पक्ष्यांच्या वर्गिकरणाविषयी थोडी माहिती
वाढ आणि रचना ह्यांमधील मूलभूत फरकावर आधारित अशा २७ गणांमधे (Order) पक्षीवर्गाचे वर्गीकरण केले जाते. उदा. कुलिंग गणातील पक्षी (Order Passeriformes) म्हणजे झाडावर राहणारे पक्षी, आणि हेच पक्षी आपल्या जास्त परिचयाचे असण्याचा संभव असतो. पाण्याजवळ आपले जीवन व्यतीत करणारे बगळ्यासारखे पक्षी बक गणात (Order Ciconiiformes) अंतर्भूत होतात तर बदके, हंस ह्यांसारख्या पाण्यात राहणाऱ्या पक्ष्यांचा वर्ग म्हणजे हंस गण (Order Anseriformes)
गणांचे आणखी कुलांमध्ये (Families) पृथक्करण करण्यात येते. एका कुलामधील पक्ष्यांचे महत्वाचे गुण सारखेच असतात. कुलिंग गणातील पक्षी म्हणजेच फांदीवर बसणारे पक्षी. ह्या गणात एकूण ४० कुले आहेत. त्यात नाचरे (Muscicapidae), कावळे (Corvidae), फुलचुब (Nectariniidae) ह्यांसारखे पक्षी आहेत. ही कुले म्हणजे खरोखरीचीच कुटुंबे आहेत कारण प्रत्येक कुलात अनेक प्रजाती असतात. प्रजातींमध्ये विकास पावलेले पुष्कळच गुण सारखे असतात आणि त्यामुळे दिसण्यात आणि आचरणात सारखेच दिसतात. ह्या सवयींचे प्रत्यंतर चोच आणि पंजा ह्यांचे आकार, काही वेळा पंख आणि साधारण आकार व हालचाल ह्यांत दिसते. अन्नसाधनांच्या पद्धतीवर चोच आणि पाय ह्यांची रचना अवलंबून असते. पुष्कळ वेळा एखाद्या अनोळखी पक्ष्याची जात जरी सांगता आली नाही तरी त्याचे कुल लगेच सांता येते.
बऱ्याचशा सारख्या गुणांच्या प्रजातीच्या समूहाला गोत्र (Genus) म्हणतात. गोत्र कुलापेक्षा खालच्या वर्गाचे असते किंवा दुसऱ्या शब्दात कुलाचे गोत्रात वर्गीकरण केले जाते. केवळ सोईसाठी सारख्या गुणांच्या प्रजाती एकत्र करुन गोत्राची निर्मिती केली आहे. शास्त्रीय नावांमधील पहिले नाव गोत्राचे असते. एवढ्यापुरताच गोत्राचा संबंध आहे. गोत्रामधील सर्व पक्ष्यांचे पहिले नाव एकच असते. उदा. कावळ्यांच्या अनेक जाती आहेत परंतु त्यांच्यामध्येही काही समान गुण असल्यामुळे त्यांना कॉरव्हस (Corvus) या एकाच गोत्रात गोवले आहे.
गोत्राची विभागणी निरनिराळ्या जातींमध्ये (Species) करणे ही शेवटची पायरी आहे. जात एक नैसर्गिक घटक आहे. आंतर निपज करुन जातींची कसोटी ठरविण्यात येते. एका जातीत सारख्या गुणधर्माचे वेगवेगळे पक्षी असतात. त्यांच्यात पुनरुत्पादन होऊ शकते. सभोवतालच्या प्रदेशाची रचना व हवामान ह्यामुळे काही वेळा एकाच जातीच्या पक्ष्यांमध्ये आकार आणि पिसांचे रंग ह्यात फरक आढळून येतात. उत्तर भागात राहणारे पक्षी दक्षिणेकडे राहणाऱ्या पक्ष्यांपेक्षा साधारण आकाराने मोठे असतात. किंवा दमट हवेत राहणाऱ्या पक्ष्यांचे रंग कोरड्या हवेत राहणाऱ्या पक्ष्यांपेक्षा जरा जास्त गडद असतात. जाती अंतर्गत असे अनेक सूक्ष्म भेद असू शकतात. हे फरक जर अधिक स्पष्ट व कायमचे असतील तर त्या जातीच्या उपजाती आणि वंश ह्यात आणखी भेद करतात. परंतू निरनिराळ्या वंशांमधील पक्ष्यांची आंतरनिपज होऊन सुद्धा जात ती राहिल्यामुळे जात ही वर्गीकरणाचा घटक म्हणून राहतेच.
प्रत्येक पक्ष्याचे गोत्र ठरवून त्याचे कुल आणि जात निश्चित करता येते. सध्या पृथ्वीवर पक्ष्यांच्या ८६५० जाती आहेत. हे पक्षी ज्या २७ गणात विभागलेले आहेत त्या गणांचा अनुक्रम सर्वात कमी प्रगत अशा वंजुल (Grebe) आणि मंजूक (Divers) पक्ष्यांपासून सुरु होऊन अतिशय प्रगत अशा फांदीधारी (Perching) पक्ष्यांपर्यंत शेवट होतो. भारतामधील १२०० पक्ष्यांच्या जाती ७५ कुलांचे प्रतिनिधित्व करतात.
(वरील माहिती सलिम अली यांच्या भारतीय पक्षी या पुस्तकातून जशीच्या तशी घेतली आहे)
-----------हरिहर (शाली)
सुगरणीची मादी एकदा अंडी
सुगरणीची मादी एकदा अंडी उबवायला लागली की नर दुसरी मादी शोधतो व दुसरा घरोबा थाटतो. विणीच्या हंगामात असे अनेक संसार थाटतो.>>> हे माहित नव्हते. कुठे तो क्रौंच आणि कुठे सुगरण.
व्यवस्थित भांग भांग पाडलेली
व्यवस्थित भांग भांग पाडलेली मैना.
सारस जोडीदाराच्या
सारस जोडीदाराच्या मृत्यूपश्चात अन्नत्याग करतो व मरतो असं वाचलंय मी
गप्पीदास
गप्पीदास
Stonechat (Female)
(फोटो जुना आहे. इमेज अपलोड करायला जरा अडचण येतेय. प्रयत्न करुन पहातोय.)
माफ करा हरिहर, तुम्ही लिहिले
माफ करा हरिहर, तुम्ही लिहिले होते उत्तर पण विसरले.
हरकत नसेल अजुन एकदा तुमच्या कॅमेराच्या लेन्स ची रेन्ज लिहाल का पुन्हा?
जसे १४-५५ , ३५-३०० एम एम वगैरे. या परिणामातच लिहा उपलब्ध असेल तर.
सध्या महिनाभर कामासाठी सलीम
सध्या महिनाभर कामासाठी सलीम अली बर्ड सँच्यूरीसमोरुन जावे लागते आहे. त्यामुळे आज घरातून ७ वाजता निघून दोन तास तेथे घालवता आले. रोज दिड तास तेथे थांबत येईल महिनाभर. आज ९:०० वाजेपर्यंत सुर्यदर्शन तर झाले नाहीच पण वातावरणही अगदी आषाढासारखे होते. त्यामुळे फोटो फारसे मिळाले नाहीत. पक्षी मात्र भरपुर दिसले, भरपुर वेळ दिसले. आठवेल तसे लिहितो.
घार (Black Kite)
काळा गोविंद (Black Drongo)
हळदी-कुंकू (Spot-billed Duck)
चक्रवाक (Ruddy Shelduck)
सोनूला (Gadwall Duck)
काळ्या डोक्याची शराटी (Black-headed ibis)
मोर शराटी (Glossy ibis)
कौरव, कांडेसर (Woolly-necked Stork)
बगळा (Heron)
राखी बलाक (Grey Egret)
गाय बगळा (Cattle Egret)
ढोकरी (Pond Heron)
दर्वीमुख (Eurasian Spoonbill)
चित्रबलाक (Painted Stork)
टिटवी (Red-wattled lapwing)
तुतवार (Common Sandpiper)
ठिपकेदार तुतवार (Wood Sandpiper)
करडा सुकना (Grey Wagtail)
थोरला धोबी (Pied Wagtail)
वेडा राघू (Green bee Eater)
जांभळी पाणकोंबडी (western swamphen)
शेकाट्या (Black-winged Stilt)
चिरक (Indian Robin)
फोटो फारसे नाहीतच कारण आकाश खुप भरुन आले होते. ही सर्व मंडळी मला 7:30 ते 8:45 am या वेळात दिसले. मी तेथून निघेपर्यंत यातले सर्व तेथेच होते. चित्रबलाक मात्र 8:30 वाजता उडून बाजूच्या झाडावर जावून बसले. त्यांच्या बसायच्या पद्धतीवरुन ते विश्रांतीसाठी बसलेले समजत होते. म्हणजे आता दुपारपर्यंत त्यांची सुट्टी.
सुनिधी थोडे फोटो Canon EOS
सुनिधी थोडे फोटो Canon EOS 60D या कॅमेऱ्याने काढले आहेत.
बाकी सर्व Nikon Coolpix P900 या कॅमेऱ्याने काढले आहेत.
हा ब्रिज कॅमेरा आहे. पॉईंट ऍन्ड शुट. त्यामुळे लेन्स, सेटींग वगैरे भानगड नाही. कॅमेरा हलकाही आहे.
वरील सर्व फोटो बर्ड वॉचिंग मोडवर काढले आहेत.
सव्वा तासात २४ पक्षी ...
सव्वा तासात २४ पक्षी ....मस्तच.
कावळा चिमणी पण दिसली असेल ना?
कावळे होते, पारवे होते. अरे
कावळे होते, पारवे होते. अरे एकाच जागी कांडेसर, शराटी, दोन प्रकारचे बगळे, शेकाट्या हे सगळे होते. मुठेचा काठ म्हणजेच हे अभयारण्य आहे. मोजता येणार नाहीत इतके पक्षी उतरलेत. वॅगटेल, तुतवार तर कुठेही बागडत असतात काठावर. मी सोनूला (Gadwall Duck) व कांडेसर (Wooly necked Stork) प्रथमच पाहीले.
फोटो टाकतो. चांगले नाहीएत पण.
Wooly necked Stork ..........
Wooly necked Stork .............सुंदर दिसतो हा
सोनूला
सोनूला
Gadwall Duck
Pune (Salim Ali Bird Sanctuary)
17 Dec. (7:45 am)
तुतवार
तुतवार
Common Sandpiper (Actitis hypoleucos)
Pune (SABS Yerawda)
17 Dec (8:00 am)
ठिपकेवाला तुतवार
ठिपकेवाला तुतवार
Wood Sandpiper (Tringa glareola)
Pune (SABS)
17 Dec (8:00 am)
हळदी-कुंकू बदक, प्लवा
हळदी-कुंकू बदक, प्लवा
Indian spot-billed duck (Anas poecilorhyncha)
Pune (SABS)
17 Dec (8:00 am)
श्री व सौ.
"दो जिस्म एक जान है हम"
(दोन बदके आहेत फोटोत.)
मोर शराटी
मोर शराटी
Glossy Ibis (Plegadis falcinellus)
Pune (SABS Yerwada)
17 Dec (8:45 am)
करडा धोबी
करडा धोबी
Grey Wagtail
Pune (SABS)
17 Dec (8:30 am)
चित्रबलाक
चित्रबलाक
ही जोडी मी आल्यापासुन पाण्यात अन्न शोधत होती. आजुबाजूला काळ्या डोक्याची शराटी, कांडेसर, बगळे, शेकाटे अन्न शोधत होते. ८:३० वाजण्याच्या आसपास दोघेही उडाले व बाजूच्या झाडावर बसले. असे बसल्यावर ते चार वाजेपर्यंत शक्यतो हालत नाहीत हे मी खुपदा पाहीले आहे.
Painted Stork
Pune (SABS Yerwada)
17 Dec. (8:30 am)
गप्पीदास फोटो ,आणि चक्रवाक
गप्पीदास फोटो ,आणि चक्रवाक भारी.
दर्वीमुख
दर्वीमुख
Wooly necked Stork, Black
Wooly necked Stork, Black headed ibis, Grey egret, Pond Heron, Egret, Black winged stilt.
गप्पीदास फोटो ,आणि चक्रवाक
गप्पीदास फोटो ,आणि चक्रवाक भारी.>>> धन्यवाद Srd!
काय सुंदर वर्णने, फोटो.
काय सुंदर वर्णने, फोटो. मेजवानी असे नाव द्या या धाग्यांना.
हा ब्रिज कॅमेरा आहे. पॉईंट
हा ब्रिज कॅमेरा आहे. पॉईंट ऍन्ड शुट. त्यामुळे लेन्स, सेटींग वगैरे भानगड नाही. कॅमेरा हलकाही आहे.
वरील सर्व फोटो बर्ड वॉचिंग मोडवर काढले आहेत. >> धन्यवाद. खरेतर वेगळी न करता येणारी पण तरीही झूम करता येणारी लेन्स असेल अर तिला रेन्ज असतेच. पण याला नसेल तर वा लिहिले नसेल तर आश्चर्य आहे.
फोटो मस्तच आहेत सगळे.
सुनिधी मॉडेल सांगीतल्यामुळे
सुनिधी मॉडेल सांगीतल्यामुळे डिटेल्स दिले नव्हते. देतो आहे.
Coolpix P900
83x optical zoom
Built-in lens, 35mm equivalent fl of 24-2000mm
मस्त फोटोग्राफी अन बर्डिंग!!
मस्त फोटोग्राफी अन बर्डिंग!!
हरिहर,
तुमच्या देवराईत जेवढे पक्षी येतात, तेवढे मला पाषाण लेक किंवा व्हालीत दिसले नाहीत, मे बी टायमिंग मॅच होत नसावं.
रॉनी देवराईत आता बरेच पक्षी
रॉनी देवराईत आता बरेच पक्षी कमी झालेत. लहान पक्षी आता फारसे दिसत नाहीत. प्रिनिया तर मला आठ दिवस दिसला नाही. बदकेही पंधरा दिवस झाली आली नाहीत. सध्या फक्त रोझी स्टर्लींग व सनबर्डस आहेत खुप. पण पुण्यात बऱ्याच पुलांवरुन खुप पक्षी दिसायला लागले आहेत. तुम्ही पुण्यात असाल तर येरवड्याला नक्की चक्कर मारा. काल मला खुप पक्षी दिसले. वर यादी दिली आहेच मी. कवडीपाटलाही खुप पक्षी दिसले. पण प्रचंड अस्वच्छता आहे सगळ्या ठिकाणी.
सिंहगड व्हॅली मात्र स्वच्छ आहे.
पाषाण लेकला तुम्ही कुठून जाता
पाषाण लेकला तुम्ही कुठून जाता? अलीकडील बाजूने एक गेट आहे. ते बंद असते पण विनंती केली की उघडून देतो वॉचमन. मला तेथे जास्त पक्षी आढळले. त्या बाजूला जात नाही कुणी.
धन्यवाद हरिहर. २०००एमएम
धन्यवाद हरिहर. २०००एमएम म्हणजे जबरदस्त आहे.
हो सुनिधी. तुम्ही नेटवर
हो सुनिधी. तुम्ही नेटवर माहिती पहा कॅमेऱ्याची.
माझा अनुभव सांगतो. वापरायला, बाळगायला अगदी सोपा आहे. हलका आहे. चटकन फोटो टिपता येतो. ऑटो फोकस छान स्पिडी आहे. इन फ्लाईट मधले पक्ष्यांचे फोटो टिपता येत नाहीत. DSLr ची गंमत नाही. Raw फोटो मिळत नाहीत. स्टॅबिलायझेशन जबरदस्त आहे. फोटोची साईझ 7 mb पर्यंत येते.
होय. वाचते. तसा मागच्या वर्षी
होय. वाचते. तसा मागच्या वर्षी हा दागिना घेतलाय म्हणा फक्त अजुन एक मोठी बहुगुणी लेन्स घ्यायचा विचार आहे. म्हणुन रेन्जचा अदमास घेत आहे फोटोंवरुन.
Pages