फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37

मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले Happy

फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !

महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.

आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राष्ट्रवादीमधे अजितदादांनी पैसे खाल्ले तरी टेण्शन नव्हते हो. आता उपमुख्यमंत्री झाल्यावर ओरडताहेत ते का सोडलं म्हणून. त्यांच्या टेण्शनची तुम्हाला लैच काळजी ! उद्या या महानाट्यामागे थोरले साहेबच होते असे सिद्ध झाले की सतरंजीवाले तर मेलेच.

पुगा, माहिती नसेल तर गप्प बसा असं म्हटलं आहे. एकाही लिंकमध्ये मला ह्याचे उत्तर नाही सापडले. असो.

अल्ला ताला की दुवा से और काँग्रेस के अच्छे शगुन से हमारी पगार बढने वाली है,

सबको मुबारक

इन्शाल्ला , आपको भी मुबारक !

या निवडणुका आणी आताचा चाल्लेला गोंधळ यात सगळ्यात जास्त डोके खराब कोणी केले असेल ना तर ते राऊतने. जाम वात आणला या माणसाने. शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस जेवढे त्यांच्या आयुष्यभरात मिडीयाला सामोरे गेले असतील त्याच्या दुपटीने या माणसाने गोंधळ घातला. दिड दिवसात हा बरा काय होतो, बाईट काय देतो, दुगाण्या काय झाडतो. शिवसेनेचे सरकार येवो न येवो, पण हा माणुस शिवसेने च्या मुळावर उठलाय हे नक्की. उद्धव ठाकरे पण नाचतायत, नाच रे बाब्या तु नाच रे नाच !

या निवडणुका आणी आताचा चाल्लेला गोंधळ यात सगळ्यात जास्त डोके खराब कोणी केले असेल ना तर ते राऊतने. जाम वात आणला या माणसाने. >>> खरं आहे.

बाकी राजकारण मला चारी पक्षांचे यावेळी अजिबात पटले नाही.

Lol

फुल्ल मज्जा मज्जा चालू आहे.

ह्यापेक्षा शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं असते तर काय झालं असते. तोंडघशी पडले स्वत: अजित पवार आणि पाडलेही त्यांनी.

असो अजून काय काय बघायला लागणार जनतेला काय माहिती.

आता इकडे मुख्यमंत्री होतील अजित पवार कदाचित.

शरद पवारांनी अजित पवारांना वापरून फडणवीसांचा गेम केलेला नसूदे.

भाजप समर्थकांच्या वतीने प्रार्थना.

Biggrin

भाजपचा गेम करण्यासाठी अजित पवारांना पाठवून सरकार स्थापन करण्याची आवश्यकता नव्हती. स्वतःवरच्या आरोपातून स्वतः सरकार बनवून स्वतःचा स्वतःला क्लीन चीट दिली असती तरी चालले असते.

आता राष्ट्रपती राजवट आणणार का अमित शहा.
जम्मू काश्मीरमध्ये असंच केलेलं.
मेहबूबा मुफ्तीच्या पायाखालचं काश्मिरी कार्पेट काढलं आणि राज्यपालांचं fax machine बंद करून टाकलं.

शरद पवारांनी अजित पवारांना वापरून फडणवीसांचा गेम केलेला नसूदे.>>>>> दाट शक्यता आहे. पण अजीत पवार यांची राजकीय कारकिर्द धोक्यात आहे की नाही हे नाही माहीत. सरकार अल्पमतातले असेल हा त्याच दिवशी अंदाज आला होता.

उद्धव ठाकरे यांचे मु होणे मला तरी पटलेले नाही. ज्या माणसाला कसलाच अनूभव नाही ( नुसता नेता होऊन भाषणे ठोकणे वेगळे) प्रत्यक्ष कार्यभार वेगळा असतो. या पेक्षा कॉ चे लोक निदान दिर्घ अनूभव वाले आहेत.

उद्धव ठाकरे यांचे मु होणे मला तरी पटलेले नाही. >>> मुळात होतील की नाही काय माहिती, अजित पवार होतीलही कदाचित.

राजकारणातून संन्यास घेणार अजित पवार. सर्व पदांचा राजीनामा दिला.

मला असे वाटतेय सिचन घोटाळ्यातून क्लीन चिट घेतली आणि पळाले

उद्धव ठाकरे यांचे मु होणे मला तरी पटलेले नाही.>>
अजुन झालेले नाहीत ओ. आणि काय ते अनुभव नाही अनुभव नाहीचे तुणतुणे? बापाचा पक्ष चालवायचा इतक्या वर्षांचा अनुभव आहे. शिवाय एकटा गडी नाही राज्याचा गाडा हाकणार. ढीगभर अनुभव असणारे दोन पक्ष आहेत पाठीशी. किमान अठरा अठरा तास काम करून दमनार तर नाही ना इतरांसारखे Wink

भाजपचा गेम करण्यासाठी अजित पवारांना पाठवून सरकार स्थापन करण्याची आवश्यकता नव्हती. स्वतःवरच्या आरोपातून स्वतः सरकार बनवून स्वतःचा स्वतःला क्लीन चीट दिली असती तरी चालले असते.

आता नाव फडण २० ह्यांचे येणार

जयंत पाटील कुठे आहेत? फडणवीसां बरोबर नाहीत ना? >>> Lol सही, असू शकतात.

चला #अजितदादा पवारांचे डावपेच आपण समजावून घेऊ यात...!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी पुढील डावपेच...!

अजित पवारांनी मोठ्या साहेबांना न सांगता भाजपाला संपविण्याचा विडा उचलला.

अजितदादा पवारांनी भाजपाला सत्तेसाठी नक्की कोण मदत करत आहे, हे पहाण्यासाठी धाडसी निर्णय घेतला.

मोठ्या साहेबांना न सांगता अजितदादांनी भाजपच्या गोटात शिरुन सर्व यंत्रणा, व्यक्ती पाहून घेतलेल्या.

रात्रीच्या अंधारात भाजपचे, संघाचे आणि नोकरशाहीतले, लोकशाही विरोधी लोक जगासमोर आणले.

केवळ आमदारांच्या सह्या असलेलं पत्र समोर ठेवून राज्यपाल कसे घटनेची गळचेपी करतात, ते समजलं.

भाजपचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न कायम स्वरुपी संपुष्टात आणलं. देवेंद्र फडणवीस यांना तोंडघशी पाडलं.

भाजपा आणि शिवसेनेची कधीच युती होणार नाही. असा उतावीळपणा देवेंद्र फडणवीसांकडून घडवून आणला.

सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी भविष्यात कोण गद्दारी करू शकतो, त्यांचे राजकारण आजच संपविलं.

भाजपा किती विश्र्वासघातकी आहे, हे शिवसेनेला कृतीतून दाखवून दिलं. त्यांचे दरवाजे बंद केले.

एका रात्रीत राष्ट्रपती राजवट हटविण्याचं जागतिक रेकॉर्ड केलं. मुंबई दिल्लीतील गद्दार गारद केले.

देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री होण्याची लालसा कायम स्वरुपी निकालात काढली.

मोदी-शहा यांच्या पेक्षा आम्ही किती मुरब्बी राजकारणी आहोत हे दाखवून दिलं.

भाजपा रात्रीत काय-काय राजकीय उद्योग करते हे समजलं.
30 नोव्हेंबर भाजपाच्या सर्वनाशाची तारीख ठरवली.

12 डिसेंबरला *महा विकास आघाडीचं* सरकार बनवून मोठ्या साहेबांना *वाढदिवसाची* गिफ्ट देणार.

राष्ट्रपती राजवट उठविल्यामुळे तीन महिने आधीच सत्तेचा मार्ग मोकळा केला.

राज्यपाल किती बालीश आणि कुचकामी आहे हे दाखवून दिलं.

स्वत: शिव्या खाल्ल्या, शत्रूच्या गोटात घुसून कोथळा बाहेर काढला आणि मोठ्या साहेबांचं स्वप्न पूर्ण केलं.

एवढे रेकाॅर्ड आजवर कोणाच्याही नावाने नोंदविण्यात आलेले नाहीत. अजितदादा धन्यवाद आणि अभिनंदन

Political Strategist.

Pages