Submitted by अ'निरु'द्ध on 17 April, 2020 - 15:03
झरा निळा सावळा
डोंगरमाथ्यावरुन झरते हळुहळु झुळझुळा
वाहत जाई शुभ्रजल ते प्रतिबिंबे घननिळा
इथले तिथले मिसळत बिलगत रुंदावे ते पाणी
दगडादगडातून जन्मला झरा शुभ्र अन् निळा
सपाट रानी काठांवरती तरुवेलींची दाटी
संथ प्रवाही वाहत जाई प्रौढ झरा सावळा
संथावल्या पाण्यामध्ये उठवी तरंग मासोळी,
क्षणी त्याच टिपे तिला ध्यानस्थ शुभ्र बगळा
काठावरच्या वृक्षावरती सानरंगुला पक्षी
लकेर घेई मजेत फुलवून गळा निळाजांभळा
हलके हलके वहात जाई पान एक हिरवे
खुडलेल्या सृजनाचा तरंगत जाई सोहळा
असा वाहता झरा संपला भासतसे कड्यापाशी
परि कोसळे प्रपात बनुनि प्रवाह अविरत मोकळा
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान !
छान !
मस्तच! झऱ्याच प्रत्येक रुप
मस्तच! झऱ्याच प्रत्येक रुप जवळुन परत एकदा अनुभवता आल..
छान!!
छान!!
मस्तच!
मस्तच!
"सानरंगुला पक्षी" भारी
हलके हलके वहात जाई पान एक हिरवे
खुडलेल्या सृजनाचा तरंगत जाई सोहळा
असा वाहता झरा संपला भासतसे कड्यापाशी
परि कोसळे प्रपात बनुनि प्रवाह अविरत मोकळा
हे फरच आवडलं.
वाह.. खूप छान. आवडले!
वाह.. खूप छान. आवडले!
सुंदर कविता..... शिंजीर माझा
सुंदर कविता..... शिंजीर माझा आवडता...सान रंगुला...मस्तच
सुंदर .
सुंदर .
काहीच साम्य नाहीये पण औदुंबर आठवली . का ते नाही सांगता येणार मात्र.
आदिश्री, मन्याऽ, अजय चव्हाण,
आदिश्री, मन्याऽ, अजय चव्हाण, अरिष्टनेमी, राघव_, वेडोबा, मनीमोहोर....
सर्वांच्या उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल मनःपूर्वकआभार..
फार सुंदर आणि प्रसन्न कविता
फार सुंदर आणि प्रसन्न कविता
चित्रदर्शी...
चित्रदर्शी...
मुग्धमानसी, दत्तात्रय साळुंके
मुग्धमानसी, दत्तात्रय साळुंके : प्रतिसादाबद्दल आभार..
आहाहा!! प्रसन्न निसर्गकविता.
आहाहा!! प्रसन्न निसर्गकविता. बालकविंची आठवणा आली.
सानरंगुला पक्षी खूप छान.
सानरंगुला पक्षी खूप छान.
प्रत्येक कडवे मस्त आहे.
प्रत्येक कडवे मस्त आहे.
सुंदर!
सुंदर!
सामो, चिन्नु आणि किमयागार...
सामो, चिन्नु आणि किमयागार...
आभार... _/\_ _/\_