Submitted by Dr Raju Kasambe on 18 July, 2019 - 11:08
कोल्हा नाही लांडगा नाही
आपला सच्चा मित्र हाय
पक्षी नाही, वटवाघूळ हाय
खाली डोकं वर पाय !!
मायाळू बुजरे निशाचर
गुहेत झाडावर वा फटी-चर
आम्हा सम सस्तन प्राणी हाय
खाली डोकं वर पाय !!
शाकाहारी वटवाघळे
खाती केवळ फळे
मांसाहारी किडे खाय
खाली डोकं वर पाय !!
इको लोकेशनचे तंत्र
अंधारात बघण्याचा मंत्र
रडार सुद्धा फेल हाय
खाली डोकं वर पाय !!
विष्ठेत नत्र आणि स्फुरद
नैसर्गिक कृषी खत
कृत्रिम खते फेल जाय
खाली डोकं वर पाय !!
पिकांचे जोमाने रक्षण
करून कीटक भक्षण
कीटकनाशकही फेल जाय
खाली डोकं वर पाय !!
डास आणि उडते किटक
हवेत करतो सफाय
इथे कासवछाप फेल हाय
खाली डोकं वर पाय!!
विष्ठेतून बीज प्रसार
वनीकरणाला हातभार
इथे वृक्षारोपण फेल हाय
खाली डोकं वर पाय !!
अंधश्रध्दा गैरसमजांनी घेरलाय
सच्चा मित्र संकटात फसलाय
वटवाघळाचा कुणी वाली नाय
खाली डोकं वर पाय !!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त आहे.बालकाव्य..
मस्त आहे.बालकाव्य..
छान. एक वटवाघूळ तीन हजार की
छान. एक वटवाघूळ तीन हजार की काय डास दिवसात खाते असे वाचले होते. वीजेच्या तीन फेज तारा व एक अर्थिंगची तार एकाखाली एक असतात. त्याला लटकल्यामुळे वीजेचा झटका बसून वटवाघळे मरतात असे म्हणतात व त्यामुळे त्यांची संख्या कमी झाली आहे. तसेच काही वटवाघळे मांसाहारी असून गाई वगैरे प्राण्यांचं रक्त पितात हे डिस्कवरी चॅनल वर पाहिले होते.
छान आहे
छान आहे
छानच!
छानच!
शशिकांत सातपुते सर, विद्युत
शशिकांत सातपुते सर, विद्युत तारांबद्दल तुम्ही लिहिले ते अगदी खरे आहे. त्यात मोठ्या आकाराची फळभक्षी वटवाघळे मरतात. प्राण्यांचे रक्त पिणारी वटवाघूळाची कुठलीही प्रजाती भारतात आढळत नाही. त्यामुळे आपल्याला चिंता नाही. धन्यवाद!!
धन्यवाद सर.
धन्यवाद सर.
कविता सुंदर.
कविता सुंदर.
आकाशवाणी अस्मिता वाहिनीवर तुमची धनेश पक्शांवरची मुलाखत ऐकली. छान माहिती मिळाली
सर्वान्चे धन्यवाद !!
सर्वान्चे धन्यवाद !!
मी काढलेला फोटो.
मी काढलेला फोटो.
वाह! माहीतीपूर्ण व मनोरंजक.
वाह! माहीतीपूर्ण व मनोरंजक.
वाह! माहीतीपूर्ण व मनोरंजक. >
वाह! माहीतीपूर्ण व मनोरंजक. >> +१
छानच कविता.. नवीन माहितीही
छानच कविता.. नवीन माहितीही कळाली. तसेच वटवाघळाचा फोटोदेखील पहिल्यांदाच पाहिला..