पक्ष्यांच्या वर्गिकरणाविषयी थोडी माहिती
वाढ आणि रचना ह्यांमधील मूलभूत फरकावर आधारित अशा २७ गणांमधे (Order) पक्षीवर्गाचे वर्गीकरण केले जाते. उदा. कुलिंग गणातील पक्षी (Order Passeriformes) म्हणजे झाडावर राहणारे पक्षी, आणि हेच पक्षी आपल्या जास्त परिचयाचे असण्याचा संभव असतो. पाण्याजवळ आपले जीवन व्यतीत करणारे बगळ्यासारखे पक्षी बक गणात (Order Ciconiiformes) अंतर्भूत होतात तर बदके, हंस ह्यांसारख्या पाण्यात राहणाऱ्या पक्ष्यांचा वर्ग म्हणजे हंस गण (Order Anseriformes)
गणांचे आणखी कुलांमध्ये (Families) पृथक्करण करण्यात येते. एका कुलामधील पक्ष्यांचे महत्वाचे गुण सारखेच असतात. कुलिंग गणातील पक्षी म्हणजेच फांदीवर बसणारे पक्षी. ह्या गणात एकूण ४० कुले आहेत. त्यात नाचरे (Muscicapidae), कावळे (Corvidae), फुलचुब (Nectariniidae) ह्यांसारखे पक्षी आहेत. ही कुले म्हणजे खरोखरीचीच कुटुंबे आहेत कारण प्रत्येक कुलात अनेक प्रजाती असतात. प्रजातींमध्ये विकास पावलेले पुष्कळच गुण सारखे असतात आणि त्यामुळे दिसण्यात आणि आचरणात सारखेच दिसतात. ह्या सवयींचे प्रत्यंतर चोच आणि पंजा ह्यांचे आकार, काही वेळा पंख आणि साधारण आकार व हालचाल ह्यांत दिसते. अन्नसाधनांच्या पद्धतीवर चोच आणि पाय ह्यांची रचना अवलंबून असते. पुष्कळ वेळा एखाद्या अनोळखी पक्ष्याची जात जरी सांगता आली नाही तरी त्याचे कुल लगेच सांता येते.
बऱ्याचशा सारख्या गुणांच्या प्रजातीच्या समूहाला गोत्र (Genus) म्हणतात. गोत्र कुलापेक्षा खालच्या वर्गाचे असते किंवा दुसऱ्या शब्दात कुलाचे गोत्रात वर्गीकरण केले जाते. केवळ सोईसाठी सारख्या गुणांच्या प्रजाती एकत्र करुन गोत्राची निर्मिती केली आहे. शास्त्रीय नावांमधील पहिले नाव गोत्राचे असते. एवढ्यापुरताच गोत्राचा संबंध आहे. गोत्रामधील सर्व पक्ष्यांचे पहिले नाव एकच असते. उदा. कावळ्यांच्या अनेक जाती आहेत परंतु त्यांच्यामध्येही काही समान गुण असल्यामुळे त्यांना कॉरव्हस (Corvus) या एकाच गोत्रात गोवले आहे.
गोत्राची विभागणी निरनिराळ्या जातींमध्ये (Species) करणे ही शेवटची पायरी आहे. जात एक नैसर्गिक घटक आहे. आंतर निपज करुन जातींची कसोटी ठरविण्यात येते. एका जातीत सारख्या गुणधर्माचे वेगवेगळे पक्षी असतात. त्यांच्यात पुनरुत्पादन होऊ शकते. सभोवतालच्या प्रदेशाची रचना व हवामान ह्यामुळे काही वेळा एकाच जातीच्या पक्ष्यांमध्ये आकार आणि पिसांचे रंग ह्यात फरक आढळून येतात. उत्तर भागात राहणारे पक्षी दक्षिणेकडे राहणाऱ्या पक्ष्यांपेक्षा साधारण आकाराने मोठे असतात. किंवा दमट हवेत राहणाऱ्या पक्ष्यांचे रंग कोरड्या हवेत राहणाऱ्या पक्ष्यांपेक्षा जरा जास्त गडद असतात. जाती अंतर्गत असे अनेक सूक्ष्म भेद असू शकतात. हे फरक जर अधिक स्पष्ट व कायमचे असतील तर त्या जातीच्या उपजाती आणि वंश ह्यात आणखी भेद करतात. परंतू निरनिराळ्या वंशांमधील पक्ष्यांची आंतरनिपज होऊन सुद्धा जात ती राहिल्यामुळे जात ही वर्गीकरणाचा घटक म्हणून राहतेच.
प्रत्येक पक्ष्याचे गोत्र ठरवून त्याचे कुल आणि जात निश्चित करता येते. सध्या पृथ्वीवर पक्ष्यांच्या ८६५० जाती आहेत. हे पक्षी ज्या २७ गणात विभागलेले आहेत त्या गणांचा अनुक्रम सर्वात कमी प्रगत अशा वंजुल (Grebe) आणि मंजूक (Divers) पक्ष्यांपासून सुरु होऊन अतिशय प्रगत अशा फांदीधारी (Perching) पक्ष्यांपर्यंत शेवट होतो. भारतामधील १२०० पक्ष्यांच्या जाती ७५ कुलांचे प्रतिनिधित्व करतात.
(वरील माहिती सलिम अली यांच्या भारतीय पक्षी या पुस्तकातून जशीच्या तशी घेतली आहे)
-----------हरिहर (शाली)
जांभळी पाणकोंबडी
जांभळी पाणकोंबडी
या जांभळ्या पाणकोंबडीचे पंख साफ करणे बराच वेळ सुरु होते. मलाही तिच्या पंखांची नक्की रचना कशी असते ते पहायचे होते. त्यामुळे तिने जितके निगुतीने पंख साफ केले तितकेच व्यवस्थित पंख व त्यांचे रंग पाहता आले. खरच अगदी सुरेख पंखांची रचना आहे.
Grey-headed swamphen (Porphyrio poliocephalus)
Pune (SABDP)
20 Dec (4:30 pm)
पंख साफ झाल्यावर तिने ते पिसारुन पुन्हा व्यवस्थित जागेवर बसवले.
पंख चापुन चोपून बसवल्यावर इतक्यावेळ गलेलठ्ठ वाटणारी कोंबडी एकदम स्लिम दिसायला लागली.
ही तिच पाणकोंबडी आहे. पंख साफ
ही तिच पाणकोंबडी आहे. पंख साफ झाल्यावर अन्नाचा शोध सुरु झाला.
विषेश म्हणजे मी आजवर पक्ष्यांमध्ये सहसा न पाहीलेली गोष्ट पाहीली. पक्षी शक्यतो चोचीने अन्न तोडतात, फाडतात. मदतीसाठी पायांचा उपयोग करतात. म्हणजे भक्ष्य पायात पकडून ते चोचीने फाडतात किंवा तुकडे करतात. पण या कोंबडीने माकड जसे हाताचा उपयोग करते तसे पायाने खालील गोष्टी उचलून त्या चोचीत पकडून तपासल्या. या अगोदर मी फक्त पोपटाला असे करताना पाहीले आहे.
खालील वस्तू उचलून ती तपासुन पहाणारी पाणकोंबडी.
आणि ही कचरा उचकणारी पाणकोंबडी. जुने कपडे टाकायची नदी ही काय जागा आहे का?
सामान्य तुतवार
सामान्य तुतवार
Common Sandpiper
Pune (SABDP)
20 Dec (5:00 pm)
हाच सँडपायपर जर एखाद्या खडकावर उभा असता तर किती सुरेख दृष्य दिसले असते! पण येथेही कचरा, कचरा आणि कचरा.
निर्माल्य आणि प्लॅस्टीक
जंगल मैना
जंगल मैना
मी देवराईत, घरामागील टेकडीवर व गावाकडे खुपदा जंगल मैना पहातो. पण आज पाहिलेल्या जंगल मैनाची जोडी पुर्ण काळी आणि नेटक्या बांध्याची होती. या अगोदर मी काळ्या रंगाची जंगल मैना पाहीली नव्हती. नेटवर सर्च करून किंवा मित्रांना विचारुन ही नक्की कोणती मैना आहे ते येथे लिहिनच. ही जंगल मैनाच आहे असे मला अजुनही वाटते. या अगोदर मी पारव्यांमधे काळ्या रंगाची जोडी पाहीली होती.
Jungle Maina (Acridotheres fuscus)
Pune (SABDP)
20 Dec (5:00 pm)
.
हे नदिकाठावर दिसणारे नेहमीचे
हे नदिकाठावर दिसणारे नेहमीचे मित्र. कुठेही गेलो तरी नदीचा काठ म्हणजे हे हवेतच. आजही हे दोन पक्षी सातत्याने माझ्या आजूबाजूला वावरत होते.
Pune (SABDP)
20 Dec (5:00 pm)
करडा धोबी (Grey Wagtail)
ठिपकेवाला तुतवार (Wood Sandpiper)
वावे नेहमी उडणाऱ्या
वावे नेहमी उडणाऱ्या पक्ष्यांचे फोटो काढतात या कॅमेऱ्याने. त्यामुळे मीही आज प्रयत्न केला. कॅमेऱ्याची क्षमता कमी पडते असे फोटो काढताना.
Black headed ibis
Ruddy Shelduck
.
वावेंइतके छान नाही पण 'आपल्याला जमेल' इतपत कॉन्फीडन्स देण्यासारखे फोटो आलेत.
कालचे आणि आजचे फोटो पाहिले.
कालचे आणि आजचे फोटो पाहिले.
सुगरण,अगदी चिमणीसारखी दिसते.>> देवकींच्या मताशी सहमत. तुमचे खाली दिलेले स्पष्टीकरणही आवडले.
सामान्य तुतवारचाही फोटो
सामान्य तुतवारचाही फोटो अप्रतिम, कचरा नसतातर खडकावर बसलेला पक्षी आणि त्याचे प्रतिबिंब अप्रतीम फोटो झालाय.
उडणाऱ्या पक्षांमधेही दुसरा फोटो जास्त आवडला.
छान येतात पी 900 नी. मला
फोटो छान येतात पी 900 नी. मला पक्षी निरीक्षणाची आवड डीएसएलआर घेतल्यानंतर लागल्याने तोफची होण्याशिवाय पर्याय नव्हता स्पोर्ट मोड आहे, त्यात, त्याने बऱ्याचदा फ्लाईटचे चांगले येतात.
बट रॉ नसेल तर थोडा एनथू कमी होतो माझा, कदाचित सवय झालीये.
लेकला तुम्ही कुठून जाता?
लेकला तुम्ही कुठून जाता? अलीकडील बाजूने एक गेट आहे. ते बंद असते पण विनंती केली की उघडून देतो वॉचमन. मला तेथे जास्त पक्षी आढळले. त्या बाजूला जात नाही कुणी.
>>
3 स्पॉट्स आहेत तिकडे. एक मेन एन्ट्री, दुसरा ब्रिजपालिकडला भाग अन तिसरा म्हणजे बांधाच्या भिंतीजवळचा भाग, जिथे हल्ली गौशाला झालीये.
मेन एंट्रीनीच मी सध्या जातो. तिथे बरेच पब्लिक असल्याने कमी पक्षी असतात. इतर ठिकाणी माणसांचा वावर कमी असल्याने बरेच पक्षी असतात. तरी भरपूर फ्लाय कॅचर्स, फ्लॉवर पेकर्स आढळतात, अन आता वेडर्स पण खूप आलेत.
गौशाळेकडे ओरिओल्स अन बाकी भरपूर आहेत. किंगफिशरच्या तीन प्रजाती एकाच वेळी सापडल्या होत्या मला.
जांभळी कोंबडी पाण्यातल्या,
जांभळी कोंबडी पाण्यातल्या, पाण्याकाठच्या गवताचे शेंडे सोलून आतला मऊ भाग खाते. शेपटीकडचा मागचा पांढऱ्या पिसांचा भाग उडवून जुलै ओगस्टमध्ये मोठा आवाज करत राहाते ते मजेदार असते. पांढऱ्या छातीची कोंबडी मे जूनमध्ये भयानक क्लक्लक्ल करते आणि दोन कोंबड्या भांडतात तेही आसमंतात घुमते. गांडुळं खातात.
बदकं पाण्यातलं शेवाळं खातात. डोक्यावर शेंदरी असलेला आईबिस पाण्यापासून दूर ही गवताळ टेकडीवर चरतो, उडताना आँग आँग ओरडत जातो. बहुतेक गोगलगाई खातो. दुसरा काळा आईबीस मात्र पाण्यातच काही तरी शोधतो. घारी पाण्यात वाहिलेले सडके अन्न गोळा करतात. डोक्यावर मागे दोन काळ्या रेघा असलेले हंस पाण्याकाठच्या शेतातही खातात. वनस्पतीच खातात. जांभळा/करडा करकोचा, चित्रबलाक, ढोकरी हे मासे, बेडुक क्याटफिश पकडायच्या मागे तर गायबगळा गुरांनी उडवलेले गवत किडे खातो. अन्नप्रकार विविध म्हणूनच सर्वांचे जमते.
स्वच्छ असे पाणी यांना कुणालाच नको असते. यालाच नीरक्षीरविवेक म्हणत असावेत.
आज काही खगबंधूंची भेट घ्यायला
आज काही खगबंधूंची भेट घ्यायला वेळ नव्हता. उद्याही नसेल. त्यामुळे सकाळी बाल्कनीतून दिसलेले नेहमीचे पक्षी कॉफी पिताना पाहीले तेवढेच. दोन बाल्कनींना विभागणाऱ्या भिंतीवर निलकस्तूरची मादी (Blue Rock Thrush) अधून मधून येऊन बसते. ती नेमकी आज आली होती. तिचे मिस्टर निलकस्तुर काही मला कधी दिसत नाहीत आजकाल. ही मादी येऊन बसली की मग दहा-पंधरा मिनिटे अगदी निवांत उन्हं खात बसते. पण आज निलकस्तूर आल्या आल्या एका बैराग्याने तिला त्रास द्यायला सुरवात केली. ही कस्तूरी खुप भित्री आहे. तिने शेवटी माघार घेतली व जागा सोडून दोन फुट बाजूला सरकून बसली. तिला तेथून हटवल्यावर बैरागी तेथे येऊन बसला. शेजारी कस्तूर होती. मला एक समजेना की तिला तेथून फक्त दिड दोन फुट हटवून त्याच जागेवर बसण्याचा बैराग्याचा हा हट्ट कशासाठी. मी भिंतीवरचे टेक्चर पाहीले तेंव्हा लक्षात आले की तो बैरागी अगदी जेथे कस्तूर बसली होती तेथेच आणि तसाच बसला होता. अगदी अर्धा सेंटीमिटरचाही फरक नव्हता. हे तर एखाद्या हटवादी मुलासारखे वागणे झाले. दोन मिनिटांनी बैरागी उडून गेला पण कस्तूर काही तेथे बसली नाही पुन्हा. हा काही योगायोग नक्कीच नव्हता. बैराग्याने चक्क दादागीरी करत खोडसाळपणा केला होता. या अगोदरही हे बैरागी इतर पक्ष्यांना हुसकावून त्या जागी बसताना मी खुपदा पाहीले आहे. पण इतकी तंतोतंत जागा घेणे हे जरा विचित्रच आहे.
निलकस्तूरी
Blue Rock Thrush
Pune 21 Dec (8:30 am)
फोटो बारकाईने पाहीला तर समजेल की या बैराग्याने कस्तूर बसली होती अगदी तिच जागा घेतली आहे बसायला.
सातभाई, बैरागी, गोसावी, कोयाळी (जुन्नर भाग), बामनीन (पुरंदर भाग)
Large Grey Babbler
Pune
21 Dec (8:30 am)
नाव गोसावी आणि जागेची हाव किती याला.
कुणी दिसो अथवा न दिसो, ही
कुणी दिसो अथवा न दिसो, ही गप्पीदासची मादी मात्र हमखास मला दर्शन देतेच देते. हिचे खुप फोटो काढले आहेत मी. ही बऱ्यापैकी ओळखते मला. कारण मी खुपदा अँगल बदलावा म्हणुन हिच्या डावी उजवीकडे फिरुन फोटो काढतो. कधी डोळ्यातले आभाळ टिपण्यासाठी जास्त जवळ जातो पण तिचा काही आक्षेप नसतो. पण मी फोटो काढत असताना एक-दोनदा बायको जरा जवळ आली तर ती उडून खुप दुर निघून गेली.
Pied Bushchat (Female)
Pune
21 Dec (8:30 am)
धन्यवाद निलाक्षी!
धन्यवाद निलाक्षी!
थँक्यू रॉनी. मी अजुन मेन गेटने गेलोच नाहीए फोटो काढण्यासाठी. सोमवारी मी जाणार आहे तेंव्हा मेन गेटनेच जाईन.
Srd थँक्यू! छान माहिती आहे ही.
अस्वच्छ पाण्याची माझी तक्रार नाहीए. पण पाण्यात कोणता कचरा असावा याला काही मर्यादा आहेत ना. थर्माकॉलवर बंदी असुनही मोठमोठे तुकडे सर्रास किनाऱ्यावर दिसतात. प्रचंड प्रमाणात प्लॅस्टीक, वॉटर बॉटल, कपडे, घरातील फेकून दिलेल्या वस्तू वगैरे नदीच्या पाण्यात टाकायचे कारण समजत नाही.
कालचे तिन्ही फोटो समोरून
कालचे तिन्ही फोटो समोरून घेतल्याने फार आवडले आहेत. कस्तुर काळानिळा असतो पण मादी फारच वेगळी आहे. पावसाळ्यात धबधब्यात ( राजमाची) कस्तुर पक्षी ढगधुक्यात शीळ घालताना ऐकू येतो. तर कधी पटकन पाण्यातल्या उघड्या खडकावर येऊन काहीतरी पकडून खाऊन उडून जातो.
थँक्यू Srd!
थँक्यू Srd!
नर कस्तूरचा फोटो आहे माझ्याकडे. देतो येथे. तो सहसा दिसत नाही पण मादी रोज दिसते.
आज पाषाणला काम असल्याने जरा
आज पाषाणला काम असल्याने जरा लवकर निघालो. सकाळी ९:०० वाजेपर्यंत तळ्यावर वेळ घालवता येणार होता. पण दुर्दैवाने ९ वाजेपर्यंत सुर्याचे दर्शन झालेच नाही. उन्हे तर पडली नाहीच पण मी निघेपर्यंत चक्क पहाटेचे वातावरण होते. परिणामी फोटो काढता आले नाहीत.
मी गेलो तेंव्हा तारेवर दोन कवडा खंडे (Pied Kingfisher) बसले होते. बराच वेळाने तेथे तिसराही एक पाईड आला. तो जरा अंतर ठेवून बसला. इतक्यावेळ शांत बसलेल्या दोन्ही पाईडने किलकारी मारली. काही सेकंद प्रेम केले आणि ते दोघेही उडाले. तिसराही निघून गेला. पुढील दहा मिनिटात ते दोन्ही पाईड पाच वेळा तेथे येवून बसले. त्यातला एक मधे मधे शिकारीसाठी पाण्यात सुर मारत होता. पण त्याच्या चोचीत मला काहीही दिसले नाही. शेवटचा सुर मारला तेंव्हा मात्र त्याच्या चोचीत मोठा मासा होता. तो मासा पाईडने तारेवर खुप वेळा आपटला. जोरजोरात हिसके दिले. मग तो मासा चोचीने हवेत उडवत बऱ्याच वेळा फ्लिप केला. मग एका झटक्यात गिळला. इतक्यात कुठूनतरी एक कावळा आला व त्याने एका पाईडवर हल्ला केला. माझ्या नजरेत येत होते तेवढ्या तळ्यावर त्या कावळ्या पाईडला पळवले. कावळाही निघून गेला. पण पाचच मिनिटांनी त्याच जागेवर काही वेडे राघू आले व पुन्हा तो कावळा कुठनतरी आला व त्यांच्या मागे लागला. त्या पंधरा मिनिटांमधे तेथून उडणाऱ्या एका राखी बलाकचा (Grey Heron) व एका घारीचाही (Black Kite) त्या कावळ्याने पाठलाग केला. तेथे अनेक पाणकावळे बसले होते, त्यांना मात्र त्याने त्रास दिला नाही. ती जागा ऐन पाण्यात होती. त्यामुळे तेथे कावळ्याचे घरटे, अंडी असण्याची काहीच शक्यता नव्हती. पण त्या पाण्यात व हवाई हद्दीत कावळ्याने कुणाला येवू दिले नाही.
हा तिसरा आगंतूक येऊन बसला पण त्याला पाहून अगोदरच्या दोघांनी जरा घाई केली व प्रेम उरकून घेतले.
तेवढ्या वेळात दोघांपैकी एकाने शिकार केली.
पण कावळ्याने त्यांना तेथे फार वेळ बसू दिले नाही. मी तळ्यावर जाताना गेटवरच एक पाटी पाहिली होती. "कपलला प्रवेश नाही" (पुणेकर्स) मला वाटले तो कावळा त्या नियमाची अंमलबजावणी करतोय की काय.
राखीबलाकचा पाठलाग करणारा कावळा
घारीला पळऊन लावताना.
राखी बलाक जरा जवळ बसला होता.
राखी बलाक जरा जवळ बसला होता. मला त्याचा शेंडी असलेला फोटो पाहिजे होता. पण त्या कावळ्याने त्याला तेथे थांबूच दिले नाही. तरीही पाच दहा मिनिटे मला शांतपणे त्या बगळ्याचे निरिक्षण करता आले. त्याची शेंडी व मानेवरची नक्षी खरच सुरेख दिसत होती. छातीवरुन खाली लटकलेले केसही मस्त दिसत होते. मी फिरत फिरत तळ्याच्या दुसऱ्याबाजूला गेलो. तेथे एक लहानसा बंधारा आहे. त्यावर एक राखी बलाक बसलेला दिसला. त्याच्या आजुबाजूला काही तुतवार व तारवाल्या भिंगऱ्या होत्या. शेजारी तिन मुग्धबलाक व दोन पांढऱ्या कंठाचे खंड्या होते. तो राखी बलाक पाय मुडपुन बसला होता. या पध्दतिने मी चित्रबलाकला बसलेले पाहीले होते. फार विनोद दिसत होते ते दृष्य.
Grey Heron (Ardea herodias)
Pune (Pashan Lake)
25 Dec (8:00)
पाय मुडपून बसलेला राखी बलाक. एखाद्या थकलेल्या म्हाताऱ्यासारखा दिसत होता.
सुरेख संकलन झाल आहे. एखाद ई
सुरेख संकलन झाल आहे. एखाद ई-बुक आरामात बनेल.
धन्यवाद सिद्धि!
धन्यवाद सिद्धि!
एवढं ई-बुक कोण करत बसणार आहे! येथे फोटोवर साधा वॉटरमार्क टाकायचा देखील कंटाळा येतो मला.
कवड्या खंड्याने बराच मोठा
कवड्या खंड्याने बराच मोठा मासा धरलाय!!
आजच्या राखी बलाकचा फोटो विशेष आवडलाय. रंगीत फोटोमध्ये दोनच रंग आहेत बलाकचे आणि आकाशाचे. करड्या रंगाच्या छटा मस्त! दमलेला पक्षीही छानच.
आजचा दिवस काळ्या पांढऱ्याचा!
----------------
वर्णन, निरीक्षण खूप उपयोगी.
मला कधीही वाचनाचा कंटाळा आला
मला कधीही वाचनाचा कंटाळा आला कि हा धागा उघडून मी यातील फोटो पाहत बसतो.
इतके सुंदर फोटो आहेत कि कितीही बघितले तरी समाधान होतच नाही
असेच फोटो टाकत राहा.
तळ्यावर मला सात मुग्धबलाक
तळ्यावर मला सात मुग्धबलाक दिसले. त्यातले सहा तळ्याच्या दुसऱ्या बाजूला होते व एक मुग्धबलाक एका जांभळ्या पाणकोंबडीबरोबर दुसऱ्या बाजूला फिरत होता. गम्मत म्हणजे सगळे मुग्धबलाक एकत्र अन्न शोधत होते व १७ पाणकोंबड्या तळ्याच्या टोकाला जवळ जवळ राहून खाद्य शोधत होत्या. हे दोघे मात्र अगदी दुरच्या एका गवताळ भागात उभे होते. अगदी एकमेकांसोबत असावेत अशा त्यांच्या हालचाली होत्या. अर्थात हे नेहमीचे आहे पण मला आपली उगाचच गम्मत वाटली. आंतर्जातीय विवाह केलेल्या जोडीसारखे दिसत होते मला ते. गेटवरच्या "कपलला प्रवेश नाही" या पाटीला हरताळच फासायचे ठरवले होते वाटते आहे या पक्ष्यांनी.
Openbill Stork (Anastomus)
Pune (Pashan Lake)
25 Dec (7:30 am)
ही मुग्धबलाकची जोडी अन्न शोधताना खुप मग्न झाली होती. ते नक्की काय शोधत होते, खात होते हे समजले नाही. त्यांच्या मोठ्या चोचीत मला काहीच दिसले नाही. कदाचीत अतिशय लहान किडे खात असावेत. नंतर सर्च करेन. अन्न शोधताना ते पुर्ण डोके पाण्याखाली घालत होते. खालील चिखल ढवळताना त्यांचे डोके जवळ जवळ ३६० अंशात फिरत होते.
हाच तो गवतात लपलेला एकांडा शिलेदार. हे सगळे मी गमतीत लिहितो आहे. आजवर नेहमीच पाणपक्ष्यांना एकत्र व सहकार्याने एकत्र वावरताना पाहिले आहे.
आणि हिच ती पाणकोंबडी आणि मुग्धबलाकची जोडी.
आययेम मिस्सिंग रेंज आफ पी 900
आययेम मिस्सिंग रेंज आफ पी 900
बाकी मस्त क्लिक्स! दुसऱ्या बाजूला जायला लागतंय!!
नक्की जा रॉनी. मी
नक्की जा रॉनी. मी बंधाऱ्याच्या बाजूला गेलो होतो आज पण गेस्ट हाऊसच्या गेटने गेलो होतो.
ढोकरी
ढोकरी
या ढोकरीने अगदी एका सेकंदात पंख साफ केले. जादू झाल्यासारखी त्याने पिसे अगदी व्यवस्थित बसवली.
Pond Heron (Ardeola)
Pune (Pashan)
25 Dec (8:30 am)
अगोदर
फक्त एका सेकंदानंतर.
खंड्या
खंड्या
एक खंड्या झाडावर व दुसरा बंधाऱ्यावर मुग्धबलाकच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. जरा बारकाईने पाहीले की लक्षात येते की या खंड्याची किती बारीक व सलग नजर असते पाण्यावर. हा मधे मधे उचकी लागल्यासारखी अंगाला झटके देत असतो.
White-throated kingfisher (Halcyon smyrnensis)
Pune (Pashan Lake)
25 Dec (9:00 am)
मोठा पाणकावळा
मोठा पाणकावळा
हे नेहमीप्रमाणे आपले पंख सुकवत बसले होते. त्यांना कसलीही घाई नव्हती. तशी ती कधीच नसते. यांच्या चोचीचा खालचा भाग शेंदरी असतो. प्लुमेजमधे कसा दिसतो ते माहीत नाही. सर्च करुन येथे लिहीन नंतर. हे विस-पंचवीसच्या संख्येने झाडावर आणि आजुबाजूला बसले होते. दोन पाणकावळे पाण्यात उतरले होते. एक साप (कोणता ते माहित नाही) पोहत आला व या कावळ्यांजवळ गेला. पण कावळ्यांनी दखल घेतली नाही.
Great cormorant (Phalacrocorax carbo)
Pune (Pashan Lake)
25 Dec (8:30 am)
हे कावळ्यांचे झाड. हे कावळे आळशी वाटतात मला. पण पाण्यात उतरल्यावर मात्र त्यांच्यावर नजर ठरत नाही.
हे तिघे खुप कर्कश्श ओरडत होते.
तारवाली भिंगरी
तारवाली भिंगरी
बंधाऱ्यावर काहीतरी खाद्यपदार्थ असावा. सहा सात भिंगऱ्या तेथे गोळा झाल्या होत्या. एक कावळा आला व या उडाल्या. मग त्यांचे आळीपाळीने खाणे सुरु झाले. कावळा चोचीत थोडे घेवून उडायचा व या तेथे येवून बसायच्या. पुन्हा कावळा आल्या की उडायच्या. कावळा चोचीत अन्न घेवून शेजारच्या बोरीच्या झाडावर बसायचा. नंतर त्याने खाली उतरने सोडले व पिकलेली बोरे निवडून खायला सुरवात केली.
Wire-tailed swallow (Hirundo smithii)
Pune (Pashan Lake)
25 Dec (9:00 am)
जांभळी पाणकोंबडी
जांभळी पाणकोंबडी
आज जांभळी पाणकोंबडी फार जवळून व स्वच्छ परिसरात पहायला मिळाली. मी मोजल्या तर एकूण १७ होत्या. म्हणजे माझ्या नजरेत तेवढ्याच आल्या. जास्तही असतील. पाण्यात साठलेल्या जलपर्णी उचकत त्या अन्न शोधत होत्या. परवा मी पाहीले होते त्या प्रमाणे त्या पायााचा उपयोग अन्न शोधण्यासाठी करत होत्या. अचानक एका ठिकाणावरुन दुसरीकडे तुरुतुरु पळत होत्या. येथेही कावळे होतेच पण या पाणकोंबड्या त्या कावळ्यांची फारशी दखल घेत नव्हत्या.
Western swamphen (Porphyrio porphyrio)
Pune (Pashan Lake)
25 Dec (8:30 am)
.
Pages