Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55
सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..
मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.
ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
mx player ओपन करायला पण भीती
mx player ओपन करायला पण भीती वाटते बाई.... सगळे १८+ कंटेंट तिकडेच पडलेत बहुतेक. समांतर आणि भौकाल साठी डाऊनलोड केलेलं....दोन्ही सिरीज छान आहेत.
we tv app वर My girlfriend is an alien बघितली.मस्त लाईट आणि क्यूट आहे.
पंचायत बघितली , खूप आवडली ,
पंचायत बघितली , खूप आवडली , पुढच्या सीजन ची उत्सुत्कता आहे , फॅमिली मॅन पण बरी आहे , मनोज वाजपेयी साठी बघितली. दोन्ही वेब सिरीज चे नेक्स्ट सीजन कधी येतील कुणास ठाऊक.
आजून काही वेब सिरीज सुचवा ज्या फॅमिली ला बसून बघता येतील, त्यातल्या त्यात माईंड द मल्होत्रा , हि बरी आहे, पण ३ मुले २१-२२ वर्ष्याची तीही मिनी माथूर ला , कुछ हजाम नाही हुआ
पंचायतबद्दलच्या सर्व
पंचायतबद्दलच्या सर्व पोस्टींना +१
इतकं साधं, निखळ, मार्मिक आणि अस्सल आपल्याकडच्या टीव्ही मालिकांमध्ये आजकाल बघायलाच मिळत नाही.
बहुतांश चित्रपट/ मालिकांमधून
बहुतांश चित्रपट/ मालिकांमधून दाखवले जाणारे गावाचे/ गावाकडील लोकांचे stereotypes बघून जाम कंटाळा आला होता.
पंचायतचा पहिला तो चावी शोधयचा सीन बघून वाटलं की ही मालिका पण अशीच निघणार की काय. पण जरा संयम ठेवला.
फारच आवडली. संपुर्ण मालिकेची हाताळणी एकदम फ्रेश आहे.
का कोणास ठाऊक त्या प्रधानच्या मुलीला चालून आलेलं स्थळ म्हणजे त्या नायकाचा MNC मधे काम करत असलेला मित्र असेल असे वाटते.
Spoiler:-
काही छोट्या छोट्या गोष्टी खटकल्या. शेवटी प्रधानाची मुलगी त्या टाकीवर त्याला दिसते. त्याने विचारल्यावर सरळ सांगते की प्रधानाची मुलगी. खरं तर तिने तोर्यात विचारायला हवं होतं तू कोण? गावाच्या बाहेरचा माणूस प्रधानाच्या मुलीला विचारतो आणि ती सरळ उत्तर देते.... छ्या.
ईथे मला एकदम आर्ची आठवली.
ती गावातच राहत असेल तर तिला
ती गावातच राहत असेल तर तिला माहित असायला पाहिजे ना सचिव कोण ते?
खरं तर तिने तोर्यात
खरं तर तिने तोर्यात विचारायला हवं होतं तू कोण?
>> हा पण एक स्टीरिओटाईप च आहे आपल्या डोक्यात बसलेला. गावाकडची तरुण मुलगी (प्रधानाची असेल तर अधिकच) तोऱ्यात वगैरे राहणारी, वागणारी, बोलणारी असली पाहिजे.
आर्चीकडे आर्चीच्या वडिलांना आपल्या पोझिशनचा माज आहे. त्यामुळे त्यांनी गावात दरारा निर्माण केला आहे. आणि तो दरारा कायम रहावा म्हणून घरच्यांनीही आपला आब अज्जिबात सोडायचा नाही हे संस्कार त्या घरातल्या प्रिन्स आणि आर्चीवर आहेत. म्हणून ते तसं वागतात.
रिंकीकडे तिच्या आईवडिलांना त्यांच्या पदाचा कोणताही गर्व किंवा माज आहे असं पंचायत बघताना जाणवत नाही. तेच साधेपणाचे, निगर्वीपणाचे संस्कार रिंकीवर झाले असतील. त्यामुळे ती निरागस आणि सहज बोलणारी दाखवली आहे.
बाकी ती त्याच गावात राहत असली तरी अभिषेक त्रिपाठी तिला नावाने माहीत असेल फक्त. तो तिच्या नजरेस पडणार नाही याची काळजी नीना गुप्ता 'स्वानुभवातून' घेते असं दाखवलं आहे. बी ए पण करस्पॉंडन्स करते असा उल्लेख आहे. सो घराबाहेर पडत नसावी फार.
मला तर विकास (चंदन रॉय) हे कॅरेक्तर पण इतके आवडले की त्याच्या बायकोला पण बघायची (उगाचच) उत्सुकता होती.
हा पण एक स्टीरिओटाईप च आहे>>>
हा पण एक स्टीरिओटाईप च आहे>>>>>
हम्म्म असू शकेल.
Men Who Built America -
Men Who Built America - Amazon Prime
ही मला भारतात दिसली नाही, अजून कुठे बघता येईल का?
पियु रींकीच्या कॅरॅक्टरबद्दल
पियु रींकीच्या कॅरॅक्टरबद्दल छान लिहीलं आहेस, तसंच असावं.
मला तर विकास (चंदन रॉय) हे कॅरेक्तर पण इतके आवडले की त्याच्या बायकोला पण बघायची (उगाचच) उत्सुकता होती. >>> सेम पिंच.
मला तर विकास (चंदन रॉय) हे
मला तर विकास (चंदन रॉय) हे कॅरेक्तर पण इतके आवडले की त्याच्या बायकोला पण बघायची (उगाचच) उत्सुकता होती >>>> khooshaboo
ते राजा राणीची जोडी नंतर कसं
ते राजा राणीची जोडी नंतर कसं त्याच भाषेत बोलावंसं वाटत होतं तसं आता या युपी अॅक्सेंट मधे बोलावंसं वाटतं सारखं
पंचायत बरेच दिवस बघायची टाळली
पंचायत बरेच दिवस बघायची टाळली होती, पण इथले रेको बघून उत्सुकता वाढली आजी बघूनच टाकली.
सगळ्यात जास्त आवडला तो रघुबिर यादव. एक मुरब्बी, संधीसाधू पण सहृदयी राजकारणी त्याने अप्रतिम साकारलाय. 'एक पुडी इस गरीब के इसमे भी डलवा दो,' आणि त्यानंतर 'एक बोला तो एक ही डालोगी क्या?' जबरदस्त टायमिंग!!!! हॅट्स ऑफ... आणि हा एक नाही तर अनेक प्रसंग.
नीना गुप्तानेही जबरदस्त acting केलीये. कुठेही गरीब बिचारी वाटत नाही, उलट रघुबिर यादव तिला वचकून असतो. 'बीस साल पहले तुम भी ऐसी बाहर खटियापे लेटे रहते थे.'
फक्त दुसऱ्या सिजनमध्ये लव स्टोरी जास्त दाखवून पचका करू नये, हीच इच्छा!
पण अजून खूप एपिसोड हवे होते.
सगळ्यांना धन्यवाद!
द फॉल ही सिरीज पाहून झाली ,
द फॉल ही सिरीज पाहून झाली , 17 च एपिसोड होते ... आवडली , फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे फिल्म सिरीज मी पाहिलेली नाही पण त्यातला मेन हिरो या सिरिजचा मेन अँटागॉनिस्ट आहे .. सिरिअल किलर आहे ... प्रचंड ग्रिपिंग होती , पण एन्ड काहीसा अपेक्षाभंग करणारा वाटला ... सिरीज जेवढी नाट्यपूर्ण होती त्यामानाने शेवट किंचित मिळमिळीत वाटला .... तोच शेवट जरा वेगळ्या पद्धतीने केला असता तर अधिक आवडला असता .
यातली मुख्य प्रोटॅगॉनिस्ट स्टेला गिबसन हे मी आतापर्यंत ज्या सिरिज पाहिल्यात त्यापैकी सर्वात वेल डेव्हलप्ड , स्वभावाला अनेक पैलू फिमेल कॅरॅक्टर होतं ...
शेवट विशेष आवडला नसला तरी सिरिज आवडत्या मालिकांपैकी एक झाली आहे .
पण अजून खूप एपिसोड हवे होते.
पण अजून खूप एपिसोड हवे होते. >>> अगदी अगदी.
पंचायत बघितली. एक नंबर आहे.
पंचायत बघितली. एक नंबर आहे. आत्तापर्यंत बघितलेल्या वेब सिरीज मध्ये सर्वात वरचा नंबर.
मस्त आहे..... अगदी सहमत.....
मस्त आहे..... अगदी सहमत...... सगळे पात्र एकदम सही
गेले काही दिवस Marriage
गेले काही दिवस Marriage Contract ही korean series netflix वर binge watch करते आहे. नावावरून स्टोरी कळते आहे
मला हिरोईन आणि hero प्रचंड आवडले आहेत त्यामुळे एकदम डोळ्यांत बदाम. नक्की बघण्यासारखी आहे. सिरीयल संथ आहे तरीही speed पण आहे, अमेरिकन speed नाही. छोटी मुलगी पण cutie आहे.हिरोला मस्त dimple आहे 
हल्लीच एक etrugrul ghazi
हल्लीच एक etrugrul ghazi नावाची नविन वेबसीरीज बघायला सुरूवात केली. तुनळीवर फारच कौतुक एकल काहीँनी तर गेम आँफ थ्रोन्सच्या तोडीची आहे म्हणुन बघायला सुरूवात केलीये. आतापर्यंत फक्त पहीला सिजन संपवला. आवडतीये. माबोवर इतर कुनी बघितलीये का ही वेबसिरीज
@अक्षय
@अक्षय
मी बघतीये ती सीरियल ..1ल्या सीझन चा 50वा एपिसोड चालू आहे..आवडली मला..
@राजसी..कोरियन सीरियल मध्ये she was preety बघा....छान हलकी फुलकी रोमँटिक कॉमेडी आहे.
JiO वर बर्याच कोरियन सिरीज
JiO वर बर्याच कोरियन सिरीज आल्या आहेत.
Any recommendations ??
@स्वस्ति
@स्वस्ति
वर मी म्हणाले ती...she was preety
आणि fight for my way असेल तर बघा...ती सुद्धा साधी सिंपल रोमँटिक कॉमेडी आहे.
Thank you Ashiwini. बघते,
Thank you Ashiwini. बघते, netflix का?
सीरिअल संपली सकाळी मला फार bore झालं होतं.
Thnks Ashwini
Thnks Ashwini
मी लिहिणारच होतो etrugrul
मी लिहिणारच होतो Ertugrul बद्दल. प्रचंड अॅडिक्ट झालोय! पहिला सीझन अर्धा झाला. गेम ऑफ थ्रोन्स सारखे न्युड सीन्स, बीभत्स हिंसा आणि सिजिआय नसल्यामुळे चांगली वाटतेय. पार्श्वसंगीत तर एकदम haunting आहे.
@ राजसी
@ राजसी
नाही Netflix नाही...kdramahood म्हणून वेबसाईट आहे...तिथे खूप साऱ्या कोरियन सीरिअल्स विथ इंग्लिश subtitles ahet.
she was preety --- ही सापडली
she was preety --- ही सापडली netflix वर.
कोरियन वेब सीरिज फॅन्ससाठी
कोरियन वेब सीरिज फॅन्ससाठी नेटफ्लिक्सवर 'Crash landing on you'. माझ्या माहितीत हिरो खूप जणींना प्रचंड आवडला आहे, पण मी मात्र एकच एपिसोड पाहून सोडून दिलं. 2 तासांचा मुव्ही परकीय भाषेत पहाणे (खरं तर वाचणे ) इतपत ठीक, पण कित्येक एपिसोडची वेबसिरीज वाचत पहायची (?) म्हणजे बोअर होतं.
'Crash landing on you'. ---
'Crash landing on you'. --- इतकी catchy वाटली नाही. एखादा एपिसोड पाहून सोडून दिली.
नेटफ्लिक्सवर एक वेबसिरीज आहे
नेटफ्लिक्सवर एक वेबसिरीज आहे ' Restaurants on the Edge'. वेगवेगळ्या देशातील एखाद्या ठिकाणचं रेस्टॉरंट जे चांगला बिझिनेस करत नाही आणि आता बंद पडायच्या मार्गावर आहे किंवा सिरीजच्या नावाप्रमाणे कड्याच्या टोकावर आहे, त्याचं पुनरुज्जीवन करण्याची प्रोसेस दाखवली आहे.
प्रत्येक एपिसोड म्हणजे नवीन देश आणि तिथलं एक रेस्टॉरंट. या reviving process मध्ये इतके सुंदर देश, शहरं, बेटं पहायला मिळतात. तिथला निसर्ग बघताना डोळे सुखावून जातात. डेकोरेशन साठी किंवा लोकल फूड अनुभवण्यासाठी टीम लोकल मार्केट, जंगलं, ऐतिहासिक जागा, नद्या, समुद्र, लोकल कलाकार, लोकल संस्कृतीला भेट देते. त्यामुळे आपल्याला नुसता निसर्ग पहायला मिळत नाही तर त्या देशाची/शहराची काही तरी नवनवीन माहिती मिळते. संस्कृतीशी, लोककथा, शेतकरी, शेफ्स, कलेशी ओळख होते. प्रवासात आपला हेच तर पहाण्याचा आणि मिळवण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे मला लॉक डाऊनमध्ये सुद्धा देशोदेशी व्हर्च्युअल प्रवास करण्याची संधी मिळाल्याचा आंनद झाला.
*याचा आता सध्याच सिझन 2 पण आला आहे.
Fauda (Netflix) वर इज्रायली
Fauda (Netflix) वर इज्रायली सिरीयल आहे... इज्राईल, आणि पॅलेस्टाईन यांच्यातल्या लफड्यावर.. पकडून ठेवणारी सिरीयल वाटली...
I-land (Netflix) पण पकड घेणारी सिरीयल होती.. बघायला हरकत नाही.
Never Have I ever (Netflix) बघितली आवडली.. एका नाचात "DD the shadi" (https://www.youtube.com/watch?v=ASHOe3_UKgc&t=38s) ची मुख्य कलाकार आहे..
Pages