फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37

मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले Happy

फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !

महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.

आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजकीय विरोधकांना वैयक्तिक शत्रू मानायचा पायंडा महान नेते नरेंद्र मोदी यांनी पाडला.
हे खरयं का साहेब ???????पुन्हा एकदा विचार करुन पहावा ही नम्र विनंती :))

किती तो रडकेपणा, सरकार पडलंय हे अजून झेपलं नाहीये पूर्व मुख्यमंत्र्यांना. ती रडकी मुलं असतात ना शाळेत त्या टाईप झालं हे.

भाजप आमदारांनी सभात्याग केला.
विधान सभेत इलेट्रॉनिक व्होटिंग नाही का? शाळेतल्या हजेरीपटासारखं चाललंय. त्यात आमदारांना संख्या येत नाहीत.
१६९ मते विश्वासाच्या बाजूने

हं.

१६९ बाजूने, चार तटस्थ. विरोधात शुन्य कारण सभात्याग केला.

एनिवे आमचा आमदार तटस्थ राहीला.

आता बहुमत सिद्ध केल्यावरच मी अभिनंदन करेन असं लिहीलं होतं मागे, त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा.

उद्धव ठाकरे व नवीन सरकारचे पुन्हा एकदा अभिनंदन व शुभेच्छा! शपथविधीनंतरची पत्रकार परिषद पाहिली. एकदम सहज गप्पा मारत असल्यासारखे अनौपचारिकपणे बोलत होते. ते सेक्युलर बद्दल विचारलेला प्रश्न त्या क्लिप मधे नव्हता. पण तो वेगळा पाहिला. त्यावर खरे तर त्यांनी चिडायचे काहीच कारण नव्हते. ही आघाडी कॉमन मिनिमम प्रोग्रॅम राबवत आहे - शिवसेना हिंदुत्व सोडणार किंवा काँग्रेस त्यांचे धोरण बदलणार अशी कोणाचीच अपेक्षा नाही. फक्त तिन्ही पक्षांना मंजूर असलेल्या गोष्टींना प्राधान्य मिळेल.

अ-राजकीय स्वरूपाच्या लोकांना अशा पत्रकार परिषदांकरता खूप तयारी करावी लागते. कारण पत्रकार लोकही काहीही उकरून काढतात. डिवचणारे प्रश्न विचारतात. अशा वेळेस मुत्सद्दीपणाने ते टोलवावे लागतात. कसलेल्या राजकारण्यांकडे ते असतेच. यांना जरा तयारी करावी लागेल.

उद्धव ठाकरे एकूणच सेनेच्या स्प्लिट नंतर पडद्यामागे जास्त होते. त्यांचे ते फोटोग्राफीचे पुस्तक (कॉफी टेबल बुक) अतिशय सुंदर होते. पण त्यांची थेट मुलाखत वगैरे कधी पाहिली नव्हती. शिवसेनेला नंतरच्या निवडणुकांमधे मनसेपेक्षा जास्त यश मिळाले तेव्हाच हे लक्षात आले होते की बाळ ठाकर्‍यांचे वक्तृत्व राठांकडे व संघटन्/काम वगैरेंचे कौशल्य उठांकडे आहे.

आता ते सत्तेवर आल्यावर सामना मधले जुने अग्रलेख वर येउ लागले आहेत. अतिशय अर्वाच्च शब्दांत विरोधी लोकांबद्दल लिहीलेले. ते यांनी लिहीले, की संजय राउतांनी ते माहीत नाही. पण इथले सुसंस्कृत आणि नम्र उठा खरे, की त्या अग्रलेखातले, असा प्रश्न पडतो. ते काही दिवसांत दिसेल. गेल्या २-३ दिवसांत जे दिसले आहे ते प्रत्यक्षात उठा करू शकले तर उगाच आधीच नकारात्मक सूर लावायची गरज नाही.

शिवसेना हिंदुत्व सोडणार किंवा काँग्रेस त्यांचे धोरण बदलणार अशी कोणाचीच अपेक्षा नाही. फक्त तिन्ही पक्षांना मंजूर असलेल्या गोष्टींना प्राधान्य मिळेल. >>> अगदी अगदी.

उद्धव ठाकरेंकडे बघताना ते कधीही सरंजामी राजकारणी वाटत नाहीत. ते आपल्यातलेच एक आहेत असे सतत वाटत राहतात. राज ठाकरे जरा चिडखोर वाटतात. तसे उद्धव वाटत नाहीत. वक्तृत्वात ते काहीसे डावे आहेत. मात्र पत्रकार परीषदेत ते मिस्कील आहेत असे समोर आले. मिलिंद गुणाजी यांच्यासोबत त्यांची खूप जवळची मैत्री आहे. त्यांनी सांगितले उद्धव ठाकरे खूप चांगल्या नकला करतात. मिलिंद गुणाजीच्या आवाजात त्यांच्या कॉमन मित्राला फोन करणे किंवा मिलिंद गुणाजीला त्या मित्राच्या आवाजात फोन करणे असे उद्योग ते आजही करतात. तसेच बोलताना सातत्याने कोट्या करणे हा त्यांचा स्वभाव आहे.

त्यांच्याकडे पाहून ते असले काही करत असतील असे वाटत नाही. सार्वजनिक वावर ते बहुधा गांभिर्याने घेत असावेत. मात्र दिलेला शब्द ते फिरवत नाहीत असे त्यांच्याबद्दल अनेक जण सांगतात. अगदी सेनेचे नसलेलेही. कदाचित त्यामुळेच मनसेत गेलेले अनेक जण पुन्हा शिवसेनेत परतले असावेत.

भ्रष्टाचाराचे म्हणाल तर आत्ताच्या प्रस्थापित पक्षांपैकी कुणालाच त्याचे वावडे नाही. मात्र भूक कुणाची किती आहे यावर लोक त्याचे मूल्यमापन करतात. राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात जास्त भ्रष्ट म्हटले जाते. मुंबई महापालिकेत शिवसेनेबाबत हीच ओरड आहे. मात्र ही राज्याची विधानसभा आहे. तिथे भ्रष्टाचाराला चाप लावण्यात ठाकरे यशस्वी ठरले तरी खूप काही साध्य होईल. कारण राज्यावर कर्जाचा जो बोजा जाता जाता फसवणीस करून गेले आहेत त्यामुळे पाच वर्षे फारसे काहीही करता येणार नाही.

केंद्राकडून कसल्याही अपेक्षा न ठेवलेल्याच ब-या. पाच लाख कोटींचा बोजा घेऊन कर्जमाफी, मेट्मो, बुलेट ट्रेन असे महाखर्चाचे प्रकल्प कसे पुढे नेणार ? त्यांनाच पुढे नेले तर शेतक-यांचे काय असा हा तिढा असणार आहे. भाजपची मोर्चेबांधणी त्या दृष्टीने असेल.

गेल्या २-३ दिवसांत जे दिसले आहे ते प्रत्यक्षात उठा करू शकले तर उगाच आधीच नकारात्मक सूर लावायची गरज नाही. >> + १.

सुप्रीम कोर्टाने हिंदुत्ववाद्यांचे थोबाड फोडले

Submitted by BLACKCAT on 30 November, 2019 - 06:45 >>>

म्हणजे राफेलच्या खोट्या आरोपांसाठी रागाला पार गटारात बुचकळून , धोबीघाटातल्या दगडावर आपटून पिळून काढून सुकायला ठेवलं असं म्हणायला हरकत नाही...

मनमोहन सिंग निर्दोष असताना त्यांना दोषी ठरविले होते त्याकरीता माफीनामा मागीतला का? काही न बोलनारी व्यक्ती दोषीच असते का?

सो हे सरकार किती काळ टिकेल लोकांच्या मते? वर्ष दीड वर्ष ? पूर्ण ५ वर्ष? २०२२ मनपा इलेक्शन पर्यंत ?
सांगा बघू पटापट.
माझ्या मते १-२ वर्षं.

15 years

वर्षभर किंवा काही महिने झाल्यावर अजित पवार मुख्यमंत्रीपद मागणार असं मला वाटतंय, मग ह्या लोकांनी दिलं तर टिकेल, आता ते सध्या शांत रहातील.

ऑलरेडी सेना विरुध्द भाजप असं ध्रुवीकरण होताना दिसतंय. असं द्विपक्षीय ध्रुवीकरण झालं तर दोन्ही काँग्रेसच्या अस्तित्वाचं काय?
आणि त्यांचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर त्यांना सेनेला कमजोर करावं लागेल.

मला म्हणताय का, ते वातावरण tv news बघून लिहिते हो. मी उद्धव याना मनापासून शुभेच्छा दिल्यात, आमच्या डोंबिवलीचे जावई आहेत हो.

मला दे फ आणि अजितदादांनी मध्ये केलं ते अजिबात आवडलं नाही. ते चूकच वाटलं, पण अजितदादांना व्हायचं असणार CM असं वाटतंय.

व्ह्यायचं असेल तर सेनेने द्यावं दुसरी टर्म ते पद त्यांना आणि त्यांनीही थांबावं तोपर्यंत मग 5 वर्ष टिकू शकेल.

मला म्हणत नसाल बहुतेक, तसं वाटलं असेल मला तर sorry.

सरकार टिकलं आणि भाजप-सेना असं ध्रुवीकरण झालं तरी आनंदच आहे. काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा सेना-उध्दव कधीही उत्तम पर्याय भाजपाला.

काही दिवसांपूर्वी इथे सुबोध खरे साहेबांनी पवार आणि ठाकरे कुटुंबिय एकमेकांचे नातलग असल्याचा गौप्यस्फोट (त्यांच्यामते) केला होता.
तर अजून अशी काही नातीगोती-
रोहित पवारांचे सासरे सतिश मगर हे मगरपट्टा सिटी आणि नांदेड सिटी या पुण्यातील प्रख्यात टाऊनशिप्सचे मालक / डेव्हलपर आहेत.
हेलिकॉप्टर मधून भ्रमण करणारे अविनाश भोसले हे चर्चित बिल्डर विश्वजित पतंगराव कदमांचे सासरे आहेत.

राजकारण हे गरिबांचं कामच नाही!

माळशिरस चे ते सातपुते का कोण ते गरीब आहेत की. आमदार झालेत. राजकरण करताहेत.

आणि सगळ्यात मोठे गरीब, फकीर, चहा विकणारे तर तुम्हाला माहीतच आहेत.

मला दे फ आणि अजितदादांनी मध्ये केलं ते अजिबात आवडलं नाही. ते चूकच वाटलं, पण अजितदादांना व्हायचं असणार CM असं वाटतंय. >>

ते टिकणार नाही हे भाजपच्या नेत्यांना माहिती असावं व त्या तीन दिवसाच्या सरकार मागचं कारण काहीतरी वेगळंच असावं,
आताचे मुख्यमंत्री ते कारण शोधून त्यांच्या भोंग्यामार्फत सामनातून जाहीर करतीलच म्हणा...

अंजू, तुम्हांला नाही.

तुमचे खरे तर कौतुक आहे. तुम्ही त्या क्षणी तुम्हाला जे वाटते ते लिहिता. एक बाजू घेतलीय म्हणून तीच लावून धरायची असे करत नाही. (जे मला ही शक्य नाही).
शिवाय तुम्ही म्हटल्याप्रमाणे इथे येऊन अभिनंदनही केलेत.

कालचा फडणवीसांचा तडफडाट आणि त्यांनी काढलेले मुद्दे अगदी इथल्या भाजप समर्थकांच्या तोडीचे होते.

हे दोघेही शिंक्याला टांगलेल्या लोण्याच्या बरणी कडे जिभल्या चाटत पाहणार्‍या बोक्या सारखे वाटत होते.
आपलाच सभापती असेल, गुप्त मतदान करून लोण्याचा गोळा पळवता येईल, अशी स्वप्ने बघत होते. पण महाविकास आघाडीने त्यां चे सगळे मनसुबे धुळीस मिळवले.
२०१४ मध्ये फडणवीसांनी विश्वासमत जिंकले की नाही याबद्दलच संभ्रम होता आणि तिथे प्रोसिजरच्या आड दडून ते तरून गेले. यावेळी महाविकास आघाडीने चोख फील्डिंग लावली आणि विश्वासमताचे नाणे खणखणीत वाजवून दाखवले.

आता बोके पुन्हा एकदा शिंक्याचे तुटेल आणि आपले फावेल म्हणून जिभल्या चाटत बसले आहेत.

*गोड बातमी*
आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेबांनी सरकार बनवुन ठाकरे परीवार सत्येवर बसवले त्या बरोबर त्यांनी नवीन सोयरीक पण जुळवली थोड्याच दिवसात *सुप्रियाची मुलगी रेवती व अदित्य ठाकरे यांचा साखरपुडा होणार आहे*.
आहे की नाही आजोबा ह्या नाहीतर त्या घरात सता कायम असली पाहिजे.

व्हाट्सअप्प forward

चला ! विश्वासमत सिद्ध झालं नाही तर काय? हा राजसीताईंपुढचा प्रश्न महाराष्ट्रापुरता मिटल्यावर त्यांना पुढचं काम मिळालं. हाच प्रश्न कर्नाटकात त्यांच्यासमोर उभा राहो अशा शुभेच्छा!

https://www.altnews.in/false-claim-bal-thackerays-sister-is-sharad-pawar...

अफवा पसरवायला (हे यांच्यासाठी श्वास घेण्यापेक्षा जास्त गरजेचं आहे) भाजप समर्थकांना आणखी एक खानदान मिळाल्याबद्दल अभिनंदन. लगे रहो.

Pages