युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरं तर मी स्वयंपाकघरात एका मर्यादेपलीकडे रमतच नाही, पण स्वत: ठरवून, उत्साहाने घाट घातला आणि प्रकरण बिघडलं की बेचैन वाटतं. >>>
मी पण याच कॅटेगरीत! रोजचा निगुतीने रांधलेला स्वयंपाक - तोही ठराविक - वरणभात, भाजीपोळी, कोशिंबीरीचा आणि सणवारानिमित्ताने होणारे पारंपरिक पदार्थ यापलीकडे माझे स्वयंपाकघरातले प्रयोग यशस्वी झाल्याचे प्रसंग एकंदरीत कमीच! कल्पनाशक्ती लढवून बिघडलेल्या पदार्थावर अधिक संस्कार करणे आणि घरात खपवणे हा एक बोनस ताप वर : स्मित:

प्रज्ञा , भा पो झालं अगदीच.

सध्या घरात कामं खूप वाढली आहेत. सामान सुमान ही मर्यादित च आहे. सम्पल.. आणलं अस होत नाहीये . बाहेर जाण्यावर मर्यादा आहेतच.

तेव्हा तरुण गृहिणींनो किती ही वाटलं तरी नवनवीन प्रयोग शक्यतो नका करू. जे जमतात तेच पदार्थ करा . पदार्थ बिघडला तर निस्तरताना खूप वेळ, ताकद खर्ची पडते, साहित्य वाया जातं वैगेरे वैगेरे...

लॉकडाऊन काळात यीस्ट सापडलं.मग एक दिवस गार्लिक ब्रेड केला.अगदी मऊसूत झाला नसला तरी गरम चांगला लागत होता.दगड म्हणून फेकून मारण्या सारखा झाला नव्हता हे उल्लेखनीय. पण त्यात आर्द्रता ठेवायला ग्रील स्टँड खाली प्लास्टिक(म्हणजे चालणारं वगैरे होतं) चा कप ठेवला होता तो मात्र वैकुंठवासी झाला.त्याच्या कडा वितळल्या.(कन्व्हेक्षन ला प्लास्टिक वापरायचं नाही, तरी घाईत समोर होता म्हणून तो वापरला गेला)
त्या चिकट कणकेच्या पुरणपोळ्या चांगल्या होतील.किंवा घरी तो जुन्या स्टाईल चा तंदूर किंवा नव्या स्टाईल चा बार्बेक्यू असेल तर पंजाबी स्टाईल रोट्या न लाटता. काहीतरी पंजाबी भाजी करून गरम गरम खाता येतील.
थोडं पाप होईल पण अश्या पातळ कणकेचे भटुरे पण मस्त होतील. थोडी गारवा वाली किंवा वारा येणारी रात्र.आणि मस्त कुटुंबा बरोबर छोले भटूरे आणि नंतर दही भात.
(मी इतकं सर्व लिहितेय तोवर इतरांनी दिलेल्या कल्पनांनि त्याचं छान काही बनून झालं असेल.)हे लिहिल्यावर मागे वाचलं की पीठ वापरून झालं.अजून उरलेले असतील तर दह्यात घालून मस्त दहिवडे होतील.

अनु, मलाही यीस्ट सापडलं म्हणूनच हा उद्योग केला. त्यातून लेकीने सॅन्डविच ची आठवण काढली. एकदा अगदीच गरज म्हणून दुकानात गेलो तर तिथे ब्रेड होता, पण लोकल पॅकिंग दिसलं ते कितपत स्वच्छ असेल वगैरे विचार केला नवर्याने. मग घरी करायचा विचार झाला. तोही पाच-सहा दिवस थोपवून धरला, पण "अजून डोक्यात घोळतंय तर केला पाहिजे" असं वाटून काल केला. आज तो लहान तुकडे करुन संजीव कपूर ग्रिल मशीनमध्ये ग्रिल करणे, काही तुकडे तळून बघणे अशा प्रकारे सुसंस्कृत करता येतो का याची चाचपणी सुरू आहे... बेकिंग करताना फुलला नाही, आतून कच्चटच राहिलं आहे, पिठूळ पिठूळ.... वरून जरा कुरकुरीत आणि छान हलका तपकिरी आहे.

यीस्ट न घातलेला मैदा/ कणीक उरली असेल तर मी वर लिहिल्याप्रमाणे घरगुती बैदारोटी होऊ शकते. तेल थोडे अधिक घालावे लागते.

तेव्हा तरुण गृहिणींनो किती ही वाटलं तरी नवनवीन प्रयोग शक्यतो नका करू.
>> अरेरे. ही पोस्ट आत्ता वाचली.
खूप दिवसांत ब्रेड - ऑम्लेट खाल्लं नाही म्हणून
https://youtu.be/0lJHZkCgk60 हे पाहून उत्साहाने गव्हाच्या पिठाचा ब्रेड बनवायला गेले. तो एक घट्ट गोळा झाला आहे. बाहेरून क्रीस्पी पण आतून एकदम घट्ट. अजिबात फ्लफी नाही.
मग चेक केलं तर बेकिंग पावडर मागच्या महिन्यात एक्सपायर झाली आहे. (बहुदा फक्त हेच कारण असावे, नंतर सगळं सुरळीत झालं की इतका सोप्पा ब्रेड घरी करायला जमलं तर बरं पडेल.)
3 वाट्या कणिक आहे त्यामुळे हा गोळा टाकून द्यायचे जीवावर येत आहे.
काही तळून बिळून करता येईल का? की एक्सपायार्ड बेकिंग पावडरचा गोळा खाल्यामुळे तब्येतीला त्रास होईल?
दाल बाटी अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही. तो पार शेवटचा पर्याय आहे.

हा ब्रेड अजून असेल तर
लसूण, मिरची मिक्सर मधून काढून प्रवाही द्रव करून
ब्रेड चे डोमिनो गार्लिक ब्रेड सारखे 2 सेमी रुंदीचे उभे तुकडे करून
गार्लिक वाला द्रव आणि किंचित मीठ वर ब्रश ने लाऊन
सर्वात वर पातळ चीज स्प्रेड किंवा मोझरेला पावडर लाऊन मायक्रोव्हेव मध्ये ग्रील किंवा कन्व्हेक्षन मोड वर 2 मिनिट फिरवून गरम खायला द्या
(आता हे सगळे पदार्थ लॉकडाऊन मध्ये कुठे मिळणार असे प्रश्न विचारू नका. काही नसेल तर अमूल बटर फासा)

।काही दिवसांपुर्वी युट्युबवर पाहिले हे. अवकाडोची बी धुवायची व वाळवायची. मी घुतल्यावर कोरडी झाल्यावर वाटीत घालुन कट्ट्यावर ठेवलीये. तर ८-१० दिवसात ती वाळुन त्याची वरची साल चुरचुरीत होते व हातानेच ती निघते व आत गुलाबी बी रहाते. ती बी मिक्सरमधे घालुन त्याची पूड करायची. त्यात खुप जास्त पौष्टीक गुणधर्म असतात. ती पूड थोडीथोडी भाज्या, सॅलड, आमटीत वापरावी.
मी पहिल्यांदाच वाळवायला ठेवले आहे. सालीवर आता पोपडे तयार झालेत. २-३ दिवसांनी पुर्ण साल निघते का पहाते. मग मिक्सरमधे ब्लेड तुटत तर नाही ना हे ही कळेल. Happy

१९-२० कैर्‍या मिळाल्या आहेत. काल लोणचे करायला कापल्या,तर आतून हलक्या पिवळसर आहेत.२ कैर्‍यांचे तात्पुरते लोणचे घातले आहे.उरलेल्या कैर्‍यांचे पन्हे,मुरांबा सोडून काय करता येईल.आज काही कैर्‍यांचे गोड लोणचे करणार आहे.
बरे त्या कैर्‍या,चांगल्या आंब्याच्या असल्यामुळे असा वापर करायला जिवावर येतेय.काही पिकत घालेन.

२ कैर्‍यांचे तात्पुरते लोणचे घातले आहे.उरलेल्या कैर्‍यांचे पन्हे,मुरांबा सोडून काय करता येईल.आज काही कैर्‍यांचे गोड लोणचे करणार आहे>>> बारीक फोडी करून तीखट मीठ लाऊन उन्हात वाळवता येईल...वाळलेल्या त्या कडक कैर्या छान आंबट गोड लागतात..

नाहीतर पिकवून आंबा झाल्यावर खाता येईल...किंवा आंब्याची रस्सा भाजी करता येईल..

.वाळलेल्या त्या कडक कैर्या छान आंबट गोड लागतात..>>>>> हे मस्त आहे.आमटीत कैरी अफलातून लागते.

त्या कैयांचे आंबे होतील की नाही याबबत शंका आहे.तरी आढी घातली आहेच.
मी घातलेले लोणचे नासते.मागच्या वर्षी शेजारणीच्या अध्यक्षतेखाली घातलेले लोणचे नासले.कुठेही पाण्याचा थेंब नाही की ओला चमचा घातला नाही.नवर्‍याला सांगितले की बाजारची लोणची खात चल.तसेही लोणचे प्रकार माझ्या नावडीचा आहे.
आता ईतक्या कैर्‍या आल्या तर फुकटही जाऊ नयेत असं वाटतं.

थोड्या पिकलेल्या कैरीचा साखरांबा छान होईल ना? माझ्या लहानपणी आमच्याकडे स्वयंपाकाला असलेल्या एक आजी पूर्ण पिकलेल्या हापूसचा करायच्या. फारच मस्त लागायचं आणि साखर पण कमी लागते. हा पदार्थ पूर्ण विसरूनच गेले होते

पूर्ण पिकलेल्या हापूसचा मोरांबा म्हणजे केवळ आहाहा!

थोड्या पिकलेल्या कैरीचा साखरांबा छान होईल ना?>> +१
कैऱ्या किसून उन्हात खडखडीत वाळवून नंतर मिक्सरमध्ये आमचूर तयार करता येईल.
तिखट आंबट टक्कू चांगला लागतो, पण तो टिकत नाही एकदोन दिवसांपेक्षा जास्त.

सर्वांना धन्यवाद! थोडा मेथांबा केला..बाकीच्या कैऱ्या पिकवत ठेवल्या आहेत.हा आंबा फार गोड आहे.गेल्यावर्षी याचा आंब्या çhya zadàche आंबे खाल्ले होते. खूप गोड होते.

खरं म्हणजे इतक्या अलिप्त पणे मेथांबा करा, छुंदा करा असं सांगतेय खरं, पण मन म्हणतय, कि थोड्या कैऱ्या पळवाव्यात तिथे येउन. आणि त्यातच "आंबा खुप गोड आहे असं देवकी ने लिहीलय. जलीफ्राय झाले इकडे मी

धनुडी, खरंच ग ! माबोवर आंमरस,पुरी बघून मीही अशीच हताश झाले होते.परवाच्या दिवशी जाऊन आंबे आणले.तेव्हा जीव थंड झाला.

मटकी update: (हे लिहायला जरा उशीरच झाला)
अख्खे धणे, जिरे तेलात परतले, त्यात कांदा, कढीपत्ता, किंचित गोडा मसाला, ही मिरच्या,लाल तिखट , मीठ, हळद, हे घालून फोडणी केली. अंकुरित मटकी त्यात घालून परतली. पाणी घालून दणदणीत वाफ येऊ दिली,शिजवली. मग जिरेपूड, चाट मसाला, मिसळ मसाला हे जिन्नस थोडेसे घातले. कोथिंबीर चिरून तीही ढकलली.
घरात खाऊ म्हणून आणून ठेवलेला लक्ष्मी नारायण पोहा चिवडा होता, मका पोहे चिवडा (ह्याच चुरा राहिला होता)

एका खोलगट कुंड्यात ही जरा पाणीदार उसळ घेतली. त्यावर डोमही चिवडे कांदा कोथिंबीर घातली
आणि ही जुगाड मिसळ हादडली

इतर आयडिया देणाऱ्यांचे आभार Happy

पुढच्या वेळेस इतर प्रकार करून पाहीन, पाणीपुरी सकट Happy

Pages

Back to top