लॉकडाऊन कायम आहे.
पण दारूची दुकाने ऊघडत आहेत.
अगदी रेड झोनमध्येही उघडत आहेत. जणू काही हे जीवनाव्श्यक पेय आहे.
आता दारू काय करते हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे.
दारू चढते. चढली कि लोकं दंगा करतात. बरेच मद्यपी असे असतील जे आधी बारमध्ये जाऊन प्यायचे. आणि बाहेरच ऊतरवून घरी येऊन मुकाट झोपायचे. आता ते घरी पितील. घरच्यांना त्रास देतील. आधीच त्यांची बायकापोरे लॉकडाऊनने त्रस्त असतील. त्यांचा त्रास आणखी वाढणार. जसे ड्राय डे असतो तेव्हाच लोकं दारूवर तुटून पडतात तसे आता खूप दिवसांनी मिळाल्यावर लोकं रोज पितील. त्याचे व्हॉट्सपवर शेअर करून एकमेकांना आणखी पिण्यास उद्युक्त करतील. म्हणजे जवळपास रोजच घरच्यांना त्रास. जो नवरा घरच्या कामात हातभार लावत असेल ते देखील कमी होईल. जे बाप आधी पोरांसमोर कधी प्यायले नसतील ते सुद्धा आता भले नाईलाजाने का असेना समोरच पितील. कित्येकांच्या घरी पैश्यांची अडचण असेल. ती आता आणखी वाढेल. दारूचा खर्च जास्तच असतो. पिणारा माणूस पैश्यांचा विचार कमीच करतो हे पाहिले आहे. एकूणच कित्येक कुटुंबांना याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फटका बसेल याची मोजदाद नसेल. डोमेस्टीक वॉयलेन्सची वेळ येऊ शकते, सोसायटीत वा वस्तीत राडा होऊ शकतो. जे या लॉकडाऊन काळात परवडण्यासारखे नाही.
बरं ती दारू चढते तेव्हा ती मेंदूचा ताबा घेते. माणसाची हिंमत वाढते. दारूच्या नशेत लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवणे सहज शक्य आहे. एकूणच दारू डोक्याला त्रास होऊ शकते.
सरकारला काय हवेय? महसूल? लोकांना दारू पाजून तो कमावणार? त्यासाठी एवढी रिस्क? या महसूल मुद्द्यावरून दारू पिणारे अर्थव्यवस्थेचा कणा आहेत असे मेसेज व्हॉटसपवर फिरू लागलेत. पुढे याचे रुपांतर उन्मादात होऊ शकते.
मला कल्पना आहे की ईथल्या लोकांना वाटेल की आम्ही पितो लिमिटमध्ये. काही होत नाही असे. होऊ दे दुकाने चालू...
पण हा विषय तुमच्या किंवा माझ्या घरचा नाही. सध्या देशाच्या स्थितीचा विचार करा आणि प्रामाणिक मते मांडा.
धन्यवाद,
ऋन्मेष
२०० + झाले
२०० + झाले
फिल्म ईंडस्ट्रीत सेक्स आणि शाहरूख या दोन गोष्टी नेहमी विकल्या जातात
- नेहा धुपिया
मायबोलीवर दारू आणि शाहरूख या दोन गोष्टी नेहमी हिट जातात
- ऋन्मेष
फिल्म ईंडस्ट्रीत सेक्स आणि
फिल्म ईंडस्ट्रीत सेक्स आणि शाहरूख या दोन गोष्टी नेहमी विकल्या जातात
- नेहा धुपिया
>>> सेक्स आणि सलमान जास्त बरोबर आहे. शाहरुख चे चित्रपट चालण्याचा जमाना गेला आता. झिरो , फॅन हि उदाहरणे आहेत.
ते नेहा धुपियाचे कोट आहे
ते नेहा धुपियाचे कोट आहे
गूग्ल करा सेक्स शाहरूख आणि नेहा धुपिया असे
बाकी सलमनचे फ्क्त चित्रपट चालतात. कालांतराने चालायचे बंदही होतील.
शहरूख चित्रपटांच्या पलीकडला ब्रांड आहे. कायम राहणार.
धुपिया ने रोडी मध्ये जो राडा
धुपिया ने रोडी मध्ये जो राडा घातला... नजरेतून उतरली... सुडो फेमिनिस्ट आहे पोचलेली...
असेल.
असेल.
तसेही धुपियाने हे वरचे वाक्य म्हटले न्सते तर ती बया गोरी की सावळी हे सुद्धा मी कधी बघायला गेलो नसतो
बाकी सलमानने राडा तर कित्येक
बाकी सलमानने राडा तर कित्येक दारू पिऊन माणसे चिरडली आहेत. तरी चित्रपट विकले जातातच.
धुपिया हेटर्स क्लब उघड... 100
धुपिया हेटर्स क्लब उघड... 100 होतात कि नाही बघ... जशा त्या अरबाज च्या धाग्यावर उड्या पडल्या होत्या....
बाकी सलमानने राडा तर कित्येक
बाकी सलमानने राडा तर कित्येक दारू पिऊन माणसे चिरडली आहेत. तरी चित्रपट विकले जातातच.
>>> वेगळ्या धाग्याचा विषय ( तुमचाच जुना धागा) - तो ड्रायवर चे पाप स्वतःवर घेत होता...
दुपारची उतरली वाटतं, एकदम
दुपारची उतरली वाटतं, एकदम शरूख वरून सलमान वर आली गाडी
एवढ्या बंदीत कुठे मिळाली रे
एवढ्या बंदीत कुठे मिळाली रे अभिषेक?
इतका वेळ दिसला नाहीस माबोवर
रांगेत उभा होतास का?
शाहरुख चे चित्रपट चालण्याचा
शाहरुख चे चित्रपट चालण्याचा जमाना गेला आता. झिरो , फॅन हि उदाहरणे आहेत
जादूगर, तुफान च्या अपयशानंतर अमिताभ संपला नाही. शाहरुखहमध्येही तेवढाच टॅलेंट आहे.
दुसरा आयडी वापरतोस तेव्हा
दुसरा आयडी वापरतोस तेव्हा ब्राउझर बदलतोस का रे अभिषेक?
एक गेला की दुसरा येतो का दोन्ही एकाच वेळी आणू शकतोस?
धुपिया हेटर्स क्लब उघड... 100
धुपिया हेटर्स क्लब उघड... 100 होतात कि नाही बघ...
>>>>
कोणाचा हेट क्लब काढू नये. फॅन क्लब काढणे जमले नाही तर नुसता क्लब काढावा.
मी आयुष्यात एकदाच एक हेट कलब काढलेला.
माझा स्वत:चाच.
ऑर्कुटवर असताना माझ्या हेट क्लबची एक ऑर्कुट कम्युनिटीच काढली होती.
पण ती स्पॅम झाली आणि ऑर्कुटने उडवली.
@ नेहा धुपिया काढतो क्लब ..
@ नेहा धुपिया काढतो क्लब .. बघूया तरी काय चीज आहे
जमल्यास विकेंडला.. अभ्यासू धागा काढूया
काढ बाबा काढ
काढ बाबा काढ
दुसरं तुला येतंय तरी काय
एखाद्या दारुबाजापेक्षा तुला हे जबरदस्त व्यसन आहे
आणि दिसतंय की ऑर्कुट काळापासून सुरू आहे
दुर्दैवी ते लोक
बघ प्रयत्न कर व्यसनातून बाहेर पडायला
आता तर तुझी कीव च येऊ लागली आहे
अरेरे
आशुछाप डोक्याचा इलाज करून
आशुछाप डोक्याचा इलाज करून घ्या काळजी वाटायला लागली आहे तुमची. रूनमेश तू लिहीत रहा तुझे लिखाण मजेशीर असते.
बरोबर आहे स्ट्रेजनर
बरोबर आहे स्ट्रेजनर
नमस्कार स्वीकारावा
अभिषेक 18 मिनिटे तरी दम
अभिषेक 18 मिनिटे तरी दम धरायचा अरे, या स्ट्रेनजर चे वय तरी बघायचे लेका
इतक्या इवल्या लेकराला माझी काळजी वाटते हे बघून मन भरून आलं
किती ती गडबड आणि अभिषेक चिडत नाही हे दाखवायची केविलवाणी धडपड
ब्राउझर बदलून आलास का?
मलाही सांग ना कसे करतोस हे सगळं
मायबोलीचे व्यसन नसून हे
मायबोलीचे व्यसन नसून हे ऑर्कुट काळापासून चालू आहे तर....
व्यसन कोणतेही असो ते वाईटच...
दारू लिमिटमध्ये पिणे सुख आहे ... सोशल साईट्स वर लिमिट मध्ये बागडणे देखील सुख... अति दारू वाईट तसे अति मायबोली वाईटच ना ऋन्मेष सर.... बघा विचार करून... रात्री बेरात्री उठून धाग्यावर रिप्लाय देणे वगैरे....
मायबोलीचे व्यसन नसून हे
मायबोलीचे व्यसन नसून हे ऑर्कुट काळापासून चालू आहे तर....
>>>>>>
ऑर्कुटची गोष्टच वेगळी होती. सारे काही केलेय तिथे. मला चांगले मित्र, कित्येक मैत्रीणी आणि आधी गर्लफ्रेंड मग बायको ऑर्कुटनेच दिले आहेत.
बाकी प्रत्यक्ष आयुष्यात मला कोणी मित्र नाहीत. जे काही आहे ते फॅमिलीच आहे. तेच माझा कम्फर्ट झोन आहेत. आणि त्यानंतर या सोशलसाईट जिथे संकोच न बाळगता बिनधास्त बागडता येते हा दुसरा कम्फर्ट झोन. मजेत चाललेय आयुष्य. कश्याला ऊगाच कोणाला काय वाटतेय याचा विचार करून कॉम्प्लिकेटेड करू
रात्री बेरात्री उठून धाग्यावर रिप्लाय देणे वगैरे....
>>>>>
ऊठून नाही हो. जागाच असतो. आता हा रिप्लाय टाकून झोप येईल तेव्हा झोपेन आणि उद्या ठिक ९ वाजता ऊठून लॉगिन करून मेल चेक करेन आणि पुन्हा अलार्म लाऊन झोपेन. वर्क फ्रॉम होमची हिच तर मजा आहे
रुन्मेषला मिळणारी प्रसिद्धी
रुन्मेषला मिळणारी प्रसिद्धी आणि त्याच्या धाग्यावर येणारे प्रतिसाद जास्त असल्याने काहींना ते बघवत नाही. दारू पिऊन मायबोलीवर ओकाऱ्या काढायला येत आहेत आणि वैयक्तिक पातळीवर जाऊन त्याच्यावर टीका करत आहेत.
दारू विकत घ्यायला आता आधार
दारू विकत घ्यायला आता आधार कार्ड Compulsory केलेय महाराष्ट्र सरकारने.
हा तर सरासर अन्याय आहे दारू पिणार्यांवर, सध्या अर्थव्यवस्था सांभाळण्याचे जोखड ज्यांच्या खांद्यावर आहे त्यांच्यावर असा अन्याय करणे माणूसकीला धरून आहे का ?
रून्मेष चे लिखाण खूप छान असते
रून्मेष चे लिखाण खूप छान असते, मी त्याचा फॅन आहे पण quantity पायी quality वर परिणाम नको वहायला
रुन्मेषवर काही आयडी खार खाऊन
रुन्मेषवर काही आयडी खार खाऊन आहेत. रुन्मेषला मिळणारी प्रसिद्धी त्यांच्या डोळ्यात खुपत असणार. समाजात वावरताना आपल्याला असे अनेक महाभाग दिसतात. रुन्मेषने या असल्या मानसिक रोगी लोकांकडे दुर्लक्ष करून मायबोलीवर लिहीत राहावे.
दारू विकत घ्यायला आता आधार
दारू विकत घ्यायला आता आधार कार्ड Compulsory केलेय महाराष्ट्र सरकारने.
हा तर सरासर अन्याय आहे दारू पिणार्यांवर
>>>>>
आधारकार्ड अन्याय आहे?
हे काही समजले नाही
आणि तसेही कोण नियम पाळतात भारतात्.. ते फक्त कागदावरच असतात ना
मजेत चाललेय आयुष्य^^^^
मजेत चाललेय आयुष्य^^^^
डिनायल मोड मधून बाहेर येणे ही व्यसनमुक्ती ची पहिली पायरी आहे
ते आधी जमवता येतं का ते बघा
आणि इमेज कशी तोडावी हे तरी तुझ्या दैवताकडून शिक
हा आयडी चिडत नाही, ही तुझी जी मायबोली वर तूच इमेज केली आहेस तीच तुला घातक होतीय बघ
त्यामुळे मग पुण्यातल्या व्यक्तीला असे 18 मिनिटे झालेली असताना
किंवा आज सकाळी 7 वाजता असे मायबोली वर येऊन तुला डिफेड करावं लागतं
इतकाही बालिशपणा करू नये रे
आधारकार्ड हा अन्याय कसा
आधारकार्ड हा अन्याय कसा
उलट मी तर म्हणतो ऑनलाइन पेमेंट पण करा
म्हणजे कळेल सरकारी योजनांचा लाभ घेणारे किती जण दारूच्या रांगेत आहेत ते
दारू विक्रीवर बंधने नकोत पण त्यांच्या वर वॉच जरूर ठेवला जावा
आशूचॅम्प डू आयडीबद्दल चार
आशूचॅम्प डू आयडीबद्दल चार शक्यता आहेत
१) तो माझाच आहे. मी बालिश पद्धतीने स्कोअर सेटल करतोय.
२) तो तुमचाच आहे. स्वत:च डु आयडी काढून कांगावा करत आहात.
३) कोणीतरी मला बदनाम करायला सरळसरळ माझाच वाटावा असा डु आयडी घेत सरळसरळ माझीच बाजूच घेत लेव्हल सोडून टिका करत आहे.
४) कोणीतरी तुमच्याशी वैर असणारी व्यक्ती या वादाचा फायदा घेत तुमच्यावर तोंडसुख घ्यायचा आनंद लुटत आहे.
---
या शक्यता माझे डु आयडी ज्ञान प्रकट करायला मांडल्या आहेत. तो कोण आहे आणि त्याचा काय हेतू आहे आणि तो कोणाला कोण वाटतोय... आई रिअली डोण्ट केअर
म्हणजे कळेल सरकारी योजनांचा
म्हणजे कळेल सरकारी योजनांचा लाभ घेणारे किती जण दारूच्या रांगेत आहेत ते
>>>>
दारूचा आस्वाद घेणे आणि सरकारी योजनांचा लाभ घेणे याचा अपापसात्ला संबंध कळला नाही
स यो चा ला घेणारयांनी दारू प्यायची नाही का ?
2 - माझा अद्याप एकही दुसरा
2 - माझा अद्याप एकही दुसरा आयडी नाही
मला जे बोलायचं असतं ते मी थेट बोलतो
कधीच गरज पडली नाही नाव गाव लपवायची
त्यामुळे हा मुद्दा बाद
4 - माझं इथे कोणाशी वैर असण्याचे कारणच नाहीये, मी सहसा ही जी धुमश्चक्री चालते त्यापासून लांबच असतो
आता जितका ऍक्टिव्ह आहे त्यापेक्षा खूप कमी एरवी असतो
त्यामुळे हाही मुद्दा बाद
बाकी आता मग तू सुज्ञ आहेसच
Pages