हैदराबाद- महिला अत्याचार मानसिकता.

Submitted by प्रशि_क on 1 December, 2019 - 00:01

नुकतीच झालेली घटना, ज्यात हैदराबादमधील एका तरुणीवर अत्याचार करून तिला जाळून मारून टाकण्यात आले. या आधी इथे अनेक चर्चा झाल्या असतील की असे अत्याचार का होतात काय मानसिकता कारणीभूत आहे ई.

मी सुद्धा याविषयी आंतरजालावर अनेक वेळा वाचलेले आहे. मागे एका इंग्रजी बातम्यांच्या संकेतस्थळावर भारतात अशीच एक घडलेली घटना नमूद केली होती, बातमी वाचून झाल्यानंतर त्याखाली आलेल्या टिप्पण्या वाचल्या ज्या खरेतर खरच या विषयावर प्रकाश पाडणाऱ्या होत्या. त्यात भारत आणि इतर पाश्चात्य देशांत असणारी सांस्कृतिक तुलना होती आणि त्यातून बरीच गहन चर्चा होतांना दिसली.

काही नियमित मुद्दे वगळता, जसे की लैंगिक दमन (sexual repression), पुरुषप्रधान संस्कृती हे बऱ्याच वेळी चर्चिले जाणारे मुद्दे सोडून एक महत्त्वाचा मुद्दा दिसला.

एका यूजरचे म्हणणे होते की दक्षिण आशियात पुरुष हे मोठाले ग्रुप करून राहतात, म्हणजे कुठे जायचे असेल, मित्रांसोबत भटकायचे असेल तर चांगला ५-७ जणांचा ग्रुप घेऊन बाहेर पडतात, याऊलट व्हाईट लोकांचे आहे ते बाहेर निघालेच तर एक्कट-दुक्कट मित्रांसोबत निघतात आणि कुठे रेंगाळत बसनेही टाळतात, त्यामुळे अमेरिकेत म्हणे महिला अत्याचार कमी होतात, आणि कोणावर बलात्कार झाला तर तो एका व्यक्तिद्वारे केला जातो, सामूहिक बलात्कार घडत नाहीत.

कदाचित वरील तर्कात तथ्यही आहे. एकटा माणूस असला की त्याला तेवढी हिंमत वाटत नाही जेवढी त्याला ४-५ किंवा मोठाल्या समुहात असतांना वाटते. गावात पान-टपरीवर वगैरे असे मित्रांचे समूह सर्रास दिसून येतात; कॉलेजात जाणाऱ्या येणाऱ्या मुलींची टिंगल-टवाळी करतांना,झुरके ओढतांना दिसतात. कदाचित ही अशी मानसिकता असणाऱ्यांची प्राथमिक किंवा शक्यतो harmless stage असावी.

पण पुढे चालून extreme stage मधली लोकं कायद्याचा वचका कमी झाला किंवा थोडी हिंमत वाढली की अशी कृत्य करत असावी.

तरी इथे या विषयी चर्चा झालेली आवडेल, अनेक माबोकर भारताबाहेर राहतात त्यांचे यावरचे मतही जाणून घ्यायला आवडेल तसेच तुम्ही राहत असलेल्या देशात या विषयीची मानसिकता काय? ई.

Group content visibility: 
Use group defaults

निर्भयाला अजूनही न्याय मिळाला नाही. ही भारतीय न्यायसंस्था. >>
बरोबर आहे.
पण आता लोकांना न्याय पोलीस आणि मीडिया देतील असं वाटतं?

आठवण करून द्यायला. हैद्राबाद केस - मुलीचे कुटुंब पोलिसांकडे गेले तेव्हा पोलि सांनी त्यांना " ती पळून गेली असेल" असं म्हणून वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या.

हैद्राबाद गॅंगरेप व हत्या प्रकरणातील चारही आरोपी, पोलीस चकमकीत ठार.
कालपर्यंत विनाचौकशी चारही आरोपींना भरचौकात फाशी द्या असे म्हणणारी मेणबत्ती मोर्च्या गॅंगने आज हैद्राबाद पोलीसांवर टिकेची झोड उठवली आहे.

पोलिसांनी न्युज देणे आणि. भर चौकात पब्लिक समोर निर्णय घेणे ह्यात फरक आहेच. इथे पोलिस स्वत:ला वाचवत आहेत असे वाटते.

जया बच्चन भर सभेत म्हणाली, पब्लिकने भर चौकात मारलं पाहिजे.

कालपर्यंत विनाचौकशी चारही आरोपींना भरचौकात फाशी द्या असे म्हणणारी मेणबत्ती मोर्च्या गॅंगने आज हैद्राबाद पोलीसांवर टिकेची झोड उठवली आहे.>>>>>

तेच तर....

या लोकांना फक्त छाती पिटुन रडायचे आहे. कसलीही कृती नकोय.

जया बच्चन भर सभेत म्हणाली, पब्लिकने भर चौकात मारलं पाहिजे>>>>>>

ताईंनी लिंचिंग शब्द वापरला आहे. मायबोलीवर या शब्दाला किती महत्त्व आहे हे माहीतच आहे.

खरंच आपण सारे सुरक्षित आहोंत?
स्त्रिया, लहान मुले, मुली, होणारे अत्याचार
रस्त्यावर होणारे अपघात, मारहाणी
बुडणाऱ्या बँक, संस्था, भीतीचे सावट
संरक्षण जबाबदारी, कर्तव्ये कोणाची
सारे काही अनुत्तरित आहे .....

https://www.deccanchronicle.com/nation/current-affairs/301119/priyanka-r...

Well informed sources told Deccan Chronicle that various options and scenarios were being discussed even as the interrogation of the four accused was underway. While some were of the opinion that “results have to be shown” immediately, there were suggestions that came from some officials. But in the end, it is learnt, the top bosses in the government directed the police to go ahead with arrest.

The hush-hush discussion that “something more than arrest” would calm public anger was aimed at sending across a message that the Telangana police will not taking things lying down when it came to such macabre crimes. “The pros and cons of various scenarios were discussed,” was all an official said. They said that often it becomes difficult for the men in khaki to take a decision on the course of action when public anger is high.

ही ३० नोव्हेंबरची बातमी आहे.

आरोपींनी स्वतः गुन्हा कबूल केल्यावर त्वरीत कठोर शिक्षा सुनवता आली नसती का?
त्याने कायद्याचा वचक राहिला असता ना
ह्या घटनेमुळे सगळ्याच गुन्ह्याचा असाच निकाल लागेल का?

<<< निर्भयाला अजूनही न्याय मिळाला नाही. ही भारतीय न्यायसंस्था. >>>

----- सहमत. पण या चौघांना मारुन अत्याचार झालेल्या तरुणीला न्याय मिळाला असे वाटते का ? तिची काहीच चुक नसतांना तिला जिवाची किंमत मोजावी लागली... यांना मारुन तिचा जिव परत येणार नाही. तिच्या कुटुंबाला दिर्घकाळ/ आजन्म या घटनेमुळे अतोनात मानसिक त्रास होणार.

अत्याचाराची घटना घडल्यावर प्रचंड जनक्षोभाच्या रेट्यापुढे न्यायालया बाहेर शिक्षा देण्याचे प्रकार थोडावेळ चांगले वाटतात, क्षणभर मनाला समाधान देतात.... पण पोलिसांनी आरोपींना / अपराध्यांना परस्पर जिवाने संपवणे, आणि न्याय निवाडा करण्याचा पायंडा पडणे अत्यंत चुकीचे आहे.

स्वसंरक्षणासाठी पोलिसांचा गोळीबार आणि चारही आरोपी ठार... अशा प्रकारे कोर्टाच्या बाहेर आरोपींना संपवल्याने भावी काळात अत्याचाराच्या घटना टळतील असे मला नाही वाटत.

कसली त्वरीत कठोर शिक्षा करतायत , सात वर्षं झाली दिलेली फाशीची शिक्षा अंमलात आणता येत नाही यांना बेकार न्यायव्यवस्थेमुळे , अपीला मागून अपीलची नाटकं चालू आहेत .. या केसचं झालं ते चांगलंच झालं .

<< मग लिचिंगला मराठीत काय म्हणणार? >>

----- कुठलिही चौकशी न करता जमावाने ठार (फासावर देणे, दगडाने ठेचणे, पब्लिक मार) मारणे

हो मग कायद्यात बदल, सुधारणा करणं अपेक्षित आहे.
असं एन्काउंटर करण्म किती योग्य आहे? आताही आणि भविष्यासाठीही

आरोपींना गोळ्या घालून मारणाऱ्या पोलिसांना बेड्या ठोकल्या पाहिजेत. हा न्याय झाला नाही. कारण गुन्हा प्रस्थापितच झाला नाही. This just shows how inefficient our system is.

अत्यंत चुकीची गोष्ट. आता असा पायंडा पडेल. पोलीस हे कायद्याचे रक्षक आहेत. त्यांनी न्याय करणं अपेक्षित नाही. ते काम न्यायालयाचं आहे.>>>
आरोपींना गोळ्या घालून मारणाऱ्या पोलिसांना बेड्या ठोकल्या पाहिजेत. हा न्याय झाला नाही. कारण गुन्हा प्रस्थापितच झाला नाही. This just shows how inefficient our system is.>>>>

अत्यंत योग्य आणि उत्कृष्ट काम केल आहे भारतीय पोलिसांनी. जेव्हा उघड आहे गुन्हा कुणी केला आहे ते कशाला वेळ वाया घालवायचा ? फुकट टॅक्स पेअर्सच्या पैशामध्ये निवांत आयुष्यभर खात बसले असते हे ४ राक्षस. निर्भया प्रकरणाची डॉक्युमेंटरी बघितलीत का ? आरोपी कुठेही गिल्टी वाटून घेत नाही आहेत. उलट जरा जास्तच शिक्षा होती आहे म्हणुन गळे काढताना दिसत होते.
हा न्यायच केला आहे पोलिसांनी. इथे काही वर्षापुर्वी फ्लोरिडाला टेररिस्टला पकडलेले. केस चालु होती. कॉप्सनी त्याने हल्ला केला आहे असे भासवून सरळ मारून टाकलेले त्याला.
इथे आमच्या गावात , ४० स्पीडच्या झोन मध्ये १०० स्पीड ने गाडी चालवून , रेड सिग्नल वर गाडी तशीच दामटुन दुसर्‍या कारला टी बोन केल एका नालायक माणसाने. प्रिस्ट , त्यांची पत्नी, तीन अ‍ॅडॉप्टेड छोटी मुल जागच्या जागी गेली. एक कुटुंब गेलच. पण त्याच बरोबर त्या प्रीस्टनी आणि त्यांच्या पत्नीने इतक मोठ कार्य करत होते जवळच पेरु देशा मध्ये ते थांबल. हजारो लोकांचे नुकसान झाले . त्या सिग्नल तोडणार्या माणसाला हॉस्पिटल मध्ये अ‍ॅडमिट केल आणि न्यायदानाची प्रोसेस सुरु ठेवावी लागली. त्याच्या नर्सने त्यावर लेख लिहिलेला कि कस त्या माण्साला जराही रिमॉर्स नाही. कसा तो स्वतःलाच प्रोटेक्ट करण्याविषयी बोलत होता आणि शेवटि तिने हेच लिहिलेल कि , शक्य असत तर तिनेच कायदा हातात घेवून त्याला मारल असत.
असल्या लोकांची गरज काय आहे पृथ्वीवर. न्याय वगैरे देण्याची आणि त्यांच्यावर रिसोर्सेस वाया घालवण्याची गरज नाही. मानवी हक्क वाल्यांना जर पुळका येत असेल तर थोडे दिवस जावून त्या बिचार्‍या मुलीच्या अगतिक आईवडीलांबरोबर राहून बघावे. त्यांचे , त्या मुलीच्या नातेवाईकांचे आयुष्य अक्षरशः कायम स्वरुपी बदलले. निदान आता ही सो कॉल्ड न्याय देण्यामध्ये त्यांची फरफट तरी थांबेल. बिचारे परत कधी नॉर्मल आयुष्य जगू शकणार नाहीत पण क्लोजर तरी मिळाल त्यांना.
तिकडे त्या डर - शाहरुख धाग्यावर पण लोकांनी शाहरुखचे कॅरॅक्टर मेलेले बघून वाईट वाटले , लग्न झाल्यावर ते कॅरॅक्टर बदलले असते वगैरे कमेंटी लिहिल्या आहेत. अक्षरशः चीड आली ते वाचून. मॅनिप्युलेटर, अ‍ॅब्युजिव्ह नार्सिस्ट कॅरॅक्टर मरायलाच हवे होते . त्याला कसला चान्स द्यायचा ?.

दुसर्‍यांना जगण्याची संधी नाकारणार्‍या लोकांना फेअर ट्रीटमेंट ची गरज नव्हती आणि नाही. निदान आता थोडी चपराक बसेल असले उद्योग करण्यापुर्वी .

<< आरोपींना गोळ्या घालून मारणाऱ्या पोलिसांना बेड्या ठोकल्या पाहिजेत. >>

----- पोलिसांवर प्रचंड दबाव आहे / असेल... ते दबावातच काम करतात... बळीचे बकरे ठरतात...

"मारण्याचे आदेश" देणारा नागरी अधिकारी /मंत्री सहीसलामत असतो.

धाग्याचा विषय महिला अत्याचार मानसिकता आहे म्हणून.

कथुआ प्रकरणी आरोपींच्या बाजूने मोर्चे निघाले होते. सुनावणी दुसर्‍या राज्यात हलवावी लागली. आरोपींच्या विरोधात खटला लढवणार्‍या वकील महिलेला अन्य वकिलांकडून, वकील संघटनेच्या प्रमुखाकडून धमक्या मिळत होत्या.

यासाठी कठोर कारवाई करायलाच हवी.
जसं मुलींना शिकवलं जातं की कसा राहायचं, कसं वागायचं, संस्कार केले जातात,नियम घातले जातात तसचं प्रत्येक घरात हे संस्कार मुलांवर सुध्धा व्हायला हवेत.

अत्यंत योग्य आणि उत्कृष्ट काम केल आहे भारतीय पोलिसांनी. जेव्हा उघड आहे गुन्हा कुणी केला आहे ते कशाला वेळ वाया घालवायचा ? फुकट टॅक्स पेअर्सच्या पैशामध्ये निवांत आयुष्यभर खात बसले असते हे ४ राक्षस. >> how are you so sure that these people were the rapists? न्याय देणे हे पोलिसांचे काम नाही. पोलिसांनी आपले काम केले असते तर ही वेळच आली नसती. तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला जेव्हा पोलीस गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच ठार मारतील तेव्हा तुमची हीच मते असूद्यात म्हणजे झालं. आणि ज्या प्रकारे या कृतीचा उदोउदो होतो आहे ते बघता ही वेळ दूर नाही.

> how are you so sure that these people were the rapists? न्याय देणे हे पोलिसांचे काम नाही. पोलिसांनी आपले काम केले असते तर ही वेळच आली नसती. तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला जेव्हा पोलीस गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच ठार मारतील तेव्हा तुमची हीच मते असूद्यात म्हणजे झालं. आणि ज्या प्रकारे या कृतीचा उदोउदो होतो आहे ते बघता ही वेळ दूर नाही.>>>>> +१

how are you so sure that these people were the rapists? न्याय देणे हे पोलिसांचे काम नाही. पोलिसांनी आपले काम केले असते तर ही वेळच आली नसती. तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला जेव्हा पोलीस गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच ठार मारतील तेव्हा तुमची हीच मते असूद्यात म्हणजे झालं. आणि ज्या प्रकारे या कृतीचा उदोउदो होतो आहे ते बघता ही वेळ दूर नाही.>>>
how are you so NOT sure that these people were the rapists?

मच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला जेव्हा पोलीस गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच ठार मारतील तेव्हा तुमची हीच मते अ>>>
तुमच्या जवळची एखादी व्यक्ती विक्टीम असेल तर तुमची ही मते असु नयेत अस प्रामाणीकपणे मला वाटत. पण ती तुमची चॉइस.

दहा अपराधी सुटले तरी चालतील पण एकाही निरपराध्याला सजा व्हायला नको ह्या पायावर सध्याची न्यायव्यवस्था आधारलेली आहे.
ह्याला बदलून एक अपराधीही सुटायला नको आणि एकाही निरपराध्याला सजा मिळायला नको असा बदल करण्याची गरज आहे.

भगवान के घर मे देर है अंधेर नही असं म्हटलं जातं. खुद्द देवालाही जिथे वेळ लागतो तिथे आपल्या न्यायव्यवस्थेलाही लागला तर काय नवल. जलद गतीने न्यायनिवाडा कसा होईल हे बघणे हेच श्रेयस्कर. न्यायसंस्थेने निकाल दिल्यावर फाशी जाहीरपणे भर चौकात देणे, ई. करता येऊच शकेल.

पण पोलिसांनी किंबहुना न्यायव्यवस्था सोडून इतर कोणीही आरोपींना गुन्हेगार ठरवून परस्पर त्यांना मारणे हे अत्यंत घातक आणि चुकीचा पायंडा पाडणारे आहे.

जवळच्या लांबच्या कोणत्याच व्यक्तीला अत्याचाराला किंवा निरपराध व्यक्तीला खोट्या आरोपाची शिक्षा भोगायला लागू नये ही इच्छा आणि प्रार्थना.

Pages