Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55
सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..
मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.
ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मामी - तो सस्पेन्स आहे पण
मामी - तो सस्पेन्स आहे पण फायनल सस्पेन्स नाहीय.. म्हणजे सिरीज च्या मध्ये कळतो...
किम्स कंन्विनियंस अजुन बघितली
किम्स कंन्विनियंस अजुन बघितली नाहि; फ्रेश ऑफ द बोटचा सिक्वेल असावा असं वाटतंय. फ्रेऑदबो ओके होती; सिंप्सन, मॅरिड विथ चिल्ड्रेन, ग्रोइंग पेन्सच्या तुलनेत. क्ल्चरल ट्विस्ट असुन देखील...
सोनी लिव वर "अनदेखी" बघायला सुरुवात केली आहे. फ्रेश स्टोरी, ग्रिपिंग सिक्वेंस आहे. मस्ट वॉच...
सोनी लिव बघण्यासाठी किती पैसे
सोनी लिव बघण्यासाठी किती पैसे भरावे लागतात.
>>सोनी लिव बघण्यासाठी किती
>>सोनी लिव बघण्यासाठी किती पैसे भरावे लागतात.<<
कल्पना नाहि, स्लिंग प्लॅनसोबत फ्री आहे...
अॅप्पल टिव्हीवर Servant
अॅप्पल टिव्हीवर Servant(मानसीक भयपट) बघायला सुरुवात केली आहे.>>>>>>>>>>>>> रेको साठी धन्यवाद! कालापासून सुरू केली बघायला ही सिरीज. केवढं मोठं ते क्रिपी घर, मिणमिणते लाईट्स वातावरण निर्मिती फार मस्त केली आहे. एकदम कॅची सिरीज आहे.
तो नक्की काय काम करतो ते नाही समजलं.
शॉनचं वाईन पिणं बघून मलाच गरगरायला लागलंय
अमा, धन्यवाद. असले प्रकार
अमा, धन्यवाद. असले प्रकार आवडतात पाहायला. म्हणजे कंपन्यांना चुना लावायचे नाही पण कॉर्पोरेट ह्यूमर Happy (तो ही इण्टेन्शनल, झी मराठी वरचा नव्हे) >>>
सिरीज इंटरेस्टिंग वाटतेय.
अनदेखी ठिक आहे. ३५० वगैरे
अनदेखी ठिक आहे. ३५० वगैरे भरले होते मी एका महिन्याकरिता. जरा वाईट वाटलं नंतर.
Kims convenience अगदी
Kims convenience अगदी साधीसुधी आणि मस्त आहे.. परदेशातून येऊन कॅनडात स्थाईक झालेल्या कुटूंबाचे साधेसुधे प्रसंग, पण पात्रं आवडायला लागतात..
तो नक्की काय काम करतो ते नाही
तो नक्की काय काम करतो ते नाही समजलं.>>> तो अन्न समालोचक, समीक्षक(food critic), सल्लागार असतो. तसेच मोठ्या उपहागृहासाठी पदार्थ बनवून त्याचे सादरीकरण करत असतो.
तो अन्न समालोचक, समीक्षक(food
तो अन्न समालोचक, समीक्षक(food critic), सल्लागार असतो. तसेच मोठ्या उपहागृहासाठी पदार्थ बनवून त्याचे सादरीकरण करत असतो.>>>>>>>>>>>> गॉट इट
पण त्याचे जेवण बनविणे फारच
पण त्याचे स्वयंपाक करणे फारच क्रुर वाटते. Eel ला आपटणे, ते जिवंत सोलणे, Lobster उकळत्या पाण्यात सोडणे.
नेटफ्लिक्स 'दूर के दर्शन'
नेटफ्लिक्स 'दूर के दर्शन' मस्त आहे...
अशोक सराफचा 'प्रवास' (अमेझॉन) बघितला... रडवा आहे पण विचार छान मांडलाय....
नेट्फ्लिक्स वर wanted आणि
नेट्फ्लिक्स वर wanted आणि orphan black . प्राइम वर the boys सिझन १.
पण त्याचे स्वयंपाक करणे फारच
पण त्याचे स्वयंपाक करणे फारच क्रुर वाटते. Eel ला आपटणे, ते जिवंत सोलणे, Lobster उकळत्या पाण्यात सोडणे.>>>>>>>> अॅग्री. ग्रोस वाटलं त्याचं कुकिंग.
लिअॅन तो तुटलेल्या माळेतला मणी का गिळते ?
मी नेटफ्लिक्स वर क्रॅश लँडिंग
मी नेटफ्लिक्स वर क्रॅश लँडिंग ऑन यु बघतेय आणि suits बघतेय
अमेझॉन प्राइम वर भारतात आता
अमेझॉन प्राइम वर भारतात आता FRINGE सीरिज उपलब्ध आहे. मी पाच वर्षापूर्वी डालो करून बघितली होती ...
खूप छान आहे! साय फाय थ्रिलर ...प्लस पोलिस प्रोसिजरल ड्रामा !
अ.प्रा वर "मीट द मल्होत्राज
अ.प्रा वर "मीट द मल्होत्राज " बघतेय पळवत पळवत .
सायरस आणि मिनी माथुर दोघही मला आवडतात .
काही काही ठिकाणी मिनी माथुर फार आवडली . काही ठिकाणे फारच म्हातारी दिसते.
फ्रायडे नाईट - जेन्व्हा डोक्याला जास्त ताप द्यायचा नसतो तेव्हा बघितली . सिरिज ओके ओके आहे . सरळ साधी . फार हिलेरिअस किन्वा ड्रामटिक नाही .
हो मल्होत्राज बरी वाटली मला.
हो मल्होत्राज बरी वाटली मला. अधून मधून पहाते मी.
अॅन वुइथ इ पहा.... अतिशय
अॅन वुइथ इ पहा.... अतिशय सुंदर चित्रण व मॅरिला आणि मॅथ्यूचा अभिनय तर शब्द कमी पडतात... नेटफ्लिक्स वर आहे.... प्रकाशयोजना, आणि प्रत्य्क इतर पात्र उठून दिसते...
मुळीच चुकवू नका.... पुढच्या म्हाणजे ४थ्या सीझनचा मोठा आग्रह होत आहे... अफाट आहे
इथे वाचून किम्स कन्व्हिनियन्स
इथे वाचून किम्स कन्व्हिनियन्स बघायला सुरूवात केली. खूप आवडली! सध्या तिसर्या सिझनवर आहे. संपेल तो लवकरच. चौथा सिझन अजून नेटफ्लिक्सवर आला नाही. आणि अजून दोन सिझन येणार असं जाहीर झालय.
सगळीच पात्र आणि छोटे छोटे प्रसंग आणि विनोद आवडले. मिस्टर किम अर्थातच भाव खाऊन जातात, मिसेस किम सुरूवातीला खूपच सामान्य पात्र वाटलं पण पुढे पुढे मस्त पकड घेतं.
पंचायत नंतर काहितरी हलकं फुलकं सापडलं.
पग्या- एक नोटिस केलेच असशील
पग्या- एक नोटिस केलेच असशील - मॉम, डॅड,साठी कोरियन शब्द - अम्मा अप्पा, हे ऐकून फार आश्चर्य वाटते. तसेच अनोळखी मोठी माणसं किंवा मित्राच्या आई बाबांना अंकल/ आंटी ( अज्जुमा/ अजुशी) बनवायची कॉन्सेप्ट त्यांच्यात पण आहे हेही मजेशीर वाटले!
हो अम्मा, अप्पा भारी वाटलं.
हो अम्मा, अप्पा भारी वाटलं. अंकल, आंटी म्हणणं हे चिनी मुलांच्यात बघितलं होतं. एकन्द्रित एशियन प्रकार आहे बहुतेक
अमेझॉन प्राईमवर Bandish
अमेझॉन प्राईमवर Bandish Bandits नावाची सिरीयल बघायला सुरुवात केलीये. पहिलाच एपिसोड बघतेय अजून. पूर्णपण नाही झालाय. माझ्या जावेन्ं रेकमेंड केली म्हणून सुरू केलीये. शास्त्रीय संगीताची पार्श्वभूमी आहे. नसिरुद्दींन शहा शास्त्रीय गायक - पंडितजी - असतो. त्याचा नातू, कुटुंब, त्याचा कुतुम्बातला दरारा, बाकीचे त्याला दबून राहतात ... असा सगळा मामला आहे. राजस्थानी कुटुंब आहे हे जोधपूरच्ं. ते चित्रण, घर, जेवणाच्ं टेबल, काश्याच्या थाळ्या, अंगण वगैरे मस्त वाटलं.
अगदी सुरुवातच सुरेखश्या संगीतानं आणि मोराच्या केकारवानं झाली. तेव्हातर आता 'मोहे रंग दे लाल' सुरु होणार की काय असं वाटलं. मग भैरव रागातील 'जागो मोहन प्यारे' सगळ्या शिष्यांनी म्हटलं ते फार छान घेतलंय. सिरीयलमधे अश्या अनेक शास्त्रीय सन्गितातल्या चीजा ई. ऐकायला मिळतील असं दिसतंय. एक वेगळा अनुभव देणारी सिरीज असावी अशी अपेक्षा. एक वरळीत एकटीच राहणारी, मॉडर्न, श्रीमंत, बिनधास मुलगी आहे, पॉप संगीत गाणारी. तिचा एक अल्ट्रा कूल daddy आहे. पुढे तो गरीब घरातला, शास्त्रीय गायन करणारा नातू आणि ही मुलगी यांचं प्रेम ई. दाखवणार बहुतेक. गरीब-श्रीमंत, जुनी वि. नवी विचारसरणी, संस्कृती संघर्ष, शास्त्रीय संगीत वि. मॉडर्न संगीत अश्या वळणांची सोय आहे. नसिरुद्दीन्चा अभिनय आताशा जरा बोअर होतो. पण बाकी चेहरे नवे आहेत, आणि ते गाणारे आहेत.
होपफुली सिरीज चांगली निघावी.
मामी, खूप अपेक्षा ठेऊन नको
मामी, खूप अपेक्षा ठेऊन नको बघूस. बंदिश बँडीट चांगली आहे पण उत्तम नाहीये. Focus संगीतावरच ठेवला आहे हे चांगलं आहे. One time watch.
असंय होय...... बरं झालं
असंय होय...... बरं झालं सांगितलंस.
पग्या- एक नोटिस केलेच असशील -
पग्या- एक नोटिस केलेच असशील - मॉम, डॅड,साठी कोरियन शब्द - अम्मा अप्पा, हे ऐकून फार आश्चर्य वाटते. तसेच अनोळखी मोठी माणसं किंवा मित्राच्या आई बाबांना अंकल/ आंटी ( अज्जुमा/ अजुशी) बनवायची कॉन्सेप्ट त्यांच्यात पण आहे हेही मजेशीर वाटले!>>>> हो क्रॅश लँडिंग बघितली त्यात तर मला बाबूजी पण ऐकू आलं
बंदिश बँडिट्स - अॅव्हरेज
बंदिश बँडिट्स - अॅव्हरेज वाटली मला.
हिरॉइन खूप ओव्हरअॅक्टिंग करते. गायिकेपेक्षा फॅशन मॉडेल वाटते. त्यामानाने हिरोचं काम ठीक वाटलं. त्यांच्या प्रेमकथेचा बेस फार रटाळ आणि ओढूनताणून आणलाय. नो पॅशन, नो केमिस्ट्री.
सपोर्ट कास्ट मात्र सगळीच छान आहे.
शं-ए-लॉचं संगीतही तसं सो-सो झालंय.
हो क्रॅश लँडिंग बघितली त्यात
हो क्रॅश लँडिंग बघितली त्यात तर मला बाबूजी पण ऐकू आलं >>> धनुडी , हिंदी dubbed चालू असेल.
.
Mcmafia बघितली. रशियन माफीया , drugs , शह-काटशह इ. इ. हल्ली असे crime thriller बघायला आवडतात.
वदीम आणि जोसेफ सगळ्यात जास्त आवडले
अरेरे. लले थँक्स याबद्दल. मग
अरेरे. लले थँक्स याबद्दल. मग मी अजिबात वेळ घालवनार नाही. त्यापेक्षा डार्कचे शेवटचे काही एपिसोडस राहिलेत ते पूर्ण करते.
जि, लली ... धन्यवाद माझा वेळ वाचवल्याबद्दल.
बंदीश बॅन्डीट गंडलिये.
बंदीश बॅन्डीट गंडलिये. रागसंगीत म्हणजे डायरेक्ट द्रुत बंदीश अशी कल्पना असावी. इकडून ह्याची की लगेच तिकडून त्याची. रामायणात बाण सोडतात तशी मारामारी. आदपाव कपड्यातली हिराॅईन. अति गुळगुळीत हिरो. ओम-फस् झालीये.
Pages