नुकतीच झालेली घटना, ज्यात हैदराबादमधील एका तरुणीवर अत्याचार करून तिला जाळून मारून टाकण्यात आले. या आधी इथे अनेक चर्चा झाल्या असतील की असे अत्याचार का होतात काय मानसिकता कारणीभूत आहे ई.
मी सुद्धा याविषयी आंतरजालावर अनेक वेळा वाचलेले आहे. मागे एका इंग्रजी बातम्यांच्या संकेतस्थळावर भारतात अशीच एक घडलेली घटना नमूद केली होती, बातमी वाचून झाल्यानंतर त्याखाली आलेल्या टिप्पण्या वाचल्या ज्या खरेतर खरच या विषयावर प्रकाश पाडणाऱ्या होत्या. त्यात भारत आणि इतर पाश्चात्य देशांत असणारी सांस्कृतिक तुलना होती आणि त्यातून बरीच गहन चर्चा होतांना दिसली.
काही नियमित मुद्दे वगळता, जसे की लैंगिक दमन (sexual repression), पुरुषप्रधान संस्कृती हे बऱ्याच वेळी चर्चिले जाणारे मुद्दे सोडून एक महत्त्वाचा मुद्दा दिसला.
एका यूजरचे म्हणणे होते की दक्षिण आशियात पुरुष हे मोठाले ग्रुप करून राहतात, म्हणजे कुठे जायचे असेल, मित्रांसोबत भटकायचे असेल तर चांगला ५-७ जणांचा ग्रुप घेऊन बाहेर पडतात, याऊलट व्हाईट लोकांचे आहे ते बाहेर निघालेच तर एक्कट-दुक्कट मित्रांसोबत निघतात आणि कुठे रेंगाळत बसनेही टाळतात, त्यामुळे अमेरिकेत म्हणे महिला अत्याचार कमी होतात, आणि कोणावर बलात्कार झाला तर तो एका व्यक्तिद्वारे केला जातो, सामूहिक बलात्कार घडत नाहीत.
कदाचित वरील तर्कात तथ्यही आहे. एकटा माणूस असला की त्याला तेवढी हिंमत वाटत नाही जेवढी त्याला ४-५ किंवा मोठाल्या समुहात असतांना वाटते. गावात पान-टपरीवर वगैरे असे मित्रांचे समूह सर्रास दिसून येतात; कॉलेजात जाणाऱ्या येणाऱ्या मुलींची टिंगल-टवाळी करतांना,झुरके ओढतांना दिसतात. कदाचित ही अशी मानसिकता असणाऱ्यांची प्राथमिक किंवा शक्यतो harmless stage असावी.
पण पुढे चालून extreme stage मधली लोकं कायद्याचा वचका कमी झाला किंवा थोडी हिंमत वाढली की अशी कृत्य करत असावी.
तरी इथे या विषयी चर्चा झालेली आवडेल, अनेक माबोकर भारताबाहेर राहतात त्यांचे यावरचे मतही जाणून घ्यायला आवडेल तसेच तुम्ही राहत असलेल्या देशात या विषयीची मानसिकता काय? ई.
पोलिसांनी आरोपींना मारुन
पोलिसांनी आरोपींना मारुन न्याय मिळवून दिला असे तुम्हाला वाटत असेल तर ते फक्त instant gratification आहे, न्याय नाही. त्या बिचार्या मुलीला तर काहीच न्याय मिळाला नाही कारण आरोपी आरोपी म्हणूनच मेले आता गुन्हा सिद्ध होणारच नाही. त्यामुळे कोणाला शिक्षा पण होणार नाही.
जर खरंच पोलिस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करत असते तर ही घटनाच घडली नसती. आज आरोपींना गोळ्या घातल्याने जर उद्यापासून बलात्कारी लोकांमधे दहशत निर्माण होईल असे वाटत असेल तर तो ही कल्पनाविलासच आहे.
माझ्या दुर्दैवाने जर अशी वेळ आलीच तर मी त्या देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून तिथे न्याय मागेन. गुन्हेगाराला शासन होईल यासाठी प्रयत्न करेन. कायदा हातात नक्कीच घेणार नाही.
भरत ,
भरत ,
तुम्ही लिहीलेले मुद्देच लिहा यला आलो होतो.
त्या मुलीची बहीण पोलिसांकडे गेल्यावर तिला ही केस आमच्या हद्दीत येत नाही म्हणून पिटाळून लावलं. त्यांनी त्याच वेळेस योग्य कारवाई करायला सुरुवात केली नाही.
https://www.google.co.in/amp/s/m.hindustantimes.com/india-news/keep-talk...
When her sister rang her back on her mobile phone at 9. 45pm, she found it switched off. Her sister rushed to file a complaint at the nearest police station at Rajiv Gandhi International Airport police station, but she was told by the officers on duty that the toll plaza didn’t fall in their jurisdiction. The family claims they were told that she may have just “eloped with a boyfriend” and also asked whether she had any “lovers or affairs”.
At 3.10am, the family finally managed to register a missing-person complaint at Shadnagar police station. These were crucial hours as the police would discover later: between 9.45 and 10.30pm, the woman was gang-raped and murdered a few metres off the Nehru-ORR toll plaza. The crimes were allegedly plotted hours previously.
व्हिझिबिलिटी असलेल्या लोकांना
व्हिझिबिलिटी असलेल्या लोकांना मारुन, पोलिसांनी त्यांच्या स्वतःच्या पायावर धोंडा नक्कीच नसता मारुन घेतला.>>
म्हणजेच आरोपी कोण आहे यावर वागणूक ठरणार. हा योग्य वावर झाला का?
>>>माझ्या दुर्दैवाने जर अशी
>>>माझ्या दुर्दैवाने जर अशी वेळ आलीच तर मी त्या देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून तिथे न्याय मागेन. गुन्हेगाराला शासन होईल यासाठी प्रयत्न करेन. कायदा हातात नक्कीच घेणार नाही.>> गॉड फॉर्बिड!!! खरं तर असा स्लाइट विचारदेखील आपल्याला फार विखारी वाटतो. तेव्हा तुझ्या-माझ्यावर वेळ या पलिकडचं बोलू यात.
____________
पण एखाद वेळी असे होणे यात फार बाऊ करायची गरज नाही असे वाटते. अर्थात भरत यांनी काही मुद्द्यांत हे दाखविलेले आहे की हे 'क्वचित' नसून याचा भस्मासूर होण्याची शक्यता फार आहे. तेव्हा
______________
परत परत, वारंवार कायदा हातात घेतला जाउ नये हे खरे आहे. पण यावेळी, पोलिसांवर काही कारवाई होउ नये असे विशफुल थिंकिंग आहे खरे.
कारण आरोपी आरोपी म्हणूनच मेले
कारण आरोपी आरोपी म्हणूनच मेले आता गुन्हा सिद्ध होणारच नाही. >>>
पोलिसांना बरंच सीसीटीव्ही फुटेज मिळालं आहे. ते गुन्हा सिध्द होण्यासाठी मोअर दॅन इनफ आहे की.
>>कायदा हातात नक्कीच घेणार
>>कायदा हातात नक्कीच घेणार नाही.<<
इथे कायद्याचं रक्षण करणार्यांनीच कायदा हातात घेतलेला आहे, आणि त्याचं समर्थनहि केलं जातंय. याचा अर्थ आपण लोकशाहिला नाहि तर ठोकशाहिला लायक आहोत. न्यायप्रक्रियेवरचं इतकं अज्ञान किंवा अविश्वास अतिशय चिंताजनक आहे. आशा करतो, एकतरी मायका लाल या एन्कांऊटर विरोधात न्यायालयात दाद मागायला जाईल...
>>>>>हा योग्य वावर झाला का?>>
>>>>>हा योग्य वावर झाला का?>>>> नाही. पण हे सर्व जर-तर बाजूला ठेवू यात. कोणाला माहीत काल्पनिक सिनॅरिओत काय झाले असते.
अशा केसेस मधे हद्द न बघता
अशा केसेस मधे हद्द न बघता पोलिसांनी तक्रार नोंदवून घ्यायला हवी असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत ना?
तक्रार नोंदवून न घेणारे पोलिस पण गुन्हेगार आहेत.
त्यांना पण न्याय निवाडा न करता रात्री कुठे तरी नेऊन गोळ्या घालायच्या का?
सनव, मेलेल्या व्यक्तीवर खटला
सनव, मेलेल्या व्यक्तीवर खटला नाही चालवत.
पोलिसांवरती कारवाई तर होउ
पोलिसांवरती कारवाई तर होउ नयेच पण उदय म्हणतात तसेच पोलिस दिसतात हो पण वरुन मंत्र्यासंत्र्यांचे आदेश येतात, ते दिसत नाहीत.
सगळीकडून पोलिसां वरच दबाव
एक प्रश्न उभा राहतो
एक प्रश्न उभा राहतो
हेच आरोपी श्रीमंत ,प्रतिष्ठित गुंड,राजकीय
अशा फॅमिली शी संबंधित असता तर एवढ्या सहज त्यांचे एन्काऊंटर करणे पोलिस ना जमले असते का.
पण ह्या अशा गुन्हेगारांना न्यायायलायला शिक्षा देणे जमले असते
पहाटे तीन वाजता घटनास्थळी
पहाटे तीन वाजता घटनास्थळी आणलं होतं क्राईन स्क्रीन रिक्रीएट करायला. लख्खं उजेड असेल तेव्हा
हो खटला नाही चालवत पण
हो खटला नाही चालवत पण सीसीटीव्ही बघून गुन्हा सिध्द करता येईल इझिली. भरपूर वेगवेगळ्या ठिकाणचं फुटेज आहे. ते फुटेज आणि पोलिस एन्काऊंटरमध्ये मेलेले लोक हे एकच आहेत हे ताडणं सोपं आहे. त्यामुळे 'ते लोक खरंच होते का गुन्हेगार?' हा प्रश्न उरणार नाही.
"गुन्हेगारांना कायद्याने हात
"गुन्हेगारांना कायद्याने हात पाय तोडून चौरंग करायची शिक्षा दिली असती तरी त्या कायद्याचे समर्थन मी करेन. बलात्कार हा एक निर्घृण गुन्हा असून बलात्काराच्या शिक्षेच्या नुसत्या कल्पनेनेसुद्धा वासनांध लोकांचं डोकं ठिकाणावर येईल अशी तरतूद कायद्यात झाली तर त्याचंही स्वागत आहे.
आता, हैद्राबाद पोलिसांनी परस्पर केलेला न्याय? सदर घटनेत आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे होते. Cctv फुटेज वगैरे.. जलदगती कोर्टातुन निकाल येऊन आरोपींना शिक्षा झालीच असती (अर्थात जन्मठेप झाली असती तर मला वैयक्तिक पातळीवर वाईटच वाटलं असतं, बलात्कारीना फक्त मृत्यूदंडच व्हायला पाहिजे), पण तेवढे कष्ट न घेता पोलिसांनी एन्काऊंटर करून प्रश्न सोडवला आणि विशेष म्हणजे या एन्काऊंटर बद्दल सोशल मीडिया फार खुश आहे, त्यांनी हैद्राबाद पोलिसांचं अभिनंदन केलं आहे*
दुसऱ्या बाजूला, उत्तर प्रदेशातील उन्नाव मधल्या दोन घटना.. पहिल्या घटनेत आरोपी भाजप आमदार सेनगर, आणि दलित पीडिता. जलद न्यायाअभावी त्या पीडित तरुणीच्या सगळ्या कुटुंबाची वाताहत झाली, तिच्या वडील आणि काकांना जीवे मारण्यात आलं. खुद्द पीडितेचा accident घडवून आणण्यात आला, तिच्या वकीलावर देखील प्राणघातक हल्ला झाला. आरोपी अजूनही तकलादू कायद्यामुळे ह्या गोष्टी करू शकत आहेत! दुसऱ्या घटनेत, जामिनावर सुटलेल्या आरोपींनी बलात्कार पीडितेलाच पेटवून टाकलं. 90 टक्के भाजलेल्या त्या तरुणीने स्वतः ambulance बोलावली.
हैद्राबाद पोलिसांनी जे केलं ते चूक की बरोबर, हा मुद्दा बाजूला ठेवून लोकांनी या एन्काऊंटरचं स्वागत एवढं वाजत गाजत का केलं? याचं उत्तर वरच्या दोन घटनांमध्ये आहे. सामान्य जनतेचा कायदा आणि व्यवस्थेवर विश्वासच उरलेला नाही याचं हे द्योतक आहे.
सकाळी सकाळी बातमी वाचल्यावर मी देखील खुश झालेलो, पण थोडा अधिक विचार केल्यावर यातला फोलपणा लक्षात आला. गुन्हेगारांविषयी कोणतीही सहानुभूती नाही, उलट गुन्हेगार स्वस्तात सुटले, असंच मला वाटतं. परंतु, अशक्त कायद्याबद्दल मला नक्कीच सहानुभूती आहे. गुन्हेगार संपले, पण न्याय अजून झाला नाही.
दोनतीन वर्षांपूर्वी
दोनतीन वर्षांपूर्वी दिल्लीतल्या रेयान इंटरनॅशनल स्कुल मधे 7 वर्षाच्या मुलाची हत्या झाली होती. राजधानीत झालेल्या या क्रूर प्रकरणाचा मुद्दा मिडीयाने उचलून धरला....
सगळीकडे हाच विषय सुरू होता. पुढच्या काहि तासात स्थानिक पोलिसांनी स्कुल बस कंडक्टरला आरोपी म्हणून अटक केली....
टिव्हीवर यही है कातील, देखीये मासुम बच्चे का कातील वैग्रे मथळे झळकत होते...डिबेट्स चालू होत्या...
सदर आरोपीला तात्काळ फाशी द्यावी वैग्रे सामुहिक मागण्या होत्या...
पोलिसांनी कंडक्टरने मुलावर अत्याचर करण्याच्या प्रयत्नातुन खून केला..तसं कबूल पण केलं असा दावा केला होता. काहि तासात गुन्ह्याची उकल केल्याचा पोलिसांचा दावा होता.
पुढे त्या मुलाच्या पालकांच्या मागणीवर सुप्रिम कोर्टाने केस सीबीआय कडे ट्रान्सफर केली. सीबीआयने शाळेतल्या एका 16 वर्षाच्या मुलाला अटक केली...त्याने परीक्षा पुढे ढकलन्यासाठी खूण केल्याचा सीबीआयचा दावा आहे.
सीबीआयला बस कंडक्टरचा खुनामधे कोणताही सहभाग आढळून आला नाही. काहि महिन्यांनी बस कंडक्टरविरुद्ध कोणतेही पूरावे नव्हते म्हणुन विशेष न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केले....!
झटपट न्याय हा कितीही चांगला वाटला तरी त्यातुन खरे आरोपी सुटण्याची शक्यता असते, शिवाय गुन्हामागचे खरे सूत्रधार देखील सुटण्याची शक्यता असते.तडकाफडकी कारवाईमुळे पोलीस आणि प्रशासनाचा नाकर्तेपना जनतेसमोर येण्याची संधी देखील जाते.
न्याय म्हणून हे काहि लोकांना कितीही योग्य वाटंत असलं तरी प्रशासनाचं हे वेगवेगळ्या पातळ्यांवरचं अपयश आहे......!
(क्रूर स्वरूपाच्या गंभीर गुन्ह्यतील आरोपींबद्दल वेगळ्या भावना असण्याचं कारण नाही. प्रशासनाने प्राधान्याने अशा केसेस सोडवाव्यात व सबळ पुराव्यानिशी स्ट्रॉंग केस कोर्टात उभी करून जास्तीत जास्त शिक्षा मिळवून द्यावी तसेच असे प्रकार होऊ नयेत म्हणुन करावयाच्या इतर उपाययोजना देखील बरोबरीने अंमलात आणाव्यात हि कायमस्वरूपी मागणी आहे)
Gajanan Gaikwad
बस कंडक्टर केसमध्ये पुरावे
बस कंडक्टर केसमध्ये पुरावे नव्हते. इथे भरपूर सीसीटीव्ही फुटेज आहे. त्यामुळे गुन्हेगार कोण हे जाणणं सहज शक्य आहे. मिडियाने ते फुटेज आणि गुन्हेगारांचे चेहरे ऑलरेडी ताडून बघितले असतील.
मय कोर्टात न्याय झाला असता की
मय कोर्टात न्याय झाला असता की. रात्री ३ वाजता कुठल्या उजेडात पाहणी करायला आले होते ?
अमेरीकेचा/ तिथल्या
अमेरीकेचा/ तिथल्या न्यायदानाचा विषय दोन तीन वेळा निघालेला पाहून मला Central Park jogger case सारखी आठवते आहे.
पोलिसांनी परस्पर न्ाय निवाडा करणे योग्य तपास न करता स्वत:ची प्रतिमा जपण्यासाठी / कारवाई केली दाखविण्यासाठी भलतेच काहीतरी करणे फार घातक आहे.
ते खरेच गुन्हेगार होते याचे
ते खरेच गुन्हेगार होते याचे फुटेज असले , डीएनए वगैरे पुरावे असले तरी खटला उभा राहून, पुरावे देवून शिक्षा यातले क्लोझर नाही. अगदी ते गुन्हेगार होते याबाबत माझ्या मनात कसलीही शंका नसली तरी ते चओघे आरोपी म्हणून मेले, पोलीसांच्या ताब्यातून पळून जाण्याच्या , त्यांच्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात मेले . यातून सिस्टिम मधली तृटी दिसते. एंकाऊंटर हे नॉर्मल नाही. ती नाईलाज म्हणून , आणिबाणिच्या क्षणी केलेली कृती! यात विजय मानण्यासारखे काही नाही. या सगळ्यात पोलीसांना दुखापत होणे, जीवावर बेतणे झाले असते तर आपण उन्मादात ते शहीद झाले म्हणत रडलो असतो. पण मूळ प्रश्न तसाच रहातो त्याचे काय?
>>बस कंडक्टर केसमध्ये पुरावे
>>बस कंडक्टर केसमध्ये पुरावे नव्हते. इथे भरपूर सीसीटीव्ही फुटेज आहे.<<
प्रश्न गुन्हेगार होते किंवा नाहि, हा नाहि. गुन्हेगार आहे/नाहि हे ठरवणार कोण, आणि शिक्षा/न्याय देणार कोण, हा आहे...
पुरावे आहेत तर पोलीस ते
पुरावे आहेत तर पोलीस ते न्यायालयात मांडण्याऐवजी स्वत.च का निवाडा करू लागले?
ज्या केसेसमध्ये गुन्हा सिध्द
ज्या केसेसमध्ये गुन्हा सिध्द झालेला नाही, काँक्रिट प्रूफ नाही आणि ज्या केसमध्ये सीसीटीव्ही वगैरे स्पष्ट (self evident) पुरावे आहेत या दोनमध्ये फरक करायला हवा.
म्हणजे इथे 'कशावरुन तेच गुन्हेगार होते?' हा प्रश्न येत नाही. तेच गुन्हेगार होते, आणि त्यांना त्याच सेम लोकेशनला नेऊन गोळ्या घातल्या जिथे त्यांनी प्रियंकावर अत्याचार केले होते.
प्रॉपर प्रोसेस फॉलो करुन शिक्षा व्हायला हवी होती हे आयडियल सिच्युएशनमध्ये बरोबर आहे. पण खरोखर प्रॉपर प्रोसेसमध्ये नीट केस मांडली गेली असती? की पुरावे टँपर केले गेले असते? फुटेज गायब झालं असतं? गुन्हेगार पळून गेले असते? किंवा त्यांना ५- ६ वर्ष शिक्षा होऊन ते लवकर मोकाट सुटले असते? किंवा त्यांची जात-धर्म आणि पिडितेची जात-धर्म यावरुन कोणीतरी केस हायजॅक केली असती? कायदे नीट केलेले आहेत पण पळवाटाही आहेत आणि implementation मध्ये त्रुटीही आहेत. यामुळेच सामान्य लोक (नॉन विचारवंत) आनंद व्यक्त करत आहेत- बिकॉज दे हॅव सीन टू मेनी रेप्स गो अनपनिश्ड.
त्यामुळे खरं तर दोनच पॉसिबल आउटकम होते- केस बारगळणं किंवा तिचा हा असा झटपट शेवट होणं.
दुसरं- जितकं outrage , थयथयाट इथे काही लोक रेपिस्ट्सना मारलं म्हणून करत आहेत त्याच्या एक शतांश तरी याच विचारवंत लोकांनी रेप इश्यूबद्द्ल, प्रॉपर प्रोसेस सुधारण्याबद्दल केला तर खरोखर सिस्टिम सुधारेल.
प्रद्युम्नच्या केसमध्ये
प्रद्युम्नच्या केसमध्ये पोलिसांनी टॉर्चर करून कन्फेशन घेतलं होतं.
पुरावे आहेत हे पुन्हा पुन्हा सांगितल्याने एन्काउंटर जस्टिफाय होतं नाही.
पोलीसांनी तक्रार नोंदवताना, चौकशी करताना कर्तव्युच्युती केली.
त्यांची भरपाई हे एन्काउंटर ?
पोलिसांचाच न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही हे त्यांच्याही कामाबद्दलच स्टेटमेंट आहे.
सनम,
सनम,
रेप इश्यूबद्द्ल, प्रॉपर प्रोसेस सुधारण्याबद्दल प्रयत्न केले जात नाहीयेत असे का वाटते तुम्हाला? हे काम आपण सगळ्यांनीच करायला हवे ना? ही फक्त विचारवंतांची जबाबदारी नाही. तसे म्हणणे म्हणजे सामान्य जनतेला कमी लेखणे. आणि इथे खरेच थयथयाट केला गेला का? की विरोधी मत मांडणे म्हणजे थयथयाट?
न्याय झाला नाही म्हणणाऱ्यांनी
न्याय झाला नाही म्हणणाऱ्यांनी एकदा निर्भयाच्या आईचं यावरचं मतही ऐका ...
https://youtu.be/q0W5j4CWmFM
मेणबत्ती मोर्चापेक्षा या
मेणबत्ती मोर्चापेक्षा या एन्काऊंटरमुळे आणि त्यावर जनतेने दिलेल्या आनंदाच्या प्रतिक्रियेमुळेच आपली जस्टीस सिस्टीम लवकर सुधारण्याची गरज आहे हे जबाबदार अधिकाऱ्यांना / सरकारला अधिक जाणवेल हे नक्की .
निर्भया व त्यासारख्या इतर गुन्ह्यांमधल्या गुन्हेगारांना वेळच्यावेळी गंभीर शिक्षा झाल्या असत्या तर आजच्या एन्काऊंटरला जनतेने निश्चितच डोक्यावर घेतलं नसतं .. देशाच्या न्यायव्यवस्थेकडूनच न्याय व्हावा ही सामान्य माणसाची इच्छा आहे पण ती पूर्ण करण्यास न्यायव्यवस्था असमर्थ ठरल्यानेच कसा का होईना मिळालेला न्याय जनता डोक्यावर घेत आहे .
राधानिशा,
राधानिशा,
त्यांना त्यांचे मत मांडायचा अधिकार आहेच . पिडीतेच्या आईचे दु:ख ! मी त्या दु:खाची कल्पनाही करु शकत नाही. मात्र त्याच वेळी माझे एनकाउंटरबाबत जे मत आहे ते माझ्या वाईट परीस्थितीतही बदलू नये अशीच प्रार्थना आहे.
>>मेणबत्ती मोर्चापेक्षा या एन्काऊंटरमुळे आणि त्यावर जनतेने दिलेल्या आनंदाच्या प्रतिक्रियेमुळेच आपली जस्टीस सिस्टीम लवकर सुधारण्याची गरज आहे हे जबाबदार अधिकाऱ्यांना / सरकारला अधिक जाणवेल हे नक्की .> हे भाबडेपणाचे आहे. लोकांना खुश ठेवायचा हा नेहमीचा शॉर्टकट झाला तर?
स्वाती तुम्ही जे म्हणताहात ते
>>>>>>>>लोकांना खुश ठेवायचा हा नेहमीचा शॉर्टकट झाला तर?>>>>>>>>>स्वाती तुम्ही जे म्हणताहात ते फीयरमॉन्गरिंग आहे. भयावह काहीतरी होइल, होइल, हा कल्पनाविलास.
सर्रास बलात्कार होणे ही वस्तुस्थिती आहे.
सामो, हे फियरमॉन्गरिंग नाही.
सामो, हे फियरमॉन्गरिंग नाही.
आई डोळ्यात तेल घालून का जपते ते कळायचेही वय नव्हते तेव्हाही सेक्शुअल अॅसॉल्टचे भय होते आणि आज पन्नाशी उलटल्यावरही आहे. भारतातही होते आणि इथ अमेरीकेतही आहे. हे भय सोबत घेवूनच बदलासाठी प्रयत्न सुरु आहेत. जे एंकाउंटर घडले ते अपवादच असावे. त्याकडे तसेच बघावे. पण लोकं त्याला न्याय म्हणून आनंदात आहेत. अशा वेळी लोकक्षोभ टाळण्यासाठी हे असे परत होणार नाही कशावरुन असे वाटणे आहे.
पोलीस पाठलागात मृत्यू हे इथे नविन नाही. पण त्याकडे कधी न्याय मिळाला म्हणून बघितले जात नाही. ती दुर्दैवी घटनाच असते.
>>>>सामो, हे फियरमॉन्गरिंग
>>>>सामो, हे फियरमॉन्गरिंग नाही.>>> स्वाती असे एन्काउंटर हा पायंडा होउन बसेल - हे फीयरमॉन्गरिंग आहे, असे म्हणते आहे मी.
अर्थात तुम्ही असे काही सुचित केलेले नाही. कदाचित माझीच भीती मी बोलून दाखवली एक प्रकारे.
____
>> पण लोकं त्याला न्याय म्हणून आनंदात आहेत. अशा वेळी लोकक्षोभ टाळण्यासाठी हे असे परत होणार नाही कशावरुन असे वाटणे आहे.>>> येस हेच!!!
Pages