अमेरिकेत मिनिआपोलिस येथे काही दिवसांपूर्वी जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. अटक करत असताना जॉर्ज प्रतिकार करत नव्हता, त्याच्याकडे शस्त्र नव्हते. त्याला ४ सशस्त्र पोलिसांनी घेरले होते. त्यापैकी एकाने त्याला जमिनीवर दाबून स्वतःचा गुडघा त्याच्या मानेवर दाबून धरला होता. आपण गुदमरतोय असे जॉर्ज जिवानिशी ओरडत होता हे येणार्या जाणार्या लोकांनी घेतलेल्या फोन व्हिडिओ मधे स्पष्ट दिसतेय, ऐकू येतेय.
या घटनेनंतर अमेरिकेत अनेक शहरांमध्ये या घटनेविरोधात निदर्शने घडत आहेत. अनेक शांततापूर्ण निदर्शने होत असतानाच काही ठिकाणी निदर्शकांनीदेखिल हिंसा , जाळपोळ सुरु केल्याचेही दुर्दैवाने पहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी परिस्थितीचा फायदा घेऊन लूटमारीच्या घटनाही घडल्या आहेत.
पोलिसांच्याकडून घडणार्या हिंसेची ही पहिलीच घटना नाही. कृष्णवर्णीयांसोबत होणार्या हिंसेचीही ही पहिली घटना नाही.
https://mappingpoliceviolence.org/
https://policeviolencereport.org/
पण या आणि इतर अनेक साइट्स च्या डेटा नुसार व्हाइट किंवा इतर कोणत्याही वर्णापेक्षा कृष्णवर्णीयांसोबत होणार्या हिंसेचे प्रमाण खूप जास्त आहे. अर्थात नेहमी ( डोळे उघडे ठेवून) बातम्या बघत असाल तर अशा स्टॅटिस्टिक्सच्या आधाराची गरज ही नाही.
**या विषयावर चर्चा NRI आणि समाजाचे दुटप्पी धोरण इथे सुरु झाली हिती. तीच सुरु ठेवायला म्हणून हा धागा उघडतेय.
वेका, माझ्या माहितीनुसार
वेका, माझ्या माहितीनुसार पोलिसांना वेगळा कायदा असे नाही तर राज्यातील सर्व पब्लिक सर्वंटस ना एक कायदा असे असते. आणि हे कायदे प्रत्येक राज्यात वेगळे आहेत. (मी तज्ञ नाही तेव्हा मला असलेली माहिती मिठाच्या दाण्यासह घे ) पोलिसांचा वेगळा पेंशन फंड असतो पण कायदा जो इतर अग्निशमन कर्मचारी, प्रोफेसर, शिक्षक इ लोकांना असतो तोच आहे.
https://www.nasra.org/files/Compiled%20Resources/Forfeiture%20statutes.pdf
ट्रेव्हर नोआ आवडतो पण कधी कधी तो बिनबुडाची विधाने करतो. युनियन मुळे अकार्यक्षम लोकांना काढून टाकता येत नाही ही अतिशयोक्ति आहे. प्रायव्हेट सेक्टर मध्ये जसे पटकन टर्मिनेट करतात तसे करता येत नाही आणि ते ही योग्यच आहे कारण नोकरीची शाश्वती नसेल तर कशाला कोण जीव धोक्यात घालून समाजाचे रक्षण करेल. पण गैरवर्तन झाले तर काढून टाकण्याची प्रोसिजर आहे (जसे टेन्यूर्ड प्रोफेसरला ही गैरवर्तनाबद्दल युनिव्हर्सिटी काढून टाकू शकते). मग माशी कुठे शिंकली - ह्या काढून टाकण्याच्या प्रक्रियेत निष्पक्ष लोकांचा सहभाग नसल्याने, सगळे पोलिसच असल्याने जरब बसेल अशी कारावाई होत नाही. ते बदलायला हवे आहे.
@ swati 2 -thank u.......
@ swati 2... u +1....he agadich patal me pratykane aapan veglya colour/samajik/ arthik paristhiti aselyachya mausashi kas vagato he tapasun pahanyachi garaj aahe.. aaha ok, mhauje kahi areas mandhye overall samajat white supremacy type vichar aahet....mala watayche African Americans la jasti tras hoto karan hajaro varsachi slavery......
Me germanyt rahate pan ithe ha white supremacy typ factor nahiye so vicharla....
अॅफर्मेटिव्ह अॅक्शन म्हणजे
अॅफर्मेटिव्ह अॅक्शन म्हणजे आरक्षण नाही, उलट तो कायदा आरक्षणाच्या अगदी विरूद्ध आहे. >> सी, हे कसं याबद्दल थोडं लिहिशील का?
मला इतके दिवस वाटत होतं की ॲफर्मेटिव्ह ॲक्शन म्हणजे थोड्या वेगळ्या प्रकारे आरक्षण - समाजातल्या दुर्बळ घटकांना संधी मिळावी यासाठी. थोडं अवांतर होईल या धाग्यावर पण मूळ वर्णद्वेषाच्या प्रश्नाचा विचार केला तर मुळीच अवांतर नाही.
>>
>>
मुळात यांचे सगळे प्रतिसाद वर्णद्वेषाने ओतप्रोत भरलेले आहेत.
<<
कावीळ झालेल्याला सगळे पिवळे दिसते तसे अमेरिका म्हणजे वर्णद्वेष असे समीकरण ज्यांनी उराशी कवटाळले आहे त्यांना तसे वाटणे स्वाभाविक आहे. फ्लॉईडला मारले ते वर्णद्वेषापोटीच असे मला वाटत नाही. आपल्या दिव्य दृष्टीला ते आधीच कळले असेल तर धन्य आहात. पण एक वर्ग आहे ज्याला कायम सगळे श्वेतवर्णीय हे नीच वर्णद्वेषाने पछाडलेले आहेत असेच वाटत असते. हरकत नाही. मला तसे वाटत नाही. मला दुसर्या बाजूचेही अनेक दोष दिसतात. काळे हे धुतल्या तांदळासारखे निर्दोष आणि गोरे हेच काय ते नीच अशी माझी मांडणी नाही.
आणि मी वर्णद्वेष्टा का बनू? मी स्वतः अल्पसंख्य आहे. व्हाईट सुप्रिमसिस्ट मला झिडकारणार, माझा तिरस्कारच करणार हे मला चांगले माहिती आहे. परंतु सगळे बीएलेम आणि अँटिफाला विरोध करणारे दुष्ट वर्णद्वेष्टे आहेत असा आततायी दावा मी करणार नाही आणि कुणी केला तर मी तो धुडकावून लावीन.
>>आधी काळ्या लोकांच्या दुर्गुणांची यादी, मग फ्लॉयडच्या गुन्ह्यांची यादी, तो अत्याचाराचा बळी = सिंबोल झाला म्हणजे आदर्श झाला असा कांगावा, शांततापूर्ण आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या जुलुमाकडे दुर्लक्ष, व्हाइट सुप्रिमसिस्ट हा शब्द तर कधी ऐकलाच नाही.
<<
कुठला मुद्दा खोडता आला नाही की मुद्दा मांडला म्हणून कांगावा करणार का? फ्लॉईडची गुन्हेगारी पार्श्वभूमी अत्यंत मोठी आहे. तो माझ्याकरता रोल मॉडेल नाही. मला त्याच्या नावाचे टी शर्ट आणि स्मारके आणि शाही अंत्ययात्रा आजिबात आवडली नाही. एखादा बळी गेला म्हणून लगेच तो थोर हुतात्मा, समाजसेवक, वर्णद्वेषाविरुद्ध लढणारा लढवय्या होत नाही. पण त्याच्याविरुद्ध जो हत्येचा गुन्हा केला गेला आहे त्याला पुरेपुर, कायद्याच्या कक्षेत बसेल तेवढी जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी असे मला वाटते. ह्या मतामुळे मी वर्णद्वेष्टा ठरत असेन तर हरकत नाही.
काळ्या लोकांचा गुन्ह्यात सहभाग मोठा आहे हे आकडेवारी सांगते. जिथे काळ्यांची स्थिती दयनीय आहे तिथे कायम डेमॉक्रॅट लोक राज्य करत आले आहेत (यू एंट ब्लॅक इफ यू डोंट व्होट फॉर अस हे बायडनसाहेबांचे वाक्य प्रसिद्ध आहेच!). त्यांनी इतकी वर्षे काही केले नाही. आता ते आगी लावायला पुढे येत आहेत.
आंदोलकांनी शेकडो दुकाने जाळून भस्मसात केली आहेत. अनेक कंपन्यांनी आम्ही जळलेली दुकाने पुन्हा बांधणार नाही असे सांगून टाकलेले आहे कारण असले हिंसक अराजकवादी लोक जे दुकाने फोडतात आणि लुटतात ते आणि त्यांना अत्यंत मचूळ, कोमट, तोंडदेखला विरोध करणारे कुठली कारवाई न करणारे डेमोक्रॅटिक नेते ह्यामुळे काही भागात दुकाने चालवणे धोक्याचे आहे. म्हणजे रोगापेक्षा उपाय जीवघेणा ठरत आहे.
माझे दावे असे आहेत की ह्या प्रकरणात हिंसक आंदोलन करणार्यांची संख्या मोर्चावर जुलुम करणार्या पोलिसांपेक्षा कैक पटीने जास्त होती. ह्या समाजकंटकानी केलेले नुकसान कितीतरी जास्त आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम गरीब लोकांनाच भोगावे लागणार आहेत.
अमेरिकेत वर्णद्वेष हा कमी आहे आणि तो उत्तरोत्तर कमी होत आहे. उगाच आगलावेपणा करून सगळ्या अमेरिकेला धारेवर धरून वर्णद्वेष्टे ठरवणे बंद करावे. निव्वळ काळे हेच अल्पसंख्य नाहीत. चिनी, व्हिएटनामी, भारतीयही आहेत. अनेक वेळा पोलिस कारवाईत हेही अल्पसंख्य मारले जातात. मागे अलाबामात एका म्हातार्या भारतीयाला पोलिसाने धक्का देऊन आडवे केले आणि त्याला पॅरालिसिस झाला. त्या पोलिसाला कोर्टाने निर्दोष सोडले. त्याबद्द्ल कुठल्या दंगली झाल्या नाहीत की त्या म्हातार्याला काही सन्मान नाही की काही नाही. सगळा शुकशुकाट!
सॅन होजेमधे, सॅन फ्रॅन्सिस्कोत अनेकदा पोलिसांनी मेक्सिकन, अशियाई लोकांना चुकीने गैरसमजाने मारले आहे. तेव्हाही दंगली जाळपोळ झाल्या नाहीत. पोलिसांवर मोठी कारवाई केल्याचेही आठवत नाही.
तरीही मला असे वाटत नाही की बहुसंख्य पोलिस वर्णद्वेष्टे आणि मुजोर असतात. वाईट वागणारे, चुका करणारे हे अपवाद असतात. त्याकरता सगळ्या पोलिस दलाला वा समस्त अमेरिकन श्वेतवर्णीयांना दोष देणे साफ चूक आहे.
एखाद्या संस्थेत समाजातल्या
एखाद्या संस्थेत समाजातल्या दुर्बळ घटकांना काम किंवा शिकायला संधी मिळावी यासाठी केले जाणारे अनेक प्रयत्न म्हणजे अॅफर्मेटिव्ह अॅक्शन. त्यात अमुक ढमुक प्रकारच्या व्यक्तीच त्या जागेवर भरल्या पाहिजेत अशी सक्ती नाही. उदा: नोकरीच्या रिक्त जागेसाठी फक्त वेबसाईटवर जाहिरात करून फायदा नाही तर स्थानिक वृत्तपत्र इ प्रिंट मिडीयामध्ये पण जाहिरात द्यावी. त्याने ज्यांच्या घरी इंटरनेट नाही अशा घटकातील व्यक्तीस संधी मिळते. मुलाखतीस उमेदवार बोलावले की मुलाखतकर्त्याने त्यांच्याशी हसून संवाद करू नये इ. अशा काही अटी कमिटीला असतात. कारण आपण कुणाशी किती हसतो ह्यात छुपे पूर्वग्रह (इंप्लिसीट बायसेस) असतात, ते टाळले पाहिजे. जर असे सर्व प्रयत्न करूनही अमुक-ढमुक वंशाचा/अल्पसंख्याक उमेदवार मिळाला नाही तर उपलब्ध अल्पसंख्याक उमेदवारासाठी गुणवत्ता शिथिल केली जात नाही. म्हणजे जर एखाद्या नोकरीस ९० टक्के (अमुक जीपीए) लागत असेल आणि कुणी अल्पसंख्याक अर्ज आहे तर त्याला/तिला ८५% टक्के असले तरी घ्या असे नाही. जागा दुसर्या योग्य उमेदवारास जाते, जागा रिकाम्या सहसा ठेवत नाहीत.
जि, तू म्हणतेस तो समज अनेक वेळा दिसतो कारण काही हार्वर्ड सारख्या प्रतिष्ठीत कॉलेजात पॉईंट सिस्टीम असते. त्यात इतर पॉईंटस समान असता अल्पसंख्याक असाल तर काही गुण अधिक दिले जातात. पण सगळ्या कॉलेजात असे नसते कारण हे "प्रेफरेन्शियल सिलेक्शन" मानले जाते. ही पद्धत वादग्रस्त आहे. https://plato.stanford.edu/entries/affirmative-action/#EquaRule इथे अधिक उहापोह आहे. थोडं लांबलचक आहे पण छान माहिती आहे.
सी, धन्यवाद! आता फरक कळला
सी, धन्यवाद! आता फरक कळला दोन्हीतला.
प्रत्येक गोष्ट ओढूनताणुन
प्रत्येक गोष्ट ओढूनताणुन भारताशी जोडायची गरज आहे का?
>>>
अर्थातच! भारतात काय कमी थेरं आहेत?
येथे BLM ची बाजू घेवून ओढून
येथे BLM ची बाजू घेवून ओढून ताणून भारताशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला गेला .
पण सगळ्या जगात ब्लॅक विरूद्ध व्हाइट असे आंदोलन चालले असताना भारतातील काही ट्विटर बहाद्दर सावळे विरूद्ध सावळे आंदोलन सुरू करण्याच्या प्रयत्नात होते
सीमंतिनीने लिहीलेले बरोबर आहे
सीमंतिनीने लिहीलेले बरोबर आहे पण अॅफर्मेटिव्ह अॅक्शन वर कधीही थोडक्यात सांगणे अवघड आहे कारण भारतातील रिझर्वेह्शन व इथले अॅफर्मेटिव्ह अॅक्शन नियम याच्यात भारतातील लॉकडाउन व इथले - इतका फरक आहे. मूळ नियमांतही, आणि अंमलबजावणीतही. एकतर फेडरल लेव्हलल बनवलेला व सर्व राज्यांकरता बंधनकारक असलेला असा नियम फक्त एक आहे - पाच की सहा "फेडरल" कॅटेगरीज मुळे कोणाला नोकरी, बढती वगैरे नाकरता येणार नाही. पण बाकी सगळे राज्याराज्यांप्रमाणे व अनेकदा आणखी स्थानिक नियमांमुळे बदलते.
पण मूळ तत्त्व भारताप्रमाणेच आहे - अनेक वर्षे संधी नाकारलेल्या जात/वंश वगैरे गटांना संधी मिळवून देणे. त्या दृष्टीने भरत यांनी भारतातील आरक्षणाशी तुलना करणे यात काही चुकीचे नाही.
पण एक प्रश्न मलाही आहे - भारतात जसे आरक्षण नसलेल्या लोकांकडून ऐकू येते की आरक्षणामुळे त्यांच्या संधी कमी झाल्या (ओपन सीट्स वगैरे), तसे इथे फारसे ऐकू येत नाही. हे मुळात खरे आहे का आणि असेल तर कशामुळे?
पण मूळ तत्त्व भारताप्रमाणेच
पण मूळ तत्त्व भारताप्रमाणेच आहे - अनेक वर्षे संधी नाकारलेल्या जात/वंश वगैरे गटांना संधी मिळवून देणे. त्या दृष्टीने भरत यांनी भारतातील आरक्षणाशी तुलना करणे यात काही चुकीचे नाही. >. यात फरक आहे. आरक्षण मध्ये अनेक वर्षे संधी नाकारलेल्या लोकाना संधी दिली जाते तर अॅफर्मेटिव्ह अॅक्शन मध्ये सध्या ज्या जाती /वंश मधील लोकाना कमी संधी मिळतात त्या लोकाना संधी दिली जाते . उदा. हारवर्ड मध्ये आशियन लोकापेक्षा गोर्या लोकाना प्रवेश सहज मिळतो . कारण आशियन लोकाचे अॅडमिशन घेण्याचे प्रमाण वाढले होते.
Intel कॅलिफोर्निया मध्ये नोकरीसाठी नॉन आशियन आणि गोरे पुरुष , सर्व महिला आणि LGBT ह्याना ४०% जागेत प्राधन्य आहे. जर भारतिय लोकाचे प्रमाण आजुन वाढले तर सिलिकॉन वॅली मध्ये नॉन भारतिय पुरुषा साठी पण अॅफर्मेटिव्ह अॅक्शन असु शकते. ईडिसन, न्यु जर्सी च्या शाळेत नॉन भारतीय मुलाना गणिताच्या कॉपिटिशन मध्ये प्राधन्य असु शकते.
मिड वेस्ट मध्ये स्कुल आणि कॉलेज अमेरिकन फुटबॉल मध्ये गोरे आणि आशियन लोकाना अॅफर्मेटिव्ह अॅक्शन चा फायदा मिळतो तर बाकिचा गोष्टीत अफ्रिकन अमेरिकन लोकाना फायदा मिळतो.
अॅफर्मेटिव्ह अॅक्शन फ्लेक्सिबल आहे तर आरक्षण फिक्स आहे.
अॅफर्मेटिव्ह अॅक्शन मध्ये जागा त्याच्या लोक संख्या पेक्षा जागा कमी असल्याने लोकाच्या मनात जास्त रोष नसतो. तसेच quality मध्ये सुध्धा फार compromise केले जात नाही.
दोन्ही प्रोसेस मध्ये थोडी समानता आहे:
NPR (अमेरिकेतिल मोठे रेडीयो स्टेशन ) मध्ये दोन भारतिय मुलाची मुलाखात ऐकली होती. त्यानी पहिल्या वर्षी हारवर्ड मध्ये अॅडमिशन न मिळाल्याने आपला वंश एकाने नलिहिता तर दुसर्याने अफ्रिकन अमेरिकन लिहुन दुसर्या वर्षी त्याच स्कोर वर अॅडमिशन मिळवली होती. हा प्रोग्रम अॅफर्मेटिव्ह अॅक्शन कसा फेल झाला त्याबद्दल होता. हारवर्ड किंवा अमेरिकेतिल खाजगी युनि मध्ये गरिब लोकाची मुले (मग ते गोरे पण असोत) जात नाहीत ह्यावर पण चर्चा झाली होती, जरी अफ्रिरिकन अमेरिकन मुलाना जागा मिळाली तरी ती एलिट क्लास च्या मुलानाच मिळली होती ह्या बद्दल पण माहिती दिली होती. भारतात पण आरक्षण मध्ये जवळपास तेच पहायला मिळते,
फारेंड उत्तम प्रश्न. करणारे
फारेंड उत्तम प्रश्न. करणारे करतात तक्रार. हसन मिन्हाजने यावर एपिसोड केला होता.
https://www.youtube.com/watch?v=zm5QVcTI2I8
संत्र नि सफरचंदाची तुलना करायचीच असेल तर - अॅफर्मेटीव्ह अॅक्शन म्हणजे फक्त reserved quota नाही. त्यात outreach, fair interviewing practices, support services अशा अनेक कृतींचा संच आहे. Reserved quota असणे अमेरिकेत सिव्हिल राईटस मूव्हमेंट नंतर काही वर्ष आले (१९७० आसपास). पण नंतर सुप्रीम कोर्टाने ते घटनाबाह्य आहे असा आदेश दिला. भारतातील आरक्षण पद्धत घटनाबाह्य नाही.
आता शेवटी संत्र नि सफरचंद दोन्ही फळचं म्हणून सारखीच म्हणलं तरी माझी हरकत नाही
तरीही मला असे वाटत नाही की
तरीही मला असे वाटत नाही की बहुसंख्य पोलिस वर्णद्वेष्टे आणि मुजोर असतात. वाईट वागणारे, चुका करणारे हे अपवाद असतात. >>>>> या वाक्याला माझा विरोध नाही तरीही असे सांगावेसे वाटते की या चुका करणार्या पोलिसांना कडक शिक्षा कधीच झालेली नाही. हातावर चापट मारून सोडून दिलेले आहे. त्यामुळे फ्लोइडला मारल्यावर दंगा जास्त झाला आहे. या दंग्याचा व जाळपोळीचा परिणाम कृष्णवर्णीय व हिस्प्यानिक यांचेवर होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ट्रंप वर्णद्वेषाविरुद्ध काही पावले उचलेल असे वाटत नाही. त्यामुळे हा संघर्ष काही दशके चालूच राहणार आहे.
हल्ली अमेरिकेत पुतळे पाडायचे
हल्ली अमेरिकेत पुतळे पाडायचे किंवा त्यांना विद्रूप करून विटंबना करायचे फॅड आले आहे. हे पुतळे सगळे अत्यंत जुने आहेत. ओबामा सारखा ईश्वरावतार आठ वर्षे राज्य करत होता तेव्हा त्या अती पुरोगामी द्रष्ट्या नेत्याला आणि त्याच्या प्रशासनाला वा विधी मंडळाला ते पुतळे हटवावेत, नष्ट करावेत, विद्रूप करावेत असे वाटले नाही. दस्तुरखुद्द ओबामांनी सरकारी पैसे पुरवून त्या पुतळ्यांची जाहीर विटंबना करणे सहज शक्य होते. पण नाही. ते फक्त फ्लॉईडच्या मृत्युनंतरच का होते आहे?
उत्साहाच्या भरात काही अँटिफा मंडळींनी गांधींचा पुतळाही विद्रूप केला असे ऐकले. गंमतच आहे! डेमॉक्रॅटिक पक्ष रेसिज्म रेसिज्मची जपमाळ ओढत बी एल एम आणि अँटिफा सारखे भस्मासूर पोसत आहे. यथावकाश त्यांनाही हे भस्मासूर जाळून टाकतील अशी आशा करू. अन्यथा ते वहावतच जाणार.
<< उत्साहाच्या भरात काही
<< उत्साहाच्या भरात काही अँटिफा मंडळींनी गांधींचा पुतळाही विद्रूप केला असे ऐकले. >>
----- " असे एकले... " हे खूप काही सांगते...
असे कृत्य अँटिफानेच केले आहे का अँटिफाच्या नावाखाली राईट विंग च्या लोकांनी वा अन्य संधीसाधू लोकांनी BLM आंदोलनाला बदनाम करण्यासाठी करवले आहे?
>>
>>
असे कृत्य अँटिफानेच केले आहे का अँटिफाच्या नावाखाली राईट विंग च्या लोकांनी वा अन्य संधीसाधू लोकांनी BLM आंदोलनाला बदनाम करण्यासाठी करवले आहे?
<<
माहित नाही. तुम्हाला हे उजव्या लोकांनी केले असा काही पुरावा माहित असेल तर सांगा. इथल्या बातमीत तर असेच सुचवले आहे की फ्लॉईडच्या मृत्युबद्दल निषेध करणार्या लोकांनी हे कृत्य केले.
https://www.telegraphindia.com/world/mahatma-gandhi-statue-defaced-in-us...
शेंडेनक्षत्र, तुमच्या पोस्ट्स
शेंडेनक्षत्र, तुमच्या पोस्ट्स वाचून असं वाटतं की तुमच्या मते सगळे प्रॉब्लेम्स isolated आहेत. अ पोलिस अधिकाऱ्याने ब व्यक्तीला अमानुषपणे मारले. ही घटना matter of fact पाहिली जावी आणि तिचा योग्य तो न्यायनिवाडा व्हावा. या घटनेला "सिद्ध" होण्यापूर्वीच वर्णद्वेषाचा रंग दिला जातोय. कृष्णवर्णीय लोकांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण अधिक असते. अशा गुन्हेगारांना यामुळे मोकळे रान मिळेल. जो ब व्यक्ती मृत्यू पावला तो तर गुंडच होता मग त्याचे उदात्तीकरण करणे योग्य आहे का?
I think when you look at the holistic picture, you can see why this single incidence has given rise to protests worldwide. तुम्ही जे म्हणालात की भारतीयांना किंवा दक्षिण अमेरिकन लोकांना जेव्हा अशी वागणूक मिळते तेव्हा का नाही हे असे मोर्चे निघत. पण मला वाटतं की म्हणूनच या आंदोलनाला पाठिंबा देणारे केवळ आफ्रिकन अमेरिकन नाहीत तर सर्व समाजातून याला पाठिंबा मिळतो आहे. The system has failed everyone at some point in time. Even the White Caucasian citizens have faced the wrath of African Americans due to people who believe in White supremacy. ही घटना, त्या नंतर दिसणारा जनक्षोभ, काही ठिकाणी लागलेलं हिंसक वळण या सगळ्या गोष्टी सुट्या सुट्या पाहून चालणार नाही. या प्रश्नाच्या मुळाशी जाताना आजपर्यंत झालेल्या चुका आणि त्या होऊ नयेत यासाठी सुधारणा, या शिवाय सध्याच्या व्यवस्थेतल्या त्रुटी आणि त्या कशा दूर करायच्या यासाठीचे उपाय, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाच्या मनात खोलवर दडलेल्या biases आणि prejudices दूर व्हावेत यासाठी प्रबोधन अशा अनेक पातळ्यांवर काम करावं लागणार आहे. फक्त या केसचा निकाल लागून त्या पोलिसाला शिक्षा झाली म्हणजे सगळं नीट झालं असं होणार नाही.
जिज्ञासा +112
जिज्ञासा +112
प्रबोधन आणि अन्य उपायांनी मानसिकता बदलल्याशिवाय शतकानुशतकांचे पूर्वग्रह आणि समजुती नष्ट होणार नाहीत. आणि हे कार्य एका दिवसात, वर्षात, दशकात किंवा एका पिढीत होणारे नाही. ज्यांना हे सर्व चुटकीसरशी व्हायला हवे आहे ते काल्पनिक जगतात वावरत आहेत.
भारतातील जातीव्यवस्था व
भारतातील जातीव्यवस्था व अमेरिकेतील वर्णव्यवस्था यातील साम्यस्थळे/समांतर प्रश्नाबद्दल फुले आंबेडकरापासून सर्व दलित विचारवंतानी लिहिले आहे. याबद्दल आज प्रकाशित झालेला एक समयोचित लेख
https://theprint.in/opinion/black-lives-mattered-to-phule-and-ambedkar-t...
>>अॅफर्मेटिव्ह अॅक्शन
>>अॅफर्मेटिव्ह अॅक्शन फ्लेक्सिबल आहे तर आरक्षण फिक्स आहे.<< +१
की पॉइंट इज डिवर्सिटि. एकाच समुहाची (वर्ण, लिंग, वय इ.) संख्या (मक्तेदारी) वाढिस लागु नये म्हणुन कायद्यात केलेली तरतुद आहे ती. भारतातल्या आरक्षणा सारखाच त्याचा अॅडवर्स इंपॅक्ट होत गेल्याने काहि राज्यांत त्याला बंदि आहे...
भारतात adverse impact फारसा
भारतात adverse impact फारसा झालेला नाही. सुपरिणामाचा वेग कमी आहे असे कदाचित म्हणता येईल पण दुष्परिणाम तरी नाहीत फारसे.
>>फक्त या केसचा निकाल लागून
>>फक्त या केसचा निकाल लागून त्या पोलिसाला शिक्षा झाली म्हणजे सगळं नीट झालं असं होणार नाही.
मग काय जाळपोळ, खून, लुटालूट केली की सगळे नीट होईल का? समाजातील सर्व थरातून ह्या विध्वंसक कार्याला पाठिंबा मिळतो आहे असा आपला दावा आहे का? मला वाटते ह्यातला मोठा पाठिंबा हा आपल्याला वर्णद्वेष्टा समजू नये ह्या भीतीतून केलेले ब्लॅकमेलिंग आहे. मग ते खरोखरचे पैसे मागण्याकरता असेल वा इमोशनल. पोलिस जेव्हा कारवाई करतात तेव्हा त्यांना निर्णय घेण्याकरता कित्येकदा काही सेकंदाचा अवधी असतो. आरोपीच्या हातात खेळण्याची बंदूक आहे का खरी का टेझर आहे का अन्य काही हे शांतपणे ठरवण्याइतकी चैन त्यांना करता येत नाही. आणि अनेकदा चुका होतात. प्रत्येक वेळी अशा प्रकारे पूर्ण देश वेठीस धरून विध्वंसक लुटालूट आणि जाळपोळ करून देशातला सो कॉल्ड सिस्टेमिक रेसिज्म कमी होणार आहे का? मला वाटत नाही.
आता अॅटलांटात अशीच एक घटना झाली जिथे एका काळ्याने पोलिस कारवाई करत असताना एकाचे टेझर पळवले आणि ते पोलिसावर रोखले. पोलिसानी गोळ्या घालून त्याला मारले. हे सगळे वेंडीच्या ड्राईव थ्रू मधे झाले. अर्थातच निषेध म्हणून हे रेस्टॉरंट भस्मसात केले. आजूबाजूच्या कार जाळल्या.
https://www.cnn.com/2020/06/14/us/atlanta-protests-rayshard-brooks-sunda...
एकंदरीत आता असेच वाटते की काळ्या लोकांवर पोलिस कारवाई करणे हेच बेकायदा समजले जावे की काय. मुळात पोलिस ही संस्थाच बेकायदा किंवा त्याहून चांगले म्हणजे अतिरेकी संघटना समजली जावी.
जिज्ञासा - सहमत. इथे ती
जिज्ञासा - सहमत. इथे ती स्पेसिफिक घटना रेसिझम चा भाग होती की नाही ते कोर्ट ठरवेल. पण Straw that broke the camel's back सारखे झाले.
शेंड्यांनी पुन्हा एकदा भरभरून स्ट्रॉ मॅन टाकले आहेत. नक्की कोणाला जाब विचारत आहेत माहीत नाही. इथे बहुतांश कोणीही (खरे तर कोणीच) दंगली वगैरे कोणत्याही विध्वंसक घटनेचे समर्थन केलेले नाही. पण सिस्टीमिक रेसिझम वरची ही चर्चा म्हणजेच दंगलींचे समर्थन असल्यासारखे वारंवार तेच पुन्हा विचारत आहेत.
दंगली हा रेसिज्मच्या निषेधाचा
दंगली हा रेसिज्मच्या निषेधाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. तुम्ही समर्थन करा वा ना करा. कोरोनामुळे कंबरडे मोडलेल्या उद्योगांचे आणखी नुकसान होतच आहे. तुम्ही समर्थन करा वा ना करा. अशा प्रकारे सुरु झालेल्या आंदोलनाला बीएलएम व अँटिफा हे हायजॅक करून अनिष्ट वळण देतच आहेत. तुम्ही समर्थन करा वा ना करा. डेव्हिड डॉर्नसारख्या निरपराधी लोकांना लुटारू लोकांना थांबवताना मरण येतच आहे. आपण समर्थन करा वा ना करा. पोलिस ही यंत्रणा खिळखिळी केली जात आहे. जेव्हा आपल्यावर पोलिसांना बोलवायची वेळ येईल तेव्हा ते हतबल असल्याचे लक्षात येईल. मग आपण समर्थन करा वा ना करा. CHAZ च्या नावाखाली डोकेफिरू लोक शहराचे मोक्याचे भाग बळकावून तिथल्या पोलिसांना हाकलत आहेत. मशिनगन धारी गुंड दादागिरी करत आहेत. आपण समर्थन करा वा ना करा.
आम्ही फक्त शुचिर्भूत आंदोलनाला समर्थन देतो. बाकी जे काही होते आहे त्याच्याशी आमचा काही संबंध नाही असे मानभावीपणे म्हटल्यामुळे त्या अनिष्ट, विध्वंसक घटना अदृश्य होत नाहीत.
एक सामान्य नागरिक म्हणून मला नेहमीच शंका वाटते की खरोखर रेसिज्मबद्दल कळवळा असणारे किती लोक आणि संधीचा फायदा घेऊन आपल्या पोळ्या भाजून घेणारे किती? आणि जरी १०० तले १० लोक विध्वंसक असले तरी उद्योगांचे होणारे नुकसान हे लाखो डॉलर्स च्या घरात आहे.
आम्ही फक्त शुचिर्भूत
आम्ही फक्त शुचिर्भूत आंदोलनाला समर्थन देतो. बाकी जे काही होते आहे त्याच्याशी आमचा काही संबंध नाही असे मानभावीपणे म्हटल्यामुळे >>> आँ? असे कोण म्हणले इथे? कायच्या काय आमच्या नावावर चिकटवू नका.
विध्वंसक घटना अदृश्य होत नाहीत. >> नाहीच होत. कोण म्हणले होतात म्हणून. त्याला तुमच्या इतकाच आमचाही विरोध आहे. पण इथे विषय तो नाही.
भारतात adverse impact फारसा
भारतात adverse impact फारसा झालेला नाही. ....I come from open category. Never felt reservation had any adverse impact. Movement to US was motivated by difference between dollars and rupee. Many of my friends from open category who moved to US after graduation not because of reservation or lack of job opportunities .they moved to US for better opportunities , hassle free lifestyle.Many of these could have earned more money in India still chose to settle in US because they preferred certain aspects of lifestyle over money. I don't think it has anything to do with reservation in India.
>>
>>
विध्वंसक घटना अदृश्य होत नाहीत. >> नाहीच होत. कोण म्हणले होतात म्हणून. त्याला तुमच्या इतकाच आमचाही विरोध आहे. पण इथे विषय तो नाही.
<<
हे म्हणजे असे झाले की चर्चा फक्त आगीच्या ज्वाळांची करायची. आगीची धग हा विषय इथे नाही! इंटरेस्टिंग.
एकंदरीत आता असेच वाटते की
एकंदरीत आता असेच वाटते की काळ्या लोकांवर पोलिस कारवाई करणे हेच बेकायदा समजले जावे की काय.?? >>>>>>>
अगदी ! अगदी ! तसाच समज समस्त काळया पाठि राख्यांचा झाला आहे यात शंका नाही !
या गदारोळात गांधीच्या पुतळ्याचे विटांबन झाले हे सर्वात वाईट .
गांधींनी ज्या काळया लोकांवर होणाऱ्या अन्यायविरुद्ध दक्षिण आफ्रिकेत आवाज उठवून समान हक्क मागण्याची सुर वात केली त्यांनीच पुतळ्याची विटंबना करावी हे चुकीचे झाले .
त्यानंतर संपूर्ण युरोपात पुतळे पडण्याची फॅशन च निघाली आहे , आणि त्यात काळे सर्वात पुढे आहेत .
जॉर्ज च्या मृत्यू नंतर जर काळे दादागिरी करून दुकाने लुटत असतील , अमेरिकेचा राष्ट्रध्वज जाळत असतील तर भान हरपलेले काळे गांधीच्या पुतळ्याची विटंबना करणार नाही कशावरून ?.
रेवा 2 प्रतिसाद पटला.
रेवा 2 प्रतिसाद पटला.
तसेही भारतात 'गुणवत्तेनुसार निवड' या सूत्राचा लवचिकतेशिवाय ठोकळेबाज वापर आणि पुरस्कार करणे म्हणजे निसरड्या वाटेवरून चालणे आहे.
गुणवत्ता (म्हणजे अर्थात स्पर्धा परीक्षांतले यश !) इतकी प्रचंड आहे आणि संधी इतक्या कमी आहेत की शिखराच्या जवळपास समान गुणवत्तेचे कितीतरी लोक असतात. त्यातल्या कोणालाही संधी मिळाली तरी फारसा फरक पडणारा नसतो. पण एक निवडनिकष किंवा रेषा ही ठेवावीच लागते. अशा वेळी 99.9 या गुणांवर उभे असलेल्या अनेकांपैकी एकाचीच निवड होणार. गुणवंत असूनही अनेक इच्छुक नाकारलेच जाणार. 90% ते 99% गुण मिळवणारे बहुतेक विद्यार्थी साधारणतः: समान गुणवत्तेचेच असतात.
याशिवाय बोगस डिग्र्या, बोगस सर्टिफिकीटे, पी एच डयांचा सुळसुळाट, नेपोटीझम, राजकीय आणि गुन्हेगारी हस्तक्षेप ह्यांच्यामुळे 'वाढलेली ' गुणवत्ता ह्यात आरक्षण कुठेतरी अंग चोरून उभे असते.
आणि तरीही, या विळख्यातून सुटून भारतात ढिगांनी गुणवंत निपजतात ह्याचे श्रेय भारताच्या लोकसंख्येला आणि इथल्या जीवघेण्या जीवनसंघर्षाला!
हे म्हणजे असे झाले की चर्चा
हे म्हणजे असे झाले की चर्चा फक्त आगीच्या ज्वाळांची करायची. आगीची धग हा विषय इथे नाही >>> खुशाल करा. पण तुमचा आविर्भाव असा आहे की इथे रेसिझम बद्दल बोलणारे त्याचे इम्प्लिसिट समर्थन करत आहेत. तो चुकीचा आहे हेच सांगतोय.
मूळ घटना घडल्यानंतर त्याबद्दल आधी प्रतिक्रिया येते. त्याचा इथे अगदी औपचारिक निषेध वगैरे नाही केला तरी त्याबद्दल लोक आधी लिहीतात. मग ते ओसरले की त्यावरची प्रतिक्रिया जर लंबक दुसर्या बाजूला नेत असेल तर त्याबद्दल आपोआप चर्चा तिकडे वळते. पण तुमची उडी मूळ घटनेबद्दलच डिनायल दाखवत थेट "आधी त्या दंगलींबद्दल बोला, नाहीतर तुम्ही सगळे दंगल समर्थक आहात" छाप होती.
दंगली, पोलिसांवरचे हल्ले, दुकाने लुटणे, सिअॅटल सारखे कॉप-फ्री झोन हे एक नंबर बिनडोक पणा आहे (दुकाने लुटणे हे तर या घटनांशी काहीच संबंध नसलेल्यांनी घेतलेला गैरफायदा आहे) व ट्रम्पला पुन्हा निवडून आणण्याचे धंदे आहेत. कारण त्याने कुंपणावरचे लोक सुद्धा घाबरून सेफ झोन शोधतात. पण एखाद्याला मारल्यावर अशा गोष्टींची चर्चा आधी करणे यात औचित्य नाही.
आणि या घटनांनी मूळ सिस्टीमिक रेसिझम चे गांभीर्य कमी होत नाही.
अमेरिकेत वर्णभेद सगळीकडे
अमेरिकेत वर्णभेद सगळीकडे खुलेपणे जाणवणार नाही पण तो नाही म्हणणे खुप धारिष्याचे होईल. पोलीसांच्या आचारसंहितेत, कार्यशैलीत बदल आवश्यक आहेत पण ते विचारपुर्वक आणणे आवश्यक आहे.
भारतात रिझर्वेशने मुळे काहिच दुष्परीणाम झाले नाहीत म्हणणे म्हणजे कमाल वाटते पण ते असो.
Pages