अमृतसरी छोले

Submitted by अल्पना on 20 June, 2011 - 06:14
amritsari chhole
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

एक वाटी काबुली चणे, २ मध्यम आकाराचे कांदे, एक मोठा टॉमेटो, एक इंच आल्याचा तुकडा, २-३ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, १ चमचा गरम मसाला, १ चमचा जीरेपुड, २ चमचे छोले मसाला, एक चमचा आमचुर पावडर, हळद, मीठ

क्रमवार पाककृती: 

काबुली चणे रात्रभर भिजवत ठेवावेत. सकाळी साधारण: १५-२० मिनीट कुकरमध्ये मीठ घालून कमी पाण्यात शिजवून घ्यावेत.

एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा, टॉमेटो, हिरव्या मिरच्या आणि आलं काढावं. त्यात हे शिजलेले चणे अर्धवट मॅश करून घालावेत. आता बाकीचे सगळे मसाले कपभर पाण्यात मिक्स करून छोल्यांमध्ये घालावे. गरज असेल तर थोडं मीठ घालावं. गॅसवर ठेवून कमी आचेवर १५-२० मिनीट किंवा त्यापेक्षा जास्तही शिजू द्यावे.

मधून अधून हलवत रहावं. पाणी आटल्यास वरून अजून थोडं पाणी घालता येईल. याची कन्सिसटंसी पावभाजीच्या भाजीसारखी असते. जितका जास्तवेळ गॅसवर हे शिजेल तितकी छान चव येते. वरून कोथिंबीर घालायची. हवं असल्यास कच्चा कांदा उभा चिरून वर घालता येईल.

वाढणी/प्रमाण: 
४ जण
अधिक टिपा: 

हे असे छोले इथे कुलच्यांबरोबर खायला मिळतात. बॉन या कंपनीचे रेडीमेड कुलचे बेकरी सेक्शनमध्ये मिळतात. (मला औरंगाबादला पण मिळाले होते. ) तव्यावर बटर लावून हे कुलचे गरम करायचे आणि त्याबरोबर हे छोले खायचे. सोबत मिठी किंवा नमकीन लस्सी आणि किसलेल्या मुळ्याची कोशिंबीर.

हे छोले करताना तेल अजिबात घालायचे नाही. याची चव हे जसंजसे शिजत जातात तसतशी वाढत जाते. बाहेर हे चोले ज्या भांड्यात बनवतात ते पुर्णवेळ गॅसवर असते.

मसाल्याचं प्रमाण चव घेवून कमी जास्त करता येतं. Happy

मसाला मिक्स करून शिजवताना गॅसऐवजी मायक्रोवेव्हमध्ये शिजवले तर १०-१५ मिनीटं लागतात.

माहितीचा स्रोत: 
जाऊ
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरबटी म्हणजे चवळी नाही दिसायला सारखे असले तरी
जी बारीक असते ती चवळी आणि चण्याच्या आकाराची जाड असते ती बरबटी दोन्हीची चव वेगळी असते (माझ्या माहितीप्रमाणे)

आज केले मी हे छोले. खूप छान चव आली होती. विशेष म्हणजे तेल नसल्याने छोले, कांदा, टोमॅटो , सगळे मसाले यांचा ओरिजिनल स्वाद खूप मस्त वाटला. घरूनही पसंती मिळाली आहे.

आहा..!!

या रविवारी नक्की करणार. रेडिमेड कुलचे हायपरसिटीत मिळतात.... मोर ला पण पाहिले होते....

त्या पेक्षा घरचे करुन पहाणार.... घरगुती नान बरोबर पण चांगले लागतिल....

कुलचे आणले होते काल म्हणून आज तुझ्या रेसीपीने छोले बनवले. अगदी authentic चव आली. आज तर छोले मसाला पण नव्हता म्हणून मी एक चमचा किचन किंग मसाला आणि थोडीशी धनेपूड घातली... मस्त चव आली. .. Happy

इथल्या कुलच्यांचा फोटो टाकणार होते पण त्या आधीच फस्त झाले... Lol

आज केले होते हे छोले.. भन्नाट झाले! कॅनचे छोले वापरल्यामुळे लिटरली सकाळी घाईच्या वेळेत १० मिनिटात रेडी!
नेहेमी करणार आता..

बायदवे मी किचन किंग अन रजवाडी गरम मसाला वापरला.

IMG_4208.JPG

मी पण मध्यंतरी एका घरगुती पार्टीसाठी केले होते. रेसिपी तंतोतंत फॅालो करुन. मस्त झाले होते. तोंडल्याची काजु घालुन भाजी , मि. लोणच, कां,का,टो वगैरे सॅलड, टो॥ सार, ढोकळा, गुलाबजाम, भात, पोळ्या दही ताक आणि हे छोले असा बेत होता़ छोले सगळ्यात हिट झाले. पार्टी नंतर " काकू छो ले अॅासम " असे मेसेज आले मला वॅा. अॅ वर. धन्यवाद अल्पना.

ममो, मेनू आहे की मस्करी! कसला तोंपासू आहे! सगळं तुम्ही केलं घरी? __/\__

हे छोले हिट्ट आहेत. छोले न आवडणारी घरची मंडळीपण हे आवडीने खाऊ लागली आहेत.

हो प्रज्ञा, मीच सगळं घरीच केलं होतं.
नवीन लग्न झालेली पुतणी, तिचा नवरा आणि इतर काही मंड़ळी आली होती म्हणून घातला होता घाट.
सांगायची गोष्ट म्हणजे एवढ्या पदार्थात सर्वात आवड़ले ते हे छोले.

बरं, एक बेसिक प्रश्न, चने आणि छोले ह्यात काय फरक? मला दोन्ही चवीतही सारखेच वाटतात. चना मसाला घातला की चने आणि छोले मसाला घातला की छोले म्हणायचं का?

ओह ओके, म्हणजे माझ्या बेसिकमध्येच प्रॉब्लेम आहे तर..
माझ्याकडे सध्या चना मसाला असल्यामुळे मी काबुली चणे/गार्बेन्झो बीन्स वापरून चना मसाला करते आहे.

चने/चणे म्हणजे हरभरे. काबुली चणे म्हणजे छोले. >>> सिंडी, ते मराठीत. हॉटेलमध्ये चना मसाला म्हणजे छोलेच आणतात. हरभर्‍यांना काला चना वगैरे म्हणत असतील. अल्पना सांगेल बरोबर.

अमृतसरी छोले बर्‍याऽच महिन्यांत झाले नव्हते. आता करते लवकरच.

मी केले आज. छान झाले. फक्त शिजवताना सवईने एक लवंग आणि दलचीनीचा तुकडा घातला तेवढीच काय ती वेगळी चव. बाकी सेमटुसेम केले आणि आवडले.

आहाहा मस्तच आहे आणि सोपी, सुटसुटीत कृती.

सर्वांचे फोटो छान आहेत.

ब्राऊन हरबरे आहेत घरात. करायला हवी पुढच्या आठवड्यात. छोले मसाला मात्र आणावा लागेल. आमचुर पावडर नाहीये, पण लिंबु रस आहे. करेनच.

मी केली आज हि रेसिपी. ब्राऊन चणे वापरून. मस्त झाले. नवऱ्याला खूप आवडले अमृतसरी चणे. कुलचे नवऱ्याने ठाण्याच्या एका restorant मधून आणले. आता छोले आणून करेन.

धन्यवाद अल्पना.

आज छोलेच केले (अमृतसरी छोले) आणि पॅटीस. मस्त झाले होते छोले.

जोडीला पाव आणले (नव-याला आवडतात म्हणून). पण ते उरले. नवरा म्हणाला. छोले-पॅटीस मस्तच लागतंय. पाव बटरवर भाजले. थोडे खाल्ले नव-याने, मी एकच घेतला. मला छोले-पॅटीसच खायचं होतं. पाव फारसे नाही आवडत मला.

मला गणपतीला हे छोले ५० लोकांकरिता बनवायचे आहेत. मी एकदा बनवले आहेत खुप छान झाले होते पन प्रमाण कमी होते आता १ किलो चण्यासाठी सगळे प्रमाण सांगा प्लीज.

सगुना,
एक किलो चणे आणा, ते किती वाट्या होतात ते मोजा आणि मग त्या प्रमाणात इतर साहित्य घ्या.

ललिता-प्रिती तुम्ही सांगितल्याप्रमाणे चने मोजुन घेतले. ११ वाटी चने घेतले. छोले हिट्ट झाले धन्यवाद अल्पनाजी.
सोबत भटुरे केले होते. सगळ्याना बिना तेलाची बनवली आहे हे सांगूनहि खरे वाटत नव्हते.

गेल्या आठवड्यात करून बघितले . नेहमीच्या मसालेदार छोल्यान्पेक्शा ही सौम्य चव फार आवडली .
आणि करायला फार सोपे !

धन्यवाद Happy

गेल्या महिन्यात ऋषिकेशला एका रोडसाईड स्टॉलवर छोले कुलचे खाल्लेले तेव्हा अल्पनाची रेसिपी आठवलेली.

आज ह्या रेसिपीने घरी छोले कुलचे बनवले, लेकीने सेम ऋषीकेशवाली चव म्हणून मान हलवल्यावर केल्याचे सार्थक झाल्यासारझे वाटले.

थँक्स अल्पना.

Mee chukun mirchi powder takali aate khup tikhat zalet. Tikhat kani karayala kahi karata yeil ka....

रे, बटाटा चिरून जरा तेलात तव्यावर खरपूस करून घेणे, थोडं मीठ लावून. नंतर तोंडाला सुटलेलं पाणी गप गिळून हा खरपूस बटाटा छोल्यांत मिसळणे.

Pages