लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने का ऊघडत आहेत??

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 May, 2020 - 13:46

लॉकडाऊन कायम आहे.
पण दारूची दुकाने ऊघडत आहेत.
अगदी रेड झोनमध्येही उघडत आहेत. जणू काही हे जीवनाव्श्यक पेय आहे.

आता दारू काय करते हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे.

दारू चढते. चढली कि लोकं दंगा करतात. बरेच मद्यपी असे असतील जे आधी बारमध्ये जाऊन प्यायचे. आणि बाहेरच ऊतरवून घरी येऊन मुकाट झोपायचे. आता ते घरी पितील. घरच्यांना त्रास देतील. आधीच त्यांची बायकापोरे लॉकडाऊनने त्रस्त असतील. त्यांचा त्रास आणखी वाढणार. जसे ड्राय डे असतो तेव्हाच लोकं दारूवर तुटून पडतात तसे आता खूप दिवसांनी मिळाल्यावर लोकं रोज पितील. त्याचे व्हॉट्सपवर शेअर करून एकमेकांना आणखी पिण्यास उद्युक्त करतील. म्हणजे जवळपास रोजच घरच्यांना त्रास. जो नवरा घरच्या कामात हातभार लावत असेल ते देखील कमी होईल. जे बाप आधी पोरांसमोर कधी प्यायले नसतील ते सुद्धा आता भले नाईलाजाने का असेना समोरच पितील. कित्येकांच्या घरी पैश्यांची अडचण असेल. ती आता आणखी वाढेल. दारूचा खर्च जास्तच असतो. पिणारा माणूस पैश्यांचा विचार कमीच करतो हे पाहिले आहे. एकूणच कित्येक कुटुंबांना याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फटका बसेल याची मोजदाद नसेल. डोमेस्टीक वॉयलेन्सची वेळ येऊ शकते, सोसायटीत वा वस्तीत राडा होऊ शकतो. जे या लॉकडाऊन काळात परवडण्यासारखे नाही.

बरं ती दारू चढते तेव्हा ती मेंदूचा ताबा घेते. माणसाची हिंमत वाढते. दारूच्या नशेत लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवणे सहज शक्य आहे. एकूणच दारू डोक्याला त्रास होऊ शकते.

सरकारला काय हवेय? महसूल? लोकांना दारू पाजून तो कमावणार? त्यासाठी एवढी रिस्क? या महसूल मुद्द्यावरून दारू पिणारे अर्थव्यवस्थेचा कणा आहेत असे मेसेज व्हॉटसपवर फिरू लागलेत. पुढे याचे रुपांतर उन्मादात होऊ शकते.

मला कल्पना आहे की ईथल्या लोकांना वाटेल की आम्ही पितो लिमिटमध्ये. काही होत नाही असे. होऊ दे दुकाने चालू...

पण हा विषय तुमच्या किंवा माझ्या घरचा नाही. सध्या देशाच्या स्थितीचा विचार करा आणि प्रामाणिक मते मांडा.

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुन्मेष त्या आयडीचे मानसिक संतुलन ढासळले असल्याने तो मद्य पिऊन तुझ्या पाठीवर लागलाय. त्याला इग्नोर करून फाट्यावर मार.

माझं इथे कोणाशी वैर असण्याचे कारणच नाहीये
>>>>
.
वैर रामाचे रावणाशी होते. कृष्णाचे कंसाशी होते.
वैर हे चांगुलपणातूनही येते.
वैर हे तुमच्यावर जळणारयांचेही असू शकते.
अगदी एखादा माणूस कश्यातच का नसतो यालाही धूळवडीत ओढा हे सुद्धा वैराचे कारण असू शकते.

आणि तुम्ही डु आयडी काढणारच नाही हे तुमचे तुम्हीच बोलत आहात. शंभर टक्के जनता यावर विश्वास ठेवेलच असे नाही. जर तुम्ही ओरिजिनल आयडीने एखाद्यावर वैयक्तिक टिका करू शकता तर तुम्ही डु आयडी सुद्धा वापरू शकताच.

त्यामुळे तुमच्या वा माझ्या म्हणण्याने कोणताही मुद्दा बाद होत नाही. Happy

मी सहसा ही जी धुमश्चक्री चालते त्यापासून लांबच असतो
>>>>

सध्याच्या धुमश्चक्रीत लीड रोल तुमचाच आहे Happy

त्यामुळे धुमश्चक्री हा क्रायटेरीया असेल तर तुमचा भूतकाळ न बघता वर्तमानावर नजर टाकली तर संशयाची सुई सर्वात पहिले तुमच्यावरच जाते Happy

थोडक्यात तुम्हालाही माझ्यासारखे आई रिअली डोन्ट केअर ॲटीट्यूड दखवतच ईथून पुढला प्रवास करायचा आहे Happy

मी माझाच डू आयडी काढणार, त्यावरून समोरच्यावर टीका करणार, मग मी स्वत:च असे म्हणणार कि हे बालिश आहे, पटवून द्यायचा प्रयत्न करणार कि हा विरोधकाचा डू आहे! वाह फ़ाटेश अभिषेक!

अभिषेक चा तोल ढासळू लागल्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत

अरेरे काय हे अधःपतन

मी काय म्हणतो ओरिजनल आयडीने चिडलास तर काय कोण फाशी नाही देणार तुला

पण इमेज ची चौकट तोडता न येणे फार डेंजर
त्यातून तुला हे असलं व्यसन

अवघड आहे बाबा तुझं
लवकर शहाणा हो, व्यसनमुक्ती केंद्रात नाव नोंदव
भविष्याचा विचार कर

वरती कुठेतरी लिहिलं आहेस की तुला अजिबात मित्र नाहीयेत
हेच कारण वाटत आहे तुझ्या व्यसनाचे
बघ प्रयत्न कर, प्रत्यक्ष मित्र करता आले तर बघ
तुलाच फायदा होईल
बाकी यावरही तू काहीतरी उटपटांग उत्तर देणारच त्यामुळं असो
आणि तुझ्या त्या ड्युआयडी ला सांग असलं काही बोलून मी निघून जाईन अशी अपेक्षा असेल तर व्यर्थ आहे
मला वेळ आहे तोवर मी तुला मदत करत राहणारच
मग कितीही खालच्या लेव्हलला जा
मला काही फरक पडत नाही

या धाग्याचा विषय काय आहे ?
>>>>

धाग्याचा विषय दारूची दुकाने का उघडावीत का नाही हाच आहे.
थोडी अवांतर चर्चा प्रत्येक धाग्यात चालते.
मूळ विषयावर चांगले मुद्दे आले की अवांतर आपसूक मागे पडते.
ती काळजी मी घेतो.
कारण दारूला विरोध हा जिव्हाळ्याचा विषय आहे. अवांतर चर्चा धागा सतत वर ठेवतात

वरती कुठेतरी लिहिलं आहेस की तुला अजिबात मित्र नाहीयेत
>>>
अजिबात नाही असे नाही. पण कमी आहेत. जे आहेत ते कमाल आहेत. Happy

यात एका धाग्याचा विषय आहे. नोट करतो.

मी काय म्हणतो ओरिजनल आयडीने चिडलास तर काय कोण फाशी नाही देणार तुला
>>>>>

मी मागेही एक दोनदा लिहिले होते. की मी प्रत्यक्ष आयुष्यात एक शॉर्ट टेंपर व्यक्तीमत्व आहे. सरकन पारा चढतो सर्रकन खाली ऊतरतो.

जास्त लिहित नाही यावर
हा देखील एक स्वतण्त्र धाग्याचा विषय आहे. नोट करून ठेवतो Happy

रुन्मेष जे लोकं दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घालतात ते तुला व्यसनमुक्ती केंद्रात जायला सांगत आहेत. मला तर वेगळीच शंका यायला लागले आता. या माणसाला घरी बायका मुलांचा प्रचंड त्रास होत असावा. याचा परिणाम म्हणून हा इथे फ्रस्ट्रेशन काढायला येत असावा. म्हणूनच तू टाकलेला फोटो, तुझी हॅपी फॅमिली बघून पोटशूळ उठले याला. सावध राहा या माणसापासून.

आशूचांप असं काहीही टाकू नका..
सन्मानित सदस्य शाहरुख बरोबर करन जोहरचे सुद्धा फॅन आहेत...
वेगळाच अर्थ घेतील.

घेऊ देत हो
मला तर हा बालक आयडी इतका आवडलाय की मी लॉक डाऊन उठताच धावत त्याला भेटायला जाईन Happy
पण त्याने इथे माझ्या आणि अभिषेक च्या प्रेमात बिब्बा घालू नये इतकीच अपेक्षा आहे
Happy

शाहरुख बरोबर करन जोहरचे सुद्धा फॅन आहेत...
>>>

असे का वाटले?

बाकी गरज नसताना करण जोहरला का हिणवत आहात?
तो जसा आहे तसा आहे. त्याने स्विकारलेय तर जग का त्रास करून घेते हे मला आज वर समजले नाही...

लॉकडाउनमध्ये रवी शास्त्री अडकले अलिबागमध्ये, म्हणाले आता मी बिअर पिऊ शकतो !

https://www.loksatta.com/krida-news/ravi-shastri-picks-roger-binny-laxma...

आता तुम्हीच ठरवा.
शास्त्री बनायचेय की विराट कोहली?

बाकी गरज नसताना करण जोहरला का हिणवत आहात?
तो जसा आहे तसा आहे. त्याने स्विकारलेय तर जग का त्रास करून घेते हे मला आज वर समजले नाही...>>> ढीगभर बायकांचे आयडी घेऊन मायबोलीवर वावरणाऱ्यांकडून कसली अपेक्षा ठेवताय तुम्ही. नारायण धारप पहिलं पेज वाचा सगळं लक्षात येईल.

आता तुम्हीच ठरवा.
शास्त्री बनायचेय की विराट कोहली?
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 8 May, 2020 - 20:01
--

विराट कोहली दारू पित नाही,
असे म्हणायचे आहे का तुम्हाला?

ढीगभर बायकांचे आयडी घेऊन मायबोलीवर वावरणाऱ्यांकडून कसली अपेक्षा ठेवताय तुम्ही. नारायण धारप पहिलं पेज वाचा सगळं लक्षात येईल.
--->>>>> आयडी घेतो तो घेतो पण तो स्वतः आजारी असून ऋन्मेष ला आजारी म्हणतो . अटेन्शन सीकर आहे तो . स्वतःचे धागे प्रतिसाद देऊन वर आणतो आजकाल कारण स्त्री आयडी ने लॉगिन करत नसावा . त्याला रंगे हाथ पकडला आहे आधी लोकांनी . जळका आयडी आहे तो .

थोडक्यात तुम्हालाही माझ्यासारखे आई रिअली डोन्ट केअर ॲटीट्यूड दखवतच ईथून पुढला प्रवास करायचा आहे Happy

ह्यावरुन माह्यावाला एकच सवाल हाये....आई खरच केअर/काळजी करत नाही कां ?

रुन्म्या (रुन्म्याच असुदे, अबिशेक नको. असेल तुझ्या पोराचे नाव. त्यालाही बापाच्या कर्तूतीचे चार दणके खावदे.) तर काय सांगत होतो, तुझे द्युआय नसतील भांडत पण तू हालला मुळातून. मी तुझ्या लेखांचा कालपर्यंत चाहता होतो म्हणून राग आहे तुझ्या या वागण्यावर. लिहि परत पहिल्यासरखे. नसेल सुचत तर दे सोडून. पण लाज नको काढू. मला काय चाहत्यांचे असं म्हणशील तर तुला तुझा देवच वाचवो. पुर्वपुण्याईवर जास्त नाही जगता येत रुन्म्या.

एखाद्याच्या प्रसिद्धीवर काही लोकं इतकं जळताहेत की त्याच्या फॅमिलीवरून कमेंट्स करत आहेत. कोणी माणूस इतका प्रसिद्ध असू शकतो की त्याची प्रसिद्धी पाहून लोकांच्या बुडाला अशी काय आग लागली विचारू नका. रुन्मेष बडा आदमी बन गया तू.

फॅमीली कुणी आणली मधी? आम्ही चौकशी करायला गेलतो का याच्या पोरांची नावे काय आहे ते? या रुन्म्याने पोरं आणली मधी. नावासहीत. त्याला काही नाही, तुम्हाला काय त्रास होतोय?

तुझ्याही फॅमीली मेब्रांची नावे सांग तुलाही बडा आदमी करु. हाकानाका
स्वतचे नाव सांगायचे सोय नाही तुला तु काय गप्पा मारतस

बाकी रुन्मेषने जो संयम इथे दाखवला तो खरच वाखण्याजोगा आहे. एव्हडे वैयक्तिक हल्ले होऊनही त्याने संयम जराही ढळू दिला नाही. बाकी आजकाल मायबोलीवर एकच नाव गजतंय ऋन्मेष ऋन्मेष ऋन्मेष आणि ऋन्मेष.रुन्मेष खरच तुझ्याकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे.

Pages