दिगंतराचे प्रवासी...

Submitted by .......... on 14 November, 2019 - 01:39

पक्ष्यांच्या वर्गिकरणाविषयी थोडी माहिती

वाढ आणि रचना ह्यांमधील मूलभूत फरकावर आधारित अशा २७ गणांमधे (Order) पक्षीवर्गाचे वर्गीकरण केले जाते. उदा. कुलिंग गणातील पक्षी (Order Passeriformes) म्हणजे झाडावर राहणारे पक्षी, आणि हेच पक्षी आपल्या जास्त परिचयाचे असण्याचा संभव असतो. पाण्याजवळ आपले जीवन व्यतीत करणारे बगळ्यासारखे पक्षी बक गणात (Order Ciconiiformes) अंतर्भूत होतात तर बदके, हंस ह्यांसारख्या पाण्यात राहणाऱ्या पक्ष्यांचा वर्ग म्हणजे हंस गण (Order Anseriformes)

गणांचे आणखी कुलांमध्ये (Families) पृथक्करण करण्यात येते. एका कुलामधील पक्ष्यांचे महत्वाचे गुण सारखेच असतात. कुलिंग गणातील पक्षी म्हणजेच फांदीवर बसणारे पक्षी. ह्या गणात एकूण ४० कुले आहेत. त्यात नाचरे (Muscicapidae), कावळे (Corvidae), फुलचुब (Nectariniidae) ह्यांसारखे पक्षी आहेत. ही कुले म्हणजे खरोखरीचीच कुटुंबे आहेत कारण प्रत्येक कुलात अनेक प्रजाती असतात. प्रजातींमध्ये विकास पावलेले पुष्कळच गुण सारखे असतात आणि त्यामुळे दिसण्यात आणि आचरणात सारखेच दिसतात. ह्या सवयींचे प्रत्यंतर चोच आणि पंजा ह्यांचे आकार, काही वेळा पंख आणि साधारण आकार व हालचाल ह्यांत दिसते. अन्नसाधनांच्या पद्धतीवर चोच आणि पाय ह्यांची रचना अवलंबून असते. पुष्कळ वेळा एखाद्या अनोळखी पक्ष्याची जात जरी सांगता आली नाही तरी त्याचे कुल लगेच सांता येते.

बऱ्याचशा सारख्या गुणांच्या प्रजातीच्या समूहाला गोत्र (Genus) म्हणतात. गोत्र कुलापेक्षा खालच्या वर्गाचे असते किंवा दुसऱ्या शब्दात कुलाचे गोत्रात वर्गीकरण केले जाते. केवळ सोईसाठी सारख्या गुणांच्या प्रजाती एकत्र करुन गोत्राची निर्मिती केली आहे. शास्त्रीय नावांमधील पहिले नाव गोत्राचे असते. एवढ्यापुरताच गोत्राचा संबंध आहे. गोत्रामधील सर्व पक्ष्यांचे पहिले नाव एकच असते. उदा. कावळ्यांच्या अनेक जाती आहेत परंतु त्यांच्यामध्येही काही समान गुण असल्यामुळे त्यांना कॉरव्हस (Corvus) या एकाच गोत्रात गोवले आहे.

गोत्राची विभागणी निरनिराळ्या जातींमध्ये (Species) करणे ही शेवटची पायरी आहे. जात एक नैसर्गिक घटक आहे. आंतर निपज करुन जातींची कसोटी ठरविण्यात येते. एका जातीत सारख्या गुणधर्माचे वेगवेगळे पक्षी असतात. त्यांच्यात पुनरुत्पादन होऊ शकते. सभोवतालच्या प्रदेशाची रचना व हवामान ह्यामुळे काही वेळा एकाच जातीच्या पक्ष्यांमध्ये आकार आणि पिसांचे रंग ह्यात फरक आढळून येतात. उत्तर भागात राहणारे पक्षी दक्षिणेकडे राहणाऱ्या पक्ष्यांपेक्षा साधारण आकाराने मोठे असतात. किंवा दमट हवेत राहणाऱ्या पक्ष्यांचे रंग कोरड्या हवेत राहणाऱ्या पक्ष्यांपेक्षा जरा जास्त गडद असतात. जाती अंतर्गत असे अनेक सूक्ष्म भेद असू शकतात. हे फरक जर अधिक स्पष्ट व कायमचे असतील तर त्या जातीच्या उपजाती आणि वंश ह्यात आणखी भेद करतात. परंतू निरनिराळ्या वंशांमधील पक्ष्यांची आंतरनिपज होऊन सुद्धा जात ती राहिल्यामुळे जात ही वर्गीकरणाचा घटक म्हणून राहतेच.

प्रत्येक पक्ष्याचे गोत्र ठरवून त्याचे कुल आणि जात निश्चित करता येते. सध्या पृथ्वीवर पक्ष्यांच्या ८६५० जाती आहेत. हे पक्षी ज्या २७ गणात विभागलेले आहेत त्या गणांचा अनुक्रम सर्वात कमी प्रगत अशा वंजुल (Grebe) आणि मंजूक (Divers) पक्ष्यांपासून सुरु होऊन अतिशय प्रगत अशा फांदीधारी (Perching) पक्ष्यांपर्यंत शेवट होतो. भारतामधील १२०० पक्ष्यांच्या जाती ७५ कुलांचे प्रतिनिधित्व करतात.

(वरील माहिती सलिम अली यांच्या भारतीय पक्षी या पुस्तकातून जशीच्या तशी घेतली आहे)
1दिगंतराचे प्रवासी.jpg

-----------हरिहर (शाली)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाण्यातील पक्षांचे नंदनवन...विनया जंगले यांचा नलसरोवरातील पक्षीविविधतेवरील आजच्या लोकप्रभातील लेख.

http://epaper.lokprabha.com/2438846/Lokprabha/06-12-2019#dual/6

सुरय
या सुरय अगदी हजाराच्या संख्येने दिसल्या. यांचा आकार भिंगरीसारखाच होता पण मोठा. दिसायला छान आहे हा पक्षी. दर पाच मिनिटांनी त्यांचा थवा पाण्याला समांतर उडत आकाशात झेपावायचा व पुन्हा काठावरच्या चिखलात उतरायचा. अप्रतिम दृष्य होते ते.

Rever Tern ( Sterna aurantia)
pune (Kawdi Pat)
29 Nov (7:15 am)

आकाशात लाह्या फेकाव्या तशा या सुरय उडत व पुन्हा एकत्र येवून बसत.

मी मुठेच्या काठावर जेवढे काही पक्षी कॅमेऱ्यात टिपले आहेत प्रत्येक वेळी प्रचंड प्रमाणात कचरा पाहीला आहे. अगदी नादानपणे केलेला कचरा. हे जर असेच सुरु राहीले तर काही वर्षांनी हे पक्षी मुठेच्या आसपासही फिरकणार नाहीत.

चक्रवाक
अतिशय देखणे असे हे बदक आहे. चमकदार व प्रसन्न रंग. यांचे अन्न शोधणे म्हणजे अगदी विनोदी होते. सुरवातीला माझे लक्ष गेले तेंव्हा दोन्ही चक्रवाक अन्न शोधत होत्या. मला समजेना की हे पाण्यावर काय आहे नक्की. पक्षी तर अजिबात वाटत नव्हते. जरा वेळात त्या दोघांनी माना बाहेर काढल्यावर मला माझी फसगत समजली. या पाण्यात डोके बुडवून पाण्यात अक्षरशः शिर्षासन करतात. शरीर तसेच उलटे रहावे म्हणून पायांची वल्ही मजेदार हलवत राहतात.

Ruddy Shelduck (Tadorna ferruginea)
Pune (kawdi pat)
29 Nov (7:30 am)

हा स्वतंत्र फिरणारा चक्रवाक.

हे दोघेही अन्न शोधताना अगदी मजेदार दिसत होते. हा फोटो मी मित्रांना नावासहीत पाठवला होता. जवळ जवळ प्रत्येकाने विचारले की बदके कुठे आहेत? आणि हे काय पाठवलय नक्की? Lol

चक्रवाक! किती सुरेख खरंच. चक्रवाक पक्ष्यावर शाळेत बहुतेक कविताही होती..
टर्न्स पण मस्त. पिवळ्या चोची. Happy

मोर शराटी
यांचा आठ पक्षी असलेला थवा नदिवर निवांत उभा होता. आजूबाजूला ग्रेट इग्रेट, कॅटेल इग्रेट, सँडपायपर, स्टिल्ट वगैरे पक्षी निवांत उभे होते. हा योगायोग होता का ते माहीत नाही पण नदीच्या दुसऱ्या बाजूला हेच पक्षी अन्न शोधत होते व या बाजूला तेच पक्षी विश्रांती घेत होते. जणू हा किनारा विश्रांती घ्यायचे ठिकाण असावे.

Black Ibis
Pune (Kawdi pat)
29 Nov (7:30 am)

Great Egret

Black winged Stilt

आज कवडी पट येथे बगळे, शराटी, खंड्या, सुरय, चित्रबलाक, तुतवार, पांढरा धोबी, पिवळा धोबी, घार, कावळा, टिटवी इत्यादी पक्षी मोठ्या प्रमाणावर दिसले.

हो वर्षा, चक्रवाक खरच फार सुंदर दिसतो. मी प्रथमच पाहीला. कवितेत होता असे वाटतेय पण अभंग किंवा पुराण कथांमधे उल्लेख ऐकलेत चक्रवाकचे. सुरय खुप मोठ्या संख्येने होत्या. त्यात मेल फिमेल असा फरक असावा. कारण काहींचे डोके काळे होते व काहींचे नव्हते. मी फोटो देतो. यातले कोण मेल व कोण फिमेल आहे हे सर्च करुन देईन येथे.

रिव्हर टर्न्सच्या मेल आणि फिमेलमधे काही फरक नाहीए. डोके पांढरे असलेले juveniles आहेत. (विकी वरील माहिती)

चक्रवाक बदकासारखा तर क्रौंच करकोच्यासारखा असतो. क्रौंच आणि सारस एकच आहेत. इंग्रजीत Indian Sarus Crane. मोठा बगळा, कांड्या करकोचा आणि सारस भाऊ शोभावेत असे पक्षी आहेत. हे सारस कुठे आढळतात हे माहित नाही मला पण हे हिवाळ्यात भरतपुरला (राजस्थान) येतात. मी अजून सारस प्रत्यक्ष पाहीला नाहीए. Sad

धन्यवाद सुबोध खरे!

सॉरी, वरती मोर शराटीला मी चुकून Black ibis म्हणालो आहे. ती Glossy ibis आहे.

पांढरा धोबी
मी खुपदा याचे निरीक्षण केले आहे. पण आज दिसलेला हा धोबी खरोखरच देखणा होता. नावाला शोभेल इतका पांढरा आणि स्वच्छ होता. सगळ्या वॅगटेलमधे हा मला जास्त आवडतो.

White Wagtail
Pune outskirts
30 Nov (7:10 am)

.

देवकी क्रौंच म्हणजे सारस हे बरोबर आहे पण रोहीतला (फ्लेमिंगो) क्रौंच म्हणत नसावे. या प्रजातींमधे थोडा फरक आहे असे मला वाटते. नक्की माहीत नाही. Crane (सारस), Stork (करकोचे), Heron (बगळे) ह्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. Crane मधे अनेक उपजाती असल्या तरी आपल्या कथांमधे जो क्रौंच आहे तो खालील ठरावीक पक्षी आहे.

(प्रचि आंजावरुन घेतली आहे)

सारस ...फारच सुंदर पक्षी. हा सुद्धा जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.. परंतु गोंदिया जिल्ह्यात काही निसर्गप्रेमी संस्था व शेतकऱ्यांनी एकत्रित येउन सारस संवर्धन चालू केले आहे व त्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यावर काही वर्षांपूर्वी लोकप्रभेत एक सुंदर लेख आला होता. गुगलून लिंक देईन इथे.

वाल्मिकींना क्रौंचवध पाहून झालेला शोक, व त्या शोकाचाच झालेला पहिला श्लोक. तो क्रौंच म्हणजेच सारस असावा

चक्रवाक ...अतिसुंदर
दंपतीप्रेमाचे व विरहाचे प्रतीक असा संस्कृत साहित्यात यांचा उल्लेख आहे.

आनंददायी बगळे - मारुती चितमपल्ली - अनुभव प्रकाशन

आपल्या आनंददायी बगळे ह्या पुस्तकात पक्षीतज्ञ् मारुती चितमपल्ली यांनी संस्कृत साहित्यातील पक्ष्यावरील लेख लिहिले आहेत. यात पक्ष्यांचे वर्णन, त्यांची विविध नावे तसेच संस्कृत साहित्य, पुराणातील संदर्भ, श्लोक दिले आहेत. फोटो नसून रेखाटने आहेत. एकूणच पक्ष्यांविषयी एक वेगळेच पुस्तक.

AB1.jpg

..

APC1.jpg

शिपाई बुलबुल
आज हा खुप दिवसांनी दिसला. येथे जे बुलबुल वावरतात ते याच्या इतके निटनेटके नसतात. हा अगदी स्वच्छ, चमकदार व सगळी पिसे चापुन चोपून बसवलेला होता. गालावरचा लाल रंग व डोक्यावरचा तुराही अगदी सुंदर व भरगच्च होता. इतर बुलबुलपेक्षा याचे डोके जास्त काळेभोर होते. नर व मादी दोघेही एका वेलीवरची लाल फळे खात होते. ही लाल फळे कसली आहेत ते उद्या शोधेन. मी आमच्या येथील सर्व बुलबुल हेच फळ खाताना पाहीले आहेत.
Red Whiskered Bulbul
Pune
30 Nov (5:00 pm)

आज संध्याकाळी आमच्या सोसायटीच्या गार्डमधे सिल्व्हरबिलचा प्रणयाराधन व प्रणय पहायला मिळाला. मादी एका फांदीवर बसली होती. नराने चोचीत पकडून एक तुरा असलेली गवताची काडी चोचीत पकडून आणली व तिच्यापासून दुर अंतर ठेवून बसला. मग तो जागेवरच उड्या मारत हळू हळू तिच्याकडे सरकायला लागला. या उड्या अतिशय लयबध्द होत्या. पुन्हा दुर जावून तो तशाच उड्या मारत जवळ आला. असे एकदोन वेळा केल्यावर तो तिच्यावर दोन ते तिन सेकंदांसाठी आरुढ झाला. खाली उतरुन तिच्या शेजारी बसल्यावर मादीने त्याला अतिशय जलद गतीने तिन वेळा चुंबन दिले. अतिशय सुरेख दृष्य होते ते. (पण त्याचे फोटो येथे देत नाही. Wink )
Indian Silverbill (Male & Female)
Pune
30 Nov (5:15 pm)

आज पर्पल रम्प्ड सनबर्डचे पिल्लू दिसले. चपळ होते. वाढ जवळ जवळ पुर्ण झाली होती पण पिल्लू असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्याने शिट्टी वाजवून वाजवून खुप गोंधळ केला. आवाज अगदी ॲडल्ट सनबर्डसारखा होता. तो या झाडावरन त्या झाडावर सारखा फिरत होता पण आवाजामुळे चटकन सापडत होता. त्याच्या सोबतच ॲडल्ट मेल होता. ते दोघे सोबत होते का हे समजले नाही. कदाचित नसावे.

Purple rumped Sunbird (Juvenile)
Pune outskirts
1 Dec (4:15 pm)

Purple rumped Sunbird (Male)

हा फोटो मी टाळला होता टाकायचा पण ही माझ्यासाठी फार महत्वाची नोंद आहे. मी आजही सिल्व्हरबिलचा प्रणय पाहिला. नराचे उड्या मारत नाचणे व मादीचे नंतर चुंबने देणे अगदी तसेच होते, त्याच पद्धतिने होते. आणखी एक नोंद म्हणजे सिल्व्हरबिल हे प्रणयासाठी जागा निवडतात. अजून किमान दहा बारा वेळा मी हे पाहीन तेंव्हा खात्रीने सांगू शकेन.
मी नराला त्याच फांदीवर गेले दोन तिन दिवस प्रणयाच्या वेळी त्याने जो नाच केला तसा नाच करताना पाहिले होते. तो एकटाच असल्याने मला त्या नाचाचा अर्थ समजला नव्हता. आता त्या नाचण्याचा अर्थ समजतोय पण नविन शंका निर्माण झाली आहे. हा प्रणयाच्या वेळी करण्याचा खास नाच तो एकटा असताना का करत होता? सराव करत होता की काय? समजेलच लवकर.
Indian silverbill (Male & Female)
Pune outskirts
30 Nov (5:15 pm)

सातभाई, बैरागी
आज सकाळी एकटा सातभाई पाहिला. सहसा हे थव्याने दिसतात. निदान जोडी असतेच. हे पिल्लूही वाटत नव्हते. महत्वाचे म्हणजे त्याला शेपटी नव्हती. भांडणात पुर्ण शेपटी तुटेल असे वाटत नाही. आपोआप गळून पडते का हेही माहित नाही. पक्ष्यांविषयी वाचन वाढवायला हवे. शेपटी नसलेला सातभाई जरा विचित्र दिसत होता. त्याच्या उडण्यात मात्र नेहमीची सफाई होती.
Large Grey Babbler (Turdoides malcolmi)
Pune outskirts
02 Nov (7:00 am)

गप्पीदास, गोजा
परिसरातील जवळ जवळ सर्व शेते आता कापणीमुळे रिकामी झाली आहेत. उशीरा पेरणीमुळे एका शेतात पिक उभे आहे. सध्या तेथेच बंटीग, रॉबीन, चाट यांची गर्दी होतेय. त्यामुळे श्राईकचीही उपस्थिती लक्षणीय आहे. याच परिसरात पावशाचेही वारंवार दर्शन व्हायला लागलेय.

Siberian stonechat (Saxicola maurus)
Pune outskirts
2 Nov (7:15 am)

Indian Robin
Pune outskirts
2 Nov (5:30 pm)

मी आजवर बुलबुलांना, खासकरुन शिपाई बुलबुलला (Red Whiskered bulbul) खालील फळ फार आवडीने खाताना पाहिलेय. ही फळे अगोदर हिरवी असतात, नंतर पिवळी होऊन मग लालबुंद होतात. आकार काबूली चण्याएवढा असेल. बुलबुल हे फळ आख्खेच गिळून टाकतात.

हे फळ खाण्यासाठी बुलबुल फार कष्ट करतात. (फोटो जुना आहे)

Pages