अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला असे वाटले की या टिनपाट डबड्याला एखाद्या मोठ्या पत्र्याच्या डब्यात बसवुन , त्याचे झाकण बंद करुन जोरजोराने तो डबा बडवावा. >>>>>>> ++++++++१११११११११

आसाने तर लाडावून ठेवलेच आहे डबडयाला, आता तर शुभ्रा सुद्दा त्याचे लाड करायला लागली आहे. तिच्याकडून ही अपेक्षा नव्हती. खा ना रे, खा ना प्लिज! कशाला, गप्प बसायच ना! खाल्ल तर ठीक आहे, नाहीतर राहील उपाशी!

राजेच्या रेस्टॉरण्टमध्ये तर कहरच केला नालायकाने.

असो. बाकी काल पहिल्यान्दाच सोहमला मोकळेपणाने हसताना पाहिल. अभिनय करण्याची सन्धी तरी मिळाली त्याला. माझ्यामते, सोहमच कॅरेक्टर परफेक्ट केलय अनिकेतने.

आसा पैसे रुमालात ठेवायच्या निमित्ताने रुमालात तोण्ड खुपसून रडते त्यावेळी निजोचा अभिनय छान होता. गिओने सुद्दा राजेची सोहमवर होत असलेली चिडचिड परफेक्ट दाखवली.

काल डबडया शुभ्रा आणि राजेच बोलण ऐकत होता , ज्या प्रकारे तो तिला विचारत होता, वाटल, हा आता तिच आणि राजेच अफेअर असल्याचा संशय घेतो की क्काय!

अगदी मलाही तेच वाटलं. त्या डबड्याच्या डोक्यात असलेच विचार येणार. निजो का रडत होती. मला एक कळत नाही, असावारीला विश्वासात न घेता राजे तिचा हात कसा मागतात. कशावरून तिलाही लग्न करायचे आहे. पहिले नवरा नवरीचे ठरायला नको का. जर राजे परस्पर ठरवत असतील आणि असावारीला गृहीत धरत असतील तर राजे आणि आजोबांमध्ये काय फरक Uhoh

मला असे वाटले की या टिनपाट डबड्याला एखाद्या मोठ्या पत्र्याच्या डब्यात बसवुन , त्याचे झाकण बंद करुन जोरजोराने तो डबा बडवावा.>>अगदी बरोबर रश्मी... शिवाय त्या डब्याला सुतळ बांधून आपल्या खड्डे वाल्या रस्त्यावर खडखडत न्यायला हवा.

निजो कडे बरेच दागिने असताना मंगळसूत्र च का विकलं असेल ? आता बहुतेक राजे मंसू घेऊन येणार आणि लग्न लागणार,

मला असे वाटले की या टिनपाट डबड्याला एखाद्या मोठ्या पत्र्याच्या डब्यात बसवुन , त्याचे झाकण बंद करुन जोरजोराने तो डबा बडवावा.>>हाहा हो रश्मी अगदी अगदी असंच वाटत...
मला तर त्याला बघितलंकी संताप होतो.
किती लहान मुलासारखं बिहेव्ह करत होता. काय तर म्हणे दीड लाखाचं घड्याळ पाहिजे.
राजे कितीही श्रीमंत असले तरी दीड लाखांचं घड्याळ रोज घालतील असं वाटत नाही.
कालचा एपिसोड बघितला नाही. निसो स्वतःच मंगळसूत्र विकून घड्याळ आणते वगैरे ड्रामा बघायची इच्छा नव्हती.

अतिलाडाने बिघडावलेल्या बबड्याच्य आईला 'सर्वोत्कृष्ठ आई' पुरस्कार मिळाला याचं वैषम्य वाटतं Uhoh

अरे बबड्या असं करतोय मग त्याची बायको काय करतेय, ती त्याला सुधारण्याचे प्रयत्न का करत नाहीये का तिचा रोल फक्त सासुबाई आणि राजे यांचं कसं जुळेल हा विचार करण्यापुरता आहे.

अतिलाडाने बिघडावलेल्या बबड्याच्य आईला 'सर्वोत्कृष्ठ आई' पुरस्कार मिळाला याचं वैषम्य वाटतं>>>>>>>>>> +११११११

शुभ्राही तशीच असेल. सासूचं लग्न लावून तिला घर बळकावयचं असेल. नाहीतर एवढ्या वर्षात सोहमचा स्वभाव तिला कळलाच नाही हे कसं शक्य आहे. असावारीलाच संस्कारांची गरज आहे.

अतिलाडाने बिघडावलेल्या बबड्याच्य आईला 'सर्वोत्कृष्ठ आई' पुरस्कार मिळाला याचं वैषम्य वाटतं Uhoh>>>>>> कुजकेपणाने दिला असेल. Proud

सर्वोत्कृष्ट आईचा पुरस्कार खरे तर माईला द्यायला हवा होता, सासुचा पण. ( राखेचा ) कारण ती सुन आणी मुलीत कसलाच भेदभाव करत नाही.

कुणीतरी ही लिंक अग्गो सासुच्या फेसबुक पेजवर चिकटवुन या. तेवढेच पुण्य लाभेल. Proud

होय रश्मी.. वयनी, माईने स्वतःची पोरं तर सांभाळलीच पण सवतीच्या पोरांना आणि सुनेला पण आईची माया दिली.. चांगले संस्कार देऊन घडवले (छाया तेवढी बापावर गेली).
झी गौरव मधे किती ग्रुपिजम चालत असावे याचा अंदाजही आला... चांगल्या माणसांना/व्यक्तीरेखेला कोणीच वाली नसतो हेच खरं..!

मालिका विनोदी झाली आहे आता अगदी.
पाणचट आणि बालिश.
पात्रांना एकवेळ म्हातारचळ लागलेला नसेल कदाचित पण लेखकाला वेड मात्र नक्की लागलेलं आहे.
_________________

गाण्याचे संगित, स्टार कास्ट, थीम छान मिळूनही मालिका भंगार आहे.

गाण्याचे संगित, स्टार कास्ट, थीम छान मिळूनही मालिका भंगार आहे.>> हे एकवेळ मान्य करु आपण.. पण मग झी गौरव मधे अशा सर्वोत्टुकार मालिका, सर्वोत्टुकार आई, सर्वोत्टुकार सासुबाई, सर्वोत्टुकार कुटुंब, सर्वोत्टुकार म्हातारबुवा.. ई..ई.. उधळलेल्या ९ पुरस्कारांचे काय..??

झी ने हा काय प्रकार चालवला आहे..? येड्याला शाणं दाखवुन शहाण्या प्रेक्षकांना येडं करण्याचा उद्योग..???

काय तर म्हणे बबड्याला दीड लाखाचं घड्याळ.... दुसरी कोण आई असती तर दीड लाखाचं घड्याळ ऐकताक्षणी बबड्याच्या कानाखाली जाळ काढला असता..!!

तुम्हाला बबड्याचा का राग येतोय? मला त्याच्या आईचा राग येतोय, त्याला आताच एवढे महाग gift घ्यायची सवय लागली तर? काहीही आता काय तो लहान आहे 8-9 वर्षाचा? त्याला सवय लागायला? आणि आता ही वळण लावणार का? अति अति..
ही मालिका त्यातल्या त्यात बरी म्हणावे लागेल.
मुख्यमंत्री, डॉलीची तर.. डोक्यात जातात.. add ही पाहवत नाहीत त्याच्या.
मानबा आहेच height of irritation साठी.
यावेळेस फक्त चला हवा येऊ द्या साठी घेतलं झी तेही एवढा बरं नाही चाललय. झी बंद करावं वाटतंय.
&tv, sab tv घेतलं आहे.

बाकी colors ला जोरात चालूये सगळा. घाडगे आणि सुन सोडून..

निजो का रडत होती. >>>>>>>>>> त्या डबडयाने आईच्या पाकिटातले पैसे चोरलेच, वर हॉटेलचा खर्च भागवण्यासाठी तिच्याकडून आणखी पैसे मागवतो फोनवर. शुभ्रा पैसे देण्याऐवजी टोमणे मारेल असे म्हणाला. सो, त्याने आजोबाकडे मागायला सान्गितले. आसा गेली आजोबान्कडे पैसे मागायला. आजोबान्नी ' माझ्याकडे पैश्याच झाड आहे का' म्हणत आसाचा मनाला लागेल असा अपमान केला. तिच्यापुढे पैसे फेकले. म्हणून ती रडत होती.

मालिकेत काही काही गोष्टी बालिश दाखवल्या आहेत पण मालिका मला तरी अजून भन्गार, पाणचट वाटली नाही. असतात अशी मुले, जे त्यान्च्या चान्गल्या आईवडिलान्ना वात आणतात. आईवडिल कितीही त्याच्यावर रागावले तरीही त्यान्च अश्या मुलान्पुढे काहीही चालत नाही. हा, ते कारखानीन्साच आजोबान्कडे राहण, राजेने आसाच मंगळसूत्र आणण ते मात्र पटल नाही.

त्याला आताच एवढे महाग gift घ्यायची सवय लागली तर? काहीही आता काय तो लहान आहे 8-9 वर्षाचा? त्याला सवय लागायला? >>>>>> नक्कीच लागू शकते. त्याला ऑलरेडी लागली आहे ती सवय. जो माणूस स्वतःच्या आईच्या पाकिटातले पैसे चोरतो ( एवढा मोठ्ठा घोडा झाला तरीही ), ऑफिसच्या कामाचे पैसे स्वतः च्या मौजमजेसाठी वापरतो, लाच घेतली म्हणून त्याला नोकरीवरुन काढूनही टाकल होत त्याला, तो कुणाकडूनही महागडे गिफ्टस सहज स्वीकारु शकतो आणि त्याबदलात तो त्या माणसासाठी काहीही करु शकतो.

माझ्यामते, सोहमच कॅरेक्टर परफेक्ट केलय अनिकेतने. >>>>>>>> अनावधानाने नाव अनिकेत लिहिल. आशुतोष म्हणायच होत मला.

आई कुठे रागावत आहे इथे? अरे बबड्या, माझा बबड्या.. बबड्या घेतोय मग गैरफायदा. शुभ्रानी काय पाहिला? Love marriage आहे न? कि good looks only?

शुभ्राही तशीच असेल. सासूचं लग्न लावून तिला घर बळकावयचं असेल. नाहीतर एवढ्या वर्षात सोहमचा स्वभाव तिला कळलाच नाही हे कसं शक्य आहे. असावारीलाच संस्कारांची गरज आहे.
नवीन Submitted by चंपा on 20 November, 2019 - 12:50
>>>>
मालिकेत अजुन ट्विस्ट अजून बाकी आहे "तुपारे" सारखा.
विक्रांतचा हिरो ते व्हिलन प्रवास झाला तिकडे. अन आता "शुभ्रा" हिराॅईनची "काळिकुट्ट" खलनायिका होईल.
मग तो "कोंबडीच्या" अंडे उबवणे बंद करेल.

Pages