Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55
सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..
मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.
ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साध्या hotstar वर आर्याचा
साध्या hotstar वर आर्याचा फक्त पहिला भाग दाखवतात, नंतर सांगतात की vip membership घ्या. जाऊदे फार बघितलं जात नाही तर सगळं कशाला घ्यायचं. Amazon prime आहे. त्यावरच्या इथे रेकमेंड केलेल्या बघेन.
"Amazon prime आहे. त्यावरच्या
"Amazon prime आहे. त्यावरच्या इथे रेकमेंड केलेल्या बघेन."--> अंजू ताई
अॅमेझॉन प्राईम वर 'बापजन्म' हा चित्रपट बघा खूप मस्त आहे.
आणि वेब सिरीज मध्ये 'पाताल लोक' जाम भारी!
फार बघितलं जात नाही तर सगळं
फार बघितलं जात नाही तर सगळं कशाला घ्यायचं >>> अगदी! त्यामुळेच मी देखील फक्त प्राइमच घेतलंय
असुर चा शेवट मला कळला नाही.
असुर चा शेवट मला कळला नाही.
"असुर चा शेवट मला कळला नाही."
"असुर चा शेवट मला कळला नाही."---> असुर संंपलेली नाहिये ओ विनीता ताई. इव्हन खरा शुभ पण अजून समोर आलेला नाहीये.
शेवटी असंं वाटतं की अमेय वाघ हाच शुभ आहे पण तो देखील एक फॉलोअर आहे.
केसर भारद्वाज कसलं भारी म्हणतो ना? "हम अनेक है!!"
शेवट तसा कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे अमेय वाघ ज्या मर्डररची जागा घेतो ना शेवटी... तेव्हा तो दोन चॉईस देतो.
"रिया" (नायकाची मुलगी) अथवा ते तिघे जण. पण या वेळी तो रिया म्हणतो म्हणून ते रियाला मारून टाकतात. स्वाती त्या रियाच्या आईची मैत्रिण ही देखील त्यांच्यापैकी एक निघते.
आणि त्याच्या थोडं आधी जेव्हा तो मर्डरर दोन चॉइसेस देतो त्या नायकाला
"त्याची बायको" अथवा "धनंजय राजपूत (अर्शद वारसी)" तेव्हा तो धंनजय राजपूत च नाव घेतो, आणि तो मर्डरर आणि नायक मिळून धनंजय राजपूत ला मारण्याचा कट करतात.
मला पण उगीच बघितली असं वाटतयंं. अर्धवट वेब सिरीज मी नाही बघत कधीच
damaged सिझन १ आवडलीच नाही
damaged सिझन १ आवडलीच नाही
फिल्मोग्राफी, व्हिडिओ, कलाकार, अभिनय सगळं छान असूनही भयानक नेगेटिव्हच वाटत राहिले
या लोकाना एन्ड चांगला करायला काय वेगळे पैसे घ्यायचे असतात की वेगळे कष्ट करावे लागतात?
शेवटाकडे सगळ्याना मारतच सुटतात
अॅमेझॉन प्राईम वर 'बापजन्म'
अॅमेझॉन प्राईम वर 'बापजन्म' हा चित्रपट बघा खूप मस्त आहे. >>> धन्यवाद. हल्ली पिक्चर फार बघितले जात नाहीत, try करेन. पाताल लोक बघितली.
बुलबुल प्रचन्ड आवडली. हि १८००
बुलबुल प्रचन्ड आवडली. हि १८०० शतकातली कथा आहे, त्या काळी लहान मुलीन बरोबर विवाह व्हायचे.
देवी शक्ती, विमेन पावर असे मिक्स रुपक वापरले आहे..ज्याना नाही आवडली, त्याना बहुधा हॉरर चे टिपिकल जॉनर अपेक्षित असावे.
अमेरिकेत भारतीय सिरीज बघायला
अमेरिकेत भारतीय सिरीज बघायला व्हीपीएन app कोणतं वापरावं?
the final call - अर्जुन
the final call - अर्जुन रामपाल , साक्षी तंवर
जबरदस्त सिरीज...खूप दिवसांनीcचांगली थ्रिलर पाहिली ... मस्त ट्विस्ट्स आणि टर्न्स...
the final call - अर्जुन
the final call - अर्जुन रामपाल , साक्षी तंवर >>> कुठे आहे.
च्रप्सदादा, कुठे पाह्यली हे
च्रप्सदादा, कुठे पाह्यली हे लिहाल का?
मंजुताई आपण दोघींनी एकाच वेळी
मंजुताई आपण दोघींनी एकाच वेळी विचारलं
the final call - अर्जुन
the final call - अर्जुन रामपाल , साक्षी तंवर >>> कुठे आहे.
ZEE5 वर आहे.
अच्छा धन्यवाद, सुनील
अच्छा धन्यवाद, सुनील.
कोणी Jack Ryan चा latest
कोणी Jack Ryan चा latest season पाहिला आहे का मला सांगा कुठे मिळेल please या series चा एक season जिथे तो आतंकवाद्याला भेटतो पाहिला आहे, सगळं कसा रिअल वाटत आणि तिसरा season ज्यात रशिया is involved पाहिला आहे, latest season लय शोधात आहे please सांगा
कोणी Jack Ryan चा latest
कोणी Jack Ryan चा latest season पाहिला आहे का मला सांगा कुठे मिळेल please या series चा एक season जिथे तो आतंकवाद्याला भेटतो पाहिला आहे, सगळं कसा रिअल वाटत आणि तिसरा season ज्यात रशिया is involved पाहिला आहे, latest season लय शोधात आहे please सांगा
Jack Ryan--प्रॉपायरेटेड
Jack Ryan--प्रॉपायरेटेड मध्ये फक्त पहिला आणि दुसरा सिजन आहे डोडो
प्राईम वर पुष्पवल्ली पाहीली.
प्राईम वर पुष्पवल्ली पाहीली. आधी एकच सीझन पाहणार होते पण पहिला आवडला म्हणून दुसरा पण सीझन लगेच पाहून संपवला. छान आहे. थोडी वेगळी डार्क हुमर साइडला जाणारा दुसरा सिझन, २० मिनिटाचेच एपिसोड आहेत. standup कॉमेडीयन सुमुखी सुरेश टायटल रोलमध्ये आहे. खूप छान एक्सप्रेसिव्ह acting आहे तिचे. सतत त्याच त्या थ्रिलर, युपी साईडच्या, शिवीगाळ असणाऱ्या सिरीज पेक्षा ही वेगळी आहे. बंगलोरच्या वातावरण व साऊथचे कलाकार रिफ्रेशिंग वाटले.
पुष्पावल्ली इम्परफेक्ट कॅरॅक्टर आहे.underrated सिरीयल आहे, इतके दिवस का नाही पहिली असे वाटले.
Jack Ryan--प्रॉपायरेटेड मध्ये
Jack Ryan--प्रॉपायरेटेड मध्ये फक्त पहिला आणि दुसरा सिजन आहे डोडो>>>>>>बरर्
the final call - अर्जुन
the final call - अर्जुन रामपाल , साक्षी तंवर >>>>>>> धन्यवाद च्रप्स.. बघतेय. २ एपिसोड्स पाहिले. चांगले वाटले.
गुफ अप्स - अभिमन्यू पायलट मरतो तेव्हा पहिल्यांदा एका शॉट मधे त्याचे डोळे मिटलेले आहेत. नेक्स्ट शॉट मधे परत उघडे. परत नंतर बंद.
कोणी ब्रिथ बघितली का अभिषेक बच्चनची? काय रिव्हुज?
ब्रिद दहा भाग बघून झाले
ब्रिद दहा भाग बघून झाले
कलाकार ओरिजिनल काम करताहेत
थीम चांगली आहे
पण अशा व्यक्ती नसतात आणि ही केवळ कल्पना आहे असेच वाटते
अभिषेकची तुलना आर माधवनशी मिडियावर सतत केली जाते आणि माधवन उजवा आहे असे वाचले जाते आहे
पण मला अभिषेकचे काम आवडले
द पॅसिफिक सिरीज कुठे मिळेल?
द पॅसिफिक सिरीज कुठे मिळेल?
टेलिग्राम वर नाही, hotstar नाहीये
(किती सबस्क्रिपशन घ्यायचे)
मला ती अभिषेकची ब्रिद अजिबात
मला ती अभिषेकची ब्रिद अजिबात नाही आवडली, प्रचंड प्रेडिक्टेबल .. आजकालच्या फास्ट थ्रिलर जमान्यात एक जुन्या काळातली स्लो, अजिबात लॉजिक नसलेली सीरिज वाटली.
मास्क घालणार्या किडनॅपरची एंट्री झाल्याझाल्या समजते कोण आहे, सहाव्या एपिसोडनंतर अगद्दीच कंटाळा येतो, छोटी सिरीज आहे म्हणून बघितली , नाहीतर सोडून दिली असती.
माधवनची ब्रिद सुध्दा गेल्या वर्षी मी पहिल्याच भागात बोअर होऊन सोडून दिली होती.
बुलबुल दहा वर्षाच्या
बुलबुल दहा वर्षाच्या मुलीबरोबर पाहता येइल का?
बुलबुल दहा वर्षाच्या
बुलबुल दहा वर्षाच्या मुलीबरोबर पाहता येइल का?>> नाही
बुलबुल दहा वर्षाच्या
बुलबुल दहा वर्षाच्या मुलीबरोबर पाहता येइल का? >>>
नाही.. दोन सीन्स डिस्टरबिंग आहेत. तसेच एकूणच चेटकीण वगैरे थोडे घाबरवणारे वातावरण आहे. हॉरर सिनेमात असते तसे..
इथे कोणी लिंक्स बाबत विचारलं
इथे कोणी लिंक्स बाबत विचारलं तर पायरेटेड च्या लिंक्स द्यायला बंदी आहे का?
माफी असावी मला कल्पना नव्हती. आम्ही colegiar वर जे काही मिळत त्यावर सापडलेलं मी शेअर करत होतो.
मागितल्या मागितल्या !
सोनीलिव्हची "अनदेखी" सिरीज
सोनीलिव्हची "अनदेखी" सिरीज चांगली वाटली.
पायरेटेड च्या लिंक्स द्यायला
पायरेटेड च्या लिंक्स द्यायला बंदी आहे का?>>छे छे आजिबात नाही
सर्व लिंक्सचे स्वागत आहे
Pages