Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32
२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!
ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.
सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..
अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सोहम तर स्वार्थी आहेच पण
सोहम तर स्वार्थी आहेच पण देवाला हात जोडून आसावरी म्हणते की शुभ्रा कुठे कमी तर पडत नसेल ना, माझा बबड्या एकटा तर पडला नसेल ना कशावरून चूक शुभ्राचीच असेल. असावारीने सोहमच्या कानाखाली वाजवून बायकोशी नीट कसं बोलायचं हे शिकवायला हवं होतं तर हिचं काहीतरी भलतंच. या माय लेकाचं काही होऊ शकत नाही, आता राजे आणि शुभ्रा यांनी एकमेकांशी लग्न केलं पाहिजे, दोघा माय लेकांना बसू दे एकमेकांना भरवत.
<<< राजस्थानच्या तुळशीबागेत>>
<<< राजस्थानच्या तुळशीबागेत>>>
खरंच सोहमचा उद्देश तरी काय
खरंच सोहमचा उद्देश तरी काय आहे? पैसे उद्देश आहे तर मग आईला कशाला लांब करतोय राजेंपासून. फक्त जेलसी म्हणून
राजे आणि शुभ्राच लग्न?
राजे आणि शुभ्राच लग्न?
आता राजे आणि शुभ्रा यांनी
आता राजे आणि शुभ्रा यांनी एकमेकांशी लग्न केलं पाहिजे........+++++++++++1111111111111+++++++++
त्या बबड्याने पैशाचा अपहार
त्या बबड्याने पैशाचा अपहार केलेला सगळेच विसरले. सोम्या पण आई बद्दल बोलून पैशाचा विषय टाळतोय. त्याला आईचं काही पडलेलं कधीच नव्हतं. असले मायलेक फक्त मराठी शिरेल आणि सिनेमात दिसतात. इथले वाचून बरं वाटलं की ही शिरेल बघायचं बंद केलंय.
ती आसा अर्धवट ऐकून काहीतरी
ती आसा अर्धवट ऐकून काहीतरी विपर्यास करणार हे वाटलेलेच बिचारी भूभरा.
भू भरा कोन?
भू भरा कोन?
शुभ्रा म्हणायचं असेल.........
शुभ्रा म्हणायचं असेल.........
आसावरीचा एक हात राजेंच्या
आसावरीचा एक हात राजेंच्या हातात, दुसरा सोहमच्या, सोहमचा दुसरा हात शुभ्राच्या हातात आणि शुभ्राचा दुसरा हात केसरी बाईच्या हातात, अशी साखळी करून चालले तर कुण्णी हरवणार नाही ++++१००० !!!!
सोहमने शुभ्राला घर सोडायला
सोहमने शुभ्राला घर सोडायला सांगितले आहे.
या माय लेकाचं काही होऊ शकत
या माय लेकाचं काही होऊ शकत नाही, आता राजे आणि शुभ्रा यांनी एकमेकांशी लग्न केलं पाहिजे, दोघा माय लेकांना बसू दे एकमेकांना भरवत.>>> आजचा भाग बघून असेच वाटले.
सोहमने शुभ्राला घर सोडायला
सोहमने शुभ्राला घर सोडायला सांगितले आहे. का म्हणे?
शुभ्रा खूपच खमकी आहे, तिने
शुभ्रा खूपच खमकी आहे, तिने काळ सोहमला चांगलेच सुनावले आणि बेडरूमच्या बाहेर काढले.
तो कोंबडीचा आसाच्या लग्न
तो कोंबडीचा आसाच्या लग्न मोडायच्या मागे आहे. पण याने त्याला काय साध्य होणार आहे? एक गुलाम पुन्हा येईल पण पैशाचे स्तोत्र राजे मात्र यामुळे त्याला मिळणार आहेत का?
राजे त्याचे गुलाम बनावेत
राजे त्याचे गुलाम बनावेत म्हणूनच करतोय तो हे सगळं. आपली बायको सोहमचं ऐकते म्हणजे सोहमला खूष ठेवलं पाहिजे असा विचार राजे करतील आणि त्याला पाहिजे ते देतील असं सोहमला वाटतंय. त्याचं स्वतःचं लग्न धोक्यात आहे पण सोहम पैशाच्या मागे आणि शुभ्रा सासूचं भलं करायला आली आहे त्यामुळे मीया बिवीलाच लग्नाची काही पडलेली नाही.
serial cha charm gelya sarkha
serial cha charm gelya sarkha watatoy ata
कालच्या प्रीकॅप वरून असं
कालच्या प्रीकॅप वरून असं वाटलं की तो कोंबडीच्या शुभ्रा आणि आ. सा. मध्ये भांडण लावायला पाहतोय..
अरे देवा.. आता तो कोंबडीच्या अजून काय काय करणारे..
काल आ. सा. म्हणाली की मी कढी
डुप्लिकेट प्रतिसाद.
काल आ. सा. म्हणाली की मी कढी
काल आ. सा. म्हणाली की मी कढी आणि खिचडी करते तर लगेच राजे म्हणायला लागले तूझ्या हाताची कढी खिचडी म्हणजे लाजवाब वगैरे. फार बोर होतय राजेंचं ते गुडी गुडी वागणं.
कुठलीही बायको कितीही सुगरण असली तरी कोणताही नवरा अगदी बनवलेल्या प्रत्येक पदार्थांची तारीफ करत नाही.
कोणताही नवरा अगदी बनवलेल्या
कोणताही नवरा अगदी बनवलेल्या प्रत्येक पदार्थांची तारीफ करत नाही>> पण हे दुसरे पणीचं आहे ना लाडाच्चं
खरंय. काय ते कवतिक. आणि ती पण
खरंय. काय ते कवतिक. आणि ती पण काय लाडेलाडे.
अधेड उमरवाली, आधी लग्न संसार मुलगा, नवर्याचं निधन, त्यानंतरचं आयुष्य सासर्यांच्या धाकात काढलेली बाई वाटतंच नाही ती.
सोहमने शुभ्राला घर सोडायला
सोहमने शुभ्राला घर सोडायला सांगितले आहे. Uhoh का म्हणे?>>>>झी5 वर शीर्षक वाचले.मालिका पाहिली नाही.
अहो साधी गोष्ट आहे. कसाही
अहो साधी गोष्ट आहे. कसाही नवरा व रिलेशन शिप असली तरी दुसरे लग्न करताना एक क्षण का होईना पहिल्या नवर्याची आठवण येउन गहिवरल्यागत होणे अगदी नैसर्गिक आहे. पण इथे तर आधी नाही म्हणा यचे मग लगेच उत्साहाने सर्व करायचे हे दिसत आहे. हौस सर्वांना असते नटायची पण एक दोन गंभीर क्षण पण हवेत. ना. का तेव्हा पण ती इतकी बबड्या मय होती? इडिपस काँप्ले क्स वाटून राहिला मला तर. सिरी अल लेख काने इमॅजिन पण केले नसेल अर्थात माझीच डोईफोड. हनिमून बोंबलला काय राज्याचा. ?!
हो ना .सोहमच्या वडिलांची
हो ना .सोहमच्या वडिलांची क्षणभरही आठवण झाल्याचे दाखवले नाही. आसावरीलाही नाही आणि आजोबांना पण नाही
पण सोहमचे वडील नेमके कसे आणि
पण सोहमचे वडील नेमके कसे आणि कधी गेले,तेच अजूनपर्यंत सांगिलेले नाही.नवर्याचा साधा फोटोही घरात नाही आणि त्या राजेंचे फोटो ही आसा कापून ठेवत होती.
आता तर काय,नवीन प्रोमोप्रमाणे राजे सोसायटीच्या नळावर पाणी भरलेल्या बादल्या उचलायला राजे आसाला मदत करणार आहेत
अभिज किचन वार्यावर सोडलेल दिसतय राजेंनी.
राजेंची बहीण दाखवणार होते ते
राजेंची बहीण दाखवणार होते ते विसरले वाटतं झी वाले. केसरी ची जाहिरात मस्त झाली. आसावरी चा लग्नापासून सोहम जास्त च डोक्यात जायला लागलंय. आणि आसावरी पण. कायतर म्हणे शुभ्र कमी पडते आहे का? इतक्या दिवसात आपली सून कशी आहे समजलं नाहीच का..
कसाही नवरा व रिलेशन शिप असली
कसाही नवरा व रिलेशन शिप असली तरी दुसरे लग्न करताना एक क्षण का होईना पहिल्या नवर्याची आठवण येउन गहिवरल्यागत होणे अगदी नैसर्गिक आहे.>>>>>>>>> हे तर सोडाच. अगदी नवपरीणीत झालीये आसा.
कसाही नवरा व रिलेशन शिप असली
कसाही नवरा व रिलेशन शिप असली तरी दुसरे लग्न करताना एक क्षण का होईना पहिल्या नवर्याची आठवण येउन गहिवरल्यागत होणे अगदी नैसर्गिक आहे.> + १. बबड्या बाकी डोक्यात जातो अगदी; पण इतकी फक्त कुटुंबात रमलेली , इत्कं पुढे पुढे येऊन माझं घर, याच साठी माझ अस्तित्व वगैरे करणारी या वयाची आई अचानक मनातून आणि नंतर कृतीतूनही इतक्या आधुनिक विचाराची हा झटका वाटणं, न पटणं हे समजण्यासारखं आहे. त्यावर त्याची नकारात्मक प्रतिक्रिया ही दाखवता आली असती. पण इथे हा तर हावरट चोरच दाखवला आहे निगेटिव्ह दाखवण्यासाठी
आजोबा आले मूळपदावर.
आजोबा आले मूळपदावर. जावयाच्या मानपानावरुन आसा आणि शुभ्राला बोलले, पण सोहमला एक चकार शब्दसुद्दा नाही. खर तर त्याच्या हातातला मोबाईल फेकायला हवा होता त्यान्नी. बबडया जेव्हा म्हणतो तु जेव्हा मी बोलावशील तेव्हा येत जा , तेव्हा आजोबान्नी त्याला खडसावून
सान्गायला पाहिजे होत की , " कोंबडीच्या, आता तिला स्वत : चा संसार आहे. लग्न झालय तिच , आता तरी तिचा पदर सोड. "
शुभ्रा खूपच खमकी आहे, तिने काळ सोहमला चांगलेच सुनावले आणि बेडरूमच्या बाहेर काढले. >>>>>>>> +++++++++१११११११ आता ती बबडयाला सुधरवणार आहे म्हणे.
Pages