हणजे....अगदी जबरदस्त हिट झाला. रेसिपी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी MDH चा चना मसाला वापरला.

आज या पद्धतीने राजमा करून पाहिलेत. त्यात मूठभर हिरवे मूगही टाकले होते.
तर... ही भाजी + भाकरी + जिरा राईस + कांदा-लिंबू तत्सम सॅलेड = अफाट सुंदर लागले.

ही रेसिपी मिळाल्यापासून छोले असेच करते. stove top आणि slow cooker दोन्ही try करुन झालेत. slow cooker मधेपण छोले आधी साध्या cooker मधून शिजवून घेते. Personally मला stove stop वर केलेले जास्त आवडतात.

gas बन्द करायच्या आधी मी १ च लोणी आणि कसूरी मेथी (microwave - ३० sec crisp करुन) वरती चुरून टाकते.

अल्पना - रेसिपीसाठी धन्यवाद.

अजून १ tip, छोले cooker मधे शिजवताना मी ऐक tea-bag आणि दालचिनी ची काडी पण टाकते. चहाने color छान येतो आणि दालचिनीने flavor.

तेच ना. लोक पेशावरी, काश्मिरी काहीही म्हणत होते. किती अडाणीपणा!
अल्पना , तुझी रेसिपी हिट्ट आहे एकदम! थॅन्क्स !

आमच्या घरीपण असेच करतो छोले. छानच होतात. तेल नाही हे सांगुनपण समजत नाही इतके खमंग होतात. . अल्पना, एक मस्त पाकृतीबद्दल खुप आभार..
तु एक लग्नातली वांग्याची भाजीपण लिहिली आहेस ती सार्वजनिक कर ना. लॉगॉन न करता दिसत नाही ती.

बाराकर अजिबात मागे पुढे पहात नाहीत >>> बाराकर नसलेल्या दह्याची आणि पाण्याची सुद्धा तारीफ करायचं सोडत नाहीत Wink

भारी झाले होते छोले.

मला आठवली नटराजची जाहिरात. Happy

सुनिधी, लग्नातली वांग्याची भाजी सीमाची आहे.

बाराकर नसलेल्या दह्याची आणि पाण्याची सुद्धा तारीफ करायचं सोडत नाहीत >>> अय्यो, मग आता मी टडोपा परत घेवू की काय? Proud

ये मॅच कि आखरी गेन्द और ये लगा सिक्सर , नटराज फिर चँपियन ! ( हे अमीन सयानीच्या आवजात, स्क्रिन वर अ‍ॅनिमेटेड पेन्सिल सिक्सर मारताना )

अतिशय सुंदर लागतात हे छोले नुसतेच खायला पण मस्त लागतात …

हीच सेम रेसिपी चवळी किंवा बरबटी वापरून पण मस्त होते पण बरबटी फारच गळू द्यायची नाही… कुकर मध्ये वाफावतांना खाली कुकर मध्ये पाणी टाकायचं बरबटीत नाही टाकायचं आणि मसाले टाकून शिजवतांना अगदी थोड्या पाण्यात शिजवायची …खायला घेतांना वरून कच्ची काकडी आणि लिंबू पिळायच. अप्रतिम चव येते

आज करणार आहे. फोटो टाकीन.
बरबटी शब्द पहिल्यांदा ऐकला.
चवळीची प्राजक्ता तु म्हणतेस तस नक्की करुन पहाणार.

Pages