Submitted by मन्या ऽ on 26 May, 2020 - 09:36
आस
अशाच या कातरवेळी
निशब्द असावा
आसमंत सारा
त्यासमयी रवि तु
क्षितिजाच्या कुशीत निजावा
रवि तुज निजवताना
वारा ही गाई झुळझुळ गाणे
ती लुकलुकणारी कोर ही
बघ तुज कथा सांगे
अशाच एका कातरवेळी
बघ. कोण पणती
त्या तुळशीसमोर लावे
मंद अश्या त्या प्रकाशात
माझा ऊर भरुन वाहे
तेव्हा दुरवर कोठेतरी
मज ऐकु येते ती किणकिणारी घंटा
'आस' लागे मनास कान्हा
तसाच ऐकु येईल का रे मज
एक दिन तुझा मधुर पावा..
-दिप्ती भगत
(९मे, २०२०)
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कसली मस्त केलीयेस. अ लीप ऑफ
कसली मस्त केलीयेस.
"लुकलुकणारी चकोर" चा अर्थ
"लुकलुकणारी चकोर" चा अर्थ कळला नाही
@सामो, थँक्स!
@सामो, थँक्स!
@अन्नत_यात्री, मी लुकलुकणारी चकोर आभाळात टिमटिमणाऱ्या चांदणीला म्हटले आहे..
मस्त
मस्त
आवडली आदिश्री
आवडली
आदिश्री
चकोर पक्षी असतो. चंद्राची कोर
चकोर पक्षी असतो. चंद्राची कोर म्हणायचे असेल मन्याला.
किल्लीताई, अस्मिता
किल्लीताई, अस्मिता प्रतिसादांसाठी धन्स!
चकोर पक्षी असतो>>> हे ठाऊक नव्हते..
चंद्राची कोर असे म्हणायचे असेल>>> कवितेत संपादीत केले आहे.
थँक्स सामो..
भावतरल
भावतरल
मस्तच...
मस्तच...
सुंदर कविता
सुंदर कविता
मस्त
मस्त
Chan kavita
Chan kavita
राजेंद्र, बोकलत, रुपाली, राव
राजेंद्र, बोकलत, रुपाली, राव पाटील, उर्मिला प्रतिसादांसाठी खुप खुप धन्यवाद!
सुंदर काव्य
सुंदर काव्य
अप्रतिम, तरल.
अप्रतिम, तरल.
मन्या ऽ.... सुरेख
मन्या ऽ.... सुरेख
वा, छान
वा, छान
जमली आहे.
जमली आहे.
मस्तच....
मस्तच....
किशोर, तृप्ती, डॉ.काका, तेजो,
किशोर, तृप्ती, डॉ.काका, तेजो, च्रप्स, तुषार, आपल्या प्रतिसादांसाठी धन्यवाद!
सुंदर !!!!
सुंदर !!!!
छान!
छान!
सांज ये गोकुळीची आठवण आली
मस्त
मस्त
प्रेरणा, वसंत, रुपाली
प्रेरणा, वसंत, रुपाली प्रतिसादांसाठी धन्यवाद! वाचकांचे आभार..
चकोर पक्षी असतो>>> हे ठाऊक
चकोर पक्षी असतो>>> हे ठाऊक नव्हते....>>>>>>
आश्चर्य वाटले. एका कवियत्रीला चकोर माहित नाही . अहो चकोर कवीलाकांनीच शोधलेला पक्षी आहे.
ते जाउदेत.
आपल्या कविता छानच असतात . ही पण छानच आहे.
का मी असे म्हणतो ? पहा
का मी असे म्हणतो ? पहा
चकोर पक्षी और चांद
वेसे तो भारत में और विश्व में कई प्रकार के सुंदर पक्षी पाए जाते हैं, परंतु भारत में चकोर पक्षी का वर्णन हमें साहित्य में बहुत ज्यादा पढ़ने को मिलता है, कई गद्य लेखकों और कवियों ने अपनी रचनाओं में चकोर पक्षी का चित्रण किया है, चकोर पक्षी को अक्सर कविताओं में प्रेमी के रूप में चित्रित किया गया है जो कि रात भर चंद्रमा को निहारता रहता है, तथा रात को चंद्रमा की ओर देख कर रोता रहता है, कवि अक्सर अपनी रचनाओं में चकोर पक्षी की उपमा का इस्तेमाल करते हैं करते हैं, चकोर पक्षी को एक वियोगी प्रेमी के रूप में दर्शाया गया हैं,
---- आन्तरजाला वरून
प्रभुदेसाई, मी सर्वप्रथम
@प्रभुदेसाई, मी सर्वप्रथम 'चकोर' हा शब्द हिंदी कवितेतच वाचला होता. पण त्यावेळी अर्थ समजुन घेतला नाही. ही माझी चुक, आता मी सुधारण्याचा प्रयत्न करत आहेच. कवितेच्याच काही गोष्टी नव्याने उमजुन घ्यायचा प्रयत्न करत आहे..
असो.
आपण सविस्तर दिलेल्या प्रतिसादासाठी मनपुर्वक धन्यवाद! वाचत रहा..
हिंदीत इतके लांब जायची गरज
हिंदीत इतके लांब जायची गरज नाही.
हे पहा इथे मराठी
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
चंद्र व्हा हो पांडुरंगा
ज्ञानेश्वरीी पासून सगळीकडे उल्लेख आहेत. वाचा वाचत रहा. वर्तमानपत्राच्या शेवटी संपादक कोण , कुणी प्रकाशित केले ,कुणी छापले तिथपर्यंत वाचत रहा. कुठले वाचन केव्हा कसे उपयोगी पडेल ते सांगता येणार नाही .
नक्कीच. धन्यवाद!
नक्कीच.
धन्यवाद!