Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<<लाडु होतील पण खुप गोड होतील
<<लाडु होतील पण खुप गोड होतील कारण करंजीच्या सारणात साखर जास्त असते खोबर आणि भाजलेल्या रव्या पेक्षा.>> खरंय सीमा, खुप गोड लागतं आहेत नेहमीच्या लाडू पेक्षा
मस्त दिसतायत लाडू .
मस्त दिसतायत लाडू . खूपच गोड लागत असतील आणि संपेल अशी quantity नसेल तर कणिक भाजून घाला त्यात म्हणजे गोडी कमी होईल.
फ्रीज मध्ये ठेवा पण बाहेर टिकणार नाहीत. खायच्या आधी थोडा वेळ काढून ठेवायचे किंवा 5 सेकंद मायक्रो वेव्ह करायचे .
मेधा,
मेधा,
बाकीच्यांनी सांगितले आहेच्,पण माझी भर.
मणगणे करा.
https://www.maayboli.com/node/43220
मेधा,
मेधा,
बाकीच्यांनी सांगितले आहेच्,पण माझी भर.
मणगणे करा.
https://www.maayboli.com/node/43220
हेब्बरची पंचमेळ डाळ रेसिपी
हेब्बरची पंचमेळ डाळ रेसिपी आहे त्यात इतर डाळींसोबत चणा डाळही आहे. तो एक आमटीचा प्रकार ट्राय करता येईल. (थोडी थोडी संपवायची तर फ्रिज/फ्रिजरमध्ये टिकेल असं गृहित धरुन).
नेहमीची आमटी पण छान लागेल,
नेहमीची आमटी पण छान लागेल, चणा डाळीची!
हैग्रीव करा.. पाकृ शोधावी
हैग्रीव करा.. पाकृ शोधावी लागेल.. दक्षिण भारतीय पदार्थ आहे, नैवेद्याला आवर्जून करतात
मस्त दिसतायत लाडू >>> अगदी
मस्त दिसतायत लाडू >>> अगदी अगदी.
Govan mangane mhanaje
Govan mangane mhanaje karnataki haygriv.fakt that kapur asto.
Ho tyat काहीवेळा sabudane ghaltat.
मस्त दिसत आहेत लाडु एकदम शितल
मस्त दिसत आहेत लाडु एकदम शितल. तुमच सगळच काम एकदम सुबक असत. सुगरण असणार तुम्ही नक्की.
मनीमोहोर, अंजु, सीमा धन्यवाद!
मनीमोहोर, अंजु, सीमा धन्यवाद!
दोघी शेजारणींना रिटर्न वानवळा म्हणून हे लाडू दिले, आता थोडेच राहिलेत.
<<मस्त दिसत आहेत लाडु एकदम शितल. तुमच सगळच काम एकदम सुबक असत. सुगरण असणार तुम्ही नक्की. >> thank you for praising
खूपच मस्त दिसत आहेत लाडू.
खूपच मस्त दिसत आहेत लाडू. त्यावरून आठवलं माझ्या पण फ्रीजमधे बसलंय सारण कधीचं. असंच उपयोगात आणावं आता
रव्याच्या खीरीसाठी जाड रवा
रव्याच्या खीरीसाठी जाड रवा वापरतात का? की बारीक?
बारीक रवा वापरतात. मस्त स्मुद
बारीक रवा वापरतात. मस्त स्मुद टेक्शर येत खिरीला..
ओके धन्यवाद मन्या ऽ
ओके धन्यवाद मन्या ऽ
समोसे करण्यासाठी मैदा भिजवला
समोसे करण्यासाठी मैदा भिजवला पण तो थोडा सैलसर झाला, त्यात अजून थोडा मैदा घालूनही ते नीट घट्ट होत नाहीये. सो आता त्या भिजवलेल्या मैद्याचे काय करता येईल, खूप पातळ लाटायला गेले तर चिकटून बसतंय, सो पुऱ्या पण करता येत नाहीयेत.
Help Please....
थोडा रवा घातला तर घट्ट होईल
थोडा रवा घातला तर घट्ट होईल का?
थोडा रवा घातला तर घट्ट होईल
थोडा रवा घातला तर घट्ट होईल का?>> +१
बारीक रवा घालून मळून घ्या. रवा जास्तीची आद्रता शोषून घेइल. रवा नसेलच तर मैदा वाढवा. मैदा छान मळला की त्याचा चिकटपणा कमी होतो. जरा तुपाचा हात लावत मळायचे. मळून ओलसर कपड्यात न गुंडाळता तसाच थोडा वेळ बाजूला ठेवा.
खारे शंकरपाळे / मठरी बघा जमत
खारे शंकरपाळे / मठरी बघा जमत आहेत का? वरून ओवा, कसूरी मेथी लावायची. नाहीतर रोटी/ गार्लिक नान / बटाटा भरून कुलचा पैकी काही. तवा पिझ्झा पण करता येईल.
गव्हाचे पीठ घालून , थोडी
गव्हाचे पीठ घालून , थोडी जिरेपूड, मिरपूड, चाटमसाला, तिखट मीठ हळद घालून कडक पोळ्या करा खाकऱ्या सारख्या किंवा मऊ पोळ्या लाटून लोणच्या सोबत खा. खूप भारी लागतो.
फक्त मऊ पोळ्या करायच्या असतील तर गरम गरम खा नाहीतर वातड होतात
अरे हो, असेल तर लोण्यासोबत सुद्धा एक नंबर लागतात ह्या पोळ्या
अर्जंट मदत हवी आहे...
अर्जंट मदत हवी आहे...
ब्रेडचं पीठ फुगायला ठेवल्यावर बेकिंग ट्रे नाही हा शोध लागला आहे. चौकोनी ट्रे आहे तो फॅमिली पॅक आईस्क्रीम मोल्ड आहे असं साबा म्हणाल्या. खरं म्हणजे तो बेकिंग ट्रे असेल असं मी गृहीत धरलं होतं... पण जाऊदे!! तर मुद्दा असा, की साध्या स्टेनलेस स्टीलच्या डब्यात बेकिंग करता येतं का? असेल तर कसं? स्टील चकचकीत हवं की नको? कायतरी ग्लॉसी वगैरे वाचलं नेटवर पण म्हणून नीट ऐकायला घेतलं तर त्या बाईने पुरेसं गोंधळात टाकलं...
काय करू? बेकिंग ग्लास नाही माझ्याकडे...
हां, तो आईस्क्रीम मोल्ड ऍल्युमिनिअमचा आहे की हिंडालिअमचा देव जाणे बाई... असं साबांनी म्हटलं आहे. त्यामुळे तो दिसायला अल्युमिनिअमचा भाऊ असला तरी काय उपयोग? हिंडालिअम चालतं का?
अंडी खात असाल तर बैदारोटी करा
अंडी खात असाल तर पूर्ण मैद्याची किंवा त्यात थोडी कणीक मिसळून बैदारोटी करता येईल.
दोन्ही चालतील ना अल्युमिनियम
दोन्ही चालतील ना अल्युमिनियम हिंडालियम
म्हणजे हिंडालिअम चालेल?
म्हणजे हिंडालिअम चालेल?
९, जालावर शोध म्हणजे
९, जालावर शोध म्हणजे तुझ्याकडे काय आहे त्याप्रमाणे वापरशील. हे बघ
If you don't have a bread pan, press the two ends closer together, and place the loaf on a greased baking sheet. When baking, the loaf will spread out a bit and create a more oval-shaped loaf. It will have the look of artisan bread or a classic French bread
तू कास्ट आर्य्न स्कीलेट वापरू शकतेस. मी कधीतरी पाव नाही पण दुसरं काही अॅल्युमिनियम फॉइलच्या ट्रे मध्ये बेक केलं होतं. घरी फॉईल असेल तर ते पण ट्राय कर. गुड लक.
प्रज्ञा, स्टेनलेस स्टीलमधे
प्रज्ञा, स्टेनलेस स्टीलमधे बेकिंग करता येते पण ते स्टेनलेस स्टील ओवनसेफ हवे. भारतातली भांडी तशी नसतात. तुझ्याकडे पार्चमेंट पेपर, अलुमिनम फॉईल असे काही आहे का? असल्यास ते आईसक्रिम मोल्ड मधे घालून वापरता येइल. नसल्यास तेलाचा हात लावून वापर.
वेका, स्वाती, जमेलसं वाटतंय..
वेका, स्वाती, जमेलसं वाटतंय.. करते आणि कळवते इथे.
अल्युमिनिअम फोईल आहे.
धन्यवाद सर्वांचे, रवा मिसळून
धन्यवाद सर्वांचे, रवा मिसळून पाहते उद्या..
दुपेडी / तिपेडी वेणी घातलेला
दुपेडी / तिपेडी वेणी घातलेला ब्रेड करा आणि दोन्ही टोक जुळवुन त्याचा गोल करा. रीथ (पुष्पचक्र) सारखा दिसेल. सॉरी मराठीत लिहायच्या नादात कदाचित नीट लिहिलं जात नाहीये पण रिथ ब्रेड (Wreath bread) असा सर्च देऊन गुगळून बघा. हा ब्रेड नुसत्या अवनस्टॅन्डवर बटर पेपर टाकुन पण होईल.
तर ब्रेड काही जमला नाही. काय
तर ब्रेड काही जमला नाही. काय चुकलं ते आता माकाचु वर विचारते. म्हणजे तितकी एनर्जी उरली तरच. फारच वाईट वाटलं आहे मला. खरं तर मी स्वयंपाकघरात एका मर्यादेपलीकडे रमतच नाही, पण स्वत: ठरवून, उत्साहाने घाट घातला आणि प्रकरण बिघडलं की बेचैन वाटतं. असो.
अगदीच बेसिक घोळ झाले असावेत... म्हणजे कन्वेक्शनला हाय रॅक/ लो रॅक ठेवावंच लागतं का... नाही ठेवलं म्हणून गंडलं असेल का... कन्वेक्शन टेंपरेचर कमी झालं तर मला सेटिंग लक्षात येऊन नीट करेस्तोवर यंत्र मायक्रोवेव्ह मोडवर कसं गेलं... डोकं आऊट झालं...
तर आता झोपते...जरा इथे लिहून बरं वाटलं.. :स्मायली:
Pages