लॉकडाऊन कायम आहे.
पण दारूची दुकाने ऊघडत आहेत.
अगदी रेड झोनमध्येही उघडत आहेत. जणू काही हे जीवनाव्श्यक पेय आहे.
आता दारू काय करते हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे.
दारू चढते. चढली कि लोकं दंगा करतात. बरेच मद्यपी असे असतील जे आधी बारमध्ये जाऊन प्यायचे. आणि बाहेरच ऊतरवून घरी येऊन मुकाट झोपायचे. आता ते घरी पितील. घरच्यांना त्रास देतील. आधीच त्यांची बायकापोरे लॉकडाऊनने त्रस्त असतील. त्यांचा त्रास आणखी वाढणार. जसे ड्राय डे असतो तेव्हाच लोकं दारूवर तुटून पडतात तसे आता खूप दिवसांनी मिळाल्यावर लोकं रोज पितील. त्याचे व्हॉट्सपवर शेअर करून एकमेकांना आणखी पिण्यास उद्युक्त करतील. म्हणजे जवळपास रोजच घरच्यांना त्रास. जो नवरा घरच्या कामात हातभार लावत असेल ते देखील कमी होईल. जे बाप आधी पोरांसमोर कधी प्यायले नसतील ते सुद्धा आता भले नाईलाजाने का असेना समोरच पितील. कित्येकांच्या घरी पैश्यांची अडचण असेल. ती आता आणखी वाढेल. दारूचा खर्च जास्तच असतो. पिणारा माणूस पैश्यांचा विचार कमीच करतो हे पाहिले आहे. एकूणच कित्येक कुटुंबांना याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फटका बसेल याची मोजदाद नसेल. डोमेस्टीक वॉयलेन्सची वेळ येऊ शकते, सोसायटीत वा वस्तीत राडा होऊ शकतो. जे या लॉकडाऊन काळात परवडण्यासारखे नाही.
बरं ती दारू चढते तेव्हा ती मेंदूचा ताबा घेते. माणसाची हिंमत वाढते. दारूच्या नशेत लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवणे सहज शक्य आहे. एकूणच दारू डोक्याला त्रास होऊ शकते.
सरकारला काय हवेय? महसूल? लोकांना दारू पाजून तो कमावणार? त्यासाठी एवढी रिस्क? या महसूल मुद्द्यावरून दारू पिणारे अर्थव्यवस्थेचा कणा आहेत असे मेसेज व्हॉटसपवर फिरू लागलेत. पुढे याचे रुपांतर उन्मादात होऊ शकते.
मला कल्पना आहे की ईथल्या लोकांना वाटेल की आम्ही पितो लिमिटमध्ये. काही होत नाही असे. होऊ दे दुकाने चालू...
पण हा विषय तुमच्या किंवा माझ्या घरचा नाही. सध्या देशाच्या स्थितीचा विचार करा आणि प्रामाणिक मते मांडा.
धन्यवाद,
ऋन्मेष
झोप रे... धागा उडणार नाही
झोप रे... धागा उडणार नाही रात्री तुझ्या...
इतकाच जीव चाललाय तर त्या
इतकाच जीव चाललाय तर त्या शाहरुख ची दारू सोडून दाखव
>>>
या भूतलावरील माझ्या परीचयात येणारया एकूण एक ईसमाची दारू सुटावी यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत.
पण तो शाहरूख आहे म्हणून त्याला वीआयपी ट्रीटमेंट द्यायची आणि सामान्य लोकांना दारूच्या आहारी जाऊ द्यायचे हे माझ्या तत्वात बसत नाही.
झोप रे... धागा उडणार नाही
झोप रे... धागा उडणार नाही रात्री तुझ्या.
>>>
मला हा टाईम सोयीचा पडतो. शांत निवांत. आणि सध्या वर्क फरॉम होम आहे. डायरेक्ट ऑफिस टाईमला उठायचे आणि दात घासत लॉगिन करायचे. ऊठायचा टाईम तब्बल दोन तास ऊशीरा झालाय त्याने.
कोणत्या तरी देशात तेथील
कोणत्या तरी देशात तेथील स्त्री शी लग्न केले की त्या देशाचे नागरिकत्व मिळत तिथे लग्न करण्याचं फक्त कागदपत्रे धंधा सुरू झाला.
किती तरी स्त्रिया लग्न करायचं व्यवसाय करायच्या
गुजरात मध्ये पण सर्रास दारू विक्री होते बंदी फक्त कागदावर च आहे.
कायद्यात फट ठेवायचे कारण च ते आहे.
फट ठेवली तर तिचा बोगदा करायला कितीसा वेळ लागतो.
कोणत्या तरी देशात तेथील
कोणत्या तरी देशात तेथील स्त्री शी लग्न केले की त्या देशाचे नागरिकत्व मिळत तिथे लग्न करण्याचं फक्त कागदपत्रे धंधा सुरू झाला.
--
या देशाचे नाव काय आहे ?
एकदा प्रयत्न करून पाहावा म्हणतोय!
हे सगळे नियम सांगायला, खरोखर
हे सगळे नियम सांगायला, खरोखर पाळले जातात का ?>>>
एकदा जाऊन परमिट काढून पहा स्वतः म्हणजे कळेल.
ब्लॅक मध्ये ही मिळते असे म्हणतात, पण तसे असेल तर त्याचा महसूल सरकारला मिळत नाही. राज्य चालवण्यास दारूचा महसूल असा उपमुद्दा आहे ना.
लोकांनी गर्दी करून करोना वाढला तरी हरकत नसेल तर दारू व्यतिरिक्त कितीतरी गोष्टी करता येतील.
एकदा जाऊन परमिट काढून पहा
एकदा जाऊन परमिट काढून पहा स्वतः म्हणजे कळेल. >> + १११
जायची गरज नाही.
जायची गरज नाही.
भारतात कोणताच कायदा रिअल मध्ये अमलात नसतो.
फक्त कागदावर असतो.
हे नागडे सत्य आहे.
आणि गुजरात भारतात च आहे.
आणि व्यापारी राज्य आहे.
तिथे तर कायदे कसे तोडायचे ह्याचे व्यवस्थित प्रशिक्षण झालेले असतं.
आता भारतात पासपोर्टला काय काय
आता भारतात पासपोर्टला काय काय डॉक्युमेंट्स लागतात याची लिस्ट दिली, पोलीस व्हेरिफिकेशन होणार असं सांगितलं तर तुम्ही म्हणाल, हे फक्त कागदोपत्री असतं उगाच.
मग म्हटलं काढून पहा एकदा पासपोर्ट तर म्हणाल, काही गरज नाही भारतात काय कायदे पालन होतं ते माहीत आहे.
पृथ्वीकर बरोबर आहे तुमचं
पृथ्वीकर बरोबर आहे तुमचं
नमस्कार स्वीकारावा
पण तो शाहरूख आहे म्हणून
पण तो शाहरूख आहे म्हणून त्याला वीआयपी ट्रीटमेंट द्यायची>>>>
इतका फालतू ओव्हर कॉन्फिडन्स कुठून येतो रे तुझ्यात
तुलाही माहितीय की शाहरूख च्या सोड त्याच्या बंगल्याच्या जवळपास जरी फिरकलास तरी त्याचे सिक्युरिटीज तुझा पार्श्वभाग शेकून काढून तुला तिथून हाकलून देतील
आणि आव असा आणतोय की त्याला व्हीयपी ट्रीटमेंट देण्याची इच्छा नाही
एकीकडे तो शेकडो युवकांना दारू पिऊन यश कसे साजरे करावे हे सांगून त्यांना चटक लावतो आणि तू ढोंगीपणा करत त्याच्या आरत्या गातोस
आणि वर अजून ढोंगीपणा म्हणजे की लोकांची दारू सोडवणार
सुधर रे
बरा हो आजारातून
घरी लक्ष दे त्यापेक्षा
Mr. 255,
Mr. 255,
मुळ मुद्दा "दारू विक्री, राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे का" हा आहे.
ज्या वस्तू वर जास्त कर आहे ती
ज्या वस्तू वर जास्त कर आहे ती वस्तू अर्थ व्यवस्थेचा कणा आहे.
दारू वर 60% वर कर असेल
त्या मुळे महसूल पण जास्त च देणार.
पेट्रोल वर 30% वर कर असेल.
म्हणून ते अर्थ व्यवस्थेचा कणा आहे.
Imported gadya 120% kar aahe.
Tya सुद्धा अर्थ व्यवस्थेचा कणा आहे.
ज्या वस्तू वर जास्त कर आहे त्या सर्व अर्थ व्यवस्थेचा कणा आहेत.
लोक इथे फारच पर्सनल होत आहेत
लोक इथे फारच पर्सनल होत आहेत असे वाटत आहे
मागेही लिहिले होते, त्याने त्याचे धागे उघडून, ते वाचून प्रतिसाद द्याच असे कोठेही म्हंटलेले नाही वा तो किंवा कोणी सदस्य तसे म्हणूही शकत नाही
धागा इतका सुसाट का सुटलाय म्हणून आज सगळे प्रतिसाद वाचले तर जरा जास्तच व्यक्तिगत रोख असलेले प्रतिसाद आलेले दिसले
बेफिकीर बरोबर आहे तुमचं
बेफिकीर बरोबर आहे तुमचं
नमस्कार स्वीकारावा
मी गेली १० वर्षे गुजरात मधे
मी गेली १० वर्षे गुजरात मधे आहे.
कायदा असा आहे.
प्रत्येक शहरात ५ ते १० लिकर शाँप आहेत(बार आणि रेस्टाँरंट नाहीत) आणि गुजरात बाहेरून आलेल्या व्यक्तीला परमीट (फिस भरून) वरिल पेपर्स देऊन दिले जाते.
काही लोकल गुजराती डॉक्टर सर्टिफिकेट दाखवून वार्षिक परमीट बनवतात.
पण Duty double आहे त्यामुळे वाईन आपल्याकडे ७५० असेल तर ईथे तीच ११०० आहे.
मानवजी म्हणतात ते बरोबर आहे
ब्लॅक मध्ये ही मिळते , त्याचा महसूल सरकारला मिळत नाही.
तुलाही माहितीय की शाहरूख च्या
तुलाही माहितीय की शाहरूख च्या सोड त्याच्या बंगल्याच्या जवळपास जरी फिरकलास तरी त्याचे सिक्युरिटीज तुझा पार्श्वभाग शेकून काढून तुला तिथून हाकलून देतील
>>>>
जर हे तुम्हालाही माहीत आहे तर तुम्ही शाहरूखची दारू मी सोडवावी ही अपेक्षा का धरत आहात?
मी माझा आवाज जिथपर्यंत जाऊ शकतो तिथपर्यंतच् पोहोचवणार ना...
हेच मग पहिल्यांदा लिहावं बाळ
हेच मग पहिल्यांदा लिहावं बाळ
की आपली तितकी नाहीये त्यामुळे इथल्याच लोकांना परावृत्त करेन
उगाचच त्याला व्हीयपी ट्रीटमेंट देणार नाही असल्या बढाया कशासाठी?
यातूनच बरा हो
प्रयत्न करा
बाकीच्यांना दारू मधून सोडवण्याआधी स्वतः चा आजार आणि व्यसने बरी करा
मग पुढचं पुढे
बेफिकीर आपल्या प्रामाणिक
बेफिकीर आपल्या प्रामाणिक मताबद्दल धन्यवाद. !
मी एक निरीक्षण नोंदवू ईच्छितो. मायबोली असो वा कुठलेही संकेतस्थळ तिथे एखादा सभासद जास्त सक्रिय होत असेल, जस्त धागे वा लेख लिहीत असेल तर एका टप्प्यावर त्याला टिकेला सामोरे जावे लागतेच.
मग ती व्यक्ती भले आपल्यासारखी दिग्गज लेखक का असेना वा माझ्यासारखे छोटेमोठे लेख आणि टीआरपी धागे काढून प्रसिद्ध होणारी का असेना. ईतरांची मी नावे घेत नाही उगाच मी स्वत:ला त्यांच्या पंक्तीत बसवतोय असे नको वाटायला. पण ईथे किती चांगले लिहीणारे केवळ ट्रोलिंगमुळे लिहायचे बंद झाले हे सर्वांनाच माहीत आहे.
पण सगळेच ट्रोलर नसतात. ट्रोलर मूठभर असतात. काही जनता मानवी स्वभावाला अनुसरून त्यात ऊत्तरते.
उदाहर्णार्थ एखादा ऊत्तम लेखक असेल, मनाला भिडणारे वगैरे लिहित असेल. त्याचे विचारही खूप सुंदर असतील तरीही पर्रफेक्ट ईथे कोणीच नसतो. जेव्हा तो चुकतो तेव्हा त्याचा गवगवा जास्त होतो. एखादी व्यक्ती कशी पर्रफेक्ट नाही आणि त्यातही कसे दोष आहेत हे बघून आत काहीतरी सुखावणे हे हुमायुन नेचर आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता माझ्याबाबत बोलायचे झाल्यास मी भले त्या ऊच्च विचार, आदर्श व्यक्तीमत्व, दिग्गज लेखक या कुठल्याच गटात मोडत नसेल पण धागे काढूनच का असेना जी प्रसिद्धी मिळवलीय तिच्यामुळे काही टिकेचे अन रोषाचे अनुभव येणारच. आणि यासाठी मी तयार राहतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बोंबला.
बोंबला.
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
इतके उच्च वैचारिक वाचून टचकन
इतके उच्च वैचारिक वाचून टचकन डोळ्यात पाणीच आलं राव
आज डोस जास्त झालेला दिसतोय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रुन्मेष च्या धाग्यांवर सर्वात
रुन्मेष च्या धाग्यांवर सर्वात जास्त प्रतिसाद असतात म्हणून बरेच जण त्याच्यावर खार खाऊन असतात
बरोबर आहे तुमचे साधा माणूस
बरोबर आहे तुमचे साधा माणूस
नमस्कार स्वीकारावा
आशुचँप ते तुम्हाला नाही
आशुचँप ते तुम्हाला नाही दुसऱ्या एका आयडीला लागू पडत आहे . तो आयडी लाईमलयीट मध्ये राहण्यासाठी चार पाच स्त्री ड्यू आयडी घेऊन बसलेला असतो . ऋन्मेष च्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले कि पुढचा धागा उघडायला पळत पळत येतो .
नवनवीन धागे काढतो . तरी ऋन्मेष वर खार खाऊन आहे .
आता पण एक श्रद्धांजली चा धागा काढला आहे . कोणी तिथे फिरकत नाहीय म्हणून स्वतःच रोज नवीन प्रतिसाद टाकून धागा वर आणतोय . आता माझ्या कमेंट नंतर तिकडे लोक जातील म्हणा .
अभिषेक एवढा राग का माझ्यावर?
अभिषेक एवढा राग का माझ्यावर? आय मिन, मी काहीही लिहून प्रतिसाद वाढवत नाही तुमचे याचा राग का.![551-Sandile.png](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u61895/551-Sandile.png)
तो श्रद्धांजली धागा फार अवघड जागेचं दुखणं झालय वाटत तुमचं, गोंधळ घालता येत नाही, शाहरुखबरोबर स्वतःची लाल करता येत नाही...
असो, आज एका प्रतिसादाची भीक घालतो.
आमच्या सोसायटीची मिटिंग असते. त्यात असच एक मेंबर मी याव, मी महान, मी याव करतो, त्याव करतो, असं सांगतो. आणि त्याला सांगितलं मग तू हे का करत नाहीस, तर काहीही बरळतो.
गंमत म्हणजे त्याने आजपर्यंत कधीही दारूला स्पर्श केला नाही (असं तो म्हणतो) पण कायम गांजा आणि कायकाय ओढतो देवाला माहिती... आणि मग बरळण चालू.
त्याला सांगितलं, बाबारे उपचार करून घे, पण उलट त्यावर त्याचं ज्ञान चालू होतं. घरचे तर इतके वैतागलेत, म्हणून आजकाल व्हाट्सएपच्या ग्रुपवर ज्ञान वाटणं चालुये, आणि जर कुणी विरोध केला, तर उलट काहीही बरळतो.
आजकाल सेम डेजा वू फिलिंग येतेय.
बादवे रुन्मेष इज कटप्पा धागा कधी येतोय??? १०० ची गॅरंटी माझी.
आशुचँप ते तुम्हाला नाही
आशुचँप ते तुम्हाला नाही दुसऱ्या एका आयडीला लागू पडत आहे >>>>>
आशा होतीच मला की हे माझ्यावर नसेल म्हणून कारण माझा मायबोलीवरचा शेवटचा धागा येऊन वर्षाहून अधिक काळ लोटला असेल.
आणि असेही अभिषेकवर जळून काय उपयोग, ही असली 'जोड्याने हाणा पण पाटील म्हणा' - टाईप्स प्रसिद्धी हवीय कशाला. असल्या प्रसिद्धीसाठी मला जर कधी हेवा वाटला तर पहिल्यांदा जाऊन स्वत:वर उपचार करून घेईन.
मला आता लॉक डाऊनमुळे वेळ जात नाहीये, अभिषेकच्या आचरटपणाला टार्गेट करायला मला मज्जा येतीय, जेव्हा पुन्हा एकदा काम सुरु होईल तेव्हा त्याला व्यवस्थित फाट्यावर मारून निघून जाईन. तुमचे मायबोलीवय किती ते माहीती नाही पण मागे एकदा अशीच खडाजंगी झाल्यानंतर बराच काळ त्याच्या सगळ्यांच धाग्यांवर व्यवस्थित दुर्लक्ष करण्यात आले होते आणि ते यापुढेही केले जाईल.
सध्या तरी हा माझा मर्यादित कालावधीचा टाईमपास आहे, त्यामुळे अभिषेकच्या नावाने गळे काढणाऱ्या स्वयंघोषित कनवाळू मायबोलीकरांनी मला माफ करावे.
अज्ञातवासी, तुमची मगर चांगलीच
अज्ञातवासी, तुमची मगर चांगलीच वाढायला लागली आहे, लॉक डाऊन च्या काळात पण चांगलं खाउ पिउ घालताय वाटतं
@आशुचँप - हो, स्टे ट्युन्ड,
@आशुचँप - हो, स्टे ट्युन्ड, हा तिचा जुना फोटो आहे. लवकरच तिचा नवीन फोटो टाकेन.
स्टायलिश झालीये एकदम आता... खूप छान खेळते.
तिचा बडेही जवळ येतोय.
आगावू शुभेच्छा तिला
आगावू शुभेच्छा तिला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चांगली मोठी हो, शहाणी हो म्हणावं
इथले काही धागे वाचायाला देउ नका तिला, नैतर प्रसिद्धीसाठी काय काय करावं लागतं हे बघून बालमनावर परिणाम होईल
धन्यवाद आशुचँप.
धन्यवाद आशुचँप.
तुमच्या शुभेच्छा तिला दिल्या, आनंदाने गोल गोल फिरायला लागली.
हो, आता नकळतं वय संपून काही गोष्टी कळायला लागल्यात तिला. पण अजूनही भल्या बुऱ्याची जाण नाही. तिला म्हणून मायबोलीपासून दूरच ठेवलंय. विनाकारण बिचारीच्या मनावर वाईट संस्कार व्हायला नको.
पण मोठी झाल्यावर बघेल तिचं विश्व, आपण कुठे कुठे पुरे पडणार. तोपर्यंत बागडू देत.
मात्र आजकाल खाण्यापिण्याचे थोडे लाड हवे असतात तिला. वाढत्या वयाच्या मगरीसाठी पौष्टीक पदार्थ सुचवा असा धागा काढावा का?
Pages