देव साहेब गोल्डीच्या दिग्दर्शनाखाली काम करायचे तेव्हा त्या चित्रपटांचा आणि गाण्यांचा दर्जा फार वेगळा होता असे मला प्रामाणिकपणे वाटते. त्यानंतर सबकुछ देव आनंद होऊ लागले. १९७० साली आलेल्या "प्रेम पुजारी" चित्रपटात तर देवसाहेब नायक, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शकही आहेत. अशावेळी जेव्हा संगीताची बाजु एसडी सारखा कसलेला संगीत दिग्दर्शक सांभाळतो आणि गीतं ही गोपालदास सक्सेना "नीरज" कवीकडून लिहून घेतली जातात तेव्हा एक तर्हेचे असंतूलन निर्माण होते. गीत, संगीत अत्युच्च प्रतीचे आणि त्यामानाने दिग्दर्शन त्या पातळीवर न पोहोचणारे. "प्रेम पुजारी" पाहताना हे वारंवार जाणवते. यातील काही गाणी ही त्या गायकाच्या कार्किर्दीतील मैलाचा दगड ठरलेली आहेत. किशोरच्या गाण्यांमध्ये "फूलों के रंग से" टाळता येईल का? खुद्द एस्डी ने गायलेल्या गाण्यांत " प्रेम के पुजारी हम है रस के भिखारी" याचा उल्लेख करावाच लागेल. लताचे "रंगीला रे" तर ग्रेटच आहे. पण हे सर्व डोक्यात ठेवून आपण गाणं जर पाहायला घेतलं तर फारसं काही पदरी पडत नाही.
वहिदा आणि देव आनंद एका ठिकाणी शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत भाग घेतल्यासारखे धावताना दिसतात. या दृष्यात एका ठिकाणी चक्क वहिदा धडपडताना दिसते तरीही हा सीन तसाच ठेवलेला आहे. इतकं धावूनही कुणाला धाप लागलेली नाही. गाणे सुरेल आवाजात सुरुच आहे. इतक्या तरल गाण्याच्या सुरुवातीलाच चमकिल्या मजबूत दातांची जाहिरात केल्याच्या थाटात वहिदा उसाचे कांडे काडकन फोडून खाताना दाखवली आहे. कशासाठी? ठावूक नाही. कपड्याच्या दुकानात जाऊन एकाच तागाने दोघांचे ड्रेस शिवले असावेत इतके ते एकाच लालजर्द भडक रंगाचे आहेत. त्या रंगाचाही डोळ्यांना त्रासच होतो. गवताच्या पेंढ्या असलेले लोकेशनही वायाच घालवले आहे. त्यातून चमकदार असे काही केलेले नाही. एका ठिकाणी मात्र सुरेख संधी होती. अलिकडे काय चूंबन सरळ सरळ दाखवले जाते. पण या गाण्यात ती एक जागा आहे. पण तेथेही देवसाहेब फारसे काही करु शकलेले नाहीत. सरधोपट, आग आणि खळाळते पाणी दाखवले आहे. पण येथे एसडी आणि किशोरने मात्र कमाल केली आहे.
आणि नेमके याचसाठी हे गाणे जबरदस्त झाले आहे.
चुंबन घेण्याच्या क्षणी "वो प्यार..." असे म्हणून किशोरने सार्या उत्कट भावना आवाजात आणून ती ओळ अर्धवट सोडली आहे. आणि पुढे एसडीने कमाल करीत सूचक म्युझिक पीसचा वापर केला आहे. ही एकच जागा काही क्षणांसाठी पाहण्याजोगी. कारण वहिदा मचाणावरून खाली वाकलेली असते आणि नायक खालून येतो.....
बाकी वहीदासारखे सौंदर्य असले म्हणजे बर्याच गोष्टी सुसह्य होतात हे देखिल तितकेच खरे. पडद्यावर वहीदा म्हणजे निव्वळ नेत्रसूख. देवसाहेबांची मान हलण्यास सुरुवात झालेला तो काळ. त्यांनी फार काही केलेलं नाही. येथे विजय आनंद असता तर बहार आली असती असं वाटत राहतं. त्याने देव आनंदकडून काहीतरी वेगळं करून घेतलं असतं. गाण्यात खरी केमिस्ट्री रंगलेली आहे ती लता आणि किशोर यांचीच.
पडद्यामागील गायक गायिकांची केमिस्ट्री ही पडद्यावरील नायक नायिकांच्या केमिस्ट्रीइतकीच महत्त्वाची गोष्ट असते ही बाब हे गाणं अगदी अधोरेखित करतं. लताचा प्रेयसीचा, प्रीतीने भरलेला, तरल, कोवळा आवाज. काहीसा अवखळ आणि खेळकरही. लता म्हटल्यावर किती लिहू आणि किती नको असं होऊन जातं. स्त्रीच्या या बारीक सारीक भावना लताच आवाजात पकडू जाणे. आणि किशोरने देवाअनंद बनूनच गायिलेलं गीत याच या गाण्याच्या भरभक्कम बाजु. सुरुवातीलाच नीरजजी प्रेमाची रेसिपी सांगतात. प्रेम काय आहे?
शोखियों में घोला जाये, फूलों का शबाब
उसमें फिर मिलाई जाये, थोड़ी सी शराब
होगा यूं नशा जो तैयार, वो प्यार है
बस हेच खरं. काव्याचा आस्वाद घ्या, गाण्यातील संगीताचा आस्वाद घ्या. आणि गायक गायिकेतील सुरेख केमिस्ट्री अनुभवा. काही एका जागेसाठी गाणे पाहायलाही हरकत नाही. कारण गाण्यात वहीदा असली कि आपले लक्ष तिच्याकडेच असते. निदान माझे तरी...
अतुल ठाकुर
मी ह्या सगळ्याच गायकांच्या
मी ह्या सगळ्याच गायकांच्या गाण्यांचा फॅन आहे. त्यामुळे 'लताच्या आवाजात अलिप्तता जाणवते', 'मुकेश च्या गाण्यांमधे आवडणार्या गाण्यांपेक्षा न आवडणार्या गाण्यांचीच संख्या अधिक आहे' वगैरे तज्ञ टिप्पणी माझ्या आवाक्याबाहेर आहे. ह्यात कुठलाही उपरोध नाही. बस! ह्या गायकांनी गायलेली असंख्य गाणी आवडतात आणी त्यांनी असंख्य सोनेरी क्षण दिले आहेत इतकच. त्याबाहेरच्या गोष्टी कधी जाणवल्या नाहीत. रागदारीवर आधारित गाणी सगळ्याच गायकांनी गायली आहेत.
मध्ये गाण्यात हसणं! ]] ह्याच
मध्ये गाण्यात हसणं! ]] ह्याच अजून एक उदाहरण म्हणजे लता रफिच "चलो दिलदार चलो" ह्यात दोन ठिकाणी कडव संपताना बाई हसतात. ते कमाल आहे. किंवा आजा पिया तो हे प्यार दू मध्ये शेवटच्या कडव्यात "खिल पडि बस इक हसी पिया तेरे प्यार कि" मध्ला हसी शब्द पण ऐका. ते पूर्ण गाणच मस्त आहे.
लेख उत्तमच आहे, अतुल यांचे
लेख उत्तमच आहे, अतुल यांचे लेख नेहमीच चुकवू नयेत असे असतात. पण प्रतिसाद सुद्धा एकापेक्षा एक माहितीपूर्ण आणि वाचनीय आहेत. मजा आली.
कित्येक विसरल्या गेलेल्या गाण्यांची आठवण झाली. खरं तर लिस्ट बनवायला हवी अशी सगळी उत्तम गाणी चर्चिली गेली आहेत.
गुम है किसि के प्यार में, दिल
गुम है किसि के प्यार में, दिल सुबहा शाम...
या गाण्यात रेखाला लताच्या भावाविष्काराला पूर्ण न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करावा लागला असेल इतकं ते जीव ओतून गायिलं गेलंय.
नॉनफिल्मी मध्ये लताची 'आंख से
नॉनफिल्मी मध्ये लताची 'आंख से आंख मिलाता है कोइ' गझल प्रचंड आवडते. अगदी जीव ओवाळून टाकावा ईतकी अप्रतिम गझल.
वरच्या चर्चेत मॅडम नूरजहां राहिल्या. मध्ये 'चांदनी रातें' च्या भिकार वर्जनची लाटच आली होती. मॅडमचा आत्मा तळमळला असेल. लताबाईंच्यामते नूरजहां ईतके एक्स्प्रेशन गाण्यात कोणी आणू शकत नाही.
लताचं त्यातल्या त्यात अलिप्त
लताचं त्यातल्या त्यात अलिप्त वाटेलेलं एकमेव गाणं म्हणजे "मेरे नैना सावन भादो"
हे एक गाणं देखिल हेमा मालिनी वर चित्रित होणार असल्यामुळे लताने तसे अलिप्त भाव आणले असावे असे मानण्यास वाव आहे.
आणि हेच गाणे किशोरच्या आवाजातले त्याला दर्दभर्या आणि भावपुर्ण गाण्यासाठी पैकीच्या पैकी गुण मिळवून देतील असं असलेलं
बाकी लता स्त्रीच्या सगळ्या भावभावनांना आपल्या आवाजातून संपुर्ण न्याय मिळवून देण्यास एकटीच समर्थ आहे ह्या अमाच्या म्हणण्यास मम. (एक स्त्री म्हणून त्यातल्या काही भुमिका प्रत्यक्ष आयुष्यात तिला जगताच आलेल्या नाहीत याचा विसर पडावा इतक्या सामर्थ्याने गाते ती ) तिने बाय चॉईस काही प्रकारची गाणी कमी गायली असतील / नसतील गायली पण सामर्थ्य नो डाऊट अॅट ऑल.
लता आणि अलिप्तता हे पटतं. आशा
लता आणि अलिप्तता हे पटतं. आशा खूप पुढे आहे ह्या स्केलवर.
रच्याकने, रफीचे जान पैचान हो गाणे नाही ऐकलेत का मंडळी? हल्लीची नवी पिढी तर जास्त फिदा होईल. ते गाणं पाहणं देखील फार उर्जित अनुभव आहे. (भाषेसाठी )
गाणी चित्रित होताना नट नट्या कोण यावर देखील गायक ठरविले जात. महानायक अमिताभ साहेबांनी रफिंसारख्या सुरेख गायकाला घरी बसवून फुटकळ किशोरदाला हिट केलं हे लै मोठ्ठं पाप बरं.
छान चर्चा चालु आहे. अजुनही
छान चर्चा चालु आहे. अजुनही मुळ लेखातले गाणे पाहिले नाही
आणि चर्चाही पुर्ण वाचून झाली नाही पण ‘लताच्या आवाजात अलिप्तता जाणवते‘ हे वाचुन स्तब्ध झाले.
लताचं गाणं येऊन तुमच्या आत्म्याला मिठी मारतं.
गाणी चित्रित होताना नट नट्या
गाणी चित्रित होताना नट नट्या कोण यावर देखील गायक ठरविले जात. महानायक अमिताभ साहेबांनी रफिंसारख्या सुरेख गायकाला घरी बसवून फुटकळ किशोरदाला हिट केलं हे लै मोठ्ठं पाप बरं. >>> खामोश!
एकतर किशोर फुटकळ वगैरे नाही. दुसरे म्हणजे त्याला वर आणणे हे जर "पाप" असेल तर ते काकाच्या माथी मारा व बर्मन पिता पुत्रांच्या. पण ते ही खरे नाही. ६० च्या दशकाच्या शेवटी शेवटी फिल्मी संगीतात एक "स्टेल" अवस्था येउ लागली होती हे तेव्हाची गाणी ऐकली तर जाणवते. बडे तीन हीरोही वय जाणवू लागण्याच्या काळात आले होते. अशा वेळेस हमखास एखादा ट्रेन्डसेटर चित्रपट येतोच* आणि त्यातून एकदम फ्रेश काहीतरी निर्माण होते. १९६९ च्या 'आराधना' ने तेच केले. नंतर राजेश खन्नाकरता जवळजवळ सर्वच संगीतकारांनी किशोर वापरला. त्याच बरोबर ७० च्या दशकांत गाण्यांची स्टाइलही जास्त उडत्या चालीची, माधुर्य कमी, संगीत जास्त अशी झाली. ती रफीला सुटेबल नव्हतीच. तरी त्यालाही अनेक चांगली गाणी मिळाली अगदी तो जाईपर्यंत. एका अर्थाने रफी मागे नाही पडला, तर किशोर खूप पुढे आला.
साधारण १९७३ पासून बच्चन पुढे आला आणि काका मागे पडला. तरीही बहुतांश सलीम-जावेद चे स्क्रिप्ट असलेल्या त्या सुरूवातीच्या चित्रपटांमधे अमिताभच्या 'विजय' या व्यक्तिरेखेला गाणीच नसत. जंजीर, शोले, दीवार, त्रिशूल, काला पत्थर आणि त्याच आसपास आलेल्या कभी कभी - यात अपवादाने एखाद दुसरे गाणे/कडवे होते. १९७७ च्या अमर अकबर अँथनी मधे त्याला खर्या अर्थाने किशोरचा तो अमिताभकरता खास वापरलेला आवाज मिळाला आणि तेव्हापासून किशोर त्याचा प्लॅबॅक झाला. पण तोपर्यंत जवळजवळ सर्वच हीरो किशोर चा आवाज वापरू लागले होते. याउलट मनमोहन देसाई हे रफीफॅन, त्यामुळे त्यांनी स्वतःच्या सुहाग, नसीब आणि देशप्रेमी मधे आवर्जून रफीचा आवाज अमिताभकरता वापरला (पण त्या गाण्यांत किशोरची मजा नव्हती) आणि इव्हन रफी गेल्यावर "डिट्टो" रफी म्हणून शब्बीर वापरला कुली मधे.
* असाच आणखी एक मोठा बदल म्हणजे १९८७ चा कयामत से कयामत तक आणि उदित नारायण चा आवाज ८० च्या दशकाच्या मध्यावर शब्बीर कुमार व मोहम्मद अजीज ऐकून पकलेल्यांना चांगले लक्षात असेल.
आमने सामने पाहिलाय का कोणी..
आमने सामने पाहिलाय का कोणी... रफी
नैन मिलाके चैन चुराना किस्का है ये काम ...
>>लताचं त्यातल्या त्यात
>>लताचं त्यातल्या त्यात अलिप्त वाटेलेलं एकमेव गाणं म्हणजे "मेरे नैना सावन भादो"<<
परत एकदा दुर्दैवाने, नि:शब्द (मराठीत स्पिचलेस, फ्लॅबर्गास्टेड)...
जास्त लिहित बसत नाहि, या लेखातला "मेरे नैना..." चा भाग वाचा...
गाणी चित्रित होताना नट नट्या
गाणी चित्रित होताना नट नट्या कोण यावर देखील गायक ठरविले जात. महानायक अमिताभ साहेबांनी रफिंसारख्या सुरेख गायकाला घरी बसवून फुटकळ किशोरदाला हिट केलं हे लै मोठ्ठं पाप बरं. >>> ह्यावर कुरुक्षेत्र होउ शकेल बरं फेफ. आर्डी किशोर एस्डी किशोरच्या गाण्यावर एक लेख माला होउ शकेल. ह्याचा आवाज सगळ्यात जवळचा वाट्तो.
लता आणि अलिप्तता हे हीरा
लता आणि अलिप्तता हे हीरा यांनी लिहिलंय आणि मी व इतरांनी अनुमोदन दिलंय ते लताचं गाणं आणि श्रोता या संदर्भात नाहीए , तर लताचं गाणं आणि लता या संदर्भात आहे. स्वत : गायक आणि संगीतकार असलेल्या एका कडूनही हे मत ऐकलंय.
गाणं गाताना , त्यातल्या भावना पोचवतानाही , लता त्या गाण्यापासून अलिप्त आहे असं वाटतं.
या वरच्या मजकुराचा पुढल्या मजकुराशी संबंध आहे आणि नाहीही. काही वर्षांपू र्वी फिल्म फेअर अवॉर्ड्सवर एक डॉक्युमेंटरी पाहिली होती. त्यात एका अवॉर्ड फंक्शनमध्ये लता 'बिंदिया चमकेगी' गात होती. गाण्यात सगळे भाव चपखल उतरले होते. पण तिचा चेहरा दूरदर्शनवर हिंदी समाचार देणार्या सलमा सुलतान इतका निर्विकार होता. गाताना ती फक्त तिचा गळा वापरत होती. हातांची वगैरे जराही हालचाल नाही. तुलना करायची तर काही गायिका खांद्यांनी गातात का असं वाटतं (ओ|ळखा कोंण ) तेच २००० च्या मागे पुढे एक कॉन्सर्ट झाला त्यात सगळे बडे गायक - एस पी पासून सोनू निगमपर्यंत होते. आता वय झालेल्या लता कडून सुरांना साथ द्यायला हातांची, मानेची हालचाल होत होती.
वर लताच्या गाण्यातल्या हसण्याचा उल्लेख आलाय. पाकीजामधल्या गाण्यातलं ते हसू अगदी अस्फुट आहे.
पन्ना की तमन्ना है के हीरा मुझे मिल जाए या गाण्यात ना करूं मैं ये काम तो नहीं मेरा नाम या ओळीआधी तिने हे फुसकं चॅलेंज आहे, असं छद्मी हास्य केलंय. ते गाण्यातल्या भावाल साजेसंच आहे.
पण बेताबमधल्या जब हम जवाँ होंगे मध्ये ऐसे हंसती थी सोबतचं हसणं धर्मेंद्रच्या नाचण्यासारखं आहे. (पळा...........)
गण्यातलं हसणं ऐकावं तर जानु जानु री का हे खनके है तोरा कंगना यातलं आशा- गीताचं .
अप्रतिम चर्चा! खूप माहिती
सुरेख लेख आणि अप्रतिम चर्चा! खूप माहिती मिळतेय.
सुरेख लेख आणि अप्रतिम चर्चा!
सुरेख लेख आणि अप्रतिम चर्चा! खूप माहिती मिळतेय.>>>+++11111
मला वाटतं की लतादीदींच्या
मला वाटतं की लतादीदींच्या गाण्यात होणारा अलिप्तपणाचा भास (?) हा त्यांच्या off screen/ off studio image चा परीणाम असावा. ज्याला लता मंगेशकर यांच्याबद्दल व्यक्ती म्हणून काहीही माहिती नाही अशा व्यक्तीने जर त्यांचे गाणे ऐकले तर तिला असं वाटेल असं मला वाटत नाही. (असंख्य वाटाणे झाले आहेत वाक्यात. कृ भा पो घ्या!) गंमत अशी आहे की भारतीय भाषा आणि चित्रपट संगीताची जराशी ओळख असणारी व्यक्ती ही लता मंगेशकर या नावाविषयी अनभिज्ञ असू शकत नाही. So we can not really test this hypothesis.
आशा भोसले यांच्या Off screen दिलखुलास स्वभावामुळे त्यांच्या गाण्यात आपल्याला आपोआप तो स्वभाव जाणवतो. अर्थात मूळ सुरेख expression हे आशाताईंच्या गाण्याचा अविभाज्य भाग आहेच.
मी कोणत्याही कंपूत नाही पण (चांगल्या अर्थाने) some are more equal असं लतादीदींच्या बाबतीत आहे खरं. This is my inherent bias.
हे अगदी पटलं. आभार !
हे अगदी पटलं. आभार !
जि + १
जि + १
भरत, अगदी अगदी.
भरत, अगदी अगदी.
अभिनयातल्या दोन स्कूलस चेच उदाहरण द्यायचे होते. चित्रपटसृष्टीतही असे वाद रंगले होते. अशोक कुमारजी म्हणत असत की तुम्ही पाचदहा किलोमीटर धावून आला आहात असा प्रसंग तुम्हाला वठवायचा असेल तर तुम्हांला त्याआधी प्रत्यक्ष धावून वातावरणनिर्मिती करण्याची गरज नाही. एकेकाची ताकद असते कल्पनेने तो प्रसंग उभा करायची. तसेच लतादीदींचे असेल.
पण मला याहून अधिकही म्हणायचे आहे. सर्वोत्तम अशा लताबाईंनी हजारो गाणी गायल्याने त्यातल्या भावनायुक्त गाण्यांची संख्या अधिक निघणे साहजिक आहे आणि मन्ना डे सारख्या उत्तम गायकांनी कमी गाणी गायल्याने भावनापूर्ण गाण्यांची टक्केवारी अधिक निघणे शक्य आहे.
आणखी लिहीन नंतर
ता क भरत, पुढचा प्रतिसाद नुकताच पाहिला . सहमत
Submitted by फारएण्ड on 29
Submitted by फारएण्ड on 29 April, 2020 - 04:21>>
मस्त प्रतिसाद फारएन्ड.
नव्वदच्या दशकातले आधी नायिकांची छेड काढणारे केस वाढलेले टपोरी हिरो आणि नंतर सगळं कसं गोड गोड असलेले चित्रपट यांचा वैताग आलेला असताना नंतर आलेला दिल चाहता है हा असाच एक मोठा रिलीफ होता
कदाचित लतादीदींच्या
कदाचित लतादीदींच्या स्वभावातील स्थितप्रज्ञतेमुळे त्यांच्या गाण्यात अलिप्तपणा जाणवत असावा. त्यांच्या काही जुन्या मुलाखती पाहता त्या कधीही कोणताही प्रकारच्या विषयावर गरजेपेक्षा जास्त व्यक्त होताना दिसत नाहीत. अगदी गाणं गाताना सुद्धा चेहऱ्यावर फारसे भाव नसतात. त्यांचा ' ये कहा आ गये हम' चा लाईव्ह व्हिडिओ पाहिल्यास हे पटेल. ह्या उलट आशाताई किंवा किशोर कुमार.
मन्ना डेंचे अजून एक गाणं -
मन्ना डेंचे अजून एक गाणं - फुल गेंदवा ना मारो...
बिग बी साठी मन्ना डेंच्या आवाजातील कोणतं गाणं आहे का?
अलिप्तता आहे का लताबाईंंच्या
अलिप्तता आहे का लताबाईंंच्या आवाजात, सांगू शकत नाही. त्यांची काही काही गाणी दुसऱ्या कोणी गायली असती तर आत्म्यापर्यंत पोहोचली नसती.
उदाहरणार्थ पायोजी मैने राम रतन धन पायो. हे मी फक्त आणि फक्त लताचेच ऐकू शकते. बाकी सगळ्यामध्ये तो भाव, ती प्रामाणिक आर्तता, ती तीव्रता नाही. हे सरळ तुम्हाला रामापाशी नेऊन सोडते.
बिग बी साठी मन्ना डेंच्या
बिग बी साठी मन्ना डेंच्या आवाजातील कोणतं गाणं आहे का? >>> ये दोस्ती. शोले.
अवांतर - पायो जी मैंने नाम
अवांतर - पायो जी मैंने नाम रतन धन पायो असा एक पाठभेद आहे आणि मला तो योग्य वाटतो.
वारकरी संप्रदायातही नामजपाचा महिमा सांगणारे अनेक अभंग आहेत.
>>पण गाण्यात मनमोकळेपणा, दिल
>>पण गाण्यात मनमोकळेपणा, दिल खोलून गाणं असं फारसं दिसत नाही. <<
हे सुरुवातीला आलेलं वाक्य. यांत लताबाई कशा दिसतात, वावरतात, गाताना कशा दिसतात इ. इ. उल्लेख नाहि. निरिक्षण बहुतेक "गाण्या" विषयी असावं, दिसण्या विषयी नाहि. असो.
आणि आता हि सारवासारव -
>>गाणं गाताना , त्यातल्या भावना पोचवतानाही , लता त्या गाण्यापासून अलिप्त आहे असं वाटतं.<<
काय एकेक थियरिइज येत आहेत, अर्थात सबळ प्रॅगमॅटिक व्यु शिवाय. या थियरी नुसार (किंवा व्यत्यास) कैलाश खेर टिपेची गाणी बहुतेक शिडीवर चढुन गात असावा...
लताबाईंची आलिप्तता हा लुडिक्रस, बेसलेस पॉइंट या धाग्यावर आता स्पष्टिकरण देण्याच्या धडपडिमुळे विनोदाकडे झुकत चालला आहे. चालु द्या...
ओ पालनहारे .... लगान.
ओ पालनहारे .... लगान.
लता चा आवाज .....
अजून काही लिहायची आवश्यकता नाही.
पायोजी मैने राम रतन धन पायो.
पायोजी मैने राम रतन धन पायो. हे मी फक्त आणि फक्त लताचेच ऐकू शकते. बाकी सगळ्यामध्ये तो भाव, ती प्रामाणिक आर्तता, ती तीव्रता नाही. हे सरळ तुम्हाला रामापाशी नेऊन सोडते >>> सहमत. हम दोनो मधील ' अल्ला तेरो नाम' हे मुळात सिनेगीत आहे हे खूप उशीरा कळलं. वाटायचं की एखादं भक्तीगीत आहे, जसे मराठीत संत ज्ञानेश्वरांचे अभंग किंवा केशवा माधवा सारखी भक्तिगीते आहेत तसेच.
लताबाईंची आलिप्तता हा
लताबाईंची आलिप्तता हा लुडिक्रस, बेसलेस पॉइंट या धाग्यावर आता स्पष्टिकरण देण्याच्या धडपडिमुळे विनोदाकडे झुकत चालला आहे. चालु द्या...>> नेहमीच इतकं का लाल होईस्तोवर बुड आपटावं पण? असेल एखाद्याचं मत तर हो म्हणा, पटत नसेल नाही म्हणा. मलाच बाई कळतं बाकी तुच्छ हा भिकार आग्रह का म्हणून?
लताची अलिप्तता जर गाणे गाताना
लताची अलिप्तता जर गाणे गाताना तिच्या चेहर्यावरचे हावभाव, हाताचा उपयोग अत्यंत कमी असतात इथवरच असेल तर ठीक आहे. मग काही म्हणणे नाही. पण प्रत्येक गायकाची, गाताना समरसुन जायची पद्धत असते. त्यात हातवारे, चेहरे वेगवेगळे करणे हे कमीजास्त असते, किंवा नसतेही.. जे लताचे होते. पण ती डोळे मिटुन ज्या शांतपणे एकाग्र होऊन म्हणते तेव्हा चेहर्यावर हावभाव नसतानाही सगळे हावभाव दिसतात. आवाजाच्या लवचिकतेमुळे चेहर्यावरचे स्नायु तिला फार थोडे हलवावे लागायचे हे मोठे कारण. व आयुष्यातल्या अनुभवांमुळे स्वभावात आलेला शांतपणा, काळजातले चेहर्यावर दाखवायचे नसेल हे ही एक कारण असेल.
किशोर फुटकळ?????
किशोरकुमार बद्दल अनेकांनी वर लिहिलंय पण त्याची व्यक्तिश: सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे त्याचा आवाज फुटलेला होता (जो रफी, मन्नाडे, तलत यांचा नव्हता व त्यामुळे त्यांना भावनाप्रधान गाणी गायला जास्त मदत झाली) तरीही नाजुक गाणी किशोरकुमार इतक्या हळुवारतेने म्हणायचा की व्वा!!!
मुकेशचे फक्त आणि फक्त 'जाने कहां गये वो दिन' हे एकच गाणे आवडते.
Pages