वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अग्गं आदिश्री सेम माझंच मत लिहिलंस की गं! मलाही त्या तिथपर्यंतच बघवलं गेलं. ती मुलगी १५ व्या वर्षीच सेक्स चा विचार करायला लागते बघून सोडूनच दिलं. पुढे नाही बघाविशी वाटली. निदान आपली भारतीय मुलं (इथे काय किंवा परदेशात) अशी नसतात हा निदान माझा समज आहे.

बघं म्हणाले होते ना तुला Happy अंजली_१२.

You Vs Wild आली आहे नेटफ्लिक्स वर . ज्यात आपण निवडू शकतो बेअर ग्रिल्सचा मार्ग. दरवेळेस दोन पर्याय असतात. माझ्या मुलांना मजा आली. ते पुरवून पुरवून पहात आहेत. Interactive आहे आणि रम्य पण. मुलगा जाणूनबुजून धोकादायक वळणावर नेतो त्याला. मुलांना आवडते. Survival skills सुद्धा सांगतो तो.

मुलीच्या व्यक्तीरेखेतून विचार केलेली सिरीयल आहे. एखाद्या 15 इयर्स old ला sex बद्दल असं वाटत पण असेल किंवा नुसते peer pressure सगळे जस वागतात तसंच तिला पण वागायचं आहे. 15 वर्षे वयाला relationship etc इत्यादी deep thinking असेल असं वाटत नाही.
Spoiler - तुम्ही पुढे पूर्ण पहिलीत तर कळेल की ती ह्या प्रकरणात पुढे जात नाही. तिला एवढा मोठा आघात झालाय ती तिला जमेल तसं cope up करते आहे.

मी १०० पाहिली नाही. पण तिच्याबद्दल वाचलं. त्यात मराठी मुलीचं हिंदी अपेक्षित असल्याने रिंकूला वेळ मिळाला नाही हे आमच्या पथ्यावरच पडलं असं दिग्दर्शकाने म्हटलं आहे. मालिका पाहिल्याशिवाय अर्थबोध होणार नाही. एकंदर विषय ऐकल्यानंतर अग्रक्रमाने पहाव असंही वाटलं नाही.

इथे वाचून पाताललोक बघु का मनात येतंय, नाहीतर सध्या फक्त हलक्याफुलक्या बघायचा विचार करत होते, डोक्याला सध्या शॉट द्यायला नको वाटतं.

मी पण १०० चा एक एपिसोड पाहून सोडून दिली. इतकी रटाळ वाटली. त्यात रिंकू राजगुरू तर अगदीच होपलेस वाटली. ती director's actress असावी बहुतेक, कारण नाहीतर तिचा सैराट नंतर कुठेच प्रभाव पडला नाही. स्टोरीत पण काहीच उत्सुकता वाटली नाही. वाटत नाही पुढे पाहीन.

अंजू, मी दोन दिवसात संपवली पाताललोक. खरंतर मी अश्या टाईपच्या (गुन्हेगारी) पाहत नाही पण एक एपिसोड पाहू म्हणून पाहायला घेतली तर पाहतच गेले ... जबरदस्त पकड आहे. सगळ्यांचीच ॲक्टिंग जबरदस्त आहे. आपल्या कल्पने पलिकडच जग आहे पण असूही शकतं...

@ अंजु मी पण हेच लिहायला आले होते की पाताल लोक चा विषय हलकाफुलका नसला तरी डोक्याला शॉट नाहीये, उलट खूप पकड घेते मनाची. अगदी मस्ट वॉच..

मी अ‍ॅक्चुअली बघायला सुरू केली पण का कोण जाणे पहिल्या भागात एवढी पकड जाणवली नाही. मे बी मीच जरा उठत बसत बघत होते म्हणून असेल पण आता लाँग विकेंड सत्कारणी लावून नेटाने बघेन जर लोक्स एवढी रेकमेंड करतायेत तर.

पाताल लोक चे एंडिंग टायटल सॉंग ....

सकल हंस मे राम बिराजे ...

अतिशय छान आहे . जरूर ऐका

https://youtu.be/7ThyL6Fx4CI

प्रेम ना बड़ी उपजे
प्रेम ना हाट बिकाय
बिना प्रेम का मानवा
बंधिया जम पुर जाय
जा घट प्रेम ना संचरे
जा घट जान मसान
जैसे खाल लोहार की
वो स्वास लेत बिन प्राण

सकल हंस में राम बिराजे
राम बिना धाम नहीं
राम बिना धाम नहीं
सब भरमंड (ब्रह्माण्ड) में जोत का बासा
राम को सुमिरो दूजा नाही
तीन गुण पर तेज हमारा
पांच तत्व पर जोत जले
जिनका उजाला चौदह लोक में
सूरत डोर आकाश चढ़े
सकल हंस में राम बिराजे

नाभि कमल से परख लेना
हृदय कमल बीच फिरे मणि
अनहद बाजा बाजे शहर में
ब्रह्माण्ड पर आवाज हुयी
सकल हंस में राम बिराजे

हीरा जो जोती लाल जवारात
प्रेम पदार्थ पर्ख्यो नाही
सांचा मोती सुमर लेना
राम धनी से म्हारी दूर लगी
सकल हंस में राम बिराजे

गुरुजन होय तो हेरीलो घट में
बाहर शहर में भटको नहीं
गुरु प्रताप नानक शाह के चरने
भीतर बोले दूजा नाइ
सकल हंस में राम बिराजे

काल रात्री पाताललोक पहायला सुरुवात केली , एखादा भाग बघून झोपेन असा विचार केला , पण इतकी गुंतत गेले . , मध्ये च कधीतरी डुलकी लागली आणि काही सीन्स चुकले , संदर्भ लागेना तेव्हा नाईलाजाने बंद केला.
गुन्हेगारांची पार्श्वभूमी अंगावर काटा आणते.
हिंसा , शिव्या सगळे कथेच्या ओघात आहेत.
काम सगळ्यांची एक नंबर झालीत.
अन्सारी मस्त आहे. नीरज काबी रूबाबदार दिसतो विशेषतः तो त्यागीची बातमी लाइव्ह देतो तो सीन. पण कोणी त्याला बेटा म्हणावे इतका तरुण नाही. Happy
मला बाजपेयी , गुजर वगैरे गोंधळ नीटसा कळला नाही पण overall impact चांगला आहे .

सकल हंस मे राम बिराजे ... >>> धन्यवाद! तो शेवटचा एपिसोड संपताना सुरू होते आणि लक्ष दिले नसते तर निसटलेच असते. अगदी थोडेच ऐकले पण फार सुंदर वाटले होते.

पाहीली काल पाताल लोक. डिस्टर्बिंग आहे पण तरीही watching is worth. आवडली. अन्सारी आवडला. आपला इन्स्पेक्टर शेवटी वाचला हे पाहून जीवच भांड्यात पडला. धाकधूकच लागली होती. चीनी बद्दल सहानुभूती वाटली..
शेवटी पण गाणं पूर्ण ऐकलं. चांगले आहे.

मस्त आहे पाताल लोकचे गाणे. मालिका तर पहायला मिळणार नाही कारण प्राईम आता घरात नाही. पुन्हा घेऊ तेव्हा पाहू.

मला इंग्रजीचं वावडं नाही पण तरीही जर हिंदी चा ऑप्शन असेल तर वेबसिरीज प्रेफर केली जाते. (याच कारणाने बहुचर्चित असून 'मनी हेईस्ट' आणि 'रिव्हरडेल' बघायची राहिलीय). मला कोणीतरी लँग्वेज ऑप्शन मध्ये 'हिंदी' पण असलेल्या इंग्रजी वेबसिरीज सुचवा ना.

'नेव्हर हॅव आय एव्हर' हिंदीत अव्हेलेबल होती हे लक्षात आल्यावर पट्कन बघितली गेली. आणि त्याखालोखाल 'सेक्स एज्युकेशन' पाहिली. ठीक वाटली. अगदीच थिल्लर नाहीये पण खूप भारीपण नाही. 12 वर्षाचे म्हणजे अगदीच लहान दाखवले आहे ओटीसचे वय. एरीकसाठी वाईट वाटले. मेव्ह थोडी स्वार्थी वाटली. आणि एमीने छुपे बुलिंग करणारा ग्रुप सोडायला खूप वेळ घेतला. ऍडमला याआधीच काहीतरी कठोर शिक्षा व्हायला हवी होती. जॅक्सनला शेवटी फसवणूक झाल्यासारखे वाटत असणार नक्की. वेबसिरीज जिथे संपली त्यापुढे थोडी अजून दाखवली असती तर सगळ्या स्टोर्यांना थोडेथोडे क्लोजर मिळाले असते का?

द हॅन्डमेड्स टेल बघितली प्राईमवर. खूप दिवस लागले बघायला. सब टायटल लावली होती इंग्लिश त्यामुळे ते वाचत वाचत बघितली. भागही मोठे आहेत एक तासाचे. आता लॉकडाऊनच्या काळात बघितली ही चूक झाली असे वाटतेय. खूप निराश वाटत आहे बघितल्यापासून. शेवटचा भाग तर अगदी अंगावर येणारा आहे. काय भयंकर शिक्षा करतात त्या हॅन्डमेड्स ना. त्यांनीच मुलं जन्माला घालायची आणि शिक्षाही त्यांनीच भोगायची. शेवटी जनिनला दगड फेकून मारत नाहीत म्हणून हात तोडून टाकतात का सगळ्यांचे. तो हात तोडतानाचा सीन जुनवर चित्रित केला आहे का. बघताना इतकं घाण वाटत राहतं, जणू काही बाई एक मशीन आहे. हे जर खरंच घडलं असेल तर हे फार भयंकर आहे. ईतकी वर्ष लागतात बाहेरच्या जगाला हे सगळं कळायला कारण तीनच्या वर वर्ष होऊन गेलेली असतात. तीन वर्षांनी जूनची मुलगी तेव्हडीच असते. जूनच्या आधीची हॅन्डमेड आत्महत्या का करते. ती स्वयंपाक करते तीपण कैदी असते का. कमांडर सगळे नपुंसक असतात का. कमांडर आणि त्यांच्या बायका बऱ्याच वयस्कर वाटतात. मोईरा फार आरामात पळून जाते दोन्ही वेळी. निक आवडला मला. अजून एक सीजन असेल का कारण नायिका अजून कैदेतच आहे.

नवीन दोन सीरीज येतायत नेटफ्लिक्स वर

१) Betaal - Evil is eternal.
https://www.youtube.com/watch?v=YSEVaVc-nOo
From the makers of 'Get Out', 'Insidious', ‘Bard of Blood’ and ‘Ghoul’ comes another boundary-pushing and genre-elevating horror series. While on a mission to displace the natives of Campa forest in order to build a highway, Sirohi and his squad unwittingly unleash the curse of Betaal mountain that wreaks havoc on the people and threatens to end civilization as we know it.

२) Choked - अनुराग कश्यप ची आहे.
https://www.youtube.com/watch?v=KY3D-htXKFE&t=45s
To what extent are you willing to go for money?
Directed by Anurag Kashyap, Choked is the story of a hapless bank cashier whose life takes an unexpected turn when she finds a source of unlimited money in her own kitchen. What will happen when the world becomes suspicious of her newfound fortunes?
streaming on 5th June, only on Netflix.

@चंपा, ही सिरीयल फँटसी आहे. दूरच्या भविष्यात अशी परिस्थिती येऊ शकते ज्यात nuclear power usage आणि अति industrialisatiom मुळे बायका-पुरुष मोस्टली सगळेच infertile होतात. जे हाताच्या बोटावर मोजण्याइतके fertile राहतात, ते सगळे बिनडोक होतात, बहुतेक परत nuclear power usage आणि अति industrialisatiom मुळे . अश्या परिस्थितीत काय होउ शकेल ह्याची fantasy serial आहे. Hope it helps.

धन्यवाद राजसी. प्राईमवर नवीन आली आहे लाखो मे एक, अरुण नलावडे आहेत. अपलोड पण आली आहे जी इंग्रजी आहे. पुष्पवल्ली काय प्रकार आहे, कुणी बघितली आहे का.

हलक फुलक बघायचे असेल पण काहीतरी भारी बघितले अशी फीलिंग हवी असेल तर कोरियन ड्रामा नक्की नक्की बघा. Netflix वर एक नवीन कोरियन सीरीस आहे - Crash landing on you

गर्भ श्रीमंत सौथ कोरियन तरुणी, जीने स्वतःच्या हिमतीवर एक मोठी कंपनी स्थापन केली आहे. Paragliding करताना वादळ येऊन ती नॉर्थ कोरीया मधे जाउन पोचते. तिथे तिला एक अतिशय देखणा soldier आसरा देतो आणि त्यांच्या मधे प्रेमाचा संवाद फुलतो.

वेब सीरीस ची स्टोरी म्हणजे Roman Holiday आणि बजरंगी भाइजान एकत्र आणि त्याला यश जोहार च्या प्रेमाची फोडणी. https://www.netflix.com/title/81159258

खूप सुंदर आहे, नक्की बघा.

हलक फुलक बघायचे असेल पण काहीतरी भारी बघितले अशी फीलिंग हवी असेल तर कोरियन ड्रामा नक्की नक्की बघा. Netflix वर एक नवीन कोरियन सीरीस आहे - Crash landing on you >>> thank u so much. पण नेटफ्लिक्स नाहीये.

Pages