नुकतीच झालेली घटना, ज्यात हैदराबादमधील एका तरुणीवर अत्याचार करून तिला जाळून मारून टाकण्यात आले. या आधी इथे अनेक चर्चा झाल्या असतील की असे अत्याचार का होतात काय मानसिकता कारणीभूत आहे ई.
मी सुद्धा याविषयी आंतरजालावर अनेक वेळा वाचलेले आहे. मागे एका इंग्रजी बातम्यांच्या संकेतस्थळावर भारतात अशीच एक घडलेली घटना नमूद केली होती, बातमी वाचून झाल्यानंतर त्याखाली आलेल्या टिप्पण्या वाचल्या ज्या खरेतर खरच या विषयावर प्रकाश पाडणाऱ्या होत्या. त्यात भारत आणि इतर पाश्चात्य देशांत असणारी सांस्कृतिक तुलना होती आणि त्यातून बरीच गहन चर्चा होतांना दिसली.
काही नियमित मुद्दे वगळता, जसे की लैंगिक दमन (sexual repression), पुरुषप्रधान संस्कृती हे बऱ्याच वेळी चर्चिले जाणारे मुद्दे सोडून एक महत्त्वाचा मुद्दा दिसला.
एका यूजरचे म्हणणे होते की दक्षिण आशियात पुरुष हे मोठाले ग्रुप करून राहतात, म्हणजे कुठे जायचे असेल, मित्रांसोबत भटकायचे असेल तर चांगला ५-७ जणांचा ग्रुप घेऊन बाहेर पडतात, याऊलट व्हाईट लोकांचे आहे ते बाहेर निघालेच तर एक्कट-दुक्कट मित्रांसोबत निघतात आणि कुठे रेंगाळत बसनेही टाळतात, त्यामुळे अमेरिकेत म्हणे महिला अत्याचार कमी होतात, आणि कोणावर बलात्कार झाला तर तो एका व्यक्तिद्वारे केला जातो, सामूहिक बलात्कार घडत नाहीत.
कदाचित वरील तर्कात तथ्यही आहे. एकटा माणूस असला की त्याला तेवढी हिंमत वाटत नाही जेवढी त्याला ४-५ किंवा मोठाल्या समुहात असतांना वाटते. गावात पान-टपरीवर वगैरे असे मित्रांचे समूह सर्रास दिसून येतात; कॉलेजात जाणाऱ्या येणाऱ्या मुलींची टिंगल-टवाळी करतांना,झुरके ओढतांना दिसतात. कदाचित ही अशी मानसिकता असणाऱ्यांची प्राथमिक किंवा शक्यतो harmless stage असावी.
पण पुढे चालून extreme stage मधली लोकं कायद्याचा वचका कमी झाला किंवा थोडी हिंमत वाढली की अशी कृत्य करत असावी.
तरी इथे या विषयी चर्चा झालेली आवडेल, अनेक माबोकर भारताबाहेर राहतात त्यांचे यावरचे मतही जाणून घ्यायला आवडेल तसेच तुम्ही राहत असलेल्या देशात या विषयीची मानसिकता काय? ई.
हैदराबाद पिडितेचा जीव
हैदराबाद पिडितेचा जीव पोलीसांनी तत्काळ हालचाल केली असती तर वाचु शकला असता ह्याबद्दल सहमत आणि पुरावे गोळा करणे हे पोलीसांचे काम आहे, न्यायनिवाडा करणे नाही ह्याबद्दल ही सहमत.
पण मला एक वेगळीच शंका येते आहे. ही केस अतीशय सेंसेटिव बनली होती त्यामधील क्रौर्यामुळे आणि आधीच्या निर्भया प्रकरणात न्याय मिळायला झालेला उशीर आणि त्या दरम्यान आरोपींनी त्या डाॅक्युमेंटरी टीम ला दिलेल्या मुलाखतीत मांडलेले विचार ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून लोक अतीशय संतापले होते. त्यामुळे च पोलीसांनी अतिशय वेगाने हालचाली करून आरोपींना जेरबंद केले होते.
ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर हा एन्काऊंटर चा निर्णय स्थानिक राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप/ पाठिंबा असल्याशिवाय पोलीसांनी परस्पर घेतला असेल असे वाटत नाही. नक्की आधार असा देता येणार नाही पण त्या वेळी ज्या बातम्या वाचल्या त्यावरून असे वाटले होते. पण हे प्रकरण जड जाणार असे जाणवल्यावर पडद्यामागील सुत्रधार नामानिराळे राहिले असण्याची शक्यता वाटते. थोडक्यात आताही खरा न्याय झालाच नाही.
https://twitter.com/umasudhir
https://twitter.com/umasudhir/status/1532662466559086592
Shocking case of #GangrapeInHyderabad of teen girl, in evening hours on Saturday, inside high-end car in upmarket #JubileeHills allegedly by 5 boys who are also underage & belong to politically influential families; police says son of MLA got off car b4 crime
ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनर लोकांच्या एन्काउंटरचं समर्थन करणारे या केसमध्ये आरोपींचा एन्काउंटर व्हावा अशी इच्छातरी व्यक्त करतील का?
एन्काउंटर केल्यामुळे बलात्कारी प्रवृत्तीच्या लोकांना धाक बसणार होता. त्याचं काय झालं?
सेंगर अजून भाजपात आहे का ?
सेंगर अजून भाजपात आहे का ?
मुलगी मेली
घरचे मेले
वकील गाडीखाली आला
साक्षीदार गायब
सरकारी वकील , न्यायाधीश , पत्रकार , मसणातला डोंबसुद्धा एकवेळ गायब होईल
पण सेंगरवर ना बुलडोझर जाईल ना पोलीस गाडी
Pages