वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Actually it is a tv show... But really worth watching....... Far far better than our hindi serieals.... Acting , background music ...i just loved it...

अपलोडचे 2 एपिसोड पाहिले , छान आहे ; मजेशीर , हलकीफुलकी आहे ... पुढे पाहणार आहे .. पण सध्या बेटर कॉल सॉल पाहत आहे , सिजन 3 अर्धा पाहून झाला आहे .. just loving it ..

@ devrup
मी पहिलाच भाग पहिला त्या सीरियल चा...मला ती हिरोईन नाही आवडत...तिची kara para ask म्हणून एक तुर्की सीरियल पहिली होती...तेव्हापासूनच नाही आवडत ती...

सगळ्या दुनियेची बघून झाल्यावर मी ऍमेझॉन प्राईम वर 'मेड इन हेवन' बघितली. चांगली वाटली. कुठेकुठे नाही पटली. तारा आवडली. पण काही ठिकाणी तिचेही वागणे पटले नाही मला. म्हणजे मागे कोणीतरी लिहिलंय तसं तिने जे केलं तेच तिच्याबाबत घडलं. मग निदान या संधीचा फायदा घेऊन तिला वेगळा काहीतरी मार्ग निवडता आला असता. त्या नात्यात राहून आदिलला जास्त चांगल्या प्रकारे धडा शिकवता आला असता. आहे त्या पैश्यांच्या जोरावर नात्यातच राहून स्वतःला हवे त्या प्रकारचे आयुष्य जगू शकली असती. असो..

करणला सुद्धा आपल्या फायनांसेस चा जास्त चांगल्या प्रकारे विचार करताना, शेवटी त्याचं कर्ज फिटलेलं बघायला आवडलं असतं. पण शेवटपर्यंत तो सुधारण्याचे काही चान्सेस दिसले नाहीत मला. जिकडे तिकडे तो अजूनच खड्ड्यात पडतोय असं जाणवत होतं. मला समहाऊ ते खूपच खटकलं. का ते माहीत नाही.

आणि मी जज करत नाहीये पण वेबसिरीज मधल्या स्त्री-पुरुषांनी सिगरेट ओढली नाही किंवा दारू प्यायली नाही तर फाऊल धरतात असं वाटायला लागलंय आताशा. दर दोन सीन नंतर कोणीतरी सिगरेट ओढतो/ओढतेच आहे. मला वाटतं संपूर्ण सिरीज मध्ये फक्त त्या यादवची मुलगी (जिला ते ऑलरेडी ड्रग्ज देत असतात) तिने सिगरेट ओढताना किंवा दारू पिताना दाखवलेली नाहीये बस्स. सिगरेट शेअरींग इतकं कॉमन असतं स्मोकर्स मध्ये? कोणीही कोणाचीही अर्धी सिगरेट ओढतं? आता कोरोनात्तर काळातच्या वेबसिरीजमध्ये निदान शेअरिंग तरी कमी दाखवतील ही भाबडी आशा आहे.

आदिल एवढा कसा हपापलेला दाखवलाय कळलं नाही. कुठलीही मुलगी बघून टर्न ऑन होताना दाखवला आहे. आणि कधीही कुठेही सुरू होताना. त्यातही गंमत म्हणजे फैजा आणि तारा दोघींना बघून तितकाच टर्न ऑन होताना दाखवलाय. जर आता फैजा वर प्रेम बसलंच आहे.. तर तारासोबत असताना काहीच न वाटणे दाखवणे अपेक्षित आहे (जे फक्त त्या झिप लावायच्या एकाच सीनमध्ये दाखवले आहे. इतर वेळी कुठेच जाणवत नाही).

आणि मी जज करत नाहीये पण वेबसिरीज मधल्या स्त्री-पुरुषांनी सिगरेट ओढली नाही किंवा दारू प्यायली नाही तर फाऊल धरतात असं वाटायला लागलंय आताशा. >>> अगदी अगदी. प्लस काही शिव्या आवश्यक आहेत ज्या ऐकवत नाहीत, प्लस काही फिजिकल सीन्स जे अजिबात बघवत नाहीत. अपवाद असतील पण त्यातही एखादा शिवी, घाण बोलणे सीन असणारच.

करण समलिंगी असल्यामुळे अडकत जातो. समाजाने अजूनही न स्वीकारल्यामुळे त्याला जेलमध्ये त्रास दिला जातो. पण त्याचं सतत पार्टनर बदलणे मला खटकलं. त्यामुळेच त्या घर मालकिणीला त्याचा संशय येतो. समलिंगी असला तरी त्यांनीही एकाबरोबर प्रामाणिक राहणे अपेक्षित नाही का.
आदिल बद्दल मलाही तेच वाटलं. त्याची होणारी बायको मोठी सामाजिक पत असलेली असते तरी तो तारासारख्या सेक्रेटरी बरोबर फिजिकल होतो तेही ऑफिसमध्ये जिथे cctv लावलेले असतात. एवढा मोठा बिसनेसमन असे करेल असे वाटत नाही. फैजाबरोबर सुद्धा तो फक्त टाईमपास करत असतो. फारच गयागुजरा दाखवला आहे तो.
एकंदर सिरीज बघताना काहीच खटकत नाही कारण हे सगळं दिल्लीत घडतं आणि समाजातल्या अतिशय हाय प्रोफाइल क्लासमध्ये. तिथे होत असेल असं म्हणून फार विचार नाही केला.

समलिंगी असला तरी त्यांनीही एकाबरोबर प्रामाणिक राहणे अपेक्षित नाही का.

>> ओहह हा. एक्झाक्टली हेच लिहिणार होते. पण हा मुद्दा निसटला. समलैंगिक सुद्धा आपापल्या पार्टनर्सशी एकनिष्ठ असतात वगैरे चर्चा खूप ऐकल्या आहेत. पण करण तसं करताना दिसत नाही. उलट दिसेल त्या माणसासोबत कुठेही सुरू होतो (गोविंद, नवाब, त्या बार मध्ये भेटलेले कैक). इतकं उथळ कॅरॅक्टर समलैंगिक लोकांविषयी खूप चुकीचे समज करून देतोय लोकांचे असं वाटलं.

त्यातही नवाबचे तर एका पुरुषाशीच लग्न झाल्याचे फोटो असतात फेसबुकवर. म्हणजे त्याला हवा तसा पार्टनर मिळालेला आहे. नवाबही त्याच्याशी एकनिष्ठ असलेला दाखवला नाहीये. हा भेटला तर याच्यासोबत सुरू.

सिरियसली, हाय क्लास लोकांमध्ये असं होतं किंवा नाही याचा आपण फक्त अंदाज बांधू शकतो. दिल्ली काय आणि मुंबई काय. अप्पर क्लास मधल्या सगळ्यांची नाती / आदर्श इतके कचकड्याचे असतात? Uhoh

ती जॅझपण मला फार भोळी वाटत होती. ती कबिरच्या प्रेमात पडते तेव्हा मला वाटलं चला एक तरी जेनुइन कपल दिसेल आता. कबीर त्या मुलीबरोबर राहात असतो हे कळल्यावर जॅझचा चेहरा पडतो, तेव्हा मला वाटलं हिला बिचारीला किती धक्का बसला असेल पण नंतर तीला त्या गॅरेजवाल्या बरोबर बघितल्यावर वाटलं हीपण धुतल्या तांदळाची नाही.
ताराची बहीण आणि भावजी फक्त चांगले दाखवलेत. गरीब असले तरी स्वाभिमानी असतात.

नीरज काबी म्हणजे माझ्या मते मेघना गुलजार चा तलवार वरती पिक्चर होता " गिल्टी " त्यात त्या मुलीच्या वडिलांचं काम केलं होत त्याने Happy

नेटफलिक्सवर 'चोक्ड (Choked) - पैसा बोलता हैं' बघितली. सो सो आहे. त्यातली जी हिरोईन आहे ती कितीही परिस्थितीने गांजलेली असली तरी तिचा सतत एरंडेल पिल्यासारखा चेहरा बघवत नाही. तिच्या मुलासाठी वाईट वाटते. अमृता सुभाष प्रचंड ओव्हरऍक्टींग करते. तिचा एकही सीन नको वाटतो बघायला. यात एक गाणं पण आहे जे का आहे आणि ते इतकं रटाळ का आहे हा प्रश्न पडतो. तुषार दळवी आणि उपेंद्र लिमयेला टोटल वाया घालवण्यासाठी घेतले आहे. एवढी मोठी स्टारकास्ट परवडत होती तर सिनेमा जिच्याभोवती फिरतो ती जरा बरी घेता आली नसती का?

**** स्पॉयलर ****

१. सगळ्यांच्याच घरी पाईपातून बंडले येत होती का नोटांची? कारण दिनेशकडेही तीच बंडले दाखवली आहेत. मग अमृता सुभाष पैसे घेऊन गप्प बसण्याऐवजी सतत रडत का असते गळे काढून?

२. सुशांतचे सरीतावर खूप प्रेम आहे असे दाखवले आहे. मग त्याने तरी ते नोटांचे सरीताला का नाही सांगितले? डायरेक्ट पोलिसांना का सांगितले? त्याला पाईपातून त्या ड्रेनेज टाकीत नोटा येत आहेत हे कसं कळलं? सरीताच्या केबिनमध्ये आलेल्या नोटांशी सुशांतचा काहीएक संबंध नसतो. पोलीस फक्त जुजबी चौकशी करायला तिथे आलेले असतात. त्यामुळे चौकशीच्यावेळी उगाचच मध्ये तोंड घालून पोलिसांना तो नोटांविषयी सांगतो?

३. सरीताकडे पहिल्या नोटा आल्या तेव्हाच किमान 20,000 रुपये तरी होते. कोणाला संशय येऊ नये म्हणून रेड्डी ला त्यातले थोडेच (८,०००) दिले सुशांतचे कर्ज फेडण्यासाठी असं मानलं तरी नंतर त्याच्यासोबत लॉज वर जाण्यापेक्षा काहितरी दागिना विकला असं खोटं सांगून रेड्डी चे उरलेले पैसे देऊन टाकायचे की. कोणती बाई हातात पैसे असताना मनाविरुद्ध असं काही करेल? की तिलाही रेड्डी आवडत असतो?

४. नंतर सुद्धा रेड्डी तिच्यावर दबाव टाकत असतो नोटा बदलण्यासाठी तेव्हा तरी त्याचे कर्ज का नाही फेडत ती?

५. मान्य आहे की सुशांत कमवत नसल्याने तिला त्याचा राग आलेला असतो.. तरीही एक नवरा म्हणून ती नोटांविषयी त्याला का सांगत नाही? एकमेकांशी बोलून त्यांना याचा जास्त फायदा घेता आला नसता का?

६. ती अचानक बेडरूममध्ये झोपणे सोडते याचाही सुशांतला काहीच संशय येत नाही. त्याने तिला विचारलेले ही दाखवले नाहीये की ती किचनमध्ये का झोपते किंवा तिने अचानक किचनच्या दरवाज्याला कुलूप लावायला का सुरुवात केली.

७. सरिता सगळीकडच्या नोटा गोळा करून एकत्र ठेवते तेव्हाच आता काहीतरी होऊन हे सगळेच्या सगळे पैसे जाणार आहेत तिच्या हातून हे प्रेडीक्ट करता येतं. सरीताचं अकाऊंट जर त्या ब्रँच मध्ये नसेलच (आणि कोर बँकिंगचा काही उल्लेख नाहीये) तर ती एवढ्या नोटा घेऊन बँकेत आलीच का? तिच्या या मुर्खपणामुळेच पोलीस पार घरापर्यंत येतात.

८. दिनेश - अंजु आणि ताई (अमृता सुभाष) यांना नोटांविषयी, लपवलेल्या किल्लीविषयी, पैश्यांच्या भरलेल्या सुटकेसविषयी जर सगळे माहीत असते तर आधीच त्यांनी पैसे काढताना का नाही दाखवलेत? कि दिनेश जे पैसे सुशांतला देतो ते पाईपमधून न येता तिथूनच जाऊन आणलेले असतात? आणि मध्येही कधीतरी अमृता सुभाष पाठीला सॅक लावून जिन्यात सरीताला भेटते तेव्हा तिथून पैसे आणत असते. (म्हणजे काळी प्लॅस्टिकची पिशवी हातात घालून पैसे घेणारी अमृता सुभाष असते?) पण मग नोटबंदीनंतर पाईपातून व्यवस्थित नव्या नोटा येत असतात (सुटकेसमध्येही त्याच असतील) तर मग ती जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी सरीताला ठरवून एवढा त्रास का देते?

९. अमृता सुभाष इतकी विचित्र आणि हायपर का दाखवली आहे? की ते सगळं नाटक असतं?

१०. कष्टाचा पैसा नसला तरी या नोटांच्या जोरावर सुशांत सरीताला आनंदी होताना बघायचे होते (पर्यायाने सरीताचे एरंडेल घेतलेले एक्सप्रेशन्स बदलतील अशी अंधुक आशा होती) ती अपूर्ण राहिली. घरासाठी थोड्याफार वस्तू घेतल्या एवढंच. नोटा बँकेत नेण्याऐवजी सोने किंवा वस्तू बिस्तू घेऊन कॅश स्वरूपातच इकडे तिकडे खपवाव्या, थोड्या आईकडे ठेवायला द्याव्यात (तसेही तिचे वडील ब्लॅक मनी कमावतात असा पुसटसा उल्लेख आहेच) हे बँकेत काम करणाऱ्या सरीताला कळले नाही हे बघून मी कपाळावर हात मारून घेतला.

Tales from the Loop : Amazon Prime पाहिली ... आवडली

थोडीशी ब्लॅक मिरर च्या अंगाने जाणारी आहे

पियू मी पण चोक्ड पाहिला. काही आवडला नाही. शेवटी सरप्राईज था तुम्हे ते काय?
अमृता सुभाष इतकी विचित्र आणि हायपर का दाखवली आहे?>>>>>>>>>++==११११११

मी सध्या स्पेस फोर्स नेटफ्लिक्स वर बघत आहे. मला आवडली... Steve Carell आवडतो . विनोदी आहे . खूप दिवसांनी काही तरी हलके फुलके पहायला मिळाले.

Descendents of the Sun

दुसरी कोरियन सिरीयल बघितली आणि परत पहिल्या marriage contract सारखीच आवडली.
पहिली सिरियल संपल्यावर एकदम रिकमेपणा आला होता. कोरियन वेगळेपणा आवडायला लागला. परत अशीच एखादी मस्त म्हणजे romantic सिरीयल बघू, म्हणून खूप बघितल्या. तशी ग्रीप काही आली नाही. जेमतेम एक भाग-अर्धा भाग, सुरुवात बघून drop out केलं.
माझ्या netflix होमपेज ची जाम वाट लागली, सबकुछ कोरियन.
काहीच सापडत नाही म्हंटल्यावर मग page नीट करायला परत जुन्या लाडक्या बघितल्या, नवीन billions चा season बघितला(बहुतेक non-netflix) .
परत कोरियन surf करायला सुरुवात केली पण ह्या वेळेस शहाणपणा करून इंटरनेट वर.
कोरियन सूर्यवंशी Happy धीर करून बघायला लागले. हिरो-हिरोईन cute आहेतच. मजा आली बघायला. पण 4 भाग झाले तर मला दळण वाटायला लागलं. मग शेवटी कंटाळून direct शेवटचा भाग बघितला. मी घरातल्या सगळ्या बायकांना कोरियन नादाला लावलं होतं marriage contract बघा सांगून, एक म्हणाली 4मध्येच कुठे सोडतेस? बघत राहा पुढे छान आहे. 9व्या भागात इझहार आहे तिथवर तरी बघ Happy परत बघायला सुरुवात केली. ह्यावेळेस मात्र पूर्ण binge केले. शेवटचा भाग दोनवेळा बघितला Happy खरंच छान आहे.
Hero जरा नाजूक cute आहे पण चालतो कारण कमांडो असणं मस्त carry करतो.
Heroine मला हिरो पेक्षा जास्त आवडली.
हिरो लहान वाटतो तिच्यापुढे पण नंतर सवय होते.
काही संवाद आहेत ती senior असल्याचे.
Main लीड्स बरोबर secondary leads आणि त्यांची लव्ह story पण छान आहे. ते दोघे पण cute आहे:)
अजून लिहिता येईल पण मग बघाच Happy
Military commando आणि डॉक्टर ची love story आहे.
संवादलेखन आणि acting मस्त.
Solidarity!

स्वस्ति, thank you. बघितली एक-दोन भाग, सोडली Sad परत try करते Happy

कोरियन सीरियल The doctors पाहिली ...छान आहे. आता मी Black Knight pahatiye.
छान आहे....... पुनर्जन्मावर...

स्वस्ति, thank you. बघितली एक-दोन भाग, सोडली Sad परत try करते >>>> मी बघितली नाहीये . फक्त वाचलयं Happy
काही सिरिज जिओवर आहेत पण काही दम नाही वाटला .

क्रॅश लॅंडींग ऑन यू पाहिली. एरवी 40 मिनिटांचे असतात भाग कोरियन सिरीजचे पण ही सिरीज भलतीच मोठी आहे, दीड तासाचा एक एक एपिसोड. तब्बल 2 वीक्स लागले ही सिरीज संपवायला. पण हीरो हेरोईन आणि साइड कास्ट क्यूट आहे.

कुणी ब्रुकलीन नाईन नाईन फॅन आहे का इथे?
मी सोमवारी सुरूवात केली. दोन सिझन संपवलेसुद्धा. मस्त हलकीफुलकी कॉमेडी!!
अरेस्टेड डेव्हलपमेंट आणि पार्क्स ॲंड रेक्रिएशन यादीत आहेत पुढच्या नंबरला.

मीसुद्धा स्पेस फोर्स बघत आहे. मस्त आहे! फुल टिपी आहे. स्टीव कॅरेल च्या रोल चे त्याच्याच "ऑफिस" मधल्या रोल शी बरेच साम्य वाटते. खूप लहान मोठे ओळखीचे ( आणि चांगले )अ‍ॅक्टर्स आहेत. फिबी(फ्रेन्ड्स), जिन यांग (सिलिकॉन व्हॅली), एमीचे डॅड ( एवरीबडी लव्ज रेमन्ड) वगैरे.

मी पाहिलेले कोरियन सिरिजः
मिस रिप्ले ( miss ripley) - लि- डा-हे ( Lee Da-hae) जबरदस्त अभिनेत्री आहे ही. लेडी बाजीगर आहे सिरिज, लि-डा अ‍ॅण्टी हिरोईन झालीये, पण खून- बिन नाही त्याच्यात. शेवट अनप्रेडिक्टेबल आहे. ड्रामाकुल(dramacool ) म्हणून साईट आहे तिकडे बघितली.

लि-डा ची माय गर्ल, नाईस विच बघायच्या राहिल्या आहेत अजून.

वुमन इन डिग्निटी - नेफिवर ही द लेडी इन डिग्निटी या नावाने आहे ही सिरिज. मर्डर मिस्टरी आहे.

सध्या www: search बघतेय नेफिवर. सर्च इजिन्स पॉर्टलमध्ये काम करणार्या तीन बायकान्ची गोष्ट आहे. इण्टरेस्टिन्ग आहे.

कोरियन वेगळेपणा आवडायला लागला. >>>>>>>>> खर आहे हे. माय गर्ल हि पहिली सिरिज मी बघितलेली. तेव्हापासून मी कोरियन सिरिजची जबरा फॅन झाली आहे.

कोरियन सूर्यवंशी, जाम हसले वाचून. हि सुद्दा लिस्टमध्ये आहे.

Anne with an 'E' बघते आहे. तीन सिझन आहेत त्यातला पहिला सिझन बघून झाला. ज्यांना स्वेअर वर्ड्स आणि सेक्स सिझन्स पाहवत नाहीत त्यांच्यासाठी अतिसोज्वळ कॅटेगरी आहे. एका एपिसोडमधील टीनएजर्सचं 5 मिनिटांचं संभाषण सोडलं तर लहान मुलांसाठीच सीरिज आहे म्हणायला हरकत नाही.

नेहमी युरोप, US मधली अत्याधुनिक शहरं, हायटेक जगणं पहाता या वेबसिरीमधलं (काळ साधारण 1896 आहे असं वाचलं) कॅनडामधील कन्ट्रीसाईड जगणं पहाताना मला मजा आली. शेतकऱ्याचं घर, प्राणी, शेती, घोडागाडी, रात्री candles लावणं, कपडे, तेव्हाची संस्कृती आणि मॅनरिझम हे बघायला वेगळं आणि छान वाटलं. एका तेरा वर्षांच्या मुलीला वृद्ध भाऊ-बहिणीची जोडी दत्तक घेते. ती मुलगी अतिशय हुशार, पुस्तकी ( गटणेचं इंग्लिश व्हर्जन) आणि कुरूप असते. ती त्या वृद्ध जोडी आणि गावकऱ्यांच्या आयुष्यात कसं स्थान मिळवते याची टिपिकल कथा आहे, पण तो काळ अनुभवताना खरंच मजा येते. मुलीची सतत बडबड इरिटेट करते. बऱ्याच वेळेस ती आगाऊ वाटते, पण अनाथ मुलगी जी 13 वर्ष deficiencies मध्ये जगली आहेत जिच बालपण कष्ट आणि छळ सहन करण्यात गेलं आहे ती अशी होणं स्वाभाविक वाटतं.
एखादा सिझन पाहून ठरवू शकता की पूर्ण सीरिज पहायची आहे का? मला आवडली. मूळ कादंबरी धडपडून मिळवून वाचेन असं वाटत नाही, पण सीरिज मात्र पूर्ण बघणार आहे.

Pages