अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे काय जबरदस्ती आहे का??
ती एक मित्र म्हणून त्याच्याकडे पाहत होती.
इन फॅक्ट कालही आ. सा शुभ्राला बोलताना तसंच म्हणाली
पण शुभ्रा नाही आई हे प्रेम आहे असंच सांगत होती.
कमाल आहे.
नवीन Submitted by me_rucha on 5 December, 2019 - 02:1१
>>>>>>>
हिंदी, मराठी मुवीस आणि सिरियल्स मध्ये असेच तर प्रेम पटवून दिले जाते कारण त्या स्टोरीची सुरुवात आणि अंत डायरेक्टर / लेखक आणि प्रोड्युसरच्या हातात असते. खऱ्या लाईफ मध्ये आपण तर्क वितर्क लावत बसतो. Happy Happy

बिचारी आ सा, असं वाटतंय वाचून. सगळेच आपले निर्णय लादतात तिच्यावर. राजे पण काय तिने होच म्हणायला हवं का.

मी पहिल्यांदाच म्हटलेलतं तर लोक्स रागवले मला.

ती खूपच मूर्ख आहे. राजे लंपट म्हातारा सून आगाव. लेक वेस्टर. म्हातारा इन्सफरेबल.

हावरट लोचट looser dabdya Kurkure ajoba .Radki asavari. Kamtalu शु भ्रा. ओन्ली राजे छान अॅक्टींग करतात आणि दिसतात ही छान. Also Maddy.b

आज च्या म. टा च्या पुणे प्लस मध्ये डबड्या नी लिहिलंय त्याच्या खव्वयेगिरीबद्दल. त्याला मासे आवडतात म्हणे.
आणि त्याने हॉटेल मॅनेजमेंट केलंय म्हणे.
तिकडंच जायचं ना..
इकडे येऊन कशामुळे अशी रटाळ, सुमार ऍक्टिंग करतोय काय माहिती..
भविष्यात हॉटेल काढायचा विचार आहे म्हणे...
बबड्या फारच डबड्या आहे बाबा ऍक्टिंग मध्ये.

अमाच्या डबडया आणि आजोबान्च्या जजमेण्टसबद्दल सहमत. बाकीच्याशी नाही. आसा ज्या प्रकारे राजेन्ची भेट व्हावी म्हणून तळमळतेय ते तो जस्ट बेस्ट फ्रेण्ड आहे म्हणून नाही. कुठलीही स्त्री आणि पुरुषसुद्दा आपल्या बेस्ट फ्रेण्डला मिस करतोय्/करतेय म्हणून इतक डेस्परेट होत नाही. सो, आग दोनो तरफ लगी है

राजे आणि आसाची केमिस्ट्री आवडली. शुभ्रा आणि आसाची सुद्दा.

Kamtalu शु भ्रा. >>>>>>>>> चान्गलच आहे की. तसही आदर्श आणि परफेक्ट सुना बघून कण्टाळा आला होता. हा बदल चान्गला वाटला. सध्या थोडी थोडी मदत करतेय आसाला. पण घरुन काम करते, आजोबा आणि डबडयासाठी घरात थाम्बते ते नाही पटल. हिला घरात छोटी मोठी मदत करायला सान्गितल होत. पूर्ण वेळ घरुन काम करायला नाही. उद्दया नोकरीही सोडायची. Sad

सध्या बबडयाला एक्टिन्ग करायचा चान्स मिळालाय. त्याला राजे आणि आसाविषयी सगळ कळलय. काय तर म्हणे, ' अभिजीत असा असेल हे मला आधी कळल असत तर घरात घेतल नसत त्याला. सोडणार नाही त्याला, पण माझे सन्सकार आड येतात.' आता ह्याला सन्सकार आठवतात? राजेच्या घडयाळाकडे, बाईकच्या चावीकडे हावरटपणे बघत होता तेव्हा कुठे गेले होते हे सन्सकार? दुसर्यान्च्या पा़कीटात हात घालणे ही घाणेरडी सवय आहे हयाची. किती मॅनरलेस असाव माणसान? Sad

पाच लाखाचा चेक घेतला का डबड्याने. प्रज्ञा सदैव कुलकर्णी घरात काय करत असते. चला हवा येऊ द्या मध्ये चांगली टर उडवली सगळ्यांची.

हो चांगलच आहे पण नवऱ्याला पण सुधरवाव जरा तिने ..घरात सासू ला मदत करावी जरा अशी एवढी शांत सासू मिळालिये तर..

हो चांगलच आहे पण नवऱ्याला पण सुधरवाव जरा तिने ..>>> तिचे प्रयत्न चालू आहेत पण जेव्हा तेव्हा आसावरी आडवी येते. मग तो डबड्या तिला म्हणतो कि आईला काही प्रॉब्लेम नाहीये मग तू का आमच्या मधे पडतेस.

भविष्यात हॉटेल काढायचा विचार आहे म्हणे...
बबड्या फारच डबड्या आहे बाबा ऍक्टिंग मध्ये.

नवीन Submitted by me_rucha on 6 December, 2019 - 16:16
>>>
म्हणुन सदानकदा त्या राजेंच्या हॉटेलात पडिक दिसतो आजकाल. Happy

म्हणुन सदानकदा त्या राजेंच्या हॉटेलात पडिक दिसतो आजकाल. Happy>> हो आणि डबड्याचं खरं नाव बहुतेक अभिजित आहे.
तेव्हा तो त्याच्या हॉटेलचंही नाव Abhi's Kitchen ठेवेल का .. Lol

नवीन प्रोमो पाहिला का कोणी,तो डबड्या आसाला मुद्दाम चुकवतो आणि आसा गावाला जाण्यासाठी भलत्याच बसमध्ये बसते.>>> सिरीयसली???? कायच्या काय वाईट्ट दाखवायचंय डबड्याला?

घरात सासू ला मदत करावी जरा अशी एवढी शांत सासू मिळालिये तर.. >>>>>>> हो, मदत करावी की, पण उगीच तिला सुपरवुमन बनवू नये. तसही त्या दोन वेस्टेड कुलकर्ण्यान्साठी ( डबडया आणि आजोबा) तिला खपण्याची गरज नाही आणि आसालासुद्दा. करियरवर लक्ष दयाव तिने.

सिरीयसली???? कायच्या काय वाईट्ट दाखवायचंय डबड्याला? >>>>>>> अगदी अगदी . काल राजे आणि आसाच्या रिलेशनची आजोबान्पुढे अनाऊन्समेण्ट करणार होता. हे त्याला बरोब्बर कळत. एरवी साधा टिव्हीचा रिमोट दयायला सुद्दा ह्याला आई लागते.

तो म्हणत होता, ' माझी आई बिचारी साधी आहे. भोळी आहे. घर ते मार्केट एवढच तिच विश्व आहे. ओ, आता कळल का ह्याला?

ह्याला पाच लाख हवेत राजे़कडून पण आसा आणि त्यान्च रिलेशन त्याला नकोय. एकवेळ त्याचा रिलेशनबद्दलचा नकार समजू शकते, ते स्वाभाविकच आहे म्हणा. पण ह्याच्याकडे जर स्वाभिमान असता तर कळताचक्षणी त्याने तो चेक राजेला परत केला असता.

काल आजोबा मात्र सरप्राईझिन्गली चान्गल बोलले राजेन्शी.

वरच्या लिन्कमध्ये तेप्र छान दिसतेय.

डबड्याचं खरं नाव बहुतेक अभिजित आहे. >>>>>>>> नाही. अनिकेत नाव आहे त्याच.

झीच्या कोणत्याही सिरिअलीतील मुख्य पात्र जरा अतीच वाटतात. आपल्या जीवनात असे पात्र कधीच बघितले नाही, असे काहिसे, त्यामुळे मनाला पटत नाही.

राजेंना माहित आहे ना सोहम कसा आहे ते, मग ते त्याच्यावर विश्वास का ठेवतात. एकदा मंगळसूत्र दिलं, एकदा पाच लाखाचा चेक, आणि याबद्दल कोणाला सांगतही नाहीत.
आज राजेंना मंदिरात वाट बघताना बघून त्यांची दया आली, सोहम असंच एक दिवस राजे आणि आसावरीला कुठेतरी सोडून पळून जाईल, म्हाताऱ्या लोकांना नाही का गर्दीत सोडून देतात.
सरळ स्पष्ष्ट बोलायचं सोडून हे काय पोरखेळ चालवलेत सोहमने.

हायला असले प्रकार चाललेत या मालिकेत? होणार्‍या सावत्र बापाकडून एक तरुण पैसे दागिने लुबाडतो?

तेजश्रीच्याच होणार सूनमध्ये ही कामं करायला तिचा सावत्र मामा आणला होता.

झीवाले त्याच आयडिया व्यवस्थित रिसायकल करतात आणि प्रेक्षक पण आपली चिडचीड रिसायकल करतात.

काही दशकांन तर तेव्हाची पिढी या मालिका बघेल तेव्हा त्यांना वाटत असेल की जुन्या काळच्या लोकां च्या लग्नात कार स्थानं करणं हा एक महत्त्वाचा विधी होता. तिकडे स्वामिनीमध्ये पण हेच चाललंय असं वाचलं.

काही दशकांन तर तेव्हाची पिढी या मालिका बघेल तेव्हा त्यांना वाटत असेल की जुन्या काळच्या लोकां च्या लग्नात कार स्थानं करणं हा एक महत्त्वाचा विधी होता>>अगदी अगदी.

काही दशकांन तर तेव्हाची पिढी या मालिका बघेल तेव्हा त्यांना वाटत असेल की जुन्या काळच्या लोकां च्या लग्नात कार स्थानं करणं हा एक महत्त्वाचा विधी होता>>>>>मस्त!

मला तर ही आसावरी जरा मंद वाटू लागली आहे! सारखं काय आपलं बाबड्या ला नको सांगू, त्याला नको बोलू, त्याची काही चूक नाही......फोन आणि पैसे पण न घेता गावी येते.....
आणि सोहम ला तर एक मुस्काटात मारायला हवी! आईशी कुणी असं वागता का?
काय संदेश जातो अशा मालिकांमधून?

आईशी कुणी असं वागता का?
काय संदेश जातो अशा मालिकांमधून>>खरंय सोहंम हे character संताप आणणारे आहे.

खरंय सोहंम हे character संताप आणणारे आहे. >>> त्याहीपेक्षा त्या डबड्याला बबड्या म्हणून त्याच्या चुकांवर पांघरूण घालणे जास्त संताप आणणारे आहे.

Pages