Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55
सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..
मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.
ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुठे आहे ही सिरीज मीरा.
कुठे आहे ही सिरीज मीरा.
सॉरी, ते लिहायचं राहील.
सॉरी, ते लिहायचं राहील. नेटफ्लिक्स वर आहे.
ओहह नेटफ्लिक्स नाही घेतलं.
ओहह नेटफ्लिक्स नाही घेतलं. मागे एक महिना फ्री घेतलेलं पण तेव्हा फार काही बघितलं गेलं नाही.
Thank u मीरा.
धन्यवाद मीरा, मुलांना घेऊन
धन्यवाद मीरा, मुलांना घेऊन बघते.
कुणी नेफ्लिवरची डार्क सीरिज
कुणी नेफ्लिवरची डार्क सीरिज पाहिली नसेल तर नक्की बघा.ज्यांना सस्पेन्स थ्रिलर हा जॉनर आवडतो त्यांच्यासाठी पर्वणी. ह्या सीरिजचा तिसरा आणि लास्ट सीझन २७ जुनला रिलीज होतोय.
Dirk Gently's Holistic
Dirk Gently's Holistic Detective Agency - टाइम मशीन, टाइम लूप , आत्म्य्याची अदलाबदली, जरासुद्धा विचार करु न देणार वेगवान कथानक जर आवडत असेल तर नक्कि पहा. नेट्फ्लिक्स वर.
कुणी नेफ्लिवरची डार्क सीरिज
कुणी नेफ्लिवरची डार्क सीरिज पाहिली नसेल तर नक्की बघा.>> हो ही बघितली आहे , इथेच मागच्या पानांवर मी लिहिले होते ह्याबद्दल. मला पण खूप आवडली. ही आवडली असेल तर तुम्ही स्ट्रेंजर थिंग्स पण नक्की बघा. ह्याचे जरा सुपेरिअर व्हर्जन आहे. तुम्हाला आवडेल ती नक्कीच. मी पण डार्क च्या लास्ट भागाची वाट बघत आहे.
हॉटस्टारवर आर्या नवीन सीरिज
हॉटस्टारवर आर्या नवीन सीरिज आली आहे. लिड रोल सुस्मिता सेन आहे. चांगले काम केले आहे. पूर्ण बघून झाली नाही अजून. हॉटस्टारच्या सीरिजचे भाग मोठाले असतात.
मी आर्याबद्दलच विचारायला
मी आर्याबद्दलच विचारायला आलेले, कोणी बघितली का. प्रोमो बघितला मी. साध्या हॉटस्टारवर दिसेल का.
ईथल्या रेकमेंडशन ने सेफ
ईथल्या रेकमेंडशन ने सेफ पाहिली नेटफि्ल्स वर...मस्त.. एकदम फास्ट...आवडली....
कोरियन सुर्यवंशी... मस्तऐ
कोरियन सुर्यवंशी... मस्तऐ नामकरण...
मला आवडलेले काही K-dramas
Hospital Playlist (too Good)
Weightlifting Fairy Kim Bok-joo(funny आहे खूप. Hero खूपच क्युटूकला आहे)
Itaewon Class( यात सगळ्याच्या hairstyles खूप funny आहेत. पण drama मस्त आहे. )
The Heirs (हीरो पेक्षा व्हीलन लईच भाव खाऊन गेला यात )
Oh my venus! (पाहता पाहता वजन पण कमी करता येईल. )
Healer (हीरो मस्त आहे. )
जर तुम्हाला crash landing on you आवडली असेल तर त्याच हीरोची Secret Garden पण पाहाच.
My ID is Gangnam beuty
Kill me heal me
Cheese in the trap
Chinese मध्ये ...
Put your head on my shoulder. (cute couple)
A little thing called first love (हो त्याच movie chi स्टोरी आहे)
आर्या पहायला सुरुवात केलीयं.
आर्या पहायला सुरुवात केलीयं.
सुरुवात अगदीच काहीतरी आहे. सगळ्यांंची acting , dialogs सगळचं विचित्र वाटले.
पण दुसर्या भागापासून पकड घेतलीयं.
सु.से. Fabulous. मात्र तिची dialog delivery सदोष आहे.
मुलं छान आहेत.
Acp KHAN भारी.
आर्या - हिंदि वेबसिरीजना
आर्या - हिंदि वेबसिरीजना ड्र्ग्ज/माफिया या व्यतिरिक्त नविन विषय सापडत नाहि बहुतेक. कुछ तो नया लाओ यार. शिवाय कथेचा डोलारा ज्या घटनेवर आधारला आहे ती घटना मूळात घडुच कशी शकते हा प्रश्न पडतो; तेसुद्धा त्या धंद्यातला माणुस असुन. असो. कुठे काहिच चांगलं बघण्याकरता उरलं नाहि तर हि वेबसिरीज बघा...
शास्वती, बरेच pointers दिलेत,
शास्वती, बरेच pointers दिलेत, आता एकेक बघीन.
हिरोईन दिसायला अगदीच अवतार दाखवली आहे. तिच्या character साठी एकदम perfect पण मला कंटाळा आला. शिवाय स्टोरी पटापट move होत नव्हती. Venus चा हिरो आहे. किती वेगळा दिसतोय आणि वेगळं character. स्टोरी Believable वाटली नाही.
Oh my venus --- ही बघितली. छान आहे सिरीयल.
थोड्या बघून सोडलेल्या सिरीयल -
the master's sun - I see dead people theme आहे. रात्रीच्या वेळेला बघायला सुरू करायची चूक केली
K2 - action drama + love story, secretary kim, suspicious partner,
It happened in rain अर्ध्याहून अधिक बघून मग सोडली. Spring night चा hero इथे पण आहे. लहान hero आणि मोठी heroine अशी love स्टोरी आहे. तो hero अगदीच शाळकरी types वाटतो. K2 आणि suspicious पार्टनर सेम hero.
गेले काही दिवस binge करून संपवली ती Misty. काय serial आहे woman centric drama. इतकी fast paced एकही कंटाळलेला क्षण नाही. टिपिकल love story मध्ये जे अति कंटाळवाणे pauses असतात ते नाहीत. Heroine नी काय काम केलंय. हे कोरियन्स सगळी पात्र इतकी व्यवस्थित कशी काय लिहितात. एकही पात्र भरलेलं वाटत नाही. Hye ran ह्या prime time anchor ची कथा आहे. Woman centric drama आवडत असतील तर नक्की बघायला पाहिजे. शेवट मला आवडला नाही. तिथल्या किंवा जगातल्या कुठल्याही पुरुषसत्ताक पद्धतीला चुचकारण्यासाठी कदाचित असा शेवट केला असावा. पण तरीही all time best सिरीयल पैकी एक - माझ्यासाठी.
Crash लँडिंग चे खूपच reco, परत बघते
Korean Drama
Korean Drama
marriage contract नन्तर crash landing on you माझ्या ऑल टाईम फेव्हरेट मध्ये ऍड झाली.
फार छान !!!
मला आवडली आर्या , पहिला भाग
मला आवडली आर्या , पहिला भाग पकड घेत नाही पण नंतर एकदम वेग आहे सगळ्या घटनांना.
खूनी कोण समजणे चाणाक्ष प्रेक्षकांना प्रेडिक्टेबल असलं तरी घडत जाणार्या घटना, स्टोरी टेलिंग्ला महत्त्व आहे.
सुष्मिता आवडलीच पण सगळ्याच पात्रांनी छान अभिनय केलाय आणि प्रथेक कॅरॅक्टरचं महत्त्व शेवटच्या भागापर्यंत उलगडत जातं .
अधून मधून येणरी गोल्डन ओल्ड बॉलिवुड साँग्ज तर अजुनही ऐकताना किती मस्त फ्रेश वाटतात, थँक्स त्या काळातल्या म्युझिक डिरेक्टर्स ना
Btw , मनी हाइस्ट Indian व्हर्जन आल् तर सुष्मिता फिट बसेल इन्स्पेक्टर म्हणून
मी काल एक भाग - एक भाग करत
मी काल एक भाग - एक भाग करत करत रात्री उशीरापर्यन्त जागून संपवली , आर्या .
twists n turns खूप आहेत . मध्ये मध्ये रेंगाळते कथा पण काही घटना फार वेगात घडतात .
आर्या आणि मुलांसोबत मी पण खूप रडले मध्ये मध्ये
काही गोष्टी फारच superficial वाटल्या . एसीपी खानची तपासाची पद्धत फक्त पाठलाग आहे .
ईन्दर ला जाळ्यात ओढतात , आर्याला सत्य कळतं तो सीन .
अधून मधून येणरी गोल्डन ओल्ड बॉलिवुड साँग्ज तर अजुनही ऐकताना किती मस्त फ्रेश वाटतात, >>> ह्म्म्म . अकेले अकेले कहां जा रहे हो , कुठून चालू होतं आणि कुठे वळण घेतं
हिंदि वेबसिरीजना ड्र्ग्ज/माफिया या व्यतिरिक्त नविन विषय सापडत नाहि बहुतेक >>> त्यात एखाद्याच विबासं , टीनेज लवस्टोरी , प्रोब्लेम चाईल्ड , एखादं समलिंगी प्रकरण ई . ई .
कलाकार सर्वच आवडले - मुलं , एसीपी खान , शेखावत , दौलत , रॅड्स . तो संग्राम - शेफ रणवीर चा चुलत भाउ वाटतो .
overall verdict - go for it
अरे पण मला सांगा आर्या साध्या
अरे पण मला सांगा आर्या साध्या hotstar वर दिसेल का, की पैसे भरून घेतो त्यावर दिसेल.
Rads = Seen in City of dreams
Rads = Seen in City of dreams with Sandeep Kulakrni
Maya= Lawyer in Thappad
Shekhawat = Rocket Singh's boss
Hina= From 'Jane tu ya janena' gang
Veer's teen age girlfriend looked familiar too, can't remember!
'फोर मोर शॉट्स' चे दोन्ही
'फोर मोर शॉट्स' चे दोन्ही सिझन बॅक टू बॅक बघितले. थोडी आवडली.. थोडी नाही.
मागे इथेच कोणीतरी लिहिलं होतं तसं दोन्ही सिझनमध्ये तेच प्रॉब्लेम्स.. तीच भावनिक गुंतागुंत..
अंजना अर्जुनशी ब्रेकप करते तो भाग मला अजिबात बघवला नाही. मे बी माबुदो असावा.
बाकी चंपा यांनी लिहिलंय त्याप्रमाणे सगळेच कुठेही सेक्स करायला सुरु होतात.. वखवखलेले वाटतात.
लग्न / जोडीदार मिळणं म्हणजेच क्लोजर नाही हे अगदीच मान्य.
पण सिझनला याव्यतिरीक्त काहीतरी क्लोजर हवे होते. त्यांनी सगळंच अर्धवट टाकलं.
आता तिसर्या सिझनला याच मुलींचे हेच प्रॉब्लेम्स घेऊन आले तर लोक नक्की बोर होतील.
स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या मुली लग्न या संस्थेत सूट होत नसाव्यात असं हे १० +१० एपिसोड्स बघुन मला वाटू लागले आहे.
सीद्धीचे वडील जातात त्या
सीद्धीचे वडील जातात त्या अर्थी तिसरा सीजन असावा. ती सगळा बिजनेस सांभाळते वगैरे.
<अरे पण मला सांगा आर्या
<अरे पण मला सांगा आर्या साध्या hotstar वर दिसेल का, की पैसे भरून घेतो त्यावर दिसेल.>
साध्या हॉटस्टारवर नाही. आताच पाहिले.
सीद्धीचे वडील जातात त्या
सीद्धीचे वडील जातात त्या अर्थी तिसरा सीजन असावा. ती सगळा बिजनेस सांभाळते वगैरे.
>> हो. त्यांच्या फेसबुक पेजवर आली तिसर्या सिझनची घोषणा.
साध्या हॉटस्टारवर नाही. आताच
साध्या हॉटस्टारवर नाही. आताच पाहिले. >>> थँक यु सो मच.
It is available on Hotstar
It is available on Hotstar
It is available on Hotstar >
It is available on Hotstar >>> थँक यु सो मच, चेक करेन.
शेरलाँक होम्स सिझन १ ते 3 बँक
शेरलाँक होम्स सिझन १ ते 3 बँक टु बँक पाहिले. Benedict Cumberbatch ची फँन झाले...त्याचे डायलॉग्स .मस्त जाँन आणी त्याची केमिस्ट्री आवडली, मिसेस हडसन आवडली. डायलॉग्स आवडले.
आर्या बघतेय. पहिला भाग बोर
आर्या बघतेय. पहिला भाग बोर वाटला होता आता दुसर्यापासून थोडी पकड घेतेय. सुष्मिताने पण लिप सर्जरी केल्यासारखे वाटतंय किंवा खोटे दात. चंद्रचुड सिंगला खूप वर्षांनी बघितले. एक फार्मा कंपनी असते ना यांची मग इतके मोठ्ठाले २ मॅन्शन , नोकरचाकर, गाड्या? असू शकतं का?
सध्या प्राइमवर जमेल तेव्हा
सध्या प्राइमवर जमेल तेव्हा 'मार्वलस मिसेस मेझल' बघते आहे. ५०-५५ मिनिटांचा एक एक भाग आहे.
ती कलाकार खूप छान काम करते. विषय वेगळा आहे. डायलॉग्जमध्ये सगळी मजा आहे.
काही गोष्टी ५० च्या दशकात न्यूयॉर्कमध्ये खरंच असतील का अशी शंका येते.
साध्या हॉटस्टारवर आर्या आहे
साध्या हॉटस्टारवर आर्या आहे पण माझ्या पीसीवर क्रोमचं जुनं व्हर्जन आहे म्हणून मला दिसणार नाही सांगतायेत. मोबाईलवर दिसेल आणि नवऱ्याच्या laptop वर दिसेल. फेवीस्टिकपण आहे, त्याने tv वर बघता येईल.
Pages