ऋतू

Submitted by मुक्ता.... on 6 April, 2020 - 22:20

सकारात्मकता जोपासूया. प्रतिकार शक्ती वाढवूया. निसर्ग काहीं सांगतोय.

फुलांनी फुलणं सुरूच ठेवलंय. उन्हाळा आपल्या पद्धतीने वाढतोच आहे. पावसाळा येईल. म्हणजे काळ पुढे जाणारच आहे. ऋतू असेच आपलं चक्र चालवणार आहेत.

या सकारात्मकतेसाठी ही कविता.

असें ऋतुनी
सजावेधजावे
नटूनि थटूनि
येणे करावे

असे फुलांनी
उमळणे करावे
हळूच हसोनी
मग दरवळावे

पहाटवाऱ्याने
कळीस स्पर्शावे
गूढ जाणिवेने
तिने थरथरावे

पानांच्या कुशीत
हळू नांदताना
स्वयंपण सोशीत
उन्हे पेलताना

असे रंगसुगंधाने
व्हावे जागृत
जीव जाणिवेने
अंतरात अमृत

श्वास मिळाले
काही क्षणांचे
हर्ष उमाळे
नवनिर्मितीचे

असेच ऋतूंनि
उल्हसित यावे
नवंसृजनांनी
सृष्टीस फुलवावे

मुक्ता
©रोहिणी बेडेकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओहो
सुंदर पॉझीटीव्ह निसर्ग काव्य