देव साहेब गोल्डीच्या दिग्दर्शनाखाली काम करायचे तेव्हा त्या चित्रपटांचा आणि गाण्यांचा दर्जा फार वेगळा होता असे मला प्रामाणिकपणे वाटते. त्यानंतर सबकुछ देव आनंद होऊ लागले. १९७० साली आलेल्या "प्रेम पुजारी" चित्रपटात तर देवसाहेब नायक, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शकही आहेत. अशावेळी जेव्हा संगीताची बाजु एसडी सारखा कसलेला संगीत दिग्दर्शक सांभाळतो आणि गीतं ही गोपालदास सक्सेना "नीरज" कवीकडून लिहून घेतली जातात तेव्हा एक तर्हेचे असंतूलन निर्माण होते. गीत, संगीत अत्युच्च प्रतीचे आणि त्यामानाने दिग्दर्शन त्या पातळीवर न पोहोचणारे. "प्रेम पुजारी" पाहताना हे वारंवार जाणवते. यातील काही गाणी ही त्या गायकाच्या कार्किर्दीतील मैलाचा दगड ठरलेली आहेत. किशोरच्या गाण्यांमध्ये "फूलों के रंग से" टाळता येईल का? खुद्द एस्डी ने गायलेल्या गाण्यांत " प्रेम के पुजारी हम है रस के भिखारी" याचा उल्लेख करावाच लागेल. लताचे "रंगीला रे" तर ग्रेटच आहे. पण हे सर्व डोक्यात ठेवून आपण गाणं जर पाहायला घेतलं तर फारसं काही पदरी पडत नाही.
वहिदा आणि देव आनंद एका ठिकाणी शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत भाग घेतल्यासारखे धावताना दिसतात. या दृष्यात एका ठिकाणी चक्क वहिदा धडपडताना दिसते तरीही हा सीन तसाच ठेवलेला आहे. इतकं धावूनही कुणाला धाप लागलेली नाही. गाणे सुरेल आवाजात सुरुच आहे. इतक्या तरल गाण्याच्या सुरुवातीलाच चमकिल्या मजबूत दातांची जाहिरात केल्याच्या थाटात वहिदा उसाचे कांडे काडकन फोडून खाताना दाखवली आहे. कशासाठी? ठावूक नाही. कपड्याच्या दुकानात जाऊन एकाच तागाने दोघांचे ड्रेस शिवले असावेत इतके ते एकाच लालजर्द भडक रंगाचे आहेत. त्या रंगाचाही डोळ्यांना त्रासच होतो. गवताच्या पेंढ्या असलेले लोकेशनही वायाच घालवले आहे. त्यातून चमकदार असे काही केलेले नाही. एका ठिकाणी मात्र सुरेख संधी होती. अलिकडे काय चूंबन सरळ सरळ दाखवले जाते. पण या गाण्यात ती एक जागा आहे. पण तेथेही देवसाहेब फारसे काही करु शकलेले नाहीत. सरधोपट, आग आणि खळाळते पाणी दाखवले आहे. पण येथे एसडी आणि किशोरने मात्र कमाल केली आहे.
आणि नेमके याचसाठी हे गाणे जबरदस्त झाले आहे.
चुंबन घेण्याच्या क्षणी "वो प्यार..." असे म्हणून किशोरने सार्या उत्कट भावना आवाजात आणून ती ओळ अर्धवट सोडली आहे. आणि पुढे एसडीने कमाल करीत सूचक म्युझिक पीसचा वापर केला आहे. ही एकच जागा काही क्षणांसाठी पाहण्याजोगी. कारण वहिदा मचाणावरून खाली वाकलेली असते आणि नायक खालून येतो.....
बाकी वहीदासारखे सौंदर्य असले म्हणजे बर्याच गोष्टी सुसह्य होतात हे देखिल तितकेच खरे. पडद्यावर वहीदा म्हणजे निव्वळ नेत्रसूख. देवसाहेबांची मान हलण्यास सुरुवात झालेला तो काळ. त्यांनी फार काही केलेलं नाही. येथे विजय आनंद असता तर बहार आली असती असं वाटत राहतं. त्याने देव आनंदकडून काहीतरी वेगळं करून घेतलं असतं. गाण्यात खरी केमिस्ट्री रंगलेली आहे ती लता आणि किशोर यांचीच.
पडद्यामागील गायक गायिकांची केमिस्ट्री ही पडद्यावरील नायक नायिकांच्या केमिस्ट्रीइतकीच महत्त्वाची गोष्ट असते ही बाब हे गाणं अगदी अधोरेखित करतं. लताचा प्रेयसीचा, प्रीतीने भरलेला, तरल, कोवळा आवाज. काहीसा अवखळ आणि खेळकरही. लता म्हटल्यावर किती लिहू आणि किती नको असं होऊन जातं. स्त्रीच्या या बारीक सारीक भावना लताच आवाजात पकडू जाणे. आणि किशोरने देवाअनंद बनूनच गायिलेलं गीत याच या गाण्याच्या भरभक्कम बाजु. सुरुवातीलाच नीरजजी प्रेमाची रेसिपी सांगतात. प्रेम काय आहे?
शोखियों में घोला जाये, फूलों का शबाब
उसमें फिर मिलाई जाये, थोड़ी सी शराब
होगा यूं नशा जो तैयार, वो प्यार है
बस हेच खरं. काव्याचा आस्वाद घ्या, गाण्यातील संगीताचा आस्वाद घ्या. आणि गायक गायिकेतील सुरेख केमिस्ट्री अनुभवा. काही एका जागेसाठी गाणे पाहायलाही हरकत नाही. कारण गाण्यात वहीदा असली कि आपले लक्ष तिच्याकडेच असते. निदान माझे तरी...
अतुल ठाकुर
८) आ चल के तुझे मैं लेके चलुं
८) आ चल के तुझे मैं लेके चलुं एक ऐसे गगन के तले हे किशोरचे गाणे पण एकदम शांत आहे.
रफीचे एप्रिल फूल बनाया, तलतचे आहा रिम्झिमके ये प्यारे प्यारे गीत मुकेशचे प्यार हुवा इकरार हुवा. सुंदर गीते अपवादात्मक सुंदर.
रफी किशोरपेक्षा संपूर्ण
रफी किशोरपेक्षा संपूर्ण विरुद्ध. अतिशय शांत, दर्दभरे, रोमँटिक आणि चरित्रात्मक गाणे चांगले गाऊ शकतात.
शम्मी कपूर आणि रफी हे कॉम्बिनेशन याला अपवाद आहे. किंबहूना ती गाणी त्यातील धसमुसळेपणामुळेच प्रसिद्ध आहेत.
फक्त शम्मीच नाही... जॉय
फक्त शम्मीच नाही... जॉय मुखर्जी... राजिंदर कुमार.. देव आनंद ... शशी कपूर .. बच्चन आणि अनेक जण + रफी..
छान लेख, पहिल्यांदा कळले असे
छान लेख, पहिल्यांदा कळले असे गाणे आहे, जुनी गाणी जास्त ऐकत नाही. पण इथले प्रतिसाद वाचुन इच्छा होतेय.
अमा अन चरप्स यांचे प्रतिसाद आवडले, अमांचे जास्त☺️
फक्त शम्मीच नाही... जॉय
फक्त शम्मीच नाही... जॉय मुखर्जी... राजिंदर कुमार.. देव आनंद ... शशी कपूर .. बच्चन आणि अनेक जण + रफी..
अगदी...
मुकेशचे प्यार हुवा इकरार हुवा
मुकेशचे प्यार हुवा इकरार हुवा.मन्ना डे
मुकेशची आनंदी मूडमधली गाणी
मुकेशची आनंदी मूडमधली गाणी अनेक आहेत. कभी कभी मधली शायराना अंदाजची गाणी दु:खी म्हणता येणार नाहीत. बाकी आठवतील तशी देईन.
१. मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चूने
२. ये दिल लेकर नजराना आ गया तेरा दिवाना
३. चेहेरे पे जरा आंचल, जब आप ने सरकाया
४. बागोंमें कैसे ये फूल खिलते है
५. चंदन सा बदन चंचल चितवन
६. डमडम डिग डीगा
७. मेहेताब तेरा चेहरा, किस ख्वाब में देखा था
८. जिक्र होता है जब कयामत का तेरे जलवों की बात होती है
९. कहीं करती होगी, वो मेरा इंतजार
१०. ये तो कहो कौन हो तुम कौन हो तुम
...आणखी खुप आहेत
मन्ना दे इतका व्हर्सटाईल आणि
मन्ना दे इतका व्हर्सटाईल आणि उत्तम रेंज असणारा गायक दुसरा नसेल....अफाट रेंज वाली गाणी...
चलत मुसाफिर मोह लिया रे
लागा चुनरी मे दाग
एक चतुर नार
पूछो ना कैसे मैने रेन
जिंदगी कैसी हैं पहेली
ए मेरी जोहराजबी
ये रात भिगी भिगी
आज सनम मधुर चांदणी मे
चुनरी संभाल गोरी.. उडी उडी जाय रे...
अतुल ठाकूर +
अतुल ठाकूर +
चांद सी मेहबुबा
किसी कि मुस्कुराहतो पे
ओ मेहबुबा... ओ मेहबुबा..
वो चांद खिला वो तारे हसे..
मेरा जुता है जपानी
मेरे मन कि गंगा
अँड माय फेव्ह - सुहाना सफर और ये मौसम हसीन..
+ lots
वाह अमा (आणि अतुल ठाकूर),
वाह अमा (आणि अतुल ठाकूर), माहौल जमा दिया इधरकू!...
अर्थात लता समर्थ आहेच, लग जा गले, रसिक बलमा इतर कुणी म्हणू नये हे मान्यच! पण अनेक गाणी अशी आहेत की तिथे तिथे त्या त्या गायिकेचा आवाज अगदी शोभून दिसला. काही जणी अगदी वन-साँग वंडर ठरल्या तरी उदा: जाने क्या तूने कही मध्ये गीता दत्त, तुम्हे हो ना हो मध्ये रूना लैला, ये मौसम रंगीन समा मध्ये सुमन कल्याणपूर, बिडी जलाईले मध्ये सुनिधी, आधा इष्क आधा है मध्ये श्रेया, दिल है छोटासा मध्ये मिन्मिनी... करोगे याद तो, हर बात याद आएगी.
हा धागा पिताश्रीना वाचायला
हा धागा पिताश्रीना वाचायला देतो.
त्यांच्या (आणि माझ्याही) ज्ञानात भर पडेल...
थँक्स everyone!!!!!
किशोर कुमारचे दर्दभरे गीत हवे
किशोर कुमारचे दर्दभरे गीत हवे असेल तर 'चिंगारी कोई भडके' सगळ्यांत डेंजर बरं!... हमसे मत पूछो कैसे मंदिर टूटा सपनोंका, लोगोंकी बात नहीं है ये किस्सा है अपनोंका..... अजय देवगण जेव्हा "हम दिल दे चुके" मध्ये ऐश्वर्याला भेटायला जातो आणि त्याला गायला सांगतात. तिथे 'चिंगारी' चा इतका कॉमिक उपयोग फक्त भन्साळीच करू जाणे. बाकी पामर 'चिंगारी ऐकून' ब्रेकप साँग ब्रेकप साँग करत भटकणार...
मला 'मेरे नैना सावन भादो'
मला 'मेरे नैना सावन भादो' जास्त आवडतं. चिंगारी दोन नंबरवर.
दर्द म्हटले की मला हकिकत मधले
दर्द म्हटले की मला हकिकत मधले रफीचे "मै ये सोच कर उसके दर से उठा था" आठवते. आणि अंगावर शहारे आणणारे ते ६२ च्या चीन युद्धाचे वातावरण आणि आपल्या सैनिकांची परवड. हे गाणे खुप अंगावर येते. खचवून टाकणारे दु:ख आहे ते.
दर्द म्हटले की मला हकिकत मधले
दर्द म्हटले की मला हकिकत मधले रफीचे "मै ये सोच कर उसके दर से उठा था" आठवते. आणि अंगावर शहारे आणणारे ते ६२ च्या चीन युद्धाचे वातावरण आणि आपल्या सैनिकांची परवड. हे गाणे खुप अंगावर येते. खचवून टाकणारे दु:ख आहे ते.>>>>
खरेच.... अगदी हुरहूर लावणारे दर्दभरे गाणे, रफीचा रेंगाळत, ती थांबवेल या आशेतली निराश पावले उचलणारा आवाज आणि त्या पावलांना मागून पुढून लिपटत जाणारे व्हाइलिनचे दुःखी सूर...
आणि त्यातला अभिनय सुद्धा तितकाच सुरेख आहे... गाण्याचे स्वर कानावर येताच संजय खान बँकर मधून बाहेर येतो आणि सुधीरला बघताच उसासा सोडतो... हाय हाय
मस्त लेख. हे गाणं पण फार
मस्त लेख. हे गाणं पण फार आवडतं आहे. अमांचा प्रतिसाद फार आवडला. लतादीदी बद्दल जे लिहीलं ते तंतोतंत खरंय. स्त्री च्या हरेक प्रकारच्या भावना गाण्यात उतरवणे तिच एक करू जाणे. यात मला ' कितनी अकेली' हे गाणं आठवलं. प्रचंड सुंदर गाणं आहे पण काहीसं अंडररेट राहिलय. याबद्दल गाण्याबद्दल ही जमलं तर नक्की लिहा अतुलजी. वाचायला आवडेल.
सगळेच प्रतिसाद छान आहेत. अमा
सगळेच प्रतिसाद छान आहेत. अमा यांचे विशेष आवडले.
मुकेशची आनंदी मूडमधली गाणी अनेक आहेत >>>> फारच छान लिस्ट दिलीत.
खरेच.... अगदी हुरहूर लावणारे
खरेच.... अगदी हुरहूर लावणारे दर्दभरे गाणे, रफीचा रेंगाळत, ती थांबवेल या आशेतली निराश पावले उचलणारा आवाज आणि त्या पावलांना मागून पुढून लिपटत जाणारे व्हाइलिनचे दुःखी सूर...
क्या बात है साधनाजी. किती सुरेख लिहिलेत.
धन्यवाद भाग्यश्री१२३
मै शायर बदनाम पण खूप छान
मै शायर बदनाम पण खूप छान गायलें आहे, दर्दभरे गाण्यामध्ये
मै शायर बदनाम पण खूप छान
मै शायर बदनाम पण खूप छान गायलें आहे, दर्दभरे गाण्यामध्ये
हे गाणं जबरदस्तच आहे. पण यात मला आनंदबक्षी शायर म्हणून खूपच भावला. काय शब्द आहेत.
शोलों पे चलना था, काटोंपे सोना था, और अभी जी भर के, किस्मत पे रोना था...
गीता दत्त वन सॉंग वंडर?
गीता दत्त वन सॉंग वंडर?
काहीही.
श्रेया घोषाल वन सॉंग वंडर ??
श्रेया घोषाल वन सॉंग वंडर ??
ऑब्जेक्शन माय लॉर्ड...
आय ऑबजेक्ट टु गीता दत्त वन
आय ऑबजेक्ट टु गीता दत्त वन सॉंग वंडर...
नका रे लिस्ट द्यायला लावू...
नका रे लिस्ट द्यायला लावू... किती टायीपणार...
मस्त लेख, आवडतं गाणं आणि
मस्त लेख, आवडतं गाणं आणि उत्तम प्रतिसाद...
आय ऑबजेक्ट टु गीता दत्त वन सॉंग वंडर. .>>+11111
पुण्यात डेक्कन वर शिंदे भोसले आरकेड मध्ये एक दर्दी दुकानवाला एसकलूजीव सीडीज विकत असे. म्हणजे लता तर लताचीच उत्तम दुर्मिळ गाणी , आशा तर फक्त आशाचीच, गीता तर फक्त गीता, हेमंत कुमार, मन्ना डे, गुलजार, देव आनन्द, किशोर, रफी, मुकेश, एस डी, आर डी ... किती तरी सीडीज घेतल्या आहेत ह्याच्या कडून.
हे गाणं आधीच आवडतं त्यात इतकं
हे गाणं आधीच आवडतं त्यात इतकं उत्तम रसग्रहण आणि त्यावर उत्तमोत्तम प्रतिसाद. दुधात साखर आणि त्यात केशर. अमा, सगळेच प्रतिसाद सुंदर आहेत. च्रप्स यांचेही आणि बहुतेक सर्वांचेच.
मला रफीचं दीवाना हुआ बादल अतिशय आवडतं. गाण्याच्या शब्दसुरांतून भावना कश्या व्यक्त कराव्यात याचे उत्तम उदाहरण. ली प्यार ने अंगडाई म्हणताना खरोखर हात वर करून आळोखेपिळोखे देत शरीराला एक नाजुक हेलकावा दिल्यासारखे वाटते. रफीसाहेबांची गाणी आवडतातच. मुकेश अनेक वेळा एकसुरी वाटतात. आवाज फिरत नाही असे वाटते. किंचित नाकी आवाजामुळे आपोआपच गाण्यात दर्द उतरतो की काय असे वाटते. अर्थात काही उत्तम गाणी आहेतच. त्यातलं एक कहीं दूर जब दिन ढल जाये. ओ मेहबूबा सुद्धा छान. ओह रे ताल मिले नदीके जल में ऐकायला छानच वाटतं. पण चालीबरहुकूम गायल्यासारखं. स्वत:चं काही ओतलंय असं वाटत नाही.
किशोरकुमार आणि मन्ना डे खूपच वर्सटाइल. रातकली जब ख्वाब में आई आवडतं आणि चलती का नाम गाडीची सगळीच गाणी. इतरही खूप. गाता रहे मेरा दिल मधलं अबॅंडन पाहावं. किशोर नेहमीच मुक्तपणे गायचा. सचिनदांची खूप कमी गाणी आहेत. पण सुजातामधलं सुन मेरे बंधू रे आणि बंदिनीमधलं मेरे साजन है उस पार किती खुल्या आवाजात गायलंय. अर्थात ही नायकाची गाणी नाहीयत. त्यामुळे जानपदगीताला साजेसा आवाज आणखीनच खुलला आहे. मन्ना डेंचीसुद्धा अनेक आहेत. वर याद्या दिल्याच आहेत काहींनी. किस ने चिलमन से मारा नजारा हे आणखी एक.
हा धागा आणि प्रतिसाद वाचुन
हा धागा आणि प्रतिसाद वाचुन धक्क्यावर धक्के बसले आहेत.अगदि पुरुष गायकांची रेंज एकाच ठेवणीत ठेवण्यापासुन ते सुमन कल्याणपूर सारख्या ताकदिच्या आणि वर्सटायल गायीकेला वनसाँग वंडर म्हणण्या इतपत. आणि शेवटि या गाण्यातल्या देवसाब आणि वहिदा रेहमान या जोडिला न ओळखणे इज लाइक दि स्ट्रॉ दॅट ब्रोक कॅमल्स बॅक... :तेथे कर माझे जुळती:
>>दिल खोलून गाणं असं फारसं
>>दिल खोलून गाणं असं फारसं दिसत नाही.<<
नि:शब्द. अगणित गाणी आहेत, लताबाईंची सगळीच गाणी म्हटलं तरी वावगं ठरणार नाहि. उदाहरणादाखल परख या चित्रपटातलं खमाज रागावरचं हे गाणं. या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळेस कृत्रीम पाउस पाडायला लागला नसावा, इतकि आर्तता आणि आद्रता भरलेली आहे...
हे अबॅंडन मला लतादीदींमधे
हे अबॅंडन मला लतादीदींमधे नाही आढळत. (खा आता मार!) त्यांच्या सुराबद्दल, आवाजाच्या गोडव्याबद्दल, फिरतीबद्दल जितकं बोलावं तितकं थोडं. पण गाण्यात मनमोकळेपणा, दिल खोलून गाणं असं फारसं दिसत नाही. पण त्यावेळची पद्धतच तशी असावी. दोन्ही खांद्यावर घट्ट पदर घेऊन स्वत:ला जखडून टाकावं असं नायिकांनी वागणं आणि तसंच गाणं. मोकळं गाणं आणि मोकळा, थोडासा बिनधास्त अभिनय म्हणजे वॅंपगिरीच. अपवाद गीताबालीचा. पण असं म्हणावं तर मुबारक बेगम होत्याच की कभी तनहाइयों मे हमारी याद आयेगी मध्ये दु:खाने आक्रंदत शाप देणाऱ्या. लताबाईंचीही आहेत अनेक गाणी, मैं हूं जोधपुर की जुगनी सारखी. किंवा चले आओ चले आओ तकाजा है निगाहों का किंवा यह दिल और उनकी निगाहों के साये मधला मोकळेपणा. आहेत तशी खूप पण पाच हजारहून अधिक गाण्यांमधे प्रमाण कमीच. गाणं ऐकायला खूप सुरेख, एकही नको असलेला स्वर नाही, पण शब्दाशब्दातून भावना ओसंडतेय आणि स्वरातून मात्र नाही. म्हणजे कोरडेपणा आहे असंही नाही. उलट स्वर मधाळ, सहज तीन्ही सप्तके गाठणारा,पुरेसा तीव्रही, घनगंभीरही, तरी अलिप्त. सुरमायेचा सर्व पसारा आणि सप्तरंगी मोरपिसारा आपल्यासमोर मांडूनही नामानिराळा. सम्राज्नीच त्या. त्यांनी असंच असावं. ते त्यांनाच शोभतं. हे म्हणजे म्हटलं तर अलंकार, म्हटलं तर उणीव.
आय ऑबजेक्ट टु गीता दत्त वन
आय ऑबजेक्ट टु गीता दत्त वन सॉंग वंडर... >> ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड बरं! आता इथे "मेरे काबिल दोस्तने जिस तरह से पूरी तवज्जू बिना" वगैरे म्हणून घ्यायला आहे चान्स खरा पण मुद्द्यावर राहू.
मूळ पोस्टचा मुद्दा - अनेक गाणी अशी आहेत की तिथे तिथे त्या त्या गायिकेचा आवाज अगदी शोभून दिसला. यादीमधल्या काही जणी हिंदी सिनेमात फार गायल्या नाहीत उदा मिन्मिनी, व रूना लैला. दक्षिणेत आणि बांगलादेशात आहे प्रसिद्ध पण हिंदी सिनेमात फार गायल्या नाहीत तरी त्या त्या गाण्यात आवडल्या. ती गाणी लता, आशा ह्यांनी म्हणायला हवी होती असे कधी वाटले नाही इतक्या चपखल वाटल्या. अशीच एक स्नेहा पंत म्हणून गायिका गोलमाल मध्ये गाऊन गेली "आगे पीछे डोलते हो भवरों की तरह". ती गोलमाल सिरीज मला फारशी प्रिय नाही. परेश रावल-सुश्मिता मुखर्जी यांची रोमँटीक इमेजही नाही. पण एकूणच त्या गाण्याची भट्टी अशी काही जमली आहे की कायम हसू येतं....
Pages