Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55
सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..
मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.
ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथेच वाचून Ertugrul Ghazi
इथेच वाचून Ertugrul Ghazi बघायला सुरूवात केली. मस्त खिळवून ठेवलंय आता. धन्यवाद
बेताल (वेताळ) - नेटफलिक्स
बेताल (वेताळ) - नेटफलिक्स
व्हेन तुंबाड मिट्स लुचाई इन परफेक्ट वे!
बेताल आवडली.
बेताल आवडली.
कोरीयन मालिका झी ५ वर आहेत.
कोरीयन मालिका झी ५ वर आहेत. हिंदीत डब्ड आहेत.
ढणढणाटी संगीत नाही, आरडा ओरडा नाही, कारस्थानं नाहीत. सगळं कसं शांत शांत. प्रसन्न चित्त करणा-या मालिका आहेत या.
बेताल (वेताळ) - नेटफलिक्स>>>>
बेताल (वेताळ) - नेटफलिक्स>>>>> ओह वेताळ आहे का ते? मला वाटलं ताल बिघडलाय ते बेताल
मनमोहन देसाईचे सिनेमे बघा.
मनमोहन देसाईचे सिनेमे बघा. चांगला वेळ जाईल. चुका काढायची सवय जाईल. जे समोर येईल ते एण्जॉय करण्याचा गुण वाढीस लागेल. जुने वाटत असतील तर फरहा खानचे बघा. ओम शांती ओम / हॅप्पी न्यू इयर इत्यादी.
बेताल नाही आवडली बुवा
बेताल नाही आवडली बुवा
बेताल चा एक रिव्ह्यू वाचला
बेताल चा एक रिव्ह्यू वाचला होता.. ईतकी खास नाही असं लिहीलेले. पाहीली नाही अजून.
चोक्ड च ट्रेलर फारच आवडले.. चांगली असेल.
अनुराग कश्यपच्या सिरीजची
अनुराग कश्यपच्या सिरीजची उत्सुकता आहे !
नेव्हर हॅव आय एव्हर मधे बरेचदा मेन्शन झाल्याने मी ‘रिव्हरडेल’ पहायला सुरवात केली आहे, टिपिकल हायस्कुल रोमान्स आणि जोडीला थ्रिलर , मला आवडतेय
कोरीयन मालिका झी ५ वर आहेत.
कोरीयन मालिका झी ५ वर आहेत. हिंदीत डब्ड आहेत. >>> थँक यु सो मच. ती Crash landing on you पण आहे का त्यात.
*** स्पॉयलर अलर्ट ***
*** स्पॉयलर अलर्ट ***
>>बेताल नाही आवडली बुवा<< +१
बकवास आहे. झांबी मुविज आवडणार्यांना रोचक वाटेल कदाचित. गरिबांचा नाइटकिंग्/व्हाइट वॉकर्स आहेत...
@अश्विनी_९९९, Ertugrul ghazi
@अश्विनी_९९९, Ertugrul ghazi कुठे बघताय? पहिल्या सिझनचा ५० वा एपिसोड बघून झालाय म्हणताय म्हणून. इथेच वाचून मी बघायला सुरूवात केली आहे असं कालच इथे लिहीलं.
मी TRT by PTV ह्यांनी अपलोड केलेले एपिसोड्स बघतेय जे उर्दूमध्ये डब केलेले आहेत. २९ एपिसोड नंतर अपलोड केलेले दिसत नाहीयेत.
आडो, नेटफ्लिक्स वर पण आहे ,
आडो, नेटफ्लिक्स वर पण आहे , पण तिथे डब्ड वर्जन नाही तर टर्किश विथ इन्ग्लिश सबटायटल्स आहेत. मी पण आत्ताच बघायला सुरुवात केली , ४-५ भाग झालेत पण सध्या ते उर्दूतले यूट्यूब वरचे भागच बघतेय.
मै, माझ्याकडे नेटफ्लिक्स
मै, माझ्याकडे नेटफ्लिक्स नाहीये.
prison break चे सर्व भाग कुठे
prison break चे सर्व भाग कुठे पहावयास मिळतिल ??
@ आऊटडोअर्स , यु ट्यूब वर
@ आऊटडोअर्स , यु ट्यूब वर बघतीये मी...इंग्लिश subtitles आहेत... Resurrection Ertugrul या नावाने शोधा.
अश्विनी, पिक्चर क्वालिटी
अश्विनी, पिक्चर क्वालिटी चांगली आहे कां?
हो
हो
थॅंक्स अश्विनी, बघते.
थॅंक्स अश्विनी, बघते.
prison break चे सर्व भाग कुठे
prison break चे सर्व भाग कुठे पहावयास मिळतिल ?? ~~ Hotstar वर
पाताल लोक पाहिली. सर्वांचे
पाताल लोक पाहिली. सर्वांचे काम छान झाले आहे.
पण थोडा गोंधळ नाही समजला. निवडणूकीचा.
ग्वाला विरुध्द पक्षातून उभा रहातो आणि परत वाजपेयी सोबत हात मिळवतो..
कुणी विस्कटून सांगेल का?
आमचं वराती मागून घोडं....
आमचं वराती मागून घोडं....
IMDB वर 9.2 रेटिंग बघून मनी हैस्ट बघायला घेतली आणि अजिबात नाही आवडली. चोरांबद्दल कुठेही अनुकंपा, सहानभूती निर्माण होत नाही म्हणून त्यांच्या भावनिक प्रसंगात कुठेही आपण कनेक्ट होत नाही. आख्या सिरीज मध्ये पोलीस अधिकारी रॅकेल बद्दल सतत ती एक बिनडोक आणि incompetent बाई आहे असच वाटत राहतं. अपहरण चं थरार नाट्य सुरू असतांनी आणि ओलिसांची जबाबदारी तिच्यावर असतांनी तिला कॉफी प्यायला, आणि इतर गोष्टी करायला भरपूर वेळ असतो.
एका प्रसंगात एक चोर मोटारसायकल घेऊन शंभर एक बदूकधाऱ्यांच्या वेढ्यातून बँकेत घुसतो हे पाहून मिथुनच्या चित्रपाटाची आठवण झाली.
एकूणच चांगल्या सिरीज शोधण्यासाठी IMDB च्या फिल्टर ला काट मारली आहे.
बेताल चा शेवट नाही आवडला .
बेताल चा शेवट नाही आवडला . अजून चांगली झाली असती हि सिरीज
पाताललोक बघायला घेतली. चार
पाताललोक बघायला घेतली. चार भाग बघून झाले, तो इन्स्पेक्टर सस्पेंड होतो तिथपर्यंत बघितली, जाम वाईट वाटलं, त्याच्या हातातोंडाशी आलेला घास काढून घेतात कोणीना कोणी.
गुल पनागला फार रोल नाहीये का. मला तो चौधरी आणि अन्सारी दोघेही आवडले (अन्सारी खूप जास्त आवडला) . ती सारा, dolly दोघी छान आहेत. तो मेहरा पूर्वी हिंदी सिरीयलमधे बघितल्यासारखा वाटतो. मला त्या dolly चा संशय येतोय, ती नाटक करते की खरंच नवऱ्याची काळजी असते.
तो त्यागी हातोड्याने मुलांना मारतो, तो सीन अंगावर येतो, बापरे.
सिरीयल ओघवती आहे अगदी. उरलेले उद्या बघायला हवेत, जाम उत्सुकता आहे.
चीनी म्हणजे तोच का लहानपणी ट्रेन मध्ये सामान चोरतात जे दोघेजण, त्यातला एक मुलगा पावडर, लिपस्टिक लावतो लगेच आरशात बघून, मीन्स त्याला इतर वस्तूंपेक्षा त्याचं आकर्षण असते.
तो त्यागी हातोड्याने मुलांना
तो त्यागी हातोड्याने मुलांना मारतो, तो सीन अंगावर येतो, बापरे. >>>>>>> हो एकदम यक्क झाले. मी का बघतेय ही सिरीज असंही वाटून गेलं.
अंजली वेबसिरीज बघताना शिव्या,
अंजली वेबसिरीज बघताना शिव्या, काही अतिरंजित सीन्स अंगावर येतात. पाताललोक मध्ये ते अपरिहार्य आहेत कारण वास्तव असं असू शकते. तरी त्रास होतो बघताना. पण त्यातही काही भाग कथेचा डिमांड नाही, दाखवला नसतं तरी चाललं असते असं वाटलं. विशेषतः तो मेहरा सारा सीन मला उगाच घुसवल्यासारखा बोअर वाटला.
ते पंजाबी आख्खं गाणं ऐकवलं नसतं तरी चाललं असते. एखादे कडवं ठीक होतं.
मला झोंबी अजिबात आवडत नाही पण
मला झोंबी अजिबात आवडत नाही पण तरी 'बेताल' आवडली कारण त्याचे कॅमेरावर्क मस्त आहे. एकतर सर्व घटना रात्रीतच घडते त्यामुळे प्रकाशाचा योग्य परिणामकारक वापर, एकाच वाड्यात घटना घडते म्हणुन त्याच त्याच खोल्यात सिन्स असले तरी वेगवेगळ्या कोनातुन घेतलेले शॉट्स, कमीतकमी रंगाचा योग्य वापर यामुळे चांगले वाटले. खरंतर तेच पहायला जास्त आवडले, कथेपेक्षा
...
पाताल लोकचे तीन भाग बघून झाले
पाताल लोकचे तीन भाग बघून झाले. सारा मला सखी गोखले सारखी दिसते असं वाटलं. डॉली सारख्या बायका डोक्यात जातात. उपयोग तर काहीच नाही (आधाराच्या दृष्टीने) पण उपद्रव मूल्य भारी. हातोडा आणि तोप या दोघांच्याही घरी बायकांवर अत्याचार करून बदला घेतला जातो हे बघून ईतकी किळस वाटली. गुल सारख्या ग्लॅमरस बाईला अशी साधी बघवत नाही आणि कामही अगदी कमी आहे तिचं. संजीव मेहरा तलवार मध्ये अगदी वेगळा दिसतो. पंजाबी गाणं पूर्ण दाखवायची गरज नव्हती. मेहरा त्या पोलीस बाईला पेस्ट्री पाठवतो ते फक्त सेल्फी काढली म्हणून की अजून काही.
मेहरा त्या पोलीस बाईला
मेहरा त्या पोलीस बाईला पेस्ट्री पाठवतो ते फक्त सेल्फी काढली म्हणून की अजून काही. >>> तिच्याकडून आतल्या बातम्या काढून घेत असावेत, अजून पूर्ण बघून व्हायची आहे पण मेहरा आणि सारा असं करत असणार.
डॉली सारख्या बायका डोक्यात
डॉली सारख्या बायका डोक्यात जातात. उपयोग तर काहीच नाही (आधाराच्या दृष्टीने) पण उपद्रव मूल्य भारी.>> थांबा चंपा, इतक्यात निष्कर्ष काढू नका. डॉली चा मेहरा ला काय उपयोग होतो ते तुम्हाला शेवटी कळेल.
ज्यांनी पहिली त्यांना माहिती असेल.
Pages