युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वेका आणि वावे या दोन आयडीत फरक करायची युक्ती हवी आहे. नेहमी गोंधळून टाकतात Wink

आमच्याकडे सततचं थंड हवामान असल्यामुळे इडलीचं पीठ आंबायला त्रास होतो.>>>
आणि
आमच्या इथे पीठ आंबायला काही अडचण नाही येत कधीच. >>>

ह्या एका आडच्या एक पोस्ट्स एकाच आयडीच्या समजून जाम भंजाळून गेलो होतो. मग समजले की दोन वेगळ्या आयडी आहेत Sad

म्हणून आल्यावर दुकानात गेले सुट्ट दही आणायला तर तो >>> हेमाताई, सीटी डेअरीत (पाचपाखाडी) १२ महिने दही मिळतं.

म्हणून आल्यावर दुकानात गेले सुट्ट दही आणायला तर तो >>> हेमाताई, सीटी डेअरीत (पाचपाखाडी) १२ महिने दही मिळतं. >> बरं झालं सांगितलंत . आमच्या भागात हल्ली सुट्ट दही जवळ जवळ मिळतच नाही म्हटलं तरी चालेल.

पिशवीच्या दह्याचे व्यवस्थित विरजण लागते. इथे 200ग्राम/500ग्राम अशी पाकिटे पण मिळतात. माझी जाऊ सेट दह्याचे पण विरजण लावते, खूप विरजण घ्यावं लागतं असं म्हणाली.

मनीमोहोर, मी या प्रकारेही काही वेळा करून पाहिलं आहे. पण दही नीट लागत नाही. Sad

माधव Lol हो, सुरूवातीला माझाही गोंधळ व्हायचा.

माधव Happy
राजसी, नंदिनीचं दही ना? त्याचं विरजण मस्तच लागतं. दहीही चविष्ट असतं नंदिनीचं.

मनीमोहोर, मी या प्रकारेही काही वेळा करून पाहिलं आहे. पण दही नीट लागत नाही. Sad >>> ज्या सायीच्या दह्याच लोणी काढून ठेवलंस त्याची quality चांगली होती ना म्हणजे त्यात पुरेश्या आंबट ताकाचा अंश असायला पाहिजे ,अस मला वाटतय.

कुठल्याही ब्रँडेड दह्याचा विरजण म्हणून मी आत्ता पर्यंत उपयोग करू शकले नाहीये.

माझ्या मुलीला दही खूप आवडतं पण विकतच दही खाऊन तिचं तोंड येत म्हणून ती खाऊ शकत नाही म्हणून मला खूप वाईट वाटत. मला इकडून दही न्यायला परवानगी नाही.मी हर प्रकारे तिकडच्या दह्याच विरजण लावून बघत असते पण यश आलेलं नाही .

हल्लीच मला विरजण (curd culture)विकत मिळत तिकडे असा शोध लागलाय ,त्याचा प्रयोग next ट्रिप मध्ये करणार आहे आपल्याकडे पण अस काही मिळत का ते बघायला हवंय.

पूर्वी दिनेशदांनी दह्याच्या पावडरीबाबत लिहिले होते.दही गाळणीने गाळून फ्रीजरमधे ठेऊन सुकवायचे अशी काहीतरी प्रोसेस होती.

विकतच्या दह्याच्या विरजणाचे,दुसर्‍या बॅचचे दही चांगले लागते.

वावे, हो, नंदिनीच दही एकदम favorite Happy इतकं छान दही मिळतं की विरजण का लावायचं Happy परत किंमत पण वाजवी, दूध अर्धा लिटर 19रुपये आणि दही 22 रुपये!

जपानमध्ये योगर्ट मेकर मिळायचं. त्यात साध विकतच दही घालुन छान दही व्हायचं. थंडीत सुद्धा काही प्रॉब्लेम आला नाही. शिवाय अमूल चा टेट्रापॅक वापरून बघा. त्या दुधाचं दही खुप छान लागत. इथे सिंगापुरी साध्या दह्याचं छान विरजण लागतं. गावाला जाऊन आल किंवा रोजचं दही आंबट झाल कि सौथइंडिअन मैत्रीण जिंदाबाद.

मल्टीटास्किंग करण्याच्या नादात( ऑफिसचे फोन कॉल्स आणि त्यासोबत स्वैपाकाची थोडीशी तयारी ) तूर डाळी ऐवजी दोन वाट्या चणा डाळ शिजवली गेली आहे. पुरण, पुरणाचे प्रकार सोडून आता त्याचं काय करता येईल ? बंगाली पद्धतीची छोलार दाल केलीय आधी पण ती फारशी खपत नाही.

1) थोड्या डाळीची कटाची आमटी करा
2) थोड्याच नुसतं पुरण करा आणि पोळी बरोबर घेऊन ते दोन चार दिवसात संपवून टाका
3) डाळीचं फार मेण झालं नसेल तर कांदा टोमॅटो वैगरे घालून सरसरीत उसळी सारखं बनवा भाजी म्हणून वाढता येईल.
4) थोडी डाळ वाटून त्यात थोडे तांदुळच पीठ आणि इतर मसाला घालून धिरडी करता येतील.
5) फार उत्साह असेल तर डाळ वाटून ती तुपावर भाजून लाडू करता येतील. मी एकदा मुद्दाम केले होते. EXact रेसिपी आठवत नाही. चांगले होतात पण व्याप भारी पडतो.

तिखट पुरणपोळी करता येईल
विदर्भात गणपती विसर्जनाला करतात तशी डाळ करता येईल
डाळीतलं पूर्ण पाणी काढायचं. भरपूर तेलाच्या फोडणीत हिंग, हळद,हि.मि कढीपत्ता घालून हलक्या हाताने परतायचे पाच मि. कोथिंबीर, ओ.खो व लिंबू पिळून खायची.

डाळीतलं पूर्ण पाणी काढायचं. भरपूर तेलाच्या फोडणीत हिंग, हळद,हि.मि कढीपत्ता घालून हलक्या हाताने परतायचे पाच मि. कोथिंबीर, ओ.खो व लिंबू पिळून खायची. >> हे जमेल. दाक्षिणात्य सुंदल सारखी भाजी होईल बहुतेक.

डाळीतलं पूर्ण पाणी काढायचं. भरपूर तेलाच्या फोडणीत हिंग, हळद,हि.मि कढीपत्ता घालून हलक्या हाताने परतायचे पाच मि. कोथिंबीर, ओ.खो व लिंबू पिळून खायची. >>> ही माझी आवडती भाजी आहे, पण आम्ही यात बारीक चिरलेला कांदा घालतो भरपूर अन तिखट मसाला सुद्धा. सोबत दिवशी असतील तर स्वर्गच नसेल तर तांदळाच्या भाकरी सोबत खायचे

करंजीच्या सारणाचे काय करता येईल? तळणीचे पदार्थ सोडून >>> चमचा दोन चमचे भाजी-आमटीत घालून संपवता येइल. किती उरलं आहे?

<<चमचा दोन चमचे भाजी-आमटीत घालून संपवता येइल. किती उरलं आहे?>> गोड सारण? रवा आहे त्यात? अर्धा किलो आहे एकूण

मनीमोहोर, फक्त दुधाचा हात लावून होईल का? कि पाक करावा लागेल?

लाडु होतील पण खुप गोड होतील कारण करंजीच्या सारणात साखर जास्त असते खोबर आणि भाजलेल्या रव्या पेक्षा.
थोडा अजुन रवा भाजला तर शिरा करता येईल. साखर घालतो त्या स्टेजला सारण घालायचे. खसखस आणि खोबरे ,वेलची असते सारणात. शिरा नक्कीच चांगला लागेल. (सारण म्हणजे आमच्याकडे तरी पीठीसाखर,खसखस्,वेलची,थोडा भाजलेला रवा इत्यादी असते.)
सारण फ्रीजमध्ये उत्तम रहात BTW. आई/सासुबाई आल्या कि ठेवतात करून.

सगळ्यांना धन्यवाद, लाडू केले. फ्रिज मधेच ठेवला होता, परंतु खुप दिवस झालेत म्हणून करून टाकले लाडू. डाव भर तूप घेऊन कढई मध्ये परतून घेतले मग परातीत काढून दुध शिंपडले आणि गरम असतानाच लाडू बांधले.

@Medha pl search for palak shengdana bhaji on YouTube. Masteer recipe Chanel Vishnu manohar. Chana dal and ground nuts used in equal quantities. Nice tasty bhaaji.

Pages