अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज थोडी बघितली. काय तमाशे लावलेत कुलकर्ण्यांनी Uhoh बंद दाराआड बोलायचं तर सोसायटी मध्ये खाली काय तमाशा. आधी राजेंनी खाली तंबू ठोकून प्रेमाचे जाहीर प्रदर्शन केले होते. शुभ्रा सोहमला ओवाळत होती आणि टोमणे मारत होती. तिने त्या निळ्या कुर्त्यावरच साडी नेसली होती आजपण. माफी सोमवारी मागणार पण त्या आधीच सोम्या पळून जाणार तिकडून बहुतेक.

आजच्या लोकसत्तामध्ये आलीये ही मुलाखत. त्याला यशस्वी वगैरे म्हटलंय. वडिलांशी तुलना करू नका असं म्हणतोय तो. वडिलांमुळे कामं मिळत असतील तर लोक अपेक्षा करणारच ना. अर्ध पान भरून मुलाखत छापली आहे, कन्टेन्ट कमी आहे वाटतं या आठवड्यात.

आपल्याला बबड्याचा राग येतो ह्याचा अर्थ त्याचा अभिनय चांगला आहे असाच असायला हवा ना ?
मुलाखतीत हा भाग आवडला , सिरीयल मुले काही चांगले होत असेल तर स्वागतच !
-
काही जण तर अगदी खोलात शिरत म्हणतात, ‘अरे अजूनही तुझा टॉवेल, कपडे आईच उचलून ठेवते, घडय़ा घालते. तिला जरा मदत करत जा’, हे जेव्हा ऐकतो तेव्हा लोकांची कमाल वाटते. विशेष म्हणजे आभासी पात्रांविषयी त्यांना वाटणारा जिव्हाळा खूप काही सांगून जातो. यातला महत्त्वाचा प्रसंग म्हणजे, अनेक मुलं खऱ्या आयुष्यातही आईसोबत असेच वागत होते. ही मालिका पाहून त्यांनी स्वत:त परिवर्तन घडवलं आणि ते अनुभव त्यांनी समाजमाध्यमांमार्फत माझ्यापर्यंत पोहोचवले,’’ असेही तो म्हणतो.

बंद दाराआड बोलायचं तर सोसायटी मध्ये खाली काय तमाशा >>>>>>>> हि फर्माईश प्रज्ञाची आणि डबडयाची. त्यान्ना शुभ्राने पाया पडून माफी मागायला हवी म्हणे. Angry

एरवी राजे " स्त्रियान्ना आदर देणारे" म्हणून फेमस आहेत ना, मग आता काय झाले त्यान्ना? डबडयाला त्याने हटकायला पाहिजे होत. पण नाही, उभे राहिले तिकडेच तमाशा बघत.

शुभ्रा सोहमला ओवाळत होती आणि टोमणे मारत होती. >>>>>>> बरोबर केले आहे तिने. ते ओवाळण sarcastically केल तिने. ' तुमच्यासाठी रस्त्यावरच्या दगडाचीही माफी मागेन' अस म्हणाली ती. Lol आसाला ते कळल नाही. ऐकावे जनाचे ( आसाचे) करावे मनाचे अस वागलीये ती. आज बघूया काय फटाके फोडतेय शुभ्रा. Wink

भांडणाचा भाग मी मिसला, रविवारी सकाळी टीव्ही लावला तेव्हा तो भाग होऊन गेला होता आणि ती येडी आसावरी गॅसवर हात शेकत होती Angry राजे म्हणत होते आता मी सुखाने घराच्या बाहेर पडू शकत नाही हिच्या ह्या असल्या वागण्यामुळे. ते ईतके वैतागले होते की कुठून हे ध्यान गळ्यात बांधून घेतलं हे भाव त्यांच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होते Proud तो सोहम सकाळी उठून त्या अक्षयच्या घरी काय खात असतो. संत्र्याचा जूस द्यायला डबड्या काय उपोषणाला बसलेला असतो. प्रज्ञा सकाळी चार वाजता भडक लाल लिपस्टिक लावूनच दार उघडते. झाला का माफी सोहळा संपन्न आणि असावारीचं बाळ गेलं का घरी.

डबड्याची डबडी आई डोक्यात जातच होती पण काल तर तिने अतीच केलं. शुभ्रा डबड्याला भरवायला स्वतःच्या ताटावरून उठली तर आसा अशी सामाधानानं हसत होती जसं काही लग्नात नाव घेऊन घास भरवायचा कार्यक्रम चालला आहे Angry

निजोला डायरेक्टरने वाया घालवलं आहे. ती नेहेमी डबड्याच्या काळजीने गुढघ्यांत थोडं वाकून जी धप धप अथवा दब दब त्याच्याकडे धावत जाते ते अगदी पाहावत नाही.

बबड्याच्या आईचं charactor असं रंगवलं असेल तर बबड्याचा काही दोष नाही, तिलाच धोपटून काढायला हवं पहिलं.

ती नेहेमी डबड्याच्या काळजीने गुढघ्यांत थोडं वाकून जी धप धप अथवा दब दब त्याच्याकडे धावत जाते ते अगदी पाहावत नाही. > Biggrin Lol

बबड्याच्या आईचं charactor असं रंगवलं असेल तर बबड्याचा काही दोष नाही, तिलाच धोपटून काढायला हवं पहिलं. >>+१११ Happy

डबड्याची डबडी आई डोक्यात जातच होती पण काल तर तिने अतीच केलं. शुभ्रा डबड्याला भरवायला स्वतःच्या ताटावरून उठली तर आसा अशी सामाधानानं हसत होती जसं काही लग्नात नाव घेऊन घास भरवायचा कार्यक्रम चालला आहे >++११११११ Sad

अशी सामाधानानं हसत होती जसं काही लग्नात नाव घेऊन घास भरवायचा कार्यक्रम चालला आहे >>>>>>>++++++११११११११११११

आता काय तर म्हणे राजे येणार आहेत बबडयाला सुधारायला. अरे तो शुभ्राला दाद देत नाही, तिथे तो राजेन्न्च काय ऐकणार? तो तर त्यान्ना ' बाहेरचा' मानतो.

कालचा अभि आणि आसाचा एपिक घिसापीटा रोमान्स ते मंगळसूत्र शर्टाच्या बटणात अडकणे आणि पदराचे टोक खिळ्याला अडकणे आणि बावरून मागे वळून पाहणे।

आधी बायको जर इतकी बावळट पणे वागली असेल तर रोमांस करताना संताप नाही का येणार?
निदान मला तरी नसतं जमलं!!
Angry

एकदम बालिश चाळे करत आहेत राजे आणि शुभ्रा .. तो कडू काढा वगैरे.. >>>>>> बरोबर वागले ते. आवडल मला. हा डबडया राजेन्ना आसा आणि शुभ्राकडून मिळणारी चान्गली ट्रीटमेण्ट पाहून सतत पोटात दुखायची नाटके करायचा. चान्गला धडा शिकवला त्याला.

आज त्याला राजेन्नी लवकर उठवून जॉगिन्ग करायला लावल सकाळी. ती आजोबान्च्या आवाजातली रिन्गटोन भन्नाट होती. Lol

बादवे, आजोबा दिसत नाहीयेत बर्याच दिवसान्पासून सिरियलमध्ये. Uhoh

आजोबा दिसत नाहीयेत बर्याच दिवसान्पासून सिरियलमध्ये. >>>>>>>>हो ना कुठे गेले आहेत? एकदा राजे म्हणतात लावू का फोन? म्हण्जे गावाला वगैरे असा अंदाज काढला. पण तब्ब्येत बरी असू दे रवी पटवर्धनांची.

कदाचित करोनाच्या पार्श्वभूमिवर सिनियर सिटीझन म्हणून खबरदारीसाठी सुट्टी दिली असेल.

म्हणे मला तुमचा अपमान झालेला मुळीच आवडत नाही. जेव्हा सोहम अपमान करतो तेव्हा ही तोंडातून एक शब्दही काढत नाही. >>>>>>> अगदी अगदी

सध्या तरी नवीन एपिसोडस चालू आहेत. सोमवारपासून नसतील कदाचित.

ते कशासाठी आले म्हणे? >>>>>>>> राजेन्च्या सान्गण्यावरुन आले डबडयाला दम भरायला. ' तुमचा मुलगा काहीच काम करत नाही, तुम्ही बिझिनेससाठी दिलेल्या ९ लाखाचे काय झाले, एकटया शुभ्रावर भार पडतोय घराचा, आम्ही शुभ्राला कायमचे घ्यायला आलोय वगैरे वगैरे. राजेन्नी तस बोलायला सान्गितल त्यान्ना. राजे आता डबडयाला आता ' अभिज किचन' साम्भाळायला देणार आहेत, त्याला कष्टान्ची सवय लागावी म्हणून. ( लागली वाट!!!!)

नजर चुकीने.. धाग्याच नाव "अगोबाई झी बाई" असं वाचला >>>>>>>> Lol

Pages