Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32
२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!
ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.
सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..
अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कै च्या कै......
कै च्या कै......
मालिका दुधखुळ्या लहान पोरांकरता चालू आहे, असे वाटू लागले आहे.
वैताग नुसता.
बबड्या आणि आजोबांना पटवले कि
बबड्या आणि आजोबांना पटवले कि संपतीये सिरियल
राजेन्नी काल आजोबान्ना
राजेन्नी काल आजोबान्ना व्हिस्कीची बाटली गिफ्ट म्हणून दिली. आजोबा खुश! हे चालत वाटत कुळकर्ण्यान्च्या घरात.
परवा शुभ्राने आसाला त्या साडीत आजोबान्समोर आणून पहिला मुर्खपणा केला. काल दुसरा मुर्खपणा केला हिने. त्या प्रज्ञाला सान्गायची काय गरज होती की ती साडी राजेन्नी गिफ्ट दिलीये म्हणून. स्वतः घेतली अस खोट सान्गायच ना. आता घेऊन गेली ती साडी आगाऊ प्रज्ञा. बर जेव्हा ती साडी घेत होती तेव्हा सरळ शुभ्राने खेचून घ्यायची होती तिच्या हातातून आणि स्वतः जवळ ठेवायची. तिला आणि आजोबान्ना म्हणायच की , ' आई नाही नेसणार साडी, मी तर नेसेन ना.'
काल राजेन्ना प्रज्ञा ती साडी नेसून आली बघून जे वाईट वाटल ते एक्सप्रेशन्स छान केले गिओने. नुसत्या नजरेने नाराजी दाखवली आसाकडे. नन्तर गॅलरीत आसाबरोबर मूक रोमान्सही छान होता.
आजोबा विक्षिप्तच आहे. त्यान्ना कन्दील लावलेला आवडत नाही म्हणे. एरवी मात्र ' संस्कृती, संस्कृती' चा धोशा लावत असतात. त्यान्ना कळत नाही का, दिवाळीला कन्दील लावण ही आपली संस्कृती आहे. आसाला सरळ कन्दील काढायला लावला त्यान्नी.
दुसर्या दिवशी मात्र आजोबा म्हणतात की मी माझी आवडनिवड कुणावरही थोपवत नाही. माझ्या कुठल्याही विशिष्ट आवडी निवडी नाहीत.' त्यावेळी शुभ्राचे एक्सप्रेशन्स बघण्यासारखे होते.
शिर्याबरोबर कैरीच लोणच? काहीही!
पण त्या आसावरीने राजेंकडून
पण त्या आसावरीने राजेंकडून साडी कशी घेतली, अशी घेतात का. राजेंनी काय सांगून दिली. राजे परकेचना अजूनही, एकदम साडी वगैरे.
बाय द वे प्रज्ञा कोण.
बाय द वे प्रज्ञा कोण.>>>>>>
बाय द वे प्रज्ञा कोण.>>>>>> अग ती बटबटीत बाई नाही का येत वरच्या फ्लॅटमधली. कारखानीसांची सून.
ते आजी- आजोबा इतके लाचार का आहेत? त्या काकू म्हणजे एकदम आशा काळे टाईप्स वाटतात.
अतिशय खालच्या दर्जाचे डायलॉग्स लिहिले आहेत.
अग ती बटबटीत बाई नाही का येत
अग ती बटबटीत बाई नाही का येत वरच्या फ्लॅटमधली. >>> हो का, thank u. मी पहिला भाग बघितला त्यात शेजारची कोणीतरी येते, जरा एजेड आहे. ती दूरदर्शनवर बातम्या द्यायची की काय पूर्वी असं वाटलं. एकच भाग बघितला फक्त , इथे वाचते मात्र.
येते, जरा एजेड आहे>>> हा हा
येते, जरा एजेड आहे>>> हा हा नाही ती नाही .
दुसर्या दिवशी मात्र आजोबा
दुसर्या दिवशी मात्र आजोबा म्हणतात की मी माझी आवडनिवड कुणावरही थोपवत नाही>>हो म्हणाले होते असं आजोबा.
शिरा केल्यावर म्हणाले मी जे ताटात पडेल ते खातो म्हणे.
किती खोटं बोलत होते.
आणि रोज जेवण्याच्या फर्माईशी असतात काय तर आज पालक ची भजी कर. नाश्त्याला अमूकच कर.. आणि काल म्हणतं होते जे पडेल ते खातो.
आता कारखानीसांवर हा पूर्ण आठवडा असणार वाटत.
मला तर ही मालिका बघायची इच्छाचं नाहीय.
रच्याकने : स्टार प्रवाह वरची मोलकरीण मालिका कशी आहे?
त्यात त्या(जोरजोरात बोलणाऱ्या आणि डोक्यात जाणाऱ्या ) उषा नाडकर्णी आहेत ना? आम्ही स्टार प्रवाह घेतलं नाहीय पॅक मध्ये.
8:30 ते 9 मध्ये एखादी मराठी सिरीयल आहे का बघण्यासाठी?
8:30 ते 9 मध्ये एखादी मराठी
8:30 ते 9 मध्ये एखादी मराठी सिरीयल आहे का बघण्यासाठी? >> आमच्याकडे हल्ली या वेळात स्वामिनी बघतात, बघा तुम्हाला आवडली तर
कालच्या भागात एक परफेक्ट
कालच्या भागात एक परफेक्ट दाखवलय. आजच्या कामवाल्या बायकान्ना सुद्दा उष्ट खरकट जेवण दिवाळी म्हणून दिलेल चालत नाही.
स्टार प्रवाह वरची मोलकरीण मालिका कशी आहे?
त्यात त्या(जोरजोरात बोलणाऱ्या आणि डोक्यात जाणाऱ्या ) उषा नाडकर्णी आहेत ना? आम्ही स्टार प्रवाह घेतलं नाहीय पॅक मध्ये.
8:30 ते 9 मध्ये एखादी मराठी सिरीयल आहे का बघण्यासाठी? >>>>>>> हि सिरियल सम्पणार आहे. २५ नोव्हेम्बर पासून तिच्याजागी
अग्निहोत्र २ सुरु होत आहे. ती बघायला सुरुवात करा.
मी सध्या रन्ग माझा वेगळा' बघायला सुरुवात केलीये.
पण त्या आसावरीने राजेंकडून साडी कशी घेतली, अशी घेतात का. राजेंनी काय सांगून दिली. राजे परकेचना अजूनही, एकदम साडी वगैरे. >>>>>> परके कसे? फ्रेण्डशीप झालीये त्यान्च्यात.
अग्निहोत्र २ हीच सिरीयल
अग्निहोत्र २ हीच सिरीयल बहुतेक झी मराठीच साडेआठचं शुक्लकाष्ठ संपवेन बहुतेक!!!
कारखानीस प्रकरण कहर बालिश आहे
कारखानीस प्रकरण कहर बालिश आहे. कारखानीस आजोबांचं पोट किती सुटलं आहे. कुठल्याही कोनातून ते गरीब बिचारे वाटत नाहीत. राजे किती महान आहेत हे दाखवण्यासाठी एवढे बालिश मार्ग.
मी सध्या रन्ग माझा वेगळा'
मी सध्या रन्ग माझा वेगळा' बघायला सुरुवात केलीये. >>> मी नाही बघत. ती नायिका चांगली अभिनेत्री आहे पण ती मुळात गोरी आहे आणि सावळी केलं तिला, मुळ सावळ्या रंगाच्या एखाद्या नायिकेला चान्स द्यायला हवा होता, सात फेरे मधे राजश्री ठाकूर होती तसं कोणीतरी. त्यामुळे पुढे जाऊन ही नायिका गोरी वगैरे होणार की काय असा डाऊट येतो, तसं अजिबात पचनी पडणार नाही. तिला अनेक सिरीयलमधे आधी बघितलेली असल्याने हा सावळा मेकअप मुद्दाम केलाय हे अगदी जाणवतं आणि कृत्रिम वाटतं सर्व. गोखलेला मस्त रोल मिळाला आहे मात्र.
परके कसे? फ्रेण्डशीप झालीये त्यान्च्यात. >>> एकदम साडी वगैरे गिफ्ट घेण्याइतकी झाली इतक्या कमी वेळात.
अग्निहोत्र १चे सगळे एपिसोड
अग्निहोत्र १चे सगळे एपिसोड कुठे बघायला मिळतील?
सोन्याच्या कड्यापेक्षा साडी
सोन्याच्या कड्यापेक्षा साडी कमी किमतीची आहे. आसावरी गेली होती ना पणत्या, वाती आणि तेल घेऊन. एव्हडी महाग साडी भेट दिली आणि तिने घेतली, आसावरी वेड घेऊन पेडगावला जात आहे.
आसावरी वेड घेऊन पेडगावला जात
आसावरी वेड घेऊन पेडगावला जात आहे. >>> ओहह असं आहे काय.
नाही अंजु. तसं नाहीये पण
नाही अंजु. तसं नाहीये पण आसावरी अति भोळी दाखवली आहे म्हणून तसं उपरोधाने लिहिलं मी.
आमच्याकडे हल्ली या वेळात
आमच्याकडे हल्ली या वेळात स्वामिनी बघतात, बघा तुम्हाला आवडली तर>>मी एकदा दुपारी पहिली होती.
गरागरा डोळे फिरवणाऱ्या गोपिकाबाई आणि तोंड वाकडं करणारी छोटी रमा पाहून परत पाहायची हिम्मत झाली नाही.
रमा माधव बाजूलाच राहिले सासू, सून सिरीयल वाटतं होती.
तरीही एकदा बघते कशी वाटतीय ते.
सुचवल्याबद्दल धन्यवाद.
अग्निहोत्र २ सुरु होत आहे. ती
अग्निहोत्र २ सुरु होत आहे. ती बघायला सुरुवात करा>> अरे वा हे माहिती नव्हतं.
धन्यवाद सुलू.
बघेन नक्की
झी मराठी सोडुन स्टार प्रवाह
झी मराठी सोडुन स्टार प्रवाह सुरु करण्यासाठी रिमोटचे बटण दाबलं जाणं फारच कठीण ठरेल.
सदशिवभाउ पार्वतीबाइ जोडी गोड
सदशिवभाउ पार्वतीबाइ जोडी गोड आहे. माधव एकदम डंब दिसतो. आज्यांचे नक्की काम काय? मधेच गायब होतात. पेशवे म्हणजे यतीन कार्येकर का?
झीचा निखिल साने कलर्समधे
झीचा निखिल साने कलर्समधे गेलाय वाटते. काल दिसला त्याम्च्या कार्यक्रमात. तरीच दर्जा इतका सुधारलाय.
कधीच गेलेत ते, फक्त कलर्स
कधीच गेलेत ते, फक्त कलर्स मराठी हा एक भाग आहे, निखील साने तर कलर्सची सर्व channels आणि काही news channels चालवतात त्या कंपनीत (नेटवर्क 18) उत्तम पदावर आहेत. दोन तीन वर्ष झाली. ते सांगत होतेना दोन वर्षापूर्वीपासून विचार सुरु आहे ह्या पुरस्कार सोहळ्याचा.
झी मराठीचे दीपक राज्याध्यक्ष यांनीपण कलर्स मराठी जॉईन केलंय, तेही होते काल.
तुमचे स्वागत आहे ऋचा.
तुमचे स्वागत आहे ऋचा.
राघोबादादा काल नॉमिनेशनमध्ये दिसले. आनन्दीबाई मात्र गायब
काल शेजारी जरा काम होते
काल शेजारी जरा काम होते म्हणून घरंगळत गेले होते. तर शेजारच्या काकुंनी ही सिरीयल लावलेली आणी पहात होत्या. आता मलाही नाईलाजाने पहाणे भाग पडले. नशीबाने एकच सीन वाट्याला आला म्हणून बरे. तो सीन मी मुठ्या आवळत, दातावर दात रोवत उद्विग्न मनाने बघीतला.
सीन पुढीलप्रमाणे : - बबड्या उर्फ डबड्या त्याच्या बायकोला ( शुभ्राच नाव ना ? ) म्हणतो की राजे या वयात कोणाच्या प्रेमात पडलेत? आणी बरेच काही बोलतो. मग शुभ्रा त्याला सुनावते की ते निदान इतके तरी करतायत, नुसतेच पाय लांब करुन सोफ्यावर नाही बसलेत. हे ऐकल्यावर डबड्याचा चेहेरा ओगी या सिरीयल मधल्या जाड्या टपलु की मपलु सारखा होतो.
मग डबड्या बेडरुम मध्ये जाऊन कानाला हेडफोन लाऊन कोणाशी तरी बोलत असतो. तो म्हणतो की त्याला कंपनीने गेस्ट रिसीव्ह करण्यासाठी व त्यांची सोय हॉटेल मध्ये करण्यासाठी पैसे दिलेत. तर तेच त्याने कुठला तरी गेम विकत घ्यायला इकडे वळवलेत. हे ऐकुन माझे कान किटले, धरणी दुभंगल्यासारखे वाटले. अरे निर्लज्ज माणसा, कंपनीचे पैसे लहान मुलासारखे वापरतोस? निदान जनाची नाहीतर मनाची तरी ठेवायची की रे डबड्या.
मला असे वाटले की या टिनपाट डबड्याला एखाद्या मोठ्या पत्र्याच्या डब्यात बसवुन , त्याचे झाकण बंद करुन जोरजोराने तो डबा बडवावा.
तुम्हाला काय वाटते?
रश्मी दंडवत.
रश्मी दंडवत.
बाय द वे ओगी नावाची कार्टून सिरीयल आहे, हे या निमित्याने समजलं, कुठे असते ही सिरीयल.
तुम्हाला काय वाटते?>>>>>>>>>>
तुम्हाला काय वाटते?>>>>>>>>>> मला वाटते डबा का बडवायचा ? डबड्यालाच आय मीन बबड्यालाच बडवायला पाहिजे
अंजु ही सिरीयल कधी कार्टुन
अंजु ही सिरीयल कधी कार्टुन नेटवर्क तरी हंगामा या किडस चॅनेलवर असते. मुळ सिरीयल मध्ये काहीच डॉयलॉग्ज्स नव्हते. मग चॅनल वाल्यांनी ओगी या मांजराला शाहरुख तर बाकीच्या झुरळ मंडळींना अक्षय कुमार, अर्शद वार्सी आणी परेश रावल चा आवाज दिला आणी बाकी कॉमेंट्री नाना पाटेकरच्या आवाजात केली. भयाण विनोदी सिरीयल आहे ही. जरुर बघ. खालीच लोळशील.
https://www.youtube.com/watch?v=xIjvDKVZ3cE
सस्मित
सस्मित
भयाण विनोदी सिरीयल आहे ही.
भयाण विनोदी सिरीयल आहे ही. जरुर बघ. खालीच लोळशील. >>> अच्छा. पण हे channel नाही घेतलं आम्ही, एक कार्टून नेटवर्क घेतलंय फक्त. तेही लावलं जात नाही.
Pages