रातभूल..(मी मुसाफिर एकटा..)
ती शरदामधली रात्र
अन मी गावाकडल्या घरी
पहुडलो बाजेवरती
लिंब ढाळे चवरी वरी
ती शिशिरामधली रात्र
अन मी उघड्या माळावरी
तृणपाती हलवी वारा
मज भरे थंड शिरशिरी
ती अचंद्र काळी रात्र
अन मी रानवाटे वरी
काजऽवे लगडले तरुला
ठिणग्या हलती खाली वरी
ती चांदणकाळी रात्र
अन् मी उजाड दुर्गावरी
आसमंती मी एकटा
पेटत्या दिवट्या दिसती दुरी
ती लखलखणारी रात्र
अन मी उघड्या व्योमाखाली
चांदणफुले चमकती गगनी
उधळण रत्नांची अंबरी
ती अथांग काळी रात्र
अन् मी अरण्यवाटेवरी
बाजुने घुबडाऽचा घुत्काऽर
मागुनि डरकाळी भयकारी
ती मध्य सागरी रात्र
अन मी विराट नौकेवरी
ते अथांग गहिरे पाणी
प्रतिबिंबे काळी रजनी उरी
ती गूढ गारुडी रात्र
मी रेताड वाळूच्या रणी
दूरऽवर उंटांचा काफिला
सरके काळ्या छायेपरी
ती चंद्रकोरीची रात्र
अन मी श्रांत रुद्रमंदिरी
शेजारी माझ्या नंदी
अन् व्याधाचा तारा शिरी..
अचंद्र : अमावस्येची
छान आहे. आवडली.
छान आहे. आवडली.
सॉलिडा!!
सॉलिडा!! एकेक कडवं शब्दचित्र आहे.
साधना आणि सामो...
साधना आणि सामो...
मनःपूर्वक धन्यवाद..
सुंदर काय सुंदर शब्द वापरले
सुंदर काय सुंदर शब्द वापरले आहेत.
ती लखलखणारी रात्र
अन मी उघड्या व्योमाखाली => व्योम हा शब्द फार कमीवेळा वापरला जातो.
अप्रतिम रचना!!
अप्रतिम रचना!!
वाह! एकेक कडवं जणु सुंदर
वाह! अप्रतिम रचना..
Bhariich....गूढ वाटते कविता..
Bhariich....गूढ वाटते कविता...
खूपच सुन्दर निरु
खूपच सुन्दर निरु
_तृप्ती_ , जव्हेरगंज, मन्याऽ
_तृप्ती_ , जव्हेरगंज, मन्याऽ ,वेडोबा, मनीमोहोर....
प्रतिसादाबद्दल मनःपूर्वकआभार..
आवडली कविता, खूपच चित्रदर्शी
आवडली कविता, खूपच चित्रदर्शी
आवडली कविता, खूपच चित्रदर्शी
आवडली कविता, खूपच चित्रदर्शी >>>> +999
हर्पेन आणि शशांकजी .....
हर्पेन आणि शशांकजी ..... आभार...
अप्रतिम
अप्रतिम
राजेंद्र देवी....
राजेंद्र देवी.... प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार...
खूप सुंदर
खूप सुंदर
एकदम वेगळीच कविता
एकदम वेगळीच कविता
काव्यदीक्षा घेण्यासाठी अजून एक कवी गावला!!
तुमच्या 'माझी ओळख' मधील,
तुमच्या 'माझी ओळख' मधील, आवडीची वाक्ये तर इतकी खास आहेत. तीन्ही अप्रतिम.
द्वैत, प्रगल्भ....
द्वैत, प्रगल्भ.... प्रतिसादाबद्दल आभार..
<<<तुमच्या 'माझी ओळख' मधील, आवडीची वाक्ये तर इतकी खास आहेत. तीन्ही अप्रतिम.>>>
@ सामो, ती वाक्यं माझ्याही भयंकर आवडीची आहेत.
आवर्जून कळवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..
सुंदर चित्रमय कविता.
सुंदर चित्रमय कविता.
नादिशा, मनःपूर्वक आभार..
नादिशा, मनःपूर्वक आभार..
सुंदर.. प्रत्येक कडवं वाचताना
सुंदर..
प्रत्येक कडवं वाचताना तसं चित्र नजरेसमोर उभं राहिले!
प्रत्येक कडव्यागणिक बदलणारे
प्रत्येक कडव्यागणिक बदलणारे दृश्य आणि ते खुलवताना केलेली शब्दसंपदेची उधळण ही शक्तीस्थानं आहेत तुमच्या कवितेची. अतिशय आवडली. खूप दिवसांनी सशक्त कविता वाचायला मिळाली.
सुंदर कविता आहे!
सुंदर कविता आहे!
mrunali, रानभुली, वावे
mrunali, रानभुली, वावे
प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार..
पुन्हा वाचली. पुन्हा आवडली.
पुन्हा वाचली. पुन्हा आवडली.
छान आहे. आवडली !
छान आहे. आवडली !