सरमिसळ, एक भयकरी रोमांच १ आत्ता!!
"तू यात डोकं घालू नको देवकी......"
सासूबाई कडाडल्या....
देवकी जागीच थांबली.उचललेलं पाऊल तसंच थिजलं.कुणीतरी डोक्यावर आघात केला असावा तशी ती काही सेकंद स्तब्ध झाली.
"तुला कधी पासून उमाळा आलाय माझ्या लेकाचा? मी आलेय ना आता पाहून घेईन सगळं!!"
वत्सला आत्या कधी आल्या?देवकी विचारात पडली. मी तर याना बोलावलं नाही. मग कशा आल्या? आत कधी आल्या? धीर एकवटून देवकी मागे वळली. पाहते तर कुणीच नाही. तिची पाचावर धारण बसली. अरे बापरे!! भास होता की काय? असेल अति टेन्शन मूळे असेल....
का याना माझा राग येतो? या सगळ्याचा माझ्याशी काय संबंध? मी काय केलं. नविनला बरं वाटावं म्हणून मी काय नाही केलं? मला माझा नवीन आधी होता तसाच परत हवाय!! त्याचा स्पर्श किती महिन्यात मला झालाच नाही. त्याचं हसणं, गाणं काहीच नाही....देवकी स्वतःशी सगळं पुटपुट करत होती.
इतक्यात
हुंममम, हुंम्म्मम्म, ह्याआआआय
असा आवाज आल्यासारखा वाटलं. देवकी तशीच उठली. स्वयंपाकघरात वाऱ्याच्या वेगाने शिरली. तिला पुन्हा वाटलं वत्सलआत्या.. पाहते तर दुधाचं पातेलं मध्ये गोल फिरतय आणि आणि त्याभोवती दोन मांजरं! गुरगुर करताहेत....
ईईईईओ, ईईईईईओ, हुआईई
देवकी तिथे धावली....आणि पाय सटकला. इतक्यात कुणी तरी धरलं... देवकीच्या हातापायातली ताकद पूर्ण गेली....
डोळे उघडले तेव्हा समोर अंधुकशी एक मूर्ती दिसली. तो नवीन होता. ती उठायचा प्रयत्न करत होती .
"ह्ये पोरी निज उठू नगस....काय अवदसा आठवली आन धावली तिकडं? काय याड लागलं व्हॅय?"
"कककोंण आहात तुम्ही?"
"म्या वत्सला हाय! तुजी सासू"
देवकीने मान झटक्यात वळवली, " त त त तुम्ही वत्सलआत्या? मग ती बाई कोण होती"
"ह्ये पोरी कोन बाई, म्या ही आता आल्ये...समदं संगती म्या नंतर...आता डोळे मिट आन गपगुमान पडून रहा. तू यात आता डोकं घालू नकं. आता म्या आली हाय, बघती माज्या पोराकड!! आन तुला बी, आलं का ध्येनात?"
वत्सलआत्यानी हलका दम भरला.
"वत्सल आत्या या अशा दिसतात? मग त्या कोण होत्या? आमचं घर दहाव्या मजल्यावर आहे. मला आणि नविनला पेटस आवडत नाहीत मग मांजर कुठून आलं?
आणि दुधाचं सपाट बुडाचं पातेलं गोल गोल कसं फिरत होतं? वत्सलआत्या कशा आल्या? मला नविनने मोबाईलवर पाठवलेले नऊ वार जरीच्या साडीतले फोटो कुणाचे होते? वत्सलआत्या तर सहावारी सुती साडी नेसल्यात! आईईईईईईईई ग!!"
देवकीने मुठी आवळल्या शरीर ताठ झालं आणि पुन्हा शुद्ध हरपली!!
शरीर तापलं...असंख्य वाफा निघत होत्या ज्ञानेंद्रियातून...वत्सलआत्या खूप घाबरल्या पण स्थिर होत्या. आधी नवीन आणि आता देवकी!! देवकीला इंजेक्शन दिलं पॅरासीटमोलचं डॉक्टरांनी. तिला झोप लागली.
नवीन आत्यांच्या मांडीवर डोकं ठेवून रडत होता.ओक्सबोक्शी!!
"रे पोरा...काय हाय ह्ये समदं? आर माझ्या सुनेन मला वलेखल नाय...तुजी ही आशी अवस्था....एकदा बी या अडाणी आयेची याद येईना तुला? आर माजा तुमच्या लग्नाला इरोध होता त्याला तशी कारने होती! न्हायंतर या पोरीला कोन पसंत करनार नाय व्हय? काय सांगू!
माज काळीज हाललं बग तिला बगून? मला येक सांग ह्ये समदं कंदीपासून व्हतय? तरास तिला हाय का तुला? मला फोटू धडलेस त्ये कुनाचे हुते? त्ये बगून म्या इरोध क्येला आन हीत आल्ये तवा येगल्याच पोरीने दार उगडलं! आन द्येवकी येगलीच हाय!! "
आये सांगतो. पण एक आज मी कैक दिवसांनी बोलतोय!! आधी मला तुझ्या मांडीवर विसवू दे. खूप थकलोय ग!!
ऐक तर मग...
क्रमशः
गुंतागुंतीची कथा.... चांगली
गुंतागुंतीची कथा.... चांगली सुरुवात
पुभाप्र
चांगली झाली आहे सुरवात नवीन
चांगली झाली आहे सुरवात नवीन भागाची प्रतीक्षा करते
माऊमैया, प्रि तम मनापासून
माऊमैया, प्रि तम मनापासून आभार...पुढचा भाग उद्या पोस्ट करते
छान सुरवात!
छान सुरवात!
Thank you मन्या $
Thank you मन्या s
खतरनाक सुरुवात! पुढचे भाग
खतरनाक सुरुवात! पुढचे भाग लवकर येऊ द्या. लेखन शैली हटकेच आहे.
छान.. पुढील भाग लवकर येऊ द्या
छान.. पुढील भाग लवकर येऊ द्या..
सुंदर.... पुलेशु
सुंदर....
पुलेशु
छान.. येऊद्या लवकर पुढील भाग
छान.. येऊद्या लवकर पुढील भाग
आर्यन वाळुंज, मनापासून आभार
आर्यन वाळुंज, मनापासून आभार
Minal Hari garaj, thank you
Minal Hariharan, thank you
वि. शो. बि. , Dhangya , thank
वि. शो. बि. , Dhangya , thank you...
मस्त सुरुवात आहे!
मस्त सुरुवात आहे!
वावे, मनापासून आभार
वावे, मनापासून आभार