वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चुरैल्स ही पहायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानी कलाकार असलेली पाकिस्तानी सिरीज zee5 वर आली आहे.

Btw , सेलिंग सनसेट कोण बघतय ?
मज्जा आहे Happy >> मी सुरुवात केली आहे मागच्या आठवड्यात. काहीतरी 6 मिलियनच घर विकत आहे तेच ना?तुम्ही ती 'how the rich get hitched' पाहिली आहे का? Hotstar वर आहे. 45 मिनिट ची आहे डॉक्यु. फुल्ल टीपी. ज्यांना इंडियन मॅचमेकिंग आवडली त्यांना आवडेल नक्की. हल्ली मी डॉक्यु बघत आहे नेफ्लिवर आणि इतर ठिकाणी. मस्त टीपी आहेत. आणि ड्युरेशन पण जास्तीत जास्त दीड तास.

मै Lol

शास्त्रीय संगीत वगैरे असल्याने बघायची डेअरिंग केली नव्हती. पण ते संगीत इतके शास्त्रीय नाही असे दिसते. मग बघायला हवी. पूर्वी अनुप जलोटा बराच वेळ तान धरून ठेवत असे, टाळ्या पडेपर्यंत. त्याची बरीच मिमिक्री झाली होती तेव्हा. जॉनी लीव्हर बहुधा कोणत्याही ओळीला ताणून धमाल उडवत असे- "तिरछी टोपीवाले" वगैरे. त्याची आठवण झाली.

फा,
बघ तू , फार तर काय तुझ्या स्टाइलने पिसं काढशील Proud
बाकी, शास्त्रीय संगीतापेक्षा २ गायकांची ‘जुगलबन्दी’ आहे , दोन्ही त्याचेच शिष्य आहेत म्हणून नासिरुद्दिन शाह काँपिटिटिव शिकवत असतो नातवाला असा माझा समज आहे, त्यात दुसरा सिंगर सिनियर आणि सक्सेसफुल असल्यामुळे जास्तं !
शिवाय त्या स्पर्धेला क्लासिकल च्या पारंपारीक स्पर्धेपेक्षा मुद्दामच दिलय उथळ स्वरुप, दॅट्स द होल पॉईंट कारण त्या तमन्ना द पॉप सिंगरचा पी.आर मॅनेजर इन्व्हॉल्व्ह होतो आणि कमर्शियल करून टाकतो सगळं मासेस पर्यंत पोचण्यासाठी , आधी विरोध असतो अशी स्पर्धा करायला, तो पी.आर मॅनेजर राजाला इन्व्हॉल्व्ह करून घेतो.
मला तर आवडली बुवा स्पर्धा आणि स्पर्धेतली तिन्ही गाणी , केसरीया बालमा विथ ट्विस्ट, ते सारंगी+ व्हॉयलिनचे फ्युजन वाद्यं देवलिन सगळे आवडले.
बघा म्हणजे मासेस पर्यंत यांच संगीत पोचल पाहिजे हा हेतु झाला साध्य त्या मॅनेजरचा Wink

बघा म्हणजे मासेस पर्यंत यांच संगीत पोचल पाहिजे हा हेतु झाला साध्य त्या मॅनेजरचा >>> लोल डीजे. पण एकूणच असे दिसते की मासेस पर्यंत पोहोचवायला जे डायल्यूट करावे लागते त्यातून त्या क्षेत्रातल्या तज्ञांना ते खटकते असे दिसते. राजा की रसोई बद्दल अशाच टोकाच्या प्रतिक्रिया ऐकल्या आहेत.

धनुडी, तू कशी शोधलीस माझी कमेंट ? थँक्स.
मला खात्री नव्हती की मी इथे लिहिली की अँमीच्या धाग्यावर?

Happy मीरा. मी कोरियन ड्रामा/सिरीयल्सच्या शोधात होते. तुम्ही लोकांनी त्याबाबतीत बरंच लिहून ठेवलयत Happy म्हणून लक्षात राहिलेलं.

बंदिश बँडिट मधील अत्यंत अश्लील आणि खालच्या थराच्या विशेषतः हिंदीतील संवाद आणि विनाकारण फोर लेटर शब्दांच्या पखरणीबद्दल कुणालाच काहीच खटकले नाही का? तसे असेल तर मी कदाचित बुरसटलेल्या विचारांचा आहे.
संगीताबद्दल तर बोलतच नाही.... कारण अभिजात संगीतास म्हणजे शास्त्रीय संगीतास लोकप्रिय करणारे प्रयोग अगदी बैजू बावरा पासून कट्यार (अलिकडील) पर्यंत झाले.... त्याला कोणीही आक्षेप घेतला नाही कारण त्यात श्रवणीयता होती, अविष्कार होता, गेयता होती अन सर्वात महत्त्वाचे म्हणजे गायकांनी खरोखर त्यांत नाविन्य आणले होते. मी फ्युजनच्या विरुध्द नाही पण बेसूरेपणाच्या अन गिमिक्स च्या विरुध्द आहे. त्या मुळे हा सर्व प्रकार अत्यंत सवंग वाटला.
असो

अश्लील संवाद हे आजकाल प्रत्येकच वेबसिरीजमधे कंपल्सरी झालंय. आणि त्यामुळे सांगायचं राहिलं पण ती तमन्ना आणि तो अर्घ्य जे काही बोलतात ते भयंकर हिडीस होतं.

>>अश्लील संवाद हे आजकाल प्रत्येकच वेबसिरीजमधे कंपल्सरी झालंय. आणि त्यामुळे सांगायचं राहिलं पण ती तमन्ना आणि तो अर्घ्य जे काही बोलतात ते भयंकर हिडीस होतं.>> अगदी हिडिस हाच शब्द योग्य आहे आणि या व्यतिरिक्त विवाहपूर्व लैंगिक संबंध आपल्या देशात संगीताला स्फूर्ती देण्यासाठी एवढे प्रेरक असतात आणि एवढे प्रचलित असतात हा एक शोधच आहे बुवा !
संगीत सवंग, कलाकार ( अतुल व नसिरुद्दिन शिवाय) भिकार अभिनय ..... जाऊद्या... जरा आत्यंतिक आहे एकूणच हा प्रकार

मेड इन हेवन पाहिली प्राईमवर.खूप आवडली.
गे पात्र खूप चांगलं रंगवलं आहे.मोठी लग्नं, त्यातले गोंधळ, गैरप्रकार, आणि हे सर्व अगदी व्यवस्थित सांभाळणारे तारा आणि राजीव(हेच नाव आहे ना त्याचं)
F शब्द आणि स्मोकिंग खूप आहे पण कथेची गरज म्हणून सोडून देऊ.
फोटोग्राफर कबीर आणि जसप्रीत पण उत्तम.कल्की नेहमी चांगली असतेच.
जोहरी भाई उर्फ विजय राज पण लहान रोल मध्ये व्यवस्थित छाप पाडतो.
झोया अख्तर च्या सिरीज काही ना काही देतातच.
पुढचा सिझन 2021 जानेवारी मध्ये येतोय.

सेंसारबोर्ड नसल्याने चित्रपट्/सेरीज तयार करणार्‍या लोकांचे 'लहान मुलाकडे नवीन खेळणे' आल्यासारखे झाले आहे.
नवीन आहे, वापरून घेतात.. थोडे जुने झाले की सोडतील बहुतेक..

मेड इन हेवन मला पण खूप आवडली होती.पण तो गे प्रकारच खूप बोअर झाला. गे माणसाचं लव्ह लाईफ अशी दुसरी सिरीयल बनवून तिकडे ते दाखवलं असतं तरी चाललं असतं , त्याचा मेन स्टोरीशी काही संबंध नव्हता. पण बरेचदा हे लोक नुसते स्टोरी प्रेझेंट करत नाहीत तर आपल्याला हवे तसे अजेंडे पुश करत असतात, ओपिनियन शेप करायचा प्रयत्न असतो.

त्याचा मेन स्टोरीशी काही संबंध नव्हता. >>>> मला तरी असं वाटलं नाही. तुम्ही 'मेन स्टोरी' कशाला म्हणता ह्यावर ते अवलंबून आहे. जर गे माणसाच्या "लव्ह लाईफ" चा मुख्य गोष्टीशी संबंध नव्हता, तर मग ताराच्या लग्न्याचा आणि तिच्या नवर्‍याचा विबासंचा ( शिवाय त्या क्रेडीट कार्डचा गैरवापर करणारी असिस्टंट मुलीच्या भावाचा ड्रग प्रॉब्लेम, तिचा तो गराजवाला मित्र) तरी कुठे संबंध होता ? एक मध्यवर्ती कथा त्यातल्या पात्रांची उपकथानके अश्या ढाच्यातल्या अनेक मालिका / चित्रपट असतात आणि ह्या मालिकेत सगळ्या कथा नीट गुंफल्या होत्या असं मला वाटलं. कुठलीच गोष्टी जास्त किंवा कमी झाली नव्हती.
राजीवचं लव्ह लाईफ तो गे असल्यामुळे तुम्हांला खटकलं असेल (किंवा अजेंडा रेटण्याचा प्रकार वाटला असेल) तर तो वेगळा मुद्दा झाला. Happy

बंदिश बँडिट मधील अत्यंत अश्लील आणि खालच्या थराच्या विशेषतः हिंदीतील संवाद आणि विनाकारण फोर लेटर शब्दांच्या पखरणीबद्दल कुणालाच काहीच खटकले नाही का
<<व्हॉट ? अश्लील संवाद होते ? Uhoh
कॅज्युअली होते जे काह्रे थोडेफार होते त्या त्या कॅरॅक्टरला अनुसरून , मला तर काहीच खटकल नाही काही !

मुख्य व्यक्तीरेखा आणि सहकारी व्यक्तीरेखा यांचं खाजगी आयुष्य थोडंफार कथेच्या ओघात येणं मान्य आहे पण त्या गे माणसाच्या खाजगी आयुष्याला disproportionately जास्त वेळ दिला गेला असं मला वाटलं आणि म्हणून बोअर झालं. गे-पोर्न हा सगळ्यांच्या इंटरेस्टचा विषय नसतो त्यामुळे कमी प्रमाणात चालला असता तो प्रकार.
(इथे दोघांनी त्याचं नाव राजीव लिहिलंय पण करण होतं असं गुगल केल्यावर दिसलं. मला नाव लक्षातही नव्हतं.)

गे-पोर्न हा सगळ्यांच्या इंटरेस्टचा विषय नसतो त्यामुळे कमी प्रमाणात चालला असता तो प्रकार. >>>>> ऑ ! त्यात जे दाखवलय ते "गे-पॉर्न" आहे ??

त्यात गे चं जे तपशीलात दाखवलं गेलं त्याचा वेडिंग प्लॅनर चा एक व्यक्तिमत्त्व म्हणून प्रवास हेही कारण असावं.
सेट, सजावट आणि खाणं इतक्या कागदोपत्री गोष्टी बघताना आजूबाजूच्या किती गोष्टी, किती माणसांचे नमुने सांभाळावे लागतात या कथेच्या भागात ते येतं.
गे किसिंग सीन भरपूर आहेत,बेड सीन थोडेफार आहेत हे मान्य.पण बाकी वेब सिरीज मध्ये हेच हेटरो जोडप्याचे भरपूर बेडसीन असतात.मला दोन्ही दचकवतात.
शिवाय त्या मुलाचे चांगले इतर मेल मित्र, चांगल्या मैत्रिणी, एक सामान्य आयुष्य आणि तरीहि आतला लढा दाखवला आहे.'हा गे आहे,100 माणसांबरोबर ब्लाईंड डेट करतो म्हणजे याला 101 वा माणूस काहीही करेल ते चालेल' ही समाजाची चुकीची धारणा पण.
यातली सर्व डेव्हलप केलेली पात्रं मला आवडली.कबीर ला आणि त्या गॅरेज वाल्या मित्राला अजून थोडं तपशीलात घेता येईल.

>>कॅज्युअली होते जे काह्रे थोडेफार होते त्या त्या कॅरॅक्टरला अनुसरून , मला तर काहीच खटकल नाही काही !>> तो त्या म्युझिक कंपनीचा एजंट असतो त्याच्या आणि होरोच्या काकाच्या तोडातील हिंदी संवाद अतिशय हिडिस आहेत असे मला वाटले.... असो ... कदाचित हा माझा प्र्~ओब्लेम असेल अन प्री- मॅरिटल सेक्सचा संगीताला प्रेरणा देणारा घटक म्हणून वापरणे हे सुध्दा मला पटले नाही... असो.... या वर आता माझी ले़अन सीमा, इति

प्री- मॅरिटल सेक्सचा संगीताला प्रेरणा देणारा घटक म्हणून वापरणे >> हे असं कुठे दाखवलंय?

बाकी त्या मुलीच्या मॅनेजरच्या तोंडी फारच unprofessional भाषा दिली आहे. कितीही कूल इंडस्ट्री असली तरी मॅनेजर लोकं आपल्या क्लायंटशी अशा भाषेत बोलत असतील हे काही पटत नाही. वरती म्हटल्याप्रमाणे "नवीन खेळणं फ्लाँट करणे" या पलीकडे काही साध्य होत नाही. No value addition to the story or character.
हिरोच्या काकाचे संवाद ठिक आहेत की.

प्री- मॅरिटल सेक्सचा संगीताला प्रेरणा देणारा घटक म्हणून वापरणे>>> त्या नंतरच हिरो चांगली कंपो़झिशन्स करतो.... अन्वयार्थ आहे
तो लाल केसांचा बुटक्या आहे त्याच्या तोंडची भाषा म्हणतोय मी

लाल केसांचा बुटक्या आहे त्याच्या तोंडची भाषा म्हणतोय मी >>> तुम्हाला लाल केसांच्या काकाविषयी की बुटका मित्र (कबीर) विषयी म्हणायचं आहे? कबीरला आहेत बरीच अशी वाक्य.

त्या नंतरच हिरो चांगली कंपो़झिशन्स करतो.... अन्वयार्थ आहे >> चुकीचा अन्वयार्थ वाटतोय हा. हिरो फक्त गातो. हिरोईन कंपोझर- सिंगर आहे. आणि हिरोच्या गाण्यात प्रेमात पडल्याची भावना नीट प्रकट होत नसते ती भावना तो प्रेमात पडतो म्हणून गाण्यात यायला लागते. It's cliché but it's okay.
त्या मित्राची भाषा मित्र म्हणून चालून जाईल बहुतेक. इतरांशी बोलताना नीट बोलतो तो. काका फारच चांगला दाखवला आहे. त्याचे काहीतरी चांगले झालेले दाखवायला हवे होते.

Pages