नुकतीच झालेली घटना, ज्यात हैदराबादमधील एका तरुणीवर अत्याचार करून तिला जाळून मारून टाकण्यात आले. या आधी इथे अनेक चर्चा झाल्या असतील की असे अत्याचार का होतात काय मानसिकता कारणीभूत आहे ई.
मी सुद्धा याविषयी आंतरजालावर अनेक वेळा वाचलेले आहे. मागे एका इंग्रजी बातम्यांच्या संकेतस्थळावर भारतात अशीच एक घडलेली घटना नमूद केली होती, बातमी वाचून झाल्यानंतर त्याखाली आलेल्या टिप्पण्या वाचल्या ज्या खरेतर खरच या विषयावर प्रकाश पाडणाऱ्या होत्या. त्यात भारत आणि इतर पाश्चात्य देशांत असणारी सांस्कृतिक तुलना होती आणि त्यातून बरीच गहन चर्चा होतांना दिसली.
काही नियमित मुद्दे वगळता, जसे की लैंगिक दमन (sexual repression), पुरुषप्रधान संस्कृती हे बऱ्याच वेळी चर्चिले जाणारे मुद्दे सोडून एक महत्त्वाचा मुद्दा दिसला.
एका यूजरचे म्हणणे होते की दक्षिण आशियात पुरुष हे मोठाले ग्रुप करून राहतात, म्हणजे कुठे जायचे असेल, मित्रांसोबत भटकायचे असेल तर चांगला ५-७ जणांचा ग्रुप घेऊन बाहेर पडतात, याऊलट व्हाईट लोकांचे आहे ते बाहेर निघालेच तर एक्कट-दुक्कट मित्रांसोबत निघतात आणि कुठे रेंगाळत बसनेही टाळतात, त्यामुळे अमेरिकेत म्हणे महिला अत्याचार कमी होतात, आणि कोणावर बलात्कार झाला तर तो एका व्यक्तिद्वारे केला जातो, सामूहिक बलात्कार घडत नाहीत.
कदाचित वरील तर्कात तथ्यही आहे. एकटा माणूस असला की त्याला तेवढी हिंमत वाटत नाही जेवढी त्याला ४-५ किंवा मोठाल्या समुहात असतांना वाटते. गावात पान-टपरीवर वगैरे असे मित्रांचे समूह सर्रास दिसून येतात; कॉलेजात जाणाऱ्या येणाऱ्या मुलींची टिंगल-टवाळी करतांना,झुरके ओढतांना दिसतात. कदाचित ही अशी मानसिकता असणाऱ्यांची प्राथमिक किंवा शक्यतो harmless stage असावी.
पण पुढे चालून extreme stage मधली लोकं कायद्याचा वचका कमी झाला किंवा थोडी हिंमत वाढली की अशी कृत्य करत असावी.
तरी इथे या विषयी चर्चा झालेली आवडेल, अनेक माबोकर भारताबाहेर राहतात त्यांचे यावरचे मतही जाणून घ्यायला आवडेल तसेच तुम्ही राहत असलेल्या देशात या विषयीची मानसिकता काय? ई.
पेपरात तर चौघांनी गुन्हा
पेपरात तर चौघांनी गुन्हा कबूल केला म्हणून वाचले.
मग इथे काय तुमचे आणि आमचे अपराधी विरुद्ध बळी असे चाललेय.
हि काय अशी गोष्ट आणि वेळ आहे का, तुमच्या घरचा विक्टीम की आमच्या घरचा असे युक्तीवाद करण्य्यची?
झंपी काका, पेय वगैरे घ्या. मग
झंपी काका, पेय वगैरे घ्या. मग विचार करून लिहा. आपल्याला गोल्ड मेडल नाही मिळणार तत्काळ प्रतिसाद दिला म्हणून.
प्रद्युम्न ठाकुर या शाळकरी
प्रद्युम्न ठाकुर या शाळकरी मुलांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी स्कूलबसच्या चालक की वाहकाला अटक केली. त्याने गुन्हा कबूल केला होता.
पुढे काय झालं?
त्याच शाळेतल्या १६ वर्षे
त्याच शाळेतल्या १६ वर्षे वयाच्या मुलाने ते कृत्य केले होते. त्याला वाचवायला कंडक्टरला अटक केली होती.
झाले ते नक्की चांगले की वाईट
झाले ते नक्की चांगले की वाईट हे कुणीही ठरवू शकत नाही जोवर मूळ गुन्ह्याची पुर्ण उकल झाली नाही.
मूळ घटना अत्यंत घृणास्पद आणि उद्वेगजनक असली तरी जे एन्काऊंटरमध्ये मारले गेले ते आरोपी होते की गुन्हेगार हे सिद्ध नव्हते. आणि ह्यामागे अजून तिसरा हात नाही हे कश्यावरुन?
एन्काऊंटरची देखील चौकशी व्हायला हवी खरोखर ते पोलिसांची शस्त्रे घेऊन खरेच पळत होते का ?
हा झालेला न्याय सामान्यांना कितीही चांगला वाटला आणि 'जश्यास तसा' आहे असे वाटले तरी तो न्याय करायचे काम पोलीसांचे नक्कीच नव्हते.
छ. शिवरायांच्या काळातले दाखले काहीजण देताना दिसतात सोमिवर. पण त्या काळातसुद्धा तिथे न्याय छ. शिवराय आणि त्यांचे न्यायाधीश करत असत त्यांचे फौजदार, जमादार अथवा हवालदार नव्हते करत.
आणि पोलिसांनी छळ करून
आणि पोलिसांनी छळ करून कंडक्टरकडून कबुली घेतली.
सीबीआई च्या तपासात निष्पन्न
सीबीआई च्या तपासात निष्पन्न झाले. न्यायालयात पोलीस कबूल झाले.
पुरोगामी गाढवा, पुन्हा
पुरोगामी गाढवा, पुन्हा माझ्या पोस्टस ट्रोल करू नका. समजलं ना... शेवटचं सांगतेय.. तुमचा फालतुपणा दुसरीकडं करा.
अॅडमिन, हि आयडी कारण नसताना काहिहि बरळतोय माझ्या पोस्टला त्याला उल्लेखून नसताना.
सीमा, मी तर या केसमध्ये देखील
सीमा, मी तर या केसमध्ये देखील व्हिक्टीमच्याच बाजूने आहे. जरी ती माझी नातेवाईक नसली तरी. पण ही घटना म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो या कॅटेगरीमधली आहे.
आपल्या लोकशाहीत एका ठिकाणी सत्ता एकवटू नये म्हणून कायदे तयार करणे (संसद, विधानसभा), कायद्याची अंमलबजावणी करणे (पोलीस, विविध सरकारी यंत्रणा), आणि कायद्याचा भंग झाला तर त्याचा न्याय करणे (न्याय व्यवस्था) असे तीन स्तंभ आहेत. या साध्या गोष्टीचा आज लोकांना विसर पडला आहे. आरोपी = गुन्हेगार हे भीषण समीकरण यामुळे समोर येते आहे. अवघडे!
देशात पुरुष विरुद्ध स्त्रिया
देशात पुरुष विरुद्ध स्त्रिया असे तट पडण्याची वेळ या हलकटांनी आणली आहे.
झंपी काका, नक्की शेवटचे ना?
झंपी काका, नक्की शेवटचे ना? तुम्ही असंबद्ध प्रतिसाद दिला की बाकीच्यांनी जयजयकार करावा का तुमचा?
पुरोगमि गाढव, तुम्हाला
पुरोगमि गाढव, तुम्हाला उद्देशून नसताना, तुमच्या प्रतिसादावर प्रतिसाद नसताना फालतु बडबडणे बंद करा. तुम्ही तुमचे मत लिहिताय मग मी माझे लिहितेय. तुम्हाला विचारले नाही, प्रतिसाद कसा असावा व कोणी काय करावे वगैरे?
तुमचे फालतु ट्रोल्स बंद करा. नाहितर तुम्ही एक अतिशय मुर्ख आणि निर्लज्ज आहात समजून दुर्लक्ष करेन. पण गैरसमजात राहू नका की, तुम्ही ट्रोल्स केल्यावर काहिच अॅक्शन घेतली जाणार नाही.
घ्या अॅक्शन. फक्त लोकांना
घ्या अॅक्शन. फक्त लोकांना शिकवताना आरशात बघा. आपल्याला अक्कल किती आपण बरळतो किती हे प्रत्येकाला समजले पाहिजे.
आपल्या देशात दहशतवादी हल्ला
आपल्या देशात दहशतवादी हल्ला करणाऱ्या गुन्हेगाराला रेड हँडेड पकडलं असूनही त्याची कोर्टात केस चालवली जाते आणि फाशीची शिक्षा दिली गेली की आजाराने मृत्यू पावला म्हणून फाशीचं नाटक केलं हे अजूनही निश्चित नाही नाहीतर अजून 5 - 10 वर्षं त्यालाही तुरुंगात जिवंत ठेवला असता .
बलात्काराचा गुन्हा सिद्ध करण्यात 2 - 4 वर्षं आणि शिक्षा झाली तर ती चुकवण्यात आणखी 5 - 10 वर्षं .. न्यायव्यवस्था लवकर बदलण्याची काही चिन्हं दिसत नाही आहेत अशावेळी गुन्हेगारी मनोवृत्तीच्या लोकांना धाक राहणार कसा ? पकडले जाण्याची भीती नाही , शिक्षेची भीती नाही म्हणूनच असले गुन्हे घडतात ... या एन्काऊंटरने रेप प्लॅनिंग करत असणाऱ्यांना , संधीची वाट पाहत असलेल्या टोळक्यांना जरा तरी धाक बसेल ..
पण ही घटना म्हातारी मेल्याचे
पण ही घटना म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो या कॅटेगरीमधली आहे.
आपल्या लोकशाहीत एका ठिकाणी सत्ता एकवटू नये म्हणून कायदे तयार करणे (संसद, विधानसभा), कायद्याची अंमलबजावणी करणे (पोलीस, विविध सरकारी यंत्रणा), आणि कायद्याचा भंग झाला तर त्याचा न्याय करणे (न्याय व्यवस्था) असे तीन स्तंभ आहेत. या साध्या गोष्टीचा आज लोकांना विसर पडला आहे. आरोपी = गुन्हेगार हे भीषण समीकरण यामुळे समोर येते आहे. अवघडे!
>>>>>+ १
मुलींच्या इतकीच शिस्त आणि
मुलींच्या इतकीच शिस्त आणि बंधने मुलांवर पण घातली पाहिजेत. लैंगिक बाबींवर मुलांशी मोकळेपणाने संवाद झाला पाहिजे.
गुन्हेगारांना फाशी जरी दिली
गुन्हेगारांना फाशी जरी दिली तरी पीडित मुलगी तिचे कुटुंब बरबाद झालेले परत पहिल्यासारखे थोडीच होणारेय?
राधानिशा, दहशतवाद्याला खरंच
राधानिशा, दहशतवाद्याला खरंच फाशी दिली याबद्दल तुम्हांला खात्री नाही, पण ज्यांचा एन्काउंटर झाला ते गुन्हेगार होते, याबद्दल खात्री आहे?
मला आहे खात्री . " या
मला आहे खात्री . " या प्रकरणाची चौकशी होणार - एन्काऊंटर केलेल्यांची कसून चौकशी होणार ; असं होणार नाही की आपण एन्काऊंटर करू आणि सरकार आपल्याला शाबासकी देईल , त्यावर पांघरूण घालेल आणि मामला रफादफा करेल " एवढं कळण्याइतके ते अधिकारी सुज्ञ नक्कीच असणार ...
ज्या देशात कन्फर्म अपराध्याला बचावाच्या हजार संधी दिल्या जातात त्या देशात निरपराध लोकांचा सरकारी यंत्रणेकडून झालेला खून जर उघडकीस आला तर किती गंभीर परिणाम भोगावे लागतील याची जाण त्या पोलिसांना नक्कीच असणार .
भलत्याचाच पोलिसांनी एन्काऊंटर करणं आपल्या देशात अशक्य नाही पण -
ही घटना कुठे लहान गावात लोकांच्या नजरेआड घडलेली नाही की कोणालाही गोळ्या घालतील आणि सत्य उघडकीस येणार नाही . अख्ख्या देशाचं , प्रसारमाध्यमांचं लक्ष पहिल्यापासून या प्रकरणावर आहे ... सीबीआय चौकशीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही . तेव्हा या प्रकरणात खरे आरोपी नसलेल्यांना गोळ्या घालायचं धाडस पोलिसांना होणार नाही याची मला खात्री आहे .
https://indianexpress.com
https://indianexpress.com/article/india/supreme-court-reverses-own-order...
आंध्र पोलिसांनी चार वर्षांपूर्वी चंदन तस्कर म्हणून अनेकांचा एन्काउंटर केलाय
मध्यम प्रदेशमध्ये simi संबंधित तरुणांचा एनकाउ़ंटर झाला.
दोन्ही प्रकरणी पोलिसांवर कारवाई झाल्याचं कळलेलं नाही.
उत्तर प्रदेशात तर एन्काउंटर हा अपवाद नसून नियम झालाय.
त्यामुळे हैदराबाद पोलिसांना हे करताना फार विचार करावा लागला नसेल.
स्वत.च्या चुकांवर पांघरूण घालायची उत्तम संधी त्यांनी साधली.
लैंगिक दमन पहिले जेवढं
.
चडवा जुलूम
चडवा जुलूम
एक प्रश्न.
एक प्रश्न.
जर ह्या केस मध्ये राजकारणी लोकांचा कोणी सुपुत्र अथवा नातेवाइक असता तर असच एनकाउंटर झालं असतं का?
जिज्ञासा, पोस्ट आवडल्या.
जिज्ञासा, पोस्ट आवडल्या.
सीमा, पोस्ट वाचून खेद वाटला. पोलीसांच्या अवाजवी फोर्सचा वापर, कायदा हातात घेणे वगैरेबाबत अमेरीकेत काही कमी प्रश्न नाहीयेत. अगदी बॉडीकॅम असूनही भरपूर प्रश्न आहेत. आत्तापर्यंत कितीतरी प्रकरणात आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करुन मिलियन्स मधे कथित आरोपीच्या कुटुंबीयांना भरपाई देणे झाले आहे. तेही टॅक्सपेअरच्या पैशाने ना.
खरेतर भारत आणि अमेरीका तुलना नकोच. कारण भारतात छळ करुन गुन्हा कबूल करुन घेणे चालते इथे अमेरीकेत असे काही करायला बंदी आहे. छळ करुन गुन्हा कबूल करायला लावणे हे आजही का सुरु आहे हा प्रश्न कुणालाच पडत नाही का?
अमेरिका आणि भारत हे सर्वच
अमेरिका आणि भारत हे सर्वच दृष्टीने वेगळे देश आहेत याची आठवण करून द्यायला नको. त्यामुळे अशी तुलना चुकीची ठरेल.
जिज्ञासा, भरत यांची पोस्ट्स
जिज्ञासा, भरत यांची पोस्ट्स पटली. बातमी वाचून शॉक बसला. ४ रेपिस्ट लोकांबद्दल कसलीही सहानुभूती नाही पण असा कायदा धाब्यावर बसवून एन्काउन्टर करणे हा भयंकर स्लिपरी स्लोप आहे.
एखाद्याचा गुन्हा सिद्ध न करता कुणा तरी पोलिस स्टेशन किंवा एखाद्या दबंग पोलिस ऑफिसर च्या हातात आरोपींच्या जगण्या मरण्याचा निर्णय हे चांगले लक्षण नाही. अशा पायंड्याचा काय काय अब्यूज होऊ शकेल याचा विचार केला तर भिती वाटते.
सीमा, सिरियसली? तू रेड सिग्नल तोडणार्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी या विचाराचे समर्थन करत आहेस का? की माझी समजण्यात चूक झाली?
https://youtu.be/LTOO8Xj1NbQ
https://youtu.be/LTOO8Xj1NbQ
चवथ्या आरोपीचे आईवडील सांगत आहेत - उसने हमसे कहा उसके ट्रकसे एक स्कुटर चलाने वाले लडकी को धक्का लगा और उसकी मौत हो गई , इससे ज्यादा उसने कुछ नहीं बताया ।
अजून भरपूर पुरावे आहेत तरीही हे तेच गुन्हेगार की पोलिसांनी भलत्याच लोकांना मारलं असे प्रश्न पडण्यामागचं कारण माझ्या लक्षात येत नाही .
राधानिशा, प्रश्न तो नाही,
राधानिशा, प्रश्न तो नाही, प्रश्न या केस चा नाही त्यापेक्षा फार मोठा आहे. माणसांना पकडून त्यांचा गुन्हा सिद्ध न करता त्यांना ठार मारण्याचे अधिकार पोलिसांना आहेत का? असावे का? त्यांनी गुन्हा केला की नाही, केला असल्यास त्याची शिक्षा काय हे ठरवणे पब्लिक, मिडिया, किंवा एखादा दबंग वा सिंघम यांच्या हातात दिले तर वर लिहिले तशी सिग्नल तोडणार्याला मृत्यूदंडाची शिक्षा असा न्याय होईल.
ही गंमतच आहे की न्यायदानाच्या प्रोसेस वर तुमचा विश्वास नाही पण गल्लोगल्ली कोणत्याही पोलिस ठाण्यातला कोणीही पोलिस ऑफिसर सारख्याच न्यायबुद्धीने वागून योग्य तो इन्साफ करेल अशी खात्री आहे??!
मै +१
मै +१
मैत्रेयी +१
मैत्रेयी +१
अगदी तेच गुन्हेगार असले तरीही एन्काउंटर किलिंग चुकीचंच आहे. एन्काउंटर किलिंगचं समर्थन करणार्यांना विचार करायला भाग पडावं यासाठी तो प्रश्न विचारला होता.
एवढे पुरावे असताना कोर्टापुढे ते नेऊन न्यायदानाला मदत करणं हेच पोलिसांचं कर्तव्य आहे. न्याय करायचा अधिकार त्यांना नाही.
Pages