अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याहीपेक्षा त्या डबड्याला बबड्या म्हणून त्याच्या चुकांवर पांघरूण घालणे जास्त संताप आणणारे आहे. >>> Lol खरं आहे. तिनेच खतपाणी घातलं स्वभावाला असं वाटतंय एकंदरीत.

अग्गोबाईच शुटिन्ग अण्णा नाईकान्च्या गावातः>> हो ना सुलु_८२, आधीच माईच्या घरात प्रश्न थोडे आहेत तेव्हा हे कुलकर्णी/राजे तिच्या डोक्याला खुराक म्हणुन निघालेत आकेरीला. ह्या म्हातार्‍या युगुलाचा बावळटपणा थेट नाईकांच्या वाड्यात घुसणार. देवा देवा.. का असं करत आहेत हे अग्गंबाईवाले..?? अग्गंबाईचा टी.आर.पी. घसरला की काय..?? Uhoh

कालचा एपिसोड किती छान होऊ शकला असता पण तो राजेंचा फोन येतो आणि ते एकोमध्ये हाक मारणारे लोक (हाकेगणिक भाषा बदलत होती पहिल्यांदा घाटावरील मग अजून त्याच टोन मधली आणि शेवटी मालवणी नेमके कुठे गेलेत विसरले का ?????) ती एक शेजारीण आजी पाणी भरणारी आधी नीट मालवणी भाषेत बोलली आणि मग अचानक सानुनासिक स्वरात कोकणस्थ ब्राह्मणी भाषा तीहि कानाला गोड वाटत न्हवती. अगदीच इर्रिटेड करणारा एपिसोड शिवाय जिथे आसावरी उतरली आहे तिथली ती बाई तर अगदीच काहीतरी. ते एसटीतले दाम्पत्य पण असेच आधी ती बाई मराठी मग घाटावरील आणि मग माका तुका करायला लागली. यांना नाही येत मालवणी भाषा तर का अट्टाहास करतात बोलाना प्रमाण मराठी.

म्हातार्‍या आजी सुरेख सून म्हणून लक्षात आहे म्हणतात; पण नवर्‍याचा उल्लेख सुद्धा नाही. आणि दोघींपैकी कोणाला आठवण सुद्धा नाही.

जाऊदे हो, राजे आसावरी लग्न झालं की पहिला नवरा प्रकट होईल मालिकेत, किंवा त्याने छळ केला असेल, आजोबा आणि लेक यांचा मिश्र अवतार असेल आणि नंतर राजे फुलाप्रमाणे जपतील मग तिला आठवण येईल हे कित्ती चांगले, माझा आधीचा नवरा कसा होता, सर्व सिरीयलचे फंडे असेच असतात.

किंवा पहिला अगदीच चांगला असून दुर्दैवाने लवकर गेला असेल.

ती तेजश्री फ्लाईट बुक करते म्हणाली का? सावंतवाडीला मुम्बईहुन विमान कि व्ह्याया गोवा? अन तिथे जाउन कशि शोधणार होती देवच जाणे.
आणि किमान बस तरी भलतिच दाखवयाची ना.कणकवलीहुन पुढे २ तास सावंतवाडी आहे. किमान गुगल मॅप् तरी बघायचा ना.

सावंतवाडी विमान आहे का, ओरोसला विमानतळ होणार होता ना.

गोव्यात जाऊन मग जाणार असतील, वड्डे वड्डे लोग वड्डी वड्डी बाते.

अंजू मीपण विमानतळामुळेच चिपीचं नाव प्रथम ऐकलं.
मालवण आणि वे़गुर्ल्याच्या मध्ये आहे.

Chipi
Maharashtra
https://maps.app.goo.gl/1hCGs73ELdjTjkKS9

इथे कितीतरी आडनावांचं मूळ दिसतंय.

विमानतळाचं उद्घाटन झालंय.
विमानं अजून उतरत नसावीत.

मला वाटलं छशिमट सारखं चिपी म्हणजे चिपळुन असेल Happy

ह्या वयाची स्त्री आणि ते ही अशा कौटुंबिक वातावरणातली एका पुरुषाची मैत्री इतकी सहज घेईल का?
मागे राजे त्यांच्या बिल्डिंगखाली येउन बॅंड का काय आणुन गाणं वैगेरे गातात तेव्हाही मी हेच म्हणाले की कुठाल्या बाईला हे ऑकवर्ड वाटणा नाही?

मै जबसे पहले दिन से बोल रही हुं . मी रोजच्या धोब्याला पण कधी घरात घेत नाही. ही फारच आश्रम हरिणी आहे. किंवा बावळट.

{मागे राजे त्यांच्या बिल्डिंगखाली येउन बॅंड का काय आणुन गाणं वैगेरे गातात}
हायला हे वाचून मला झी मराठी पुन्हा घ्यावासा वाटतोय.
मानबामध्ये राधिका काहीतरी पराक्रम करते तेव्हा सौमित्र तिच्या बिल्डिंग खाली बॅंड आणतो ते आठवलं.
ही पण आयडिया रिसायकल

काल तर काय हिला त्या गावच्या नातेवाईक बाईने खायला पण काही ठेवलं नव्हतं. अरे काय पीडा आहे.
काही साधं सरळ चांगलं होतंच नाही का ह्या झीमनट्यांचं.
ती राधाक्का एक तसलीच. काही सुरळीत नाही.

हायला हे वाचून मला झी मराठी पुन्हा घ्यावासा वाटतोय.>>>>> कशाला?
राजे त्यांच्या बिल्डिंगखाली येउन बॅंड का काय आणुन गाणं वैगेरे गातात हे एवढं बघण्यासाठी? युट्यूबवर बघा की ओ.

मुंबईहुन सावंतवाडीला जाताना ज्येष्ठ नागरीक चं कंसेशन घेऊन कोकणकन्या ने आरामात झोपुन जायचं सोडुन म्हातारी एसटीने का गेली..?

कणकवली डेपोकडे एकही चांगली एस.टी. नाही का एवढी जुनाट मेकची एसटी मुंबईला सोडली..? दिवाकर रावतेंना हे कळालं तर कणकवलीचे आगार व्यवस्थापक तिथल्या तिथे निलंबीत होतील Proud

अय्या हा अण्णुचा नेक्स्ट नंबर असेल तर? काय मजा? राजेचा कलाम लागेल डब्याला हॉटेल मिळेल.

अमा... काय भारी लॉजिक आहे हो..! Biggrin
राजेंचं तिकिट रोड-साईड-वेट-लिस्टेड-कंफर्म होणार... आण्णाला नवीन गर्लफ्रेंड मिळणार... माईला रडण्यासाठी अजुन एक कारण मिळणार.. Biggrin Biggrin

अंजू मीपण विमानतळामुळेच चिपीचं नाव प्रथम ऐकलं.
मालवण आणि वे़गुर्ल्याच्या मध्ये आहे. >>> नंतर माझ्या लक्षात आलं, चिपीचं नाव मध्ये ऐकलेलं. तो map मस्त आहे. आम्हाला नंतर एखादी कॅब करावी लागेल तिथून गावाला जायला पण विमानसेवा सुरु झाली तर बराच वेळ वाचेल, इथून दोन तास प्लस तिथे दोन तास धरला आणि मधला एक तास, तरी फरक पडेल.

आता बागबान मोड ऑन .. पक्षी अमिताभ ऐवजी आसा. आणि हेमा च्या जागी राजे. घरामध्ये खायला का~~~हीही नाही. कोकणमेवासुद्धा नाही. (अश्रुपात)

तुम वहा मै यहा...

बरं पुढचा एपिचा प्रोमो पहिला. राजेंची कोकणात एन्ट्री.
आधी एसटीतुन बॅग फेकतात. Uhoh मग हे उडी मारत उतरतात Lol

आजचा भाग मस्त होता, राजेंचा अभिनय एकदम छान... >>>>>>>> +++++++++१११११११११ अगदी अगदी. राजे आणि आसाच फोनवरच बोलण मस्त होत. त्यावेळी वाजवलेल बॅकग्राऊण्ड गोड होत.

आणि सोहम ला तर एक मुस्काटात मारायला हवी! आईशी कुणी असं वागता का? त्याहीपेक्षा त्या डबड्याला बबड्या म्हणून त्याच्या चुकांवर पांघरूण घालणे जास्त संताप आणणारे आहे. >>>>>>>>> +++++++१११११११११ बर, चुकीच्या बसमध्ये बसवल ते बसवल. परत आल्यावर त्याने मदनकाकाकडे साधी चौकशी ( खोटी का होईना) सुद्दा केली नाही आईची. विचारल नाही, आई नीट उतरली ना तुमच्याकडे, तिला त्रास नाही ना झाला काही नाही. फक्त शुभ्रा आणि आजोबान्ना काळजी वाटत होती आसाची. आजोबा वरुन दाखवत नाही, पण त्यान्ना सुनेबद्दल माया आहे.

काय संदेश जातो अशा मालिकांमधून>> हेच, सोहमसारख्या मुलान्पासून सावध राहाव बायकान्नी. ह्याच्यासारखा मुलगा असेल तर आसासारख वागू नये.

किंवा पहिला अगदीच चांगला असून दुर्दैवाने लवकर गेला असेल. >>>>>>>>>> असच असेल अन्जू, मागे एकदा डबडया बोलून गेला होता की, त्याच्या वडिलान्ना फोटोग्राफीची आवड होती. आजोबान्चा विरोध होता त्याला. त्यावरुन त्यान्चे आणि आजोबान्चे वाद व्ह्याचे. तसच एका भागात आजोबा त्याचा मुलगा वारला त्यासाठी आसाला जबाबदार धरताना दाखवले आहे.

अय्या हा अण्णुचा नेक्स्ट नंबर असेल तर? काय मजा? राजेचा कलाम लागेल डब्याला हॉटेल मिळेल. >>>>>>>>> ते शक्य नाही. अण्णाचा काळ १९९० चा दाखवलाय तर अग्गोबाई २०१९. अण्णा देवाघरी गेले एक- दोन वर्षापुर्वी.

फोन आणि पैसे पण न घेता गावी येते..... >>>>>>>> डबडया राजेवरन्चा राग तिच्या फोनवर काढतो. फोन पाण्यात बुडवून खराब करतो. नन्तर तो रिपेअरला दिला अस खोटच सान्गतो. लॅण्डलाईन होल्डवर ठेवून देतो.

पुढचा एपिचा प्रोमो पहिला. राजेंची कोकणात एन्ट्री.
आधी एसटीतुन बॅग फेकतात. Uhoh मग हे उडी मारत उतरतात >>>>>>> आधी बागबान, आता डिडिएलजे/ कुकुहोहै. Lol

बाकी एक चान्गल दाखवल, एरवी आपल्या भारतीय सिरियल्समध्ये हिरो, हिरवीण किव्वा कुणीही कागदपत्रे न वाचता त्यावर सह्या करतात ( आणि नन्तर पस्तावतात.) . इथे मात्र राजेन्नी डबडयाच कॉण्ट्रेक्ट साईन न करता आधी ' मी वकिलाशी बोलून घेतो' म्हणाले. गुड, डबडया गॅसवर गेला आता!

कागदपत्रे न वाचता त्यावर सह्या करतात ( आणि नन्तर पस्तावतात.) . इथे मात्र राजेन्नी डबडयाच कॉण्ट्रेक्ट साईन न करता आधी ' मी वकिलाशी बोलून घेतो' म्हणाले.>>> डबड्याने त्यांना आसावरीला भेटू दिले नाही ना म्हणून रागाने त्यांनी सही करायचे टाळले असेल.

नवीन महत्वाचे काय घडले? निवेदिता पोहचली का कोकणात? >>>>>>> कधीच. सध्या मै वहा तुम यहा चालल आहे दोघान्च. आज राजे को़कणात येतील.

तो मित्र आईला काकूबाई बोलला, तिच्या आणि राजेच्या रिलेशनपशिपबद्दल काहीबाही बोलला तेव्हा बबडया किती चिडला त्याच्यावर. म्हणजे प्रेम आहे त्याच आईवर.

शुभ्राने आजोबान्ना त्यान्च्या नकळत जीभ बाहेर काढून चिडवल. ती मदनची आई त्यान्ना ' कुजका कान्दा' म्हणाली. Lol

Pages