अमेरिकेत मिनिआपोलिस येथे काही दिवसांपूर्वी जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. अटक करत असताना जॉर्ज प्रतिकार करत नव्हता, त्याच्याकडे शस्त्र नव्हते. त्याला ४ सशस्त्र पोलिसांनी घेरले होते. त्यापैकी एकाने त्याला जमिनीवर दाबून स्वतःचा गुडघा त्याच्या मानेवर दाबून धरला होता. आपण गुदमरतोय असे जॉर्ज जिवानिशी ओरडत होता हे येणार्या जाणार्या लोकांनी घेतलेल्या फोन व्हिडिओ मधे स्पष्ट दिसतेय, ऐकू येतेय.
या घटनेनंतर अमेरिकेत अनेक शहरांमध्ये या घटनेविरोधात निदर्शने घडत आहेत. अनेक शांततापूर्ण निदर्शने होत असतानाच काही ठिकाणी निदर्शकांनीदेखिल हिंसा , जाळपोळ सुरु केल्याचेही दुर्दैवाने पहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी परिस्थितीचा फायदा घेऊन लूटमारीच्या घटनाही घडल्या आहेत.
पोलिसांच्याकडून घडणार्या हिंसेची ही पहिलीच घटना नाही. कृष्णवर्णीयांसोबत होणार्या हिंसेचीही ही पहिली घटना नाही.
https://mappingpoliceviolence.org/
https://policeviolencereport.org/
पण या आणि इतर अनेक साइट्स च्या डेटा नुसार व्हाइट किंवा इतर कोणत्याही वर्णापेक्षा कृष्णवर्णीयांसोबत होणार्या हिंसेचे प्रमाण खूप जास्त आहे. अर्थात नेहमी ( डोळे उघडे ठेवून) बातम्या बघत असाल तर अशा स्टॅटिस्टिक्सच्या आधाराची गरज ही नाही.
**या विषयावर चर्चा NRI आणि समाजाचे दुटप्पी धोरण इथे सुरु झाली हिती. तीच सुरु ठेवायला म्हणून हा धागा उघडतेय.
शेंडेनक्षत्र, तुमची arguments
शेंडेनक्षत्र, तुमची arguments इतकी polar का आहेत? एखाद्या व्यक्तीने या घटनेचा निषेध केला म्हणजे तिचा न्याय यंत्रणेवर विश्वास नाही, ती व्यक्ती दंगलींचं, लूटीचं, जाळपोळीचं समर्थन करता असं सगळं तुम्ही मनानी ठरवून टाकलं आहे का? कारण तसं काही नाहीये. पण तुमची जर bigger picture पहाण्याची तयारीच नसेल तर मात्र तुम्ही तर्काने सुट्या सुट्या घटनांवर प्रश्न विचारत रहा. Those answers will not lead you anywhere because you are asking wrong set of questions. If you are really interested in a long-term solution then you need to ask why people are so angry? Why people want to burn down businesses in their own neighborhood? Are blacks born criminals? Why hasn't Civil rights act and affirmative action been enough to change the mindset of the people?
If you want safer neighborhoods then helping weaker sections of the society to get better education, better jobs will reduce the crime rate or helping the police to become more powerful do the job?
Maya Angelou once said, "People will forget what you said, people will forget what you did, but people will never forget how you made them feel." African Americans have been made to feel the worst for centuries it is very difficult to forget that. If we all want a sustainable solution then we have to do something that will make everybody feel better about themselves.
I really don't get the point of your criticism. या आंदोलनावर, दंगलींवर, गुन्हेगारीवर टीका करणं सोप्पं आहे. You are just "othering" people which is no different from what was done in the past and then you will have the same consequences as we have seen before.
गुन्हेगारीची केवळ आकडेवारी
गुन्हेगारीची केवळ आकडेवारी पाहून अमूक एक वंश ( किंवा जात ) जेनेटिकली गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे असा निष्कर्ष काढणे चुकिचे आहे. त्या आकडेवारीत काही बायसेस नाहीत ना ? हेही तपासावे लागेल.
पारधी लोकांवर ब्रिटिशांनी गुन्हेगारी जमात असा शिक्का मारला, त्यामुळे त्यांना गावाच्या वेशीत प्रवेश नाकारत असत. त्यामुळे त्यांची मुले शिक्षणापासून दूर राहिली, व ते एक दुष्टचक्र किंवा सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी झाली.
जिज्ञासा व सीमंतिनी यांच्या
जिज्ञासा व सीमंतिनी यांच्या पोस्ट्स आवडल्या.
Hidden Figures इथे बहुतेकांनी वाचलं असेलच, अतिशय वाचनीय सत्य घटनाक्रम आहे. त्याच नावाची फिल्मपण आहे. नासा मध्ये काम करणाऱ्या ब्लॅक महिलांबद्दल आहे.
आधीच ब्लॅक, त्यात महिला. महत्प्रयासाने नासामध्ये काम करायची संधी मिळते. कसलंही आरक्षण नाही. शिक्षणात नाही, नोकरीत नाही. निवडीच्या निकषांमध्ये कसलीही सवलत तर नाहीच उलट गोऱ्या लोकांपेक्षा यांनी थोडं जास्त सरस असायला हवं तरच कोणी त्यांच्या तिथे असण्यावर आक्षेप घेणार नाही हे सतत डोक्यात ठेवून मेहनत करत राहतात. लंच रूम, बाथरूम इथेही कामाच्या ठिकाणी भेदभाव केला जातो. तरीही या महिला मिळालेल्या संधीचं सोनं करतात. कसलीही entitlement त्यांच्या डोक्यात, वागण्यात दिसत नाही. Total respect !
>>
>>
गुन्हेगारीची केवळ आकडेवारी पाहून अमूक एक वंश ( किंवा जात ) जेनेटिकली गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे असा निष्कर्ष काढणे चुकिचे आहे. त्या आकडेवारीत काही बायसेस नाहीत ना ? हेही तपासावे लागेल.
<<
मग तपासा आणि "सुधारित" आकडेवारी सांगा.
<<
पारधी लोकांवर ब्रिटिशांनी गुन्हेगारी जमात असा शिक्का मारला, त्यामुळे त्यांना गावाच्या वेशीत प्रवेश नाकारत असत. त्यामुळे त्यांची मुले शिक्षणापासून दूर राहिली, व ते एक दुष्टचक्र किंवा सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी झाली.
<<
पारधी जातीप्रमाणे काळ्यांना अमेरिकन लोक गुन्हेगारी जमात असा शिक्का मारते आहे का? त्यांना अमेरिकेतील कुठल्या वेशीत आज प्रवेश नाकारला जातो आहे? त्यांना कुठल्या शिक्षणापासून वंचित ठेवले जाते आहे? माझ्या माहितीप्रमाणे काळे बहुसंख्य असणार्या स्कूल डिस्ट्रिक्टांना बाकी डिस्ट्रिक्टांपेक्षा जास्त सरकारी पैसा दिला जातो. कारण विद्यार्थी, पालक पैसा खर्च करू शकत नाहीत.
>>
शेंडेनक्षत्र, तुमची arguments इतकी polar का आहेत? एखाद्या व्यक्तीने या घटनेचा निषेध केला म्हणजे तिचा न्याय यंत्रणेवर विश्वास नाही, ती व्यक्ती दंगलींचं, लूटीचं, जाळपोळीचं समर्थन करता असं सगळं तुम्ही मनानी ठरवून टाकलं आहे का? कारण तसं काही नाहीये. पण तुमची जर bigger picture पहाण्याची तयारीच नसेल तर मात्र तुम्ही तर्काने सुट्या सुट्या घटनांवर प्रश्न विचारत रहा.
<<
हिंसक घटना ह्या आंदोलनाच्या अविभाज्य घटक बनत आहेत. ह्या सुट्या सुट्या घटना नाहीत. त्या घट्टपणे त्या आंदोलनाशी निगडितच आहेत. आंदोलन झाले नसते तर असल्या भयानक हिंसक घटना घडल्याच नसत्या.
साधनशुचिता हा प्रकार ह्या आंदोलनात दिसत नाही. गैर प्रकार घडल्यास आंदोलन थांबवावे असा कुणीही विचार करत नाही. कुठलाही भेदभाव न करणारे, अनेक काळ्यांच्या व इतरांच्या उपजीविकेचे साधन असणारे, लाखो डॉलरची गुंतवणूक असणारे उद्योग काहीही दोष नसताना भस्मसात होत असताना आम्ही त्यांना "सुट्या सुट्या घटना" समजून, दुर्लक्षित करून कुठले तरी बिग पिक्चर पहाण्यात गुंग व्हावे इतका माझा दृष्टीकोन विशाल नाही. क्षमस्व.
हिंसक घटना ह्या आंदोलनाच्या
हिंसक घटना ह्या आंदोलनाच्या अविभाज्य घटक बनत आहेत. ह्या सुट्या सुट्या घटना नाहीत. त्या घट्टपणे त्या आंदोलनाशी निगडितच आहेत. आंदोलन झाले नसते तर असल्या भयानक हिंसक घटना घडल्याच नसत्या. >>>
सिरीयसली? अगेन? १ मुळे २ झाले व २ मधून ३ निघाले. तर तुम्ही सोयीने २ व ३ बद्द्लच बोलताय पुन्हा. १ चे काय? आंदोलन झाले नसते तर हिंसक घटना झाल्या नसत्या. पण रेसिझम नसते तर आंदोलनच झाले नसते.
प्रश्न खुप येत आहेत इथे.
प्रश्न खुप येत आहेत इथे. काही उत्तरे देण्याचा प्रयत्न. उपयोग होईल की नाही ते माहीती नाही, पण थोडी माहीती तरी कळेल लोकांना.
त्यांना अमेरिकेतील कुठल्या वेशीत आज प्रवेश नाकारला जातो आहे? >> https://www.npr.org/2017/05/03/526655831/a-forgotten-history-of-how-the-...
धनि, गीतेबद्दल... सॉरी
धनि, गीतेबद्दल... सॉरी लिंकबद्दल धन्यवाद.
गैरप्रकार घडल्यावर आंदोलन थांबवावे असा विचार कुणी करत नाही कारण गैरप्रकार घडल्यावर गैरप्रकार थांबवावे असा विचार आघाडीवर असलेली माणसे करतात. त्यानुसार ओप्रा ते ओबामा सर्वांनी 'पुढे कसे जावे?' अशा प्रकारचे मार्गदर्शन केले आहे आणि चळवळीस योग्य ते वळण मिळत आहे.
>>
>>
पण रेसिझम नसते तर आंदोलनच झाले नसते.
<<
अजूनही हेच म्हणतो. फ्लॉईडला रेसिज्ममुळे मारले ह्याला काही पुरावा नाही. निव्वळ सामूहिकरित्या काढलेला निष्कर्ष, त्या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी न करताच. ज्या संविधानात बदल करून रेसिज्म बेकायदा ठरवले आणि सगळे समान जाहीर केले ते संविधानही आता रेसिस्ट समजले जाते का?
वादाकरता क्षणभर मानू की तो पोलिस रेसिस्ट होता. मग त्याचा बदला म्हणून ओकलंड, शिकागो, पोर्ट्लंड, सिएटल इथली दुकाने का जाळायची? त्यांनी काय रेसिज्म केले आहे? मिनियापोलिसच्या एका पोलिसाने (समजा) रेसिज्मचा पूर्वग्रह बाळगला तर सगळा देश वेठीस धरून नासधूस का करायची? नासधूस झालेले बहुतेक उद्योग हे डेमॉक्रॅटिक राज्यात आहेत. ह्यातल्या अनेक ठिकाणी उच्चपदावर काळे लोक आहेत. महापौर, पोलिस प्रमुख, लोकप्रतिनिधी हे काळे आहेत. एकंदरीत डेमॉक्रॅट लोक रेसिज्म च्या बाबतीत bending backward म्हणण्याइतके बोटचेपे आहेत. कुठल्याही दृष्टीने त्यांना रेसिज्म ठरवणे मला तरी जमणार नाही. तरी त्या भागात इतकी हिंसक आंदोलने का? उदा. कॅलिफोर्नियात आणखी काय केले पाहिजे म्हणजे आंदोलकांचे समाधान होईल? कॅलिफोर्नियातील राज्याचे, कुठल्या शहराचे सरकार खरोखर रेसिस्ट आहे का?
मुळातली घटनाच रेसिस्ट आहे असे एकतर्फी, घाईघाईने ठरवून पूर्ण देश पेटवणे समर्थनीय कसे?
अशा घटना सतत घडत असतात.
अशा घटना सतत घडत असतात. त्यातली कोणतीतरी एखादी ठिणगीसारखे काम करते. ती स्पेसिफिक घटना रेसिझम ने प्रेरित होती का नाही ते कोर्ट ठरवेल पण लक्षणे तीच आहेत.
लक्षात घ्या - त्या पोलिस ऑफिसरवर रेसिझम चा आरोप करणे हा मुख्य भाग नव्हे. त्याने मर्डर ऑलरेडी केला आहे. तो रेसिझम ने प्रेरित होता की नाही हे दुय्यम आहे. पण व्हाइट पोलिसाने काळ्या व्यक्तीला गुन्ह्याच्या मानाने जास्त शिक्षा तिथल्या तेथे देणे हे कॉमन आहे. हा तसाच प्रकार लोकांना दिसला म्हणून ठिणगी उडाली.
बाकी तुम्ही त्यावरून पुन्हा इथल्या लोकांना तेच प्रश्न विचारत आहात ज्याचे समर्थन मुळातच कोणी केलेले नाही.
>>
>>
पण व्हाइट पोलिसाने काळ्या व्यक्तीला गुन्ह्याच्या मानाने जास्त शिक्षा तिथल्या तेथे देणे हे कॉमन आहे. हा तसाच प्रकार लोकांना दिसला म्हणून ठिणगी उडाली.
<<
गुन्ह्याच्या मानाने जास्त शिक्षा देणे हे काळ्यांच्या बाबतीत कॉमन आहे? अशी आकडेवारी आहे का उपलब्ध? म्हणजे वंशवार पोलिसांच्या हातून झालेले मृत्यू त्यातील काळ्या लोकांचे लक्षणीय प्रमाण अशी कुठली अधिकृत आकडेवारी उपलब्ध आहे का? उदा. अशा प्रकारे मृत्यु पावणारे श्वेतवर्णीय नगण्य आहेत का?
की केवळ काळ्या लोकांची ताकद जास्त असल्यामुळे हे आंदोलन, विध्वंस वगैरे घडले आहे?
आणि ही तथाकथित ठिणगी संपूर्ण देशाला पेटवताना दिसते आहे हे कांड व्यवस्थित नियोजन असल्याशिवाय निव्वळ उत्स्फूर्तपणे घडणार नाही असे मला तरी वाटते.
पोलिस दलाला अशा प्रकारे वेठीस धरण्याचे दुष्परिणाम नजिकच्या काळात दिसणार आहेत.
https://www.startribune.com/seven-minneapolis-police-officers-resign-aft...
अशा प्रकारे पोलिस जर राजीनामे देऊ लागले तर कायदा आणि सुव्यवस्था कोण बघणार? आधीच तुटपुंजे असणारे पोलिस आणखीच दुबळे केले तर कठिण आहे.
गुन्ह्याच्या मानाने जास्त
गुन्ह्याच्या मानाने जास्त शिक्षा देणे हे काळ्यांच्या बाबतीत कॉमन आहे? >>> माझ्या वाक्यातील "तिथल्या तेथे" शब्द वगळू नका स्ट्रॉमॅन उभा करायला.
- शस्त्र नसताना मारले गेलेले
- गाडी चालवताना उगाचच पोलिसांनी थांबवून चौकशी केलेले
- नेबरहूड्स मधे हटकले जाणारे
असे अनेक प्रकार आहेत जेथे काळे हे व्हाइट्स पेक्षा कितीतरी जास्त आहेत. हा या बाफवरचा नवीन शोध नाही. गेली कित्येक वर्षे चर्चेत आहे.
>>
>>
गुन्ह्याच्या मानाने जास्त शिक्षा देणे हे काळ्यांच्या बाबतीत कॉमन आहे? >>> माझ्या वाक्यातील "तिथल्या तेथे" शब्द वगळू नका स्ट्रॉमॅन उभा करायला.
<<
सॉरी, तिथल्या तिथे. पण ती शि़क्षाच आहे कशावरून? पोलिस अटक करताना क्रूरपणे वागतात इतपत म्हणता येईल. ते थेट शिक्षा देऊ इच्छितात का आरोपीला कस्टडीत डांबण्याकरता नको इतका हिंसक उपाय करतात आणि त्यात अनेकदा आरोपी मरतो.
<<
असे अनेक प्रकार आहेत जेथे काळे हे व्हाइट्स पेक्षा कितीतरी जास्त आहेत. हा या बाफवरचा नवीन शोध नाही. गेली कित्येक वर्षे चर्चेत आहे.
<<
अशी आकडेवारी वर्षाप्रमाणे उपलब्ध आहे का? मला सापडलेल्या आकडेवारीत श्वेतवर्णीयांची संख्या जास्त आहे. पण आता प्रमाण कसे मोजणार?
त्या वर्णाच्या गुन्ह्यात सापडलेल्या आरोपींची टक्केवारी का एकूण त्या समुदायाच्या लोकसंख्येची टक्केवारी? कारण गुन्ह्यामधला काळ्या लोकांचा सहभाग जास्त आहे असे एफ बी आयची आकडेवारी सांगते. त्यामुळे त्यातलेच काही पोलिसांच्या हातून मरत असणार. मला अशी स्पष्ट आकडेवारी सापडलेली नाही.
एक उदाहरणः अॅटलांटात एक नशा केलेला काळा माणूस वेंडीजच्या ड्राईव्ह थ्रू मधे झोपला होता. त्याला कारबाहेर काढून डी यू आयच्या आरोपाखाली अटक करायचा प्रयत्न करताच त्याने मारामारी करून, पोलिसाचे टेजर हिसकावले आणि पळून जायचा प्रयत्न केला. एकदा त्याने ते टेझर पोलिसावरही रोखले. मग एका पोलिसाने त्याच्यावर गोळ्या झाडून मारले. हे प्रकरण जॉर्ज फ्लॉईडपेक्षा खूपच वेगळे आहे. इथे सगळा दोष पोलिसाला देता येत नाही. त्या आरोपीने ते टेझर कुठल्या व्यक्तीवर वापरून त्या व्यक्तीचा जीव धोक्यात घातला असता तर पुन्हा त्या पोलिसालाच दोष दिला असता.
आता चर्चेची गाडि "तिथल्या
आता चर्चेची गाडि "तिथल्या तिथे" वर आलीच आहे तर -
१. तिथल्या तिथे घडलेल्या दुर्घटनेत काळे, पांढरे, पिवळे, करडे (ब्राउन) यांचं प्रमाण किती?
२. वर #१ मधे कंप्लाइंग टु पुलिस ऑर्डर किंवा डिसओबेइंग पुलिस ऑर्डर, अॅट टाइम्स रेझिस्टिंग अॅरेस्ट यात का/पां/पि/क यांचं प्रमाण किती?
३. मूळात पुलिस रेझिस्टंस करण्याची गरजच का भासते? कर नाहि त्याला डर कशाला? यात का/पां/पि/क यांच इतर रेसच्या तुलनेत प्रमाण किती? इन दॅट सिच्युएशन, इज रेझिस्टंस टु पुलिस अॅरेस्ट जस्टिफायेबल?
४. स्टँडऑफ सिच्युएशन मधे पुलिस ऑफिसरचा बळी घेण्यात का/पां/पि/क यांचा सहभाग किती? किती का/पां/पि/क पुलिस बळी पडले आहेत?
या चार प्रश्नांसंबंधित इन्साइटफुल डेटा आणि सत्यपरिस्थिती कुठलाहि पुर्वग्रह न बाळगता समजुन घेता आली, तर गुन्हेगारांच्या बाबतीत तरी रेसिझम आणला जावु नये...
या चार प्रश्नांसंबंधित
या चार प्रश्नांसंबंधित इन्साइटफुल डेटा आणि सत्यपरिस्थिती कुठलाहि पुर्वग्रह न बाळगता समजुन घेता आली >>> याबद्दल काहीच विरोध नाही. पण सिस्टीमिक रेसिझम आहे हे काही फक्त डेम्स आणि लिबरल लोकांचेच मत आहे असे नाही. फेन्स वरच्या अनेकांचे आहे. "मॅपिंग पोलिस व्हायोलन्स" सारख्या प्रोजेक्ट्स मधून त्यातला काही डेटा दिसतो. वरती जी उदाहरणे दिली आहेत तसा डेटा आधी पाहिलेला आहे. ड्रायव्हिंग व्हाइल ब्लॅक सारखी असंख्य उदाहरणे आहेत.
हे एक उदाहरण डेटा असलेले.
https://mappingpoliceviolence.org/unarmed
इथे माझ्या मुद्द्याला क्रॉस जाणारे असले, तरी सांगतो - इन जनरल अनआर्म्ड म्हणजे डेंजरस नाही असे गृहीत धरलेले नाही. पण तरीही हे प्रमाण जास्त वाटते.
आणि या व्यतिरिक्त इतर जनरल "सिस्टीम" मधला रेसिझम वेगळाच.
हल्ली रोज काही वेळ सी एन एन
हल्ली रोज काही वेळ सी एन एन पाहतोय. ब्लॅक ला इव्हज मॅटर चळवळीचा चांगला परिणाम होताना दिसतोय. Except for those intentionally living in denial (to hide their own racism under the guise of lack of evidence and statistics) बर्यापैकी संख्येने लोक , अधिकारपदावरील व्यक्ती आणि यंत्रणा याबाबत नुसत्या सजग होऊन विचार करताना नव्हे, तर कृती करताना दिसत आहेत.
हे लेख वाचनात आले
https://www.statista.com/chart/21872/map-of-police-violence-against-blac...
https://thesocietypages.org/toolbox/police-killing-of-blacks/
https://thesocietypages.org/toolbox/racial_bias_police_shootings/
https://www.wgbh.org/news/local-news/2020/06/12/black-people-made-up-70-...
Minneapolis Police Use Force Against Black People at 7 Times या शीर्षकाचा न्यूयॉर्क टाइम्सचा लेख दिसतोय. वाचता येत नाही.
https://twitter.com
https://twitter.com/TedhiLakeer/status/1272733050359525382
HAPPENING TODAY @ 7 pm
You don’t want to miss this, whether you are in India or in the US.
I discuss race, in all its colours, with this formidable panel of @surajyengde
, @SikhProf
, and @ChawlaSwati
.
Please head to @TheQuint’s Facebook page at 7 pm today.
व्हाइट पोलिसाने काळ्या
व्हाइट पोलिसाने काळ्या व्यक्तीला गुन्ह्याच्या मानाने जास्त शिक्षा तिथल्या तेथे देणे हे तर नेहेमीच होत आले आहे. कालच एका गौरवर्णी पोलिसाने एका कृष्णवर्णीयाला तीन गोळ्या घालून मारले आहे. कारण काय तर तो जास्त प्यायला होता व स्वत:च्या गाडीत झोपला होता. पोलीसाने त्याला गाडीबाहेर यायला सन्गितले त्यप्रमाणे तो आला. तो जास्त प्यायला होता हे स्पश्ट होते. पोलिसाने त्याला तिथेच रहायाला सान्गायला हवे होते ते न करता लगेचच त्या पोलिसाने त्याला बेड्या अडकवण्याचा प्रयत्न केला त्या झटपटीत या कृष्णवर्णीयाने पोळीसाची टेजर गन घेऊन पाळाय ला सुरवात केली त्यात या पोलिसाने त्याच्यावर गोळ्या झाडल्या त्यात तो मेला. आता त्या पोलिसावर खुनाचा आरोप करण्यात आला आहे. पोलिस युनियांचे मनाने आहे की त्या पोलिसाने योग्य प्रमाणात शस्त्र वापरले. अशी गौरावर्णीयांची मनस्थिती आहे. म्हणून अमेरिकेत अशी आंदोलने झाली आहेत. American police must change their mindset. They do not have to use a gun because they have it.
Shaheen Bagh protest to
Shaheen Bagh protest to resume? : Jihadist leftists announced
डिफंडिंग आणि सिटी पोलीस वगैरे
डिफंडिंग आणि सिटी पोलीस वगैरे बद्द्ल माहिती शोधताना अमेरीकेतील पोलीसांच्या इतिहासाबद्दल माहिती मिळाली. पहिल्या भागाची लिंक देत आहे. पुढील दुवे त्या पानावरच आहेत.
https://plsonline.eku.edu/insidelook/history-policing-united-states-part-1
प्यायलेला गौरवर्णी माणसाला
प्यायलेला गौरवर्णी माणसाला ट्रॅफिक स्टॉप केल्यावर तिकिट वगैरेही न देता घरी पोहोचवणे, दुसर्या-तिसर्या दिवशी ही बातमी फुटल्यावर गदारोळ, मग ती प्यायलेली व्यक्ती स्कूल सिस्टिममधली असल्याने तिने पदाचा राजिनामा देणे आणि पोलीसाला थोडे दिवस डेस्क जॉब.
पिवून जास्त झालेली व्यक्ती गाडी रस्त्याच्या कडेला लावून झोपते. व्यक्ती पूर्वेकडली आणि अधिकारी पदावरची. पोलीस येतात, उठवतात, व्यक्ती संवाद करायच्या परीस्थितीत नाही, लायसन्स प्लेट वरुन पत्ता लावून कंपनीच्या जनरल मॅनेजरला फोन, ते लोकं आल्यावर वॉर्निंग देवून सोडून देणे.
उचभ्रू गौर वर्णिय वस्तीत पार्टी, आई वडील गावाला गेलेले , सगळी टीनेजर्स, अंडरएज ड्रिंकिंग आणि इतर बरेच काही. दंगा वाढल्याने शेजारी पोलिस बोलावतात. मुलं सैरा- वैरा, रेझिस्टिंग अॅरेस्ट वगैरे, गनचा वापर नाही , टेझर नाही. जी मुलं पळाली त्यांना पकडून जुवेनाईल कोर्ट आणि कम्युनिटी सर्विस. जी मुलं पळाली नाहीत ती वॉर्निंग देवून पालकांच्या ताब्यात.
जे वॉक करणारी, रस्त्यावर स्केटबोर्ड करणारी गौरवर्णिय मुले. पोलीस गाडी थांबवून मुलांना समज देतात, वर्तन त्यांना आणि इतरांनाही धोकादायक आहे सांगतात.
वर दिलेली उदाहरणे माझ्या आसपासची. आता यातल्या व्यक्ती आफ्रिकन अमेरीकन असत्या तर त्यांना अशीच वागणूक मिळाली असती का?
जेव्हा या प्रोटेस्टचे स्वरुप बदलून लूटमार सुरु झाली तेव्हा मला साधारण १८-२० (?) वर्षांपूर्वी सिनसिनाटित उसळलेली दंगल आठवली. तेव्हा १९ वर्षांचा आफ्रिकन अमेरीकन तरुण अरेस्ट करताना मारला गेला होता. ४-५ दिवस प्रचंड नुकसान झाले होते. मात्र इंटरनेट लिमिटेड होते. आतासारखे स्मार्ट फोन्स, सोशल मेडीआ वगैरे नसल्याने त्या शहरापुरता उद्रेक सिमित राहीला. यावेळी असे झाले नाही. आधीच करोनाने खचलेली इकॉनॉमी आणि त्यात मोठ्या शहरांतून दंगलीमुळे झालेले नुकसान! काही ठिकाणी हिंसाचार करणारे आंदोलनाशी संबंधित नाहीत, वेगळेच ग्रुप्स आहेत असेही बाहेर येत आहे. पूर्वीचा इतिहास लक्षात घेता या दंगली टळाव्यात किंवा पसरु नयेत म्हणून काही करता आले असते का?
हल्ली रोज काही वेळ सी एन एन
हल्ली रोज काही वेळ सी एन एन पाहतोय. ब्लॅक ला इव्हज मॅटर चळवळीचा चांगला परिणाम होताना दिसतोय. Except for those intentionally living in denial (to hide their own racism under the guise of lack of evidence and statistics) बर्यापैकी संख्येने लोक , अधिकारपदावरील व्यक्ती आणि यंत्रणा याबाबत नुसत्या सजग होऊन विचार करताना नव्हे, तर कृती करताना दिसत आहेत.
>>>
किती लोक सीएनएन पाहतात आणि किती लोक फॉक्स? किनाऱ्यावरची राज्ये सोडल्यास इतर जवळपास सर्व राज्यात ट्रम्पचा बेस अधिकाधिक पक्का झाला आहे. न्यूयॉर्क टाइम्स , वॉशिंग्टन पोस्ट मोजके लोक सोडल्यास जे मतदान करणार आहेत त्यापैकी कोण वाचते?
अटलांटाची केस थोडी वेगळी आहे.
अटलांटाची केस थोडी वेगळी आहे. ती spur of the moment असू शकते. दोन पोलिसांनाही न आवरणारा तो माणूस पोलिसांचीच टेझर गन घेउन पळून चालला होता, त्यात तो नशेत होता. त्या स्पेसिफिक मूमेण्टला अचानक घेतलेला निर्णय असू शकतो - त्याला काही पर्याय असले तरी. मिनियापोलिस पेक्षा हे खूप वेगळे आहे.
भारतात पायावर गोळी मारतात तसे इथे काय नियम आहेत माहीत नाही.
फा, वेगळे असले तरी पाठीत
फा, वेगळे असले तरी पाठीत गोळ्या घातल्या आहेत. कोणी अंगावर येत असले तर पाठीत गोळ्या नाही जात!
सिस्टेमिक रेसिझम चे एक
सिस्टेमिक रेसिझम चे एक उदाहरण
https://www.bloomberg.com/news/articles/2020-06-16/black-lives-matter-hi...
ध - मारण्याचे समर्थन नव्हे.
ध - मारण्याचे समर्थन नव्हे. पण किमान कारण असे आहे की पोलिसांच्या बाबतीत अशा वेळेस स्प्लिट सेकंदाचा निर्णय असतो. हातात टेझर गन घेउन पळालेला आणि मुळात नशेत असलेला धिप्पाड माणूस तसाच तर जाउ देता येणार नाही. बॅक अप बोलावून येइपर्यंत तो पळून गेला तर आणखी धोका होता. व्हिडीओ मधेही जाणवते की दोन पोलिस ऑफिसर्सनाही तो भारी पडला.
बाय द वे - नशेत असताना पार्क केलेल्या गाडीत झोपण्याबद्दलही अटक होउ शकते इतका विचार केला नव्हता. वेब सर्च केले असता असे दिसते की काही ठिकाणी जर हे सिद्ध होउ शकले की तुम्ही नशेत आधी गाडी चालवली होती, तर अटक होते.
>>अटलांटाची केस थोडी वेगळी
>>अटलांटाची केस थोडी वेगळी आहे. << +१
आत्ता पर्यंतची प्रत्येक केस नीट लक्ष देउन बघितली तर एक कॉमन थीम सापडेल, पुलिस ब्रुटॅलिटी व्यतिरिक्त. ती ओळखता आणि कबुल करता आली तर खर्या अर्थाने समस्येच्या मूळात शिरता येईल. आणि इच्छाशक्ति असेल तर उपाययोजना हि करता येतील.
प्रत्येक केस डिएस्कलेट करता आली असती का? अॅब्सोलुटली! तर ती का झाली नाहि याची कारणं शोधुन पुलिस रुलबुक्स, ट्रेनिंग्ज, कम्युनल हार्मनी प्रोग्रॅम्स इ. राबवण्यावर फोकस द्यायचा कि वर्णद्वेषाच्या किस्स्यांचा हार्प वाजवायचा हे सातत्याने संबंधितांना दुर्दैवाने सांगावं लागत आहे...
नशेत असलेला धिप्पाड माणूस >>
नशेत असलेला धिप्पाड माणूस >> इथे तुझ्या मनातली सुप्त रेसिस्ट भावना मला जाणवते आहे. असो.
इथे बर्याच जणांचे पोस्ट्स
इथे बर्याच जणांचे पोस्ट्स वाचल्यावर subconscious bias बद्दल काडिचीही माहिती नाही हे कळते आहे. कॉर्पोरेट वर्ल्ड मधे काम करणार्यांना ह्याबद्दल शिकावे लागते असे वाटले होते. बहुधा तसे नसावे.
ध - कोणत्या अर्थाने?
ध - कोणत्या अर्थाने?
किती लोक सीएनएन पाहतात आणि
किती लोक सीएनएन पाहतात आणि किती लोक फॉक्स? किनाऱ्यावरची राज्ये सोडल्यास इतर जवळपास सर्व राज्यात ट्रम्पचा बेस अधिकाधिक पक्का झाला आहे. न्यूयॉर्क टाइम्स , वॉशिंग्टन पोस्ट मोजके लोक सोडल्यास जे मतदान करणार आहेत त्यापैकी कोण वाचते?... I swear , whatever he lost in corona (not sure about that too☺️,)he has gained during this protest. Considering past voting patterns of US citizens his second term is certain, unless and until there is some major swing .
Pages