खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश दादांच्या रेसिपीने केलेले ताकातले पोळे
>>>>
हे बहुधा आम्ही आंबोळ्या बोलतो त्याच कुटुंबातील असावे
ताकातले - दिनेशदा - कुठे मिळेल रेसिपी - आमच्याकडे असले प्रकार वारंवार होतात. प्लीज रेसिपीची लिंक द्या ना. छानच दिसत आहेत. बघून भूक लागली

ताकातले पोळे

हा कोकणातला एक साधासुधा प्रकार आहे. नेटवर फारसा दिसला नाही. चवीला खुपच छान लागतो. अगदी मोजक्या साहित्यातून करता येतो.

लागणारे साहित्य :

१) १ वाटी तांदूळ,
२) १ टिस्पून मेथी,
३) १ टेबलस्पून पोहे,
४) दही , लागेल तसे,
५) चवीपुरते मीठ,
६) तेल
७) अर्धा टिस्पून साखर

सविस्तर कृती.

१) तांदूळ धुवून निथळत ठेवा. तांदूळ साधा नेहमीचा घ्या. मला बासमतीशिवाय पर्याय नाही. म्हणून मी साहित्यात १ टेबलस्पून साबुदाणा वापरला आहे. तो एरवी (म्हणजे साध्या तांदळासाठी ) आवश्यक नाही.

२) दही घेणार ते चांगले लागलेले पण आंबट नसावे. ते घुसळून दाट ताक करा. एका बोलमधे तांदूळ घ्या. तांदळावर एक सेमी येईल एवढे ताक त्यात ओता.

३) तांदळात मेथीदाणे आणि पोहे थोडेसे ओले करुन घाला. वापरत असाल तर साबुदाणाही त्यात घाला.

४) हे सगळे चार पाच तास भिजू द्या. मग मिक्सरमधे किंवा रगड्यावर बारीक वाटा गरज लागलीच तर थोडे पाणी घाला, पण मिश्रण फार पातळ करून नका, त्यात थोडे मीठ आणि साखर घाला. व हे मिश्रण झाकून उबदार जागी रात्रभर ठेवून द्या.

५) सकाळी हे मिश्रण आकाराने दुप्पट झालेले असेल. नसेल तर तेवढे होईपर्यंत थांबा.

६) तवा तापत ठेवून त्याला पुसट तेल लावा आणि त्यावर हे मिश्रण जाडसर पसरा. थोड्याच वेळात या पोळ्याला सुंदर जाळी पडेल. मग त्यावर थोडे तेल सोडा. खालून सोनेरी रंग आला कि काढून घ्या. पलटून भाजायची गरज नाही हवा असेल तर भाजा. (फोटोत डिशमधे आहे, तो मी दोन्ही बाजूनी भाजला आहे.)

७) या पोळ्याला ताकामुळे एक सुंदर चव येते. सोबत हवी असेल तर नारळाची चटणी घ्या. किंवा या पोळ्यावर लोणी किंवा तूप लावून खा.

८) पिठ पुर्णपणे फुगून आले कि फ़्रिजमधे दोन तीन दिवस ठेवू शकता.

थँक्स सगळ्यांना .

मला केक बनवायचा आहे . पण त्या ओव्हन नामक प्रकारची थोडी भीतीही आहे .

जिरा लिंबू... वॉव..
केक आणि सामोसे पण छान.
ताकातले पोळे सद्ध्या ट्रेंंडिंग आहे फेसबुक वर..आणि मस्त झालेत हे पण. दिनेशदांच्या रेसिपीज खूप आवडतात.. मस्त लिहीतात ते..
आता मी पण करून बघते. रेसिपी साठी धन्यवाद.
त्यांची ओरीजीनल पोस्ट अंगत पंगत वर शोधायला वेळ लागला परवा.. आज परत बघेन.. Happy

Takatale pole bhari distayat..colour sunder aalay.. manglore special set dosa sarkhach distoy..

Sadhana tai, I have already mentioned Dinesh Dada's name in the earlier post. I can't edit my recipe post now. Thank you.

--Recipe by Dinesh Shinde on Facebook Angat Pangat group

ताकातले पोळे

हा कोकणातला एक साधासुधा प्रकार आहे. नेटवर फारसा दिसला नाही. चवीला खुपच छान लागतो. अगदी मोजक्या साहित्यातून करता येतो.

लागणारे साहित्य :

१) १ वाटी तांदूळ,
२) १ टिस्पून मेथी,
३) १ टेबलस्पून पोहे,
४) दही , लागेल तसे,
५) चवीपुरते मीठ,
६) तेल
७) अर्धा टिस्पून साखर

सविस्तर कृती.

१) तांदूळ धुवून निथळत ठेवा. तांदूळ साधा नेहमीचा घ्या. मला बासमतीशिवाय पर्याय नाही. म्हणून मी साहित्यात १ टेबलस्पून साबुदाणा वापरला आहे. तो एरवी (म्हणजे साध्या तांदळासाठी ) आवश्यक नाही.

२) दही घेणार ते चांगले लागलेले पण आंबट नसावे. ते घुसळून दाट ताक करा. एका बोलमधे तांदूळ घ्या. तांदळावर एक सेमी येईल एवढे ताक त्यात ओता.

३) तांदळात मेथीदाणे आणि पोहे थोडेसे ओले करुन घाला. वापरत असाल तर साबुदाणाही त्यात घाला.

४) हे सगळे चार पाच तास भिजू द्या. मग मिक्सरमधे किंवा रगड्यावर बारीक वाटा गरज लागलीच तर थोडे पाणी घाला, पण मिश्रण फार पातळ करून नका, त्यात थोडे मीठ आणि साखर घाला. व हे मिश्रण झाकून उबदार जागी रात्रभर ठेवून द्या.

५) सकाळी हे मिश्रण आकाराने दुप्पट झालेले असेल. नसेल तर तेवढे होईपर्यंत थांबा.

६) तवा तापत ठेवून त्याला पुसट तेल लावा आणि त्यावर हे मिश्रण जाडसर पसरा. थोड्याच वेळात या पोळ्याला सुंदर जाळी पडेल. मग त्यावर थोडे तेल सोडा. खालून सोनेरी रंग आला कि काढून घ्या. पलटून भाजायची गरज नाही हवा असेल तर भाजा. (फोटोत डिशमधे आहे, तो मी दोन्ही बाजूनी भाजला आहे.)

७) या पोळ्याला ताकामुळे एक सुंदर चव येते. सोबत हवी असेल तर नारळाची चटणी घ्या. किंवा या पोळ्यावर लोणी किंवा तूप लावून खा.

८) पिठ पुर्णपणे फुगून आले कि फ़्रिजमधे दोन तीन दिवस ठेवू शकता.

--Recipe by Dinesh Shinde on Facebook Angat Pangat group

Thank you for the recipe Piku
@ मी_वैदेही ताकातले पोळे मस्त दिसतायत ... दिनेश दादांच्या रेसिपी अगदी unique असतात .
@ जाई जिर लिंबू सरबत चा कलर खूप मस्त आलाय !!

पिकू , श्रेया , जुई थँक्स

जुई , मी ही रेसिपी फॉलो केलेली .
https://youtu.be/JsBsAZ6udcc
माझ्या सरबतचा पिवळा रंग जरा ज्यादा पाणी टाकून डायलूट केल्याने आलाय. मूळ रेसिपीत ब्राऊनश रंग आहे Happy

माय गॉड! पिकु, किती काय काय केलय. किती उरक.
बेसन लाडू कसले जबरी दिसताहेत. आणि म ब पण. आणि आइसक्रीम पण.
मल कोणी सांगेल का की केक बेक करताना ओवन मधे हिट सेटींग कशी असावी. फक्त वरुन आच? फक्त खालुन आच? वरुन खालुन दोन्ही कडुन आच? मायक्रोव्हेव नाहीये. रेगुलर ओवन आहे.

थँक्स सस्मित.. Happy
ओव (OTG) मधे बेक करताना खालून आच असते. बेक मोड सिलेक्ट केला की. प्रिहीट करणे मस्ट आहे ओवन. आणि केक पँन मधल्या रँक मधे ठेवा. सगळी कडून सेम हीट लागण्यासाठी.

आणि वरती उल्लेखलेल्या फेबुवरील, अंगत पंगत ची लिंक काय आहे( नक्की काय नाव आहे?).
त्यावरून आठवले, दिनेशदा ह्यांच्या ब्लॉगची लिंक कोणी देइल का?
धन्यवाद

अग मी_वैदेही, मायबोलीवर कोणा दुसऱ्याचे साहित्य द्यायची परवानगी नाही, त्यामुळे कोणी तुझी आधीची कमेंट न वाचता थेट रेसिपी वाचली तर गैरसमज होऊन वाद व्हायचे म्हणून तुला आधीच सांगितले.

इथे देण्यायोगी पाकृ मी लॉकडाऊन काळात बनवेन असे वाटले नव्हते. तरीही आज फोकच्या ब्रेड बनवला गेलाच.... करून पाहावा असे बरेच दिवस वाटत होते, आज योग आला.

हा कापलेला. आतून मऊ व बाहेरून कुरकुरीत झालेला.

Pages