Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32
२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!
ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.
सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..
अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओह! मी असं लिहलंय म्हणुन
ओह! मी असं लिहलंय म्हणुन वाटलं का तुम्हाला की मी पहिल्यांदाच मराठी सीरियल बघतेय
प्रज्ञाविरुद्द केस करणार होते
प्रज्ञाविरुद्द केस करणार होते त्याचं काय झालं. आता किती कायदे आहेत ज्येनाच्या बाजूने, कोणालाच माहिती नाही का. मला वाटलं आता शुभ्राची अवंतिका होईल आणि सगळ्या जगाचे प्रश्न सोडवेल.
ते दोघे सायकल चालवतात Uhoh
ते दोघे सायकल चालवतात Uhoh फारच प्रगती आहे. हल्ली मालिका बघत नाही म्हणून कल्पना नाहीये ह्याची. >>>>>>>> डबल सीट होती त्यान्ची. एका सायकलवर बसून हॉटेलवर पोहोचले ते.
आसा ताट धरून काय उभी असते? टेबल खुर्ची नाही का? काहीतरीच दाखवतात. शुभ्रा नी एक हात राजेंचा धरला आणि एक आसावरीचा मग दोघांनी मिळून केक कापला असं झालं म्हणे.. कसा काय बुवा..>>>>> आजोबामुळे झाल हे सगळ. ते दोघे उशिरा हॉटेलमध्ये आले. सो, आजोबान्नी नेहमीसारखा आकान्डताण्डव केला. मला जेवायच आहे, माझ्या पथ्यपाण्याच काय, आमच्या वेळी नव्हती असली वाढदिवसाची थेर वै वै. त्यान्नी आसाला तिचा वाढदिवस न साजरा करण्याची शिक्षा केली. आसा जर केक कापणार नाही तर मीसुद्दा कापणार नाही असा राजे हट्ट करायला लागले. म्हणून शुभ्राने हि हात धरण्याची आयडिया केली. असा राग आला होता ना मला आजोबान्चा.
केक कापण्याचा प्रसंग आवडला. शुभ्राने आसावरी आणि राजेचा हात धरला आणि राजेनी केक कापला. आवडलं. केक चा बॉक्स उघडल्यावर केक बघुन शुभ्राला टेन्शन येतं. ती केक उघडत नाहीये म्हणून प्रद्या जात असते केक उघडायला तर शुभ्रा तिला पाय घालुन पाडते. प्रज्ञाला चेहरा केकवर आपटतो आणि ते लिहिलेल पुसलं जातं. केक खराब होतो. त्या सीनला खरंच हसु आलं. >>>>>>>>> +++++++१११११११११११
मला तो राजे आणि आसाचा आरश्याचा सिनही आवडला.
काल प्रज्ञाने कहर केला. त्या आज्जी आजोबांना घरी या असे म्हणते आणि ते तयार झाल्यावर हीच जळफळाट होतो. मग मुद्दाम तयार होऊन त्यांना दारात उभे करून स्वतः पार्टीला निघून जाते. हलकट. >>>>>>>>> अगदी अगदी
मला तर आजोबांपेक्षा आसावरीचा
मला तर आजोबांपेक्षा आसावरीचा जास्त राग येतो. हो बाबा-हो बाबा, तुमचेच बरोबर बाबा करत असते नेहमी. बरं एव्हढे सगळे करुन बाबा हिचा सतत अपमान करणार.
तो डबड्या तर इतका स्वार्थी
तो डबड्या तर इतका स्वार्थी दाखवला आहे कि राजेंच्या व्यवसायात भागिदारी मिळेल आणि पुढे सगळा व्यवसायच आयता मिळेल या विचाराने तो आसावरी आणि राजेंच्या लग्नास लगेच तयार होईल आणि आजोबांना पण तयार करेल.
मी एक प्रोमो बघितला news
मी एक प्रोमो बघितला news चॅनेलवर, गि. ओक आणि नि. जोशीचा, तो प्रपोज करताना, त्यात दोघे वयस्क वाटले मला, पहिला भाग मी बघितलेला तेव्हा नि जो तर एकदम यंग वाटत होती आणि ओक पण एवढे वयस्क नव्हते दिसले.
तो डबड्या तर इतका स्वार्थी
तो डबड्या तर इतका स्वार्थी दाखवला आहे कि राजेंच्या व्यवसायात भागिदारी मिळेल आणि पुढे सगळा व्यवसायच आयता मिळेल या विचाराने तो आसावरी आणि राजेंच्या लग्नास लगेच तयार होईल आणि आजोबांना पण तयार करेल.
नवीन Submitted by sonalisl on 28 November, 2019 - 08:27 >>>
बरोबर. त्या डबड्याचा काही नेम नाही. या दोघांचे लग्न लावून देईल आणि बिझनेस तर घेईलच शिवाय या दोघांचा जाच सुद्धा करेल. अभिजित काही बोलायला गेले कि आसावरी आहे सावरायला, 'असुद्याना, ओ' वैगरे करत.
मला तर आजोबांपेक्षा आसावरीचा
मला तर आजोबांपेक्षा आसावरीचा जास्त राग येतो. हो बाबा-हो बाबा, तुमचेच बरोबर बाबा करत असते नेहमी. बरं एव्हढे सगळे करुन बाबा हिचा सतत अपमान करणार. >>>>>>>>>> ++++++++११११११११
वाढदिवसाच्या एपिसोडमध्ये कन्ट्युन्टिच्या दोन चुका झाल्यात. एक म्हणजे राजे आणि आसा ज्या टॅक्सीमधून हॉटेलला जायला निघतात त्याचा ड्रायव्हर म्हातारा होता, पण जेव्हा ती टॅक्सी रस्त्यात बन्द पडते, तेव्हा तो चक्क तरुण दाखवलाय. राजेनी रसत्यात टॅक्सी बदलली की काय?
दुसरी चुक, प्रज्ञाने ज्या केकची अदलाबदल करुन हार्ट शेप्ड केक ठेवला तो केकसुद्दा सफेद होता. नन्तर मात्र राजेन्नी केक कापला तो चॉकलेट केक होता.
सोहम मित्राबरोबर जातो अभिस
सोहम मित्राबरोबर जातो अभिस किचनमध्ये तेव्हा पैसे द्यायला काचकूच करतो, याचा अर्थ कुलकर्णी परिवार सहकुटुंब जातात तेव्हा कधीच पैसे देत नाहीत का. जर राजे पैसे घेत नसतील तर परत परत तिथे जाणं बरं दिसतं का.
आसावरी राजेंना कानाखाली वाजवेल का, पण तिचा हात नाही पोचणार त्यांच्या गालापर्यंत. घरून शिळ्या पोळ्या खाऊन निघालेली ना आसावरी, तिथे परत जेवणार होती, की ते दुपारचं जेवण होतं
आसावरी सारखी आई असु शकते?
आसावरी सारखी आई असु शकते?
असू शकते. आसावरीवर हे बिंबवलं
असू शकते. आसावरीवर हे बिंबवलं गेलं आहे की सोहम आणि आजोबांची काळजी घेणं हेच तिच्या आयुष्यचं परम कर्तव्य आहे. मागे आजोबांनीही हात भाजल्याचा केवढा कांगावा केला होता. तिला गिल्ट द्यायला आजोबा आणि सोहम तत्पर असतात.
सोहम काल म्हणत होता की आई तर फक्त स्वयंपाक करते, मग मागे शुभ्राने एवढं लेक्चर दिलं, आई तर काय घरीच तर असते वगैरे वगैरे ते सगळं वाया गेलं का.
वायाच जाणार... प्रत्येकवेळी
वायाच जाणार... प्रत्येकवेळी ती शुभ्राला थांबवते. जोपर्यंत डबड्याचे आणि बाबांचे काहीतरी चुकते असे तिला वाटत नाही किंवा ती स्वतःचा विचार करत नाही तोपर्यंत काहीच बदलणार नाही.
आसावरी राजेंना कानाखाली
आसावरी राजेंना कानाखाली वाजवेल का>>>>>>>>>> अगदी तसंच वाटलं, पण आसाचा आजवरचा बुळा स्वभाव बघता ती असं करेल असं वाटत नाही.
तेजश्री ने कमाल केली एका
तेजश्री ने कमाल केली एका श्वासात हावभावांसकट डैलॉग्ज म्हटलेन् आज.
फक्त त्या नादात शब्द चुकला एक.. राजे "झाकपाक" कपडे घालून दिवसभर वावरत होते असं म्हणाली..
प्रपोज करायची जागा पण अगदी
प्रपोज करायची जागा पण अगदी त्यांच्या वयाला , परिपक्व पणाला शोभेलशी होती!!
हे असं कोणीही सहज ऐकू शकेल,
हे असं कोणीही सहज ऐकू शकेल, येणारे जाणारे बघतील, व्यत्यय आणतील, अशा ठिकाणी हे सगळं बोलायची काय गरज होती राजेंना. बबड्या तर लहान बाळ आहे, आईच्या कुशीत कसा झोपत नाही.
कालचा एपिसोड छान होता.
कालचा एपिसोड छान होता. डायलॉग्ज चान्गले होते.
आसाच्या वागण्यावरुनच कळत होत की तिच्याही मनात राजेन्विषयी प्रेम आहे. तिला राजेच्या प्रपोजलचा राग आला नाही. हल्ली ति त्यान्चा नावाने उल्लेख करत नाही, हे, ह्यान्ना म्हणत असते. तिला समाज, घरचे काय म्हणतील अस वाटत ते स्वाभाविक आहे.
तेजश्री ने कमाल केली एका श्वासात हावभावांसकट डैलॉग्ज म्हटलेन् आज. >>>>>>+++++++११११११
सर्वान्चा अभिनय मस्त झाला होता काल. एरवी डायलॉग्ज काहीही कॅटेगरीतील असतात उदा. आजोबा स्वेटरच्या एपिसोडमध्ये म्हणतात, " मला कशाला स्वेटर? हे काय काश्मीर आहे का?' ( म्हणजे थन्डी काय फक्त काश्मीरचमध्येच पडते? ) काल एकेक शब्द सुन्दर लिहिला होता.
राजे रडतं असतात आणि बाकी
राजे रडतं असतात आणि बाकी बायका सेल्फी काढतायेत तो सीन चांगला होता.
कालचे संवाद रोज लिहिणार्याने
कालचे संवाद रोज लिहिणार्याने लिहिले नसतील
मी ही शिरेल बघत नाही, पण
मी ही शिरेल बघत नाही, पण
<<<मला कशाला स्वेटर? हे काय काश्मीर आहे का?'>>> हे ठाणे मुंबईत राहणार्याला लागू पडते, इकडे इतकी थंडी पडतच नाही की स्वेटर घालावे.
राजे रडतं असतात >>> ते का
राजे रडतं असतात >>> ते का रडतात, तिने नकार दिला का. त्यांनी होकार गृहीत धरलेला का.
हो ऑफकॉर्स ती नकारच देणार
हो ऑफकॉर्स ती नकारच देणार होती. समाजाचा विचार करून
आज तर आसावरीला बघून किव आली.
आज तर आसावरीला बघून किव आली. तिच्याकडून काहीच होणार नाही.
शेवटी आजोबा (अती वय झाल्याने कश्याचे काही समजत नसल्याने) आणि डबड्या (व्यवसायाच्या लालालचेने) तिला राजेंशी लग्न करायला सांगतील.
मी ही शिरेल बघत नाही, पण
मी ही शिरेल बघत नाही, पण
<<<मला कशाला स्वेटर? हे काय काश्मीर आहे का?'>>> हे ठाणे मुंबईत राहणार्याला लागू पडते, इकडे इतकी थंडी पडतच नाही की स्वेटर घालावे.
नवीन Submitted by VB on 3 December, 2019 - 12:41
हो, बरोबर अगदी आमच्या गोराईला रात्री नुसते धुक्याचे साम्राज्य पसरले असते खाडीच्या जंगलात पण घरात मात्र फॅन फुल्ल स्पीड ने चालू ठेवावा लागतो. उकडत नाही बस एवढीच थंडी.
काल त्या डबड्याचा खूप राग आला
काल त्या डबड्याचा खूप राग आला आजोबांकडून आईला बोलणे खाऊ घातले आणि राजेंच्या रेस्टोरंट मध्ये (बापाचे हॉटेल असल्यासारखे) खूप ऍरोगंटली वागला. एक थोबाडीत द्यावीशी वाटली (मुळात त्याचा लोचट चेहरा बघितला तरी राग येतो).
हे ठाणे मुंबईत राहणार्याला
हे ठाणे मुंबईत राहणार्याला लागू पडते, इकडे इतकी थंडी पडतच नाही की स्वेटर घालावे. >>>>> हो, हे असू शकत
अगदी आमच्या गोराईला रात्री नुसते धुक्याचे साम्राज्य पसरले असते खाडीच्या जंगलात पण घरात मात्र फॅन फुल्ल स्पीड ने चालू ठेवावा लागतो. उकडत नाही बस एवढीच थंडी. >>>>>>>>> हो ना. हल्ली तिन्ही सिझन्स एकत्र नान्दतायत मुम्बईत. दिवसा उन्हाळा, अधूनमधून पाऊस पडतो, रात्री किव्वा पहाटे थंडी असते.
शुभ्राने डबडयाला चहा करायला लावला आणि आजोबान्ना चश्मा देतेवेळी टोमणा मारला ते बघून बर वाटल. आसाला मिठीत घेऊन तिची ' काय झाल आई' म्हणत तिची विचारपूस करते तो सिनही छान होता.
निजोने आरसा कपाटात ठेवताना झालेली घालमेल, राजेच टिव्हीवरच बोलण ऐकून तिच्या मनाची झालेली तगमग परफेक्ट दाखवली.
काल त्या डबड्याचा खूप राग आला आजोबांकडून आईला बोलणे खाऊ घातले आणि राजेंच्या रेस्टोरंट मध्ये (बापाचे हॉटेल असल्यासारखे) खूप ऍरोगंटली वागला. एक थोबाडीत द्यावीशी वाटली (मुळात त्याचा लोचट चेहरा बघितला तरी राग येतो). >>>>>>>>>++++++++११११११११
राजेंच्या रेस्टोरंट मध्ये (बापाचे हॉटेल असल्यासारखे) >>>>>>> पुढे जाऊन राजे त्याचा बापच होणारेच ना. अर्थात त्याने आणि आजोबाने मनावर घेतल तर.
मुळात त्याचा लोचट चेहरा
मुळात त्याचा लोचट चेहरा बघितला तरी राग येतो>> हो मलाही
I just dont like him.
आ. सा. नाही म्हणाली म्हणून राजे रडतं होते.
आसा पहिल्या फटक्यात हो म्हणेल
आसा पहिल्या फटक्यात हो म्हणेल आणि लाजेल असं वाटलं होतं का राजेंना. मीच विचारणार होते आता, वाट बघून थकले तुम्ही कधी विचाणार याची, असं आसा म्हणेल असं राजेंना वाटलं का. प्रेमभंग झाला म्हणून घारगे तळणारा प्रियकर पहिल्यांदा बघितला
सोहम बहुतेक पैशासाठी आसा ला
सोहम बहुतेक पैशासाठी आसा ला लग्नाला पटवेल, पण राजे त्याची डाळ शिजू देतील असं नाही वाटतं. त्याला बाईक मिळेल असं वाटत असताना राजेंनी वाटेला लावलं त्याला बरोबर.
प्रेमभंग झाला म्हणून घारगे
प्रेमभंग झाला म्हणून घारगे तळणारा प्रियकर पहिल्यांदा बघितला.. lol
राजे आणि शुभ्रा उगाचच आ. सा ला तिला राजेंप्रती ज्या काही भावना आहेत ते कसं प्रेमाचं आहे हे सारखं सारखं पटवून द्यायचा प्रयत्न करतायेत.
अरे काय जबरदस्ती आहे का??
ती एक मित्र म्हणून त्याच्याकडे पाहत होती.
इन फॅक्ट कालही आ. सा शुभ्राला बोलताना तसंच म्हणाली
पण शुभ्रा नाही आई हे प्रेम आहे असंच सांगत होती.
कमाल आहे.
Pages