फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37

मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले Happy

फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !

महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.

आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे जे ११ लोक निवडुन आलेत त्यांना सगळ्यांना मंत्रीपद की आणखी काही?

Submitted by रेवा२ on 9 December, 2019 - 11:22 >>

होईल होईल..भाजप वेळ दवडत बसत नाही. पण मला महाराष्ट्राची काळजी पडलीय.. कधी होणार "खाते" वाटप? कधी देणार क्रुषीमंत्री बळीराजाला दिलासा ?

कर्नाटकात भाजपचे स्थिर सरकार आले व तिथला कॉन्ग्रेसचे बॉस डी के शिवकुमार यांनी पराभव स्विकार केला. ७० जागांच्या जीवावर किती हा मानभावीपणा...

>>कधी होणार "खाते" वाटप?
कुणि काय खायचे ते ठरले की...! आणि गेले अनेक वर्षांचे ऊपाशी, भुकेले खूप आहेत.. Proud

>>> १५ पैकी फक्त १२ सीट भेटल्या. >>>

भेटल्या - चूक
मिळाल्या - बरोबर

ह्यांचा महिनाभर उपाशी तर सूर्योदयाच्या आधीच लाडू गिळायला गेला होता,

आता बोलतात, दैवी संकेत आहे, येणारच म्हणून

आज फडणवीसांची मुलाखत पाहिली. ते म्हणाले की त्यांचा आणि अ. प.चा शपथविधी इ. श. पवारांना माहित होतं. त्यावरुन असं वाटलं की फडणवीसांनी अ. प. करवी ४०,००० हजार कोटीच्या निधीची बातमी शपंकडे पोचवली असेल. वर हेही सांगितले असेल की फक्त मुख्यमंत्र्यांनाच त्याचा अ‍ॅक्सेस आहे. म्हणले गेले की सगळे पैसे उठाच्या खिशात! शप आणि काँ. बसणार की नुसतीच बोंबलत! मग शपंनी ' मला नाही तर उठाला पण मिळू देणार नाही, असा स्टॅन्ड घेऊन बाकीचे नाट्य घडवून आणले तर नसेल ना?

काय माहिती, श प नी आधीच हात वर केलेत, मला माहिती नाही तो गेला ते. पण मला वाटतं की कोर्टाने जो निर्णय दिला, त्यामुळे आमदार जमवता आले नाहीत भाजपला, वेळ नव्हता. इतकं एका दिवसात अजित पवार आणूही शकले नसते कोणाला, श प आदेशाशिवाय. अ प ना क्लीन चीट द्यायची सुरवात झाली त्या काळात ( अ‍ॅफीडीव्हेट त्या चार दिवसांतलं आहे असं काँग्रेसचे एकजण टीव्ही चर्चेत सांगत होते) . त्यामुळे आता अ प ना सगळ्यात क्लीन चीट मिळाली तरी भाजप काहीही करू शकणार नाही सुरुवात त्यांनी करून दिली आहे. लोकांना दिसायला तरी गेम फसला दे फ यांचा असंच दिसलं. आतली बातमी खरी काय खोटी काय कोणीही सांगू शकत नाही पण कोर्टाचा मोठा वाटा आहे नक्कीच, कमी दिवसांचे मुख्यमंत्री मान मिळण्यासाठी. जास्त दिवसांचे मुख्यमंत्री हा ही मान त्यांनाच आहे.

देवेंद्र फडणवीस तर सांगतायेत की मी तो व्यवहार केलाच नाही, खोटं आहे सर्व.

राणे तर आदल्या दिवशीपर्यंत सांगत होते, सगळीकडचे आमदार माझ्याकडे, उद्या बहुमत असेल तरी सिद्ध करू पण ते काही खरं नव्हतं हे सिद्ध झालं, उलट इथलेच काही अपक्ष गेले तिथे.

अजित पवार काही दिवसांनी नक्की काहीतरी वेगळी स्टोरी सांगतील, ते कधीतरी सांगणार आहेत का असं वागले ते, ख खो तेच जाणे Lol

एकेक सुरस कहाण्या अजून ऐकायच्या आणि बघायच्या आहेत असं वाटतंय. आतातर मला वर्षभराने अजित पवार मुख्यमंत्री होतील असंही वाटतंय. करायला लागेल त्यांना.

'वो चार दिन' अशी खरंतर मस्त स्टोरी होईल वेगवेगळ्या तर्कवितर्कांची. सगळ्यांची बाजू वेगळी, खरं काय कधीच कळणार नाही बहुतेक.

या धाग्यावर हा प्रश्न बसत नाही तरीहि मी विचारतो. जामिनावर बाहेर असलेल्या भुजबळाना मन्र्तीपद मिळाले याविशयी कोणिच लिहिलेले वाचले नाही. हा निर्णय योग्य आहे काय?

अजिबात आवडला नाहीये आणि पटलेला नाही. मी कुठेतरी दुसरीकडे लिहिलं का इथेच लिहिलं आठवत नाही पण लिहिलंय कुठेतरी. मी भाजप सपोर्टर असूनही साध्वीला जेव्हा तिकीट दिलं तेव्हाही पटले नव्हतं हे लिहिलं होतं. तर ह्यांना तर काय पार मंत्रीच केलं.

काहीही चाललेलं असते खरंतर, भाजप, रा कॉंग्रेस असती तरी श प यांनी भुजबळ यांना मंत्रीपद द्यायला लावलं असते आणि त्यांनीही ते दिलं असते. सत्तेसाठी आता काहीही घडू शकते.

>>> जामिनावर बाहेर असलेल्या भुजबळाना मन्र्तीपद मिळाले याविशयी कोणिच लिहिलेले वाचले नाही. हा निर्णय योग्य आहे काय? >>>

योग्यच आहे, कारण ते सेक्युलर पुरोगामी आहेत.

कर्नाटकात जद आणि काँग्रेसमधून भाजपत जाऊन निवडून आलेल्या बा रभाईंचं अभिनंदन. त्यांना वचन दिल्याप्रमाणे मंत्रीपदही मिळणार आहे असं येडियुरप्पांनी सांगितलंय. मूळ काँग्रे सींचा होत असलेला उत्कर्ष पाहून परम संतोष जाहला.

ज्यांच्या खात्यात एकूण ४८ करोड रुपयांची ५३ डिपॉझिट्स जमा झाली होती अशा नव्यानेच रोल्स रॉयस मालक एम नागराजू यांचा भाजपच्या बंडखोर उमेदवाराकडूनच पराभव झाला असला तरी येडियुरप्पा त्यांना विधानपरिषदेवर सामावून घेतीलच.

कुठल्याही गोष्टीत काही ना काही पॉझिटिव्ह शोधण्याच्या शुगोल यांच्या कसबाचं कौतुक. मीही त्यांच्याकडून शिकायचा प्रयत्न करतो.

७२ तासांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत पदाचा कारभारही न स्वीकारता ७२ तासांच्या मुखमंत्र्यांकडून क्लीन चिट मिळालेल्या अजित पवारांचेही अभिनंदन!

>>> ७२ तासांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत पदाचा कारभारही न स्वीकारता ७२ तासांच्या मुखमंत्र्यांकडून क्लीन चिट मिळालेल्या अजित पवारांचेही अभिनंदन! >>>

शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी अशा अनेक ठिकाणी घरोबा करूनही वारंवार मंत्रीपद मिळवणाऱ्या भुजबळचेही अभिनंदन करा.

महाराष्ट्रातील काँग्रेस एनसीपी व देशभरातील सर्व काँग्रेस आमदार, खासदार, आजी-माजी मंत्री यांच्या खात्यात मात्र ४८ रुपयेही नाहीत हो. आणि जर असतील तर ते कष्ट करुन कमावलेलेच आहेत हो. महाराष्ट्रातील आघाडी नेत्यांच्या मालकीची हिल स्टेशन्स, टाऊनशिप्स, बंगले, शिक्षणसंस्था, साखर कारखाने , हेलिकॉप्टर्स हे सगळं एकीकडे जंतेची सेवा करुन फावल्या वेळात सचोटीने बिझनेस करुन कमावले आहेत. म्हणून तर आपले ते हे त्यांचं मायबोलीवर इतकं मन लावून समर्थन करतात Biggrin
लगे रहो काँग्रेस समर्थक, तुमची तत्वनिष्ठा पाहून डोळे दिपतात आमचे.

आणि हो शिवसेनेने कॅबमध्ये भाजपच्या बाजूने वोट केलं म्हणे. तरीपण काँग्रेस सेनेला कम्युनल म्हणणारे नाहीच्चे आणि सरकार समर्थन काढणार नाहीच्चे कारण काँग्रेस व एनसीपीच्या या गरीब, सालस आमदार व मंत्र्यांना जंतेची सेवा करायची संधी मिळायला पाहिजे.

जामीन असेल तर मंत्रिपद देऊ नये असा कायदा असता तर एव्हाना शहा मोडीने राष्ट्रपती राजवट आणून थयथयाट केला असता,

पक्षाच्या पडत्या काळातही मूळ काँग्रेसी स्वतःचा उत्कर्ष साधत असतील तर ते चांगलंच आहे.

आता कर्नाटक विधानसभेत एकूण २२४ आमदार. म्हणजे मंत्रीमंडळ जास्तीत जास्त ३३ लोकांचं. त्यातले किमान १२ आयातीत. हे छान आहे की नाही? आणखी दोन ठिका णी पोटनिवडणुका व्हायच्या आहेत. त्यांच्यासाठीही दोन जागा शिल्लक आहेत.

हो ना. येड्डियुरप्पा वेडेच आहेत की त्यांना वाटतंय आपण बहुमताच्या थोडेच मागे होतो (१०४ सीट्स मिळाल्या, बहुमत ११२ वर), आता ४९ टक्के वोट शेअर मिळाला, लोकसभेला भरपूर सीट भेटल्या म्हणजे जनादेश भाजपाला आहे आणि आपण सरकार बनवलं पाहिजे, ती आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यासाठी काँग्रेसच्या काही स्थानिक आमदारांचा सपोर्ट घेतला तरी चालेल (हे लोक मतदारसंघात स्वतःच्या नावावर निवडून आले- पक्ष बदलला तरी). किती हे वागणं चुकीचं आहे.

काँग्रेसवाले हुश्शार आहेत. जनादेश खरंतर २२२ पैकी ३७ सीट्स मिळवणार्‍या जेडीएसला होता हे त्यांना बरोब्बर कळलं म्हणून तर कुमारस्वामीना सीएम बनवलं होतं. जंतेचा आदेशच तसा होता. जेडीएस काँग्रेस अलायन्स म्हणजे दोन सालस, गरीब पक्षांचा केवळ जंतेने लडिवाळ आग्रह केला म्हणून झालेला अलायन्स.

मी अजिबात उपरोधाने लिहीत नाहीए. जास्तीत जास्त काँग्रेसींनी यावेळी भाजपमध्ये जाऊन आपल्या पोळीवर तू प ओढून घेतलं पाहिजे असंच माझं मत आहे. मग ते कर्नाटकातले असोत, गोवा, अरुणाचल प्रदेश की आणखी कुठले. महाराष्ट्रातही भाजपने येडियुरप्पांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन कमला करावं.

महाराष्ट्रातही भाजपने येडियुरप्पांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन कमला करावं.

Biggrin पण महाराष्ट्र काँग्रेस एनसीपीला पोळीवर तूप ओढण्यासाठी आता कसलं नवीन ऑपरेशन कशाला? आता तूपाचं अख्खं गोडाऊन ताब्यात आहे की. 'खाते' वाटप अजून झालं नसलं म्हणून काय झालं, होईल आज ना उद्या. मग तूप काय नी गूळ काय!

हे क्लिनचिट प्रकरण नक्की काय आहे?
कोणी दिली क्लिनचिट न्यायालयाने की ED ने की अजुन कुठल्या संस्थेने? अशा संस्थांना न्यायालयाला बायपास करून कुणाला क्लिनचिट देता येते का?

काँग्रेस ऑन CAB: भाजपवाले कॅब ला सपोर्ट करतात म्हणून फेसबुकवर पोस्टी लिहून ठाम विरोध करु.
ऑल्सो काँग्रेस: सेनावाले पण कॅब ला सपोर्ट करतात पण सेना इज लव्ह!

काँग्रेस ऑन मोदीराज : मोदींच्या राज्यात देशातील मुस्लिम असुरक्षित आहेत.
ऑल्सो काँग्रेस: पाकिस्तान-बांगला देशातील समस्त मुस्लिमांना भारतात स्थायिक व्हायचं असल्यास होऊ दिलंच पाहिजे कारण मोदींच्या राज्यात ते पाकिस्तान- बांगला देशसारख्या मुस्लिम देशांहून जास्त सुरक्षित आहेत.

काँग्रेस ऑन फ्रीडम: फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन असलाच पाहिजे. देश भयंकराच्या दारात उभा आहे, ही हुकुमशाही आहे.
ऑल्सो काँग्रेस: पानिपत मुव्ही बॅन करा कारण जाट समुदायाला आवडली नै.

सेनावाले पण कॅब ला सपोर्ट करतात पण सेना इज लव्ह! >>> Lol सुरु झालेत वाद, दलवाईना पसंत नाही पडलं पण अरविंद सावंत म्हणाले की राज्य लेवलवर common minimum prgm ठरलाय, केंद्रात आम्ही UPA त कुठे गेलो, बाळासाहेबांच्या विचारांसाठी दिलाय इथे पाठींबा. मला वाटतं काही गोष्टी सेना देशलेवलवर वेगळ्या ठेवेल, त्यांना ठेऊ देतील की नाही काय माहिती.

कॅबला राज्यसभेत सेना पाठींबा देणार नाही म्हणे आता. लोकसभेत दिला आणि राज्यसभेत अडवणूक. >> अन्जू, ही अडवणूक नाहीये. हे काँ. समोर नांगी टाकणे आहे. तिकडे रागांनी डोळे वटारले, मुमंपद धोक्यात आणले, म्हणून मारलेली पलटी आहे. यापुढे असेच चालणार आहे.

Pages