Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37
मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले
फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !
महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.
आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाजपाच्या वळचणीस राहून पक्ष
भाजपाच्या वळचणीस राहून पक्ष संपण्याच्या मार्गावर होता हे शेंबडे पोर देखील सांगेल त्यामुळे उध्दव ठाकरेंचे काही चुकत आहे असे वाटत नाही. >> +१ भाजपा बरोबर नुकसान आणि मानहानी होणार याची खात्री होती. आता जे होईल ते स्वीकारायची प्रामाणिक जबाबादारी उठाच्या डोक्यावर असेल कारण मुख्यमंत्री ते स्वतः असतील.
उ ठा ना शुभेच्छा.
>>गड आला पण सिंह गेला!<<
>>गड आला पण सिंह गेला!<<
म्हण चूकलेली आहे. कुठला गड आला? उलट बंगला गेलाय. चपखल म्हण कदाचित - तेल गेले तूप हि गेले, हाती आले धुपाटणे हि असेल. म्हणजे फडणविस आता सगळ्यांची डर्टी लाँड्री धुत (काढत) बसणार. सर्वात जास्त आमदारांचं संख्याबळ असुनहि सत्ता काबीज करता आली नाहि हि सल/जखम भाजपाला (त्यांच्या डायहार्ड समर्थकांना) कायम ठुसठुसत रहाणार आहे. असो. माझ्यामते महाआघाडीचा पहिला वार बहुतेक बुलेट ट्रेनवर पडेल; मुंबई मेट्रो वाचावी अशी इच्छा आहे. पवारसाहेब या प्रोजेक्टमधे मोडता घालु देणात नाहित, बहुया काय होते...
विरोध कारशेड आरेत असण्याला
विरोध कारशेड आरेत असण्याला आहे. मेट्रोला नाही.
कारशेडसाठी अनेक पर्यायी जागा होत्या.
अमुक जातीला सत्तेत शून्य
अमुक जातीला सत्तेत शून्य प्रतिनिधित्व असणं अपेक्षित आहे असं लिहिलं तर त्याबद्दल कोणाला प्रॉब्लेम असू नये. >>> फ २० मुख्यमंत्री झाल्याबरोबर मोर्चे काढले असते तर या म्हणण्याला धार आली असती. कुलकर्णी चौकात चंपा नको म्हणून ज्याप्रमाणे आंदोलन झाले तसे का नाही केले ? आता एवीतेवी फ२० गेलेच आहेत तर कांगावा करून घ्यावा असे वाटले एकंदरीत.
जेव्हां ३.५ दिवसांचा गणपती बसला होता तेव्हां का नाही म्हणालात असे काही ?
शिवसेनेच्या वाढीला पोषक
शिवसेनेच्या वाढीला पोषक वातावरण आहे. भाजपकडे सत्ता नसल्याने आता जे मुंगळे चिकटले होते ते दूर होतील. त्यामुळे त्या पक्षाला आलेली सूज उतरायला सुरूवात होईल. २०१४ ला भाजप निवडून आली तेव्हाही त्यात अर्ध्यापेक्षा जास्त आयात उमेदवारच होते. ते कमी पडले म्हणून पुन्हा २०१९ ला आयात केले. म्हणजेच मूळची या पक्षाची ताकद किती आहे हे आता सत्ता नसताना समजून येईल.
विखे पाटील, मोहीते पाटील हे एक एक करून स्वगृही परत येतील. मोहीते पाटील आत्ताच काँग्रेस नेतृत्वाशी अथवा शिवसेनेशी तह करू पाहत आहेत. ते राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता नाही. हर्षवर्धन पाटील हे ही परतणार आहेत. हा २०१९ चा माल. २०१४ च्या आयात उमेदवारांनाही हाक दिली जाईल.
भाजपचं अस्तित्व पुढच्या निवडणुकीत १७% च्या आसपास येईल.
>>विरोध कारशेड आरेत असण्याला
>>विरोध कारशेड आरेत असण्याला आहे. मेट्रोला नाही.<<
व्हॉट कॅन आय से - कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है...
(No subject)
<< भाजपाच्या वळचणीस राहून
<< भाजपाच्या वळचणीस राहून पक्ष संपण्याच्या मार्गावर होता हे शेंबडे पोर देखील सांगेल त्यामुळे उध्दव ठाकरेंचे काही चुकत आहे असे वाटत नाही. आहे त्या परिस्थितीत जो काही सर्वोत्तम पर्याय निवडता येईल तो बरोबर निवडला आहे. बाकी या महानाट्याचे मुख्य सूत्रधार पवारांकडून शिकण्यासारखं बरेच आहे. ही निवणूक सर्वार्थाने पवार पॉवर मुळे लक्षात राहणार यात दुमत नाही. >>
------ सेनेला अपमानित करणे, आणि संपवण्याचे प्रयत्न भाजपाने सातत्याने केले आहेत. केंद्रात तसेच राज्यात एकही जबाबदारीचे पद सेनेला दिले नाही. दर दिवशी अपमान सहन करत रहाण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला हे खूप चांगले झाले. निर्णय घ्यायला तसा विलंबच झाला.
आता सोनियाच्या दरबारी किंवा बारामतीकरां कडे जावे लागले तर बिघडले कुठे ?
उद्धव ठाकरे यांना भावी काळासाठी शुभेच्छा. ते खूप समंजस आहेत, आणि समतोल साधण्याचे कौशल्य आहे.
<< भाजपचं अस्तित्व पुढच्या
<< भाजपचं अस्तित्व पुढच्या निवडणुकीत १७% च्या आसपास येईल. >>
------- तुमच्या बोटाला साखर लागो तसे झाले तर देशासाठी खूप चांगले आहे.
या तीन पायाच्या सरकारचा गाडा
या तीन पायाच्या सरकारचा गाडा हाकताना अर्थातच प्रत्येक पक्षातील प्रत्येक बड्या सरदाराची लाज, बूज व मान राखल्याशिवाय या नविन राजाला एक पाऊल पुढे टाकणे देखिल अवघड आहे. >>>>>
NcP BJP madhye hi paristhiti navhati kaay?
आमची आघाडी तत्वाच्या पायावर उभी आणि तुमची आघाडी संधीसाधू आशु भूमिका का घ्यायची?
गड आला सिंह गेला निबंध वाचला
गड आला सिंह गेला निबंध वाचला एकदाचा. निबंध सेनेवरच लिहिलाय म्हणजे त्यांचा कोणी सिंह गेलाय का? कोण?
गेल्या पाच वर्षांत त्यांच्या पक्षाला सर कारात किती किंमत होती? उलट सत्ताधारी पक्षच सरकारविरोधात आंदोलने, वक्तव्ये करतो आहे असे चित्र होते. मग आता त्यांना दुसर्या पक्षांशी जुळवून घ्यावे लागत असेल तर त्याबद्दल पोटदुखी का? तुम्हीच वाघाची नखे आणि दात घासून बोथ्ट केले आणि तो दुसरीकडे गेल्यावर त्याला मांजर म्हणता? मांजराला कॉर्नर केल्यावर काय होतं ते अनुभवलंत.
फोडाफोडीचं राजकारण आपल्याच तोंडावर फुटताच महाभरतीबद्दल ची मतं ३६० अंशात फिरून पुन्हा निकालानंतरच्या जागी आली.
फडणवीसांच्या प्रे कॉ मधलं सगळ्यात (हास्य)स्फोटक वाक्य - आम्ही फोडाफोडीचं राजकारण केलं नाही, करायचं नाही म्हणून राजीनामा दिला.
भाजप अजूनही व्यक्ति केंद्रित राजकारणा पलीकडे जाऊ शकणार नाही हे सेनेची नवी मातोश्री सोनिया इ. वक्तव्यांवरून दिसतं आहे.
एककल्ली, एककेंद्री ज्याला अडवणारं कुणी नाही अशा सत्ताधार्यापेक्षा (नोटाबंदी आणि फडणवीसांचे ८० तास ही दोन उदाहरणं) विचारविनिमय करून हळू का होईना पुढे जाणारे सहमतीचे राजकारण कधीही बरं.
काँग्रेसने केलेल्या चुका भाजप अधिक जोमाने करताना पाहून नक्की काय वाटायला हवं ते कळत नाही. अब्दुल कलामना परदेशातून बिहारमधल्या राष्ट्रपती राजवटीचा आदेश काढावा लागला होता. तोच प्रकार कोविंद यांच्याबाबत झाला जेव्हा त्यांनी आधी राष्ट्रपती राजवट आणली आणि मग उचलली. इथे दोन्ही प्रकरणांत राष्ट्रपतींसोबत, केंद्र सरकार, गृहमंत्री, राज्यपाल यांचे हात माखलेले आहेत.
>>> आता नवीन सरकारने उरलेले
>>> आता नवीन सरकारने उरलेले २०% ही आरक्षित करुन १०० % कोटा देऊन टाकावा. >>>
आपल्या जागा कमी करण्यामागे एक ब्राह्मणच आहे हे बऱ्याच ब्राह्मणांच्या अजून लक्षात आलेले नाही. त्यांना यातील गांभीर्य व यामुळे ब्राह्मणांचं झालेलं नुकसान समजलेलेच नाही. फडणवीस ब्राह्मण आहेत या एकमेव कारणामुळे ते फडणवीसांच्या चुकीच्या कृत्यांकडे पूर्ण डोळेझाक करून त्यांच्या जयजयकारात मग्न आहेत.
अमृता फडणवीस apolitical
अमृता फडणवीस apolitical person आहेत म्हणून त्यांच्यावर कमेंट केली नव्हती. काल काहींनी त्यांचे व्हिडियो शेअर केलेले पाहिले. त्या फडणवीसांच्या प्रचारात सहभागी होत्या. कार प्रवासात कोणा पत्रकाराला छोटासा इंटरव्ह्यु दिलाय त्यात इतर राजकार ण्यांवर कमेम्ट्स केल्यात.
राज ठाकरेंबद्दल " एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट" असं साभिमय म्हटलंय.
देवेंद्र फडणवीसांइतकं काम दुसर्या को णीच केलं नाही, असं सर्टिफिकेट दिलंय. वर नवा फादर ऑफ द नेशन जन्माला घातलाय.
यासग ळ्यावर कमेंट्स करण्यासारखं काही नाही. पण त्या अराजकीय व्यक्ती नाहीत हे स्पष्ट झालं.
रेशीमबागेला स्वतंत्र राज्य
रेशीमबागेला स्वतंत्र राज्य जाहीर करून तिथे फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून बसवता येईल पाच वर्षे.
सांस्कृतिक कार्यक्रमही घेता येतील
(No subject)
>>> विरोध कारशेड आरेत
>>> विरोध कारशेड आरेत असण्याला आहे. मेट्रोला नाही.
कारशेडसाठी अनेक पर्यायी जागा होत्या. >>>
इंदू मिलच्या अंदाजे २० एकर जागेत आंबेडकरांचे स्मारक, पुतळा वगैरे करणार आहेत. या जागेत कारशेड करून त्याला आंबेडकरांचे नाव देता आले असते, इतक्या मोठ्या जागेचा व्यावहारिक उपयोग झाला असता व आरे वनातील २६०० वृक्ष व त्यांच्या आश्रयाने वास्तव्य करणारे असंख्य पशुपक्षी वाचले असते.
In the three day rule BJP has
In the three day rule BJP has transferred funds given by centre for bullet train project back to centre and there is hardly any money in the Maharashtra treasure to give farm loan waivers. This is the reason for 3 day govt was needed - explained by one bhakt खखोदेजा
यासग ळ्यावर कमेंट्स
यासग ळ्यावर कमेंट्स करण्यासारखं काही नाही. पण त्या अराजकीय व्यक्ती नाहीत हे स्पष्ट झालं. >>
त्यांनी फॅमिली कनेक्शनचा वापर बॉलिवुडमध्ये चमकण्यासाठी केलेला आहे हे उघडच आहे की.
हाच प्रकार स्मिता ठाकरे, आदित्य ठाकरे, रितेश देशमुख यांनीही केला. त्यांचं ठीक आहे.
पण अमृता रानडे-फडणविस, व्हाईस प्रेसिडंट (अॅक्सिस बँक)- यांना हा असला मोह व्हावा हे धक्कादायक होतं.
जाता जाता, त्यातल्या एका
जाता जाता, त्यातल्या एका आमदाराच्या नावे त्या काळात आणि पुढल्या दोन तीन आठवड्यांत त्याच्या खात्यात ५३ वेळा प्रत्येकी ९०+ रुपये जमा केले गेले होते.>>>>> अबबबब!
पं. लालबहादुर शास्त्री काय, स. पटेल काय, यांच्या काळात हा बाजार कधीच नव्हता. हे सर्व लोकमान्य नेते होते. आजकाल राजकारण म्हनजे खोगीर भरती व गुरांचा बाजार !
हाच प्रकार स्मिता ठाकरे,
हाच प्रकार स्मिता ठाकरे, आदित्य ठाकरे, रितेश देशमुख यांनीही केला. त्यांचं ठीक आहे. >>> फारच गंमतीशीर. सरळ बाजू घेऊन बोला ना किंवा उदाहरणं तरी नीट द्या. स्मिता ठाकरे या निर्मात्या होत्या. त्यासाठी कला लागत नाही. शिवाय त्या आता ठाकरे कुटुंबासोबत नाहीत. आदित्य ठाकरेंनी अभिनय, गायन किंवा अशा कोणत्या क्षेत्रात चमकण्यासाठी सत्तेचा वापर केला असेल तर माहीत नाही. कदाचित तुमच्याकडे ती माहिती असेल. सत्तेमुळे एखादी अभिनेत्री त्यांच्याकडे आली असेल तर प्रधानमंत्री मोदींसोबत अनेकांनी फोटो काढले आहेत, त्यांच्याशी संबंधित हजारो आहेत.
रीतेश देशमुखला मात्र सत्तेमुळे संधी मिळाली हे बरोबर आहे. मात्र नंतर त्याने स्वतःच्या जिवावर स्थान निर्माण केले. वडील गेल्यानंतर कुणी विचारत नाही अशी स्थिती नाही त्याची. वडलांच्या पोझिशनचा फायदा घेऊन महानायकाला आपल्यासोबत अल्बम काढायला लावायची पाळी यांच्यापैकी कुणावार आली होती का ? शिवाय यांच्या नावाने हे आधी कसे साधे होते, कसे रांगेत उभे राहतात असे फॉर्वर्ड्स देखील फिरलेले नव्हते.
अजून एका अराजकीय पत्नीने तर
अजून एका अराजकीय पत्नीने तर सरकारच पाडलं woman pawar
https://www.facebook.com
https://www.facebook.com/100025835227312/videos/477585699779267/
पडायला ते सरकार उभं कुठे
पडायला ते सरकार उभं कुठे होतं?
मला तरी काही चूक वाटत नाही
मला तरी काही चूक वाटत नाही अमृता फडणवीस जर खरोखरच नवऱ्याच्या पदामुळे गायन क्षेत्रात पुढे गेल्या असतील तर. एखाद्या व्यक्तीने फक्त एकाच क्षेत्रात असावे असा काही नियम आहे का? त्यांनी काही कोणाच्या मागेपुढे केलं नसेल पण लोकांनी स्वतः होऊन त्यांना गाण्याच्या ऑफर्स दिल्या असतील तर त्यांनी का नाही म्हणावं?
मला राजसी id चे आऊट ऑफ the
मला राजसी id चे आऊट ऑफ the box views फार आवडतात
स्वतःची चूक मनोमन मान्य करत
स्वतःची चूक मनोमन मान्य करत फडणवीसांनी राजीनामा दिला. ते शिवसेनेबद्दल काहीतरी बोलले, पण अजीत पवारांबद्दल जास्त काही बोलले नाही. पण आता संजय राऊत यांना अजीत पवारांबद्दल नक्कीच प्रेमाचा उमाळा फुटेल आधी अजीत पवार यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याने ते तडफडत रहातील अशी विधाने करणार्या राऊतांना अजीत पवारांची परत पप्पी घ्यायची वेळ यावी हे अनाकलनीय नव्हतेच.
त्यांना यापुढेही गाण्याच्या,
त्यांना यापुढेही गाण्याच्या, व्हिडियोच्या ऑफर्स मिळाव्यात यासाठी शुभेच्छा.
फडणवीसांना आजत कच्या
फडणवीसांना आजत कच्या पत्रकाराने अजित पवारांबद्दल प्रश्न विचारला की.
तुम्ही ज्यांच्याबद्दल सतत बोलत आलात, च क्की पिसिंगला पा ठवणार होतात त्यां नाच तुम्ही उपमुख्यमंत्री कसं केलंत?
त्यावर फडणवीस म्हणाले ते सर्वाधिक बहुमताने निवडून आले. राष्ट्रवादीचे गटनेते निवडले गेले होते.
त्यांना सोबत घेणं चूक की बरोबर याचा विचार नंतर करू. चक्की पिसिंगबद्दल अर्थातच काही बोलले नाहीत.
आता जे चक्की पिसायला पाठवणार होते त्यांनी मांडीवर घेतलेलं चालत असेल तर संजय राऊतांना पप्पी घ्यायला काय जातंय? (आणि ते खंजीर खुपसणं इत्यादी सगळं नाटकाचा भाग नव्हतंच असं ठामपणे वाटत नाहीए )
फडणवीसां विरोधात खडसेंनी आघाडी उघडली. गाडीभर पुरावे रद्दीत विकले. आम्हांला (मुढे, तावडे) सोबत घेतलं असतं तर २०-२५ जागा आणखी आल्या असत्या.
मी पुन्हा येईन हे सूर आणि शब्द फडणवीसांचा अजून बराच काळ पाठलाग करणार आहेत. शरद पवारांच्या मागे ४० वर्षं झाली तरी खंजीर आहे तसेच.
७९ तासांचा व्याभिचार मोठा
७९ तासांचा व्याभिचार मोठा कलंक आहे, तो कधी पुसला जाईल असे वाटत नाही.
फडणवीसां विरोधात खडसेंनी
फडणवीसां विरोधात खडसेंनी आघाडी उघडली. गाडीभर पुरावे रद्दीत विकले. आम्हांला (मुढे, तावडे) सोबत घेतलं असतं तर २०-२५ जागा आणखी आल्या असत्या. >>> हे बघितलं टीव्हीवर.
बरेच जण नाराज आहेत.
Pages