सरमिसळ ही भयकथामालिका लिहिते आहेच. ही एक आधी अर्धवट राहिलेली लघुकथा काल पूर्ण केली. आज प्रकाशित करतेय, आय होप की भयकथेशी असलेली लिंक तुमची आणि माझीही तुटणार नाही.ही सिम्पल साधी कौटुंबिक आणि त्याच्यातील व्यक्तीच्या समाजाची आहे. प्लिज सांगा कशी वाटली ते...
ऑन द वे फॉर डिवोर्स....
मी थबकलो, काहीतरी चुकतंय,काहीतरी नाहीय...क्षणात ती ही बावरली....म्हणाली काय रे काय झालं? तर्क लढवू लागली...काही तर बोलले नाही ...मग आता हा मागे का वळला...त्याने शब्दाला शब्द द्यावा...पण मी शब्द मनातही म्हटले नाही...मग हा का वळला? काय झालं असं विचारलं म्हणून आता वाद होईल का?
ती: वाटेवर या खिन्न पाचोळा
माथ्यावरती तप्त उन्हाळा
काळ हा किती ओसरला
कसा सरला रे जिव्हाळा
जिव्हारी लागती या झळा
काळ हा किती ओसरला
नाही अंत या दुष्काळा
नच सरला तरी उमाळा
जरी काळ हा कितीही ओसरला
मला कळेना एवढं विचारून ती नुसती का थांबली. जवळ आली नाही. मी मागे वळलो नाही की तिला उत्तर दिले नाही. वाटलं परत वाद होईल आणि या निर्मनुष्य वाटेवर आणि किर्रर्र जंगलात आमचाच आवाज आम्हाला ऐकू येईल.
काय म्हटलं मी आमचा आवाज? आज पहिल्यांदा जाणवलं 'आमचं आपलं' असं काही...वाद,गैरसमज....मी हसू लागलो...जोरजोरात आपल्याच तंद्रीत...
आणि क्षणभरात सुकलेल्या पाचोळ्यावर जोरात चरर झालं आणि लाल मातीचा धुरळा उठला. बाईसाहेबांनी ब्रँडेड शूज नि जरा त्या निर्मनुष्य वाटेला आमच्या असण्याची जाणीव करून दिली. मी ओळखले ही चिडली. मी अस काय केलं म्हणून ही चिडली. माझा क्षणभरच आलेला गहिवर उमाळा, आटोपला. मी डोळ्यातलं पाणी न पुसताच मागे वळलो. डोळ्याच्या कोनातून एक कटाक्ष टाकला. अचानक एक उष्ण वाऱ्याचा झोत अमच्यातून पसार झाला.
थोडा पाचोळा फेर धरून काही क्षण नाचला...
वादळ येते की काय म्हणून वाराही बिचकला...
मला परत ओळी, सुचल्या आणि हसू आलं. पुन्हा तिने पाय आपटला.पुन्हा वाऱ्याचा झोत. या खेपेला तिच्या चेहऱ्यावरून स्पर्श करता झाला. तिचे अलगद क्लिप ने बांधलेले केस उडवून गेला. काय झालं विचारलं ते न सांगता हसतोय हा माणूस....ती पुटपुटली....पुन्हा केस करकचून अधिक आवळून बांधलन आणि एक तिर्हाईत कटाक्ष टाकून म्हणाली बघतोस काय? हसण्याचा कार्यक्रम झाला असेल तर जरा पावलं उचला. मेकॅनिक मिळायचा नाही आणि रात्री इथेच बसावं लागेल. मी पहातच होतो...तीही स्तब्ध झाली....
आज एकमेकांना बघून घेऊ म्हणणारे ,खरोखर एकमेकांना बघत होतो
या जुन्या वाटेवर
आज किती दिसांनी आलो
तेच वृक्ष तेच तरुवर....
तेच वळण अनोळखी....
इथेच भेट आपली अनोखी...
तेच वृक्ष तेच तरुवर
पण सुकलेला पर्णघोष
मधुर होता प्रसन्न होता
तेच वृक्ष, तेच तरुवर...
कल्पवृक्ष भासले होते...
सखे...
सखे...मी नकळत बोलून गेलो. आज कितीतरी दिवसांनी मला जाणवलेली ती, त्याच वाटेवर पुन्हा...तिच्या खोल डोळ्यात आकंठ काही जाणवलं.....तिने अंतर्मनात ठासून दाबून बसवलं होत. मला दुष्काळ दिसला.
किती पावसाळे आम्ही घालवले...किती हिवाळे सरले....या अशाच एककल्ली विचारांनी एक वावटळ आमच्यात कायमची स्थिरावली. आणि वादळं येत राहिली. मुलांची पर्वा न करता शहरात डीवोर्स फायनल करायला चाललो होतो.
आमची आंबेसिडर याच वळणाशी बंद पडली परत, आधी पडली होती तशी.
मी तुला हसलो नाही, मी म्हणालो. तिने मान वर उंचावली. वळणदार भुवयांपैकी एक उडवली,तिला अस करता येतं. त्याचा अर्थ 'काय?'
मी तिला त्या ओळी ऐकवल्या ,
थोडा पाचोळा फेर धरून काही क्षण नाचला...
वादळ येते की काय म्हणून वाराही बिचकला...
पोट धरून हसली.थोडी बाजूला गेली. एक डेरेदार झाड शोधलंन आणि मांडीच घालून बसली. काय वेडेपणा आहे मी म्हटलं...चल कोर्ट बंद होईल आणि मेकॅनिक मिळायचा नाही...
तिच्या डोळ्यात द्वितीयेची चंद्रकोर दाटली...म्हणाली एवढी घाई झालीय का? डिओर्स होण्याआधी जरा काही ऐकीव की...
आता मात्र वातावरण बदललं होतं. मी एकेक ऐकवू लागलो. ती मुग्ध होत राहिली.
राहुकाल जणू सरला होता. आम्ही बोलत राहिलो,ऐकत राहिलो. काय चुकत होतं ते कळलं होतं.
त्या वळणावरती आता अंधार दाटला होता
भूतकाळ कैक क्षणांचा केव्हाच आटला होता....
ती कधीच अशी नवखी मला भासली नव्हती
तिची वलये अशी अनोखी मला वाटली नव्हती
अचानक गडगडाट झाला..मी दचकलो ,फटकन उठून उभा राहिलो आणि ती हसली...म्हणजे फिसकरली...म्हणालो हल्ली कमी बिचकतो...तुझी ,तुझ्या बोलण्याची आणि अशा गडगडाटी स्वभावाची सवय झालीय, मला हवी तशी चिडली...म्हणाली चल निघू ...कोर्टात जायला उशीर होतोय..
मी म्हटलं उशीर झालाय कोर्ट बंद झालंय...आपल्या आयुष्यात उशीर होऊ नये म्हणून....
ती गहिवरली आणि आकाश नरमले...
टपटप सुरू झाली. हळूहळू पाचोळा थिरकू लागला...सुगंध हलकेच भिनू लागला. आमचे फोन खणखणले.....
तिला लेकीचा आणि मला लेकाचा....पोरं समजूतदार झाली होती....घरी या मग सांगतो..जरा काही ट्रान्सपोर्ट ची व्यवस्था करा फक्त......आम्ही एकत्रच उत्तरलो....
पुन्हा उलटे निघालो...त्याच पायवाटेवर....आमची आंबेसिडर....ती आंबेसिडर असच म्हणते....तशीच उभी धुळीने माखली होती....तिला आवडत नसे....
खर सांगायचं तर मला परत जायचं नव्हतं....ती इतक्या दिवसांनी अशी पुन्हा या पायवाटेवर...तो पावसाचा सुगंध आणि मी पुन्हा तसाच...मागेच थांबलो...ती निघाली हळूहळू पुढे....
मी आहे वाटले शिणलो....
सुटणार म्हणून गुणगुणलो...
पण तुला न मी विसरलो....सखे
अजूनही तुझियात एकवाटलो....
प्लिज जाऊ नकोस, एकदाच मागे वळ...फक्त एकदाच...
ती नाही वळली....वाटत होतं...आजचे दुःख उद्या ढकलले....
आन सोसाट्याचा वारा यावा तशी तशी गर्रर्रकन मागे वळली.....अशनीसारखी येऊन धडकली....पुन्हा अग्निशलाका मला बिलगली....कोसळत्या पावसातही....माझा तुटलेला तारा..तुकडा आयुष्याचा...
म्हणतात याला पाहिलं की मनातली इच्छा पूर्ण होते...तसच झालं....
राजा, इगो ठेऊ बाजूला......
धन्या, जाऊ चल घरला.......
मिश्कीलपणे ते मोठाले डोळे फिरवत म्हणाली...फक्त त्या डोळ्याच्या काळ्याशार विहिरीत आज भलताच पूर आला होता....
म्हटलं एकच अट आहे....तशी पुन्हा रखुमाई, म्हणजे दोन्ही हाताचे तळवे...पालथे कमरेवर..आणि काळेभोर डोळे आणखीन मोठे? काय....?
इथं या पायवाटेवर येत जाऊ दोघेच...आंबेसिडर घेऊन....
आकाशात विजा लखलखाट करत होत्या मात्र माझ्या सॉरी आमच्या आयुष्यात कोसळणारा लोळ मात्र कायमचा थबकला....
मुक्ता
जबरदस्त!!!
जबरदस्त!!!
या लिखाणाला तोड नाही अप्रतिम
या लिखाणाला तोड नाही अप्रतिम
सुंदर
सुंदर
सुंदर!
सुंदर!
सहजीवनाचं सांर एकवटलंय या तरल
सहजीवनाचं सांर एकवटलंय या तरल कवितेत !
सुंदर !
आवडले हे लिखाण. पुलेशु.
आवडले हे लिखाण. पुलेशु.
खूप खूप आभार सर्वांचे
खूप खूप आभार सर्वांचे