असे वाटते मैफिल काही जमून आली नाही
जिथून होती दाद पाहिजे .. तिथून आली नाही
सहजच होता पाण्याला मी स्पर्श एकदा केला
एक लाट जी गेली मागे फिरुन आली नाही
आयुष्याने मारून ठोकर केले खरे शहाणे
सारी अक्कल काही शाळा शिकून आली नाही
तिला बहूधा खूप आठवण येत असावी आता
याच्या आधी कोरी चिठ्ठी चुकून आली नाही
इकडे चुकतो ठोका तिकडे उचकी लागत असते
प्रेमाची ही भाषा तेंव्हा कळून आली नाही
त्या मातीला तसा देखणा स्पर्श मिळाला होता
उगाच काही तिथे अबोली उगून आली नाही
सणासुदीला लेकीवाचुन सुने वाटते अंगण
निरोप येतो ‘‘निरोप नव्हता’’ म्हणून आली नाही
जरी नोकरी संसाराचे अवघड गणित जुळवते
तरी असे दाखवते की ती दमून आली नाही
हंबरडा फोडत गोठ्याशी गायी कधीच आल्या
गुरे चारण्या गेलेली ती अजून आली नाही
बरेच झाले की मी माझी व्यथा मांडली येथे
इथल्या इतकी गर्दी कोठे जमून आली नाही
___________________________ शाम
सॅल्युट! मतला,कोरी चिठ्ठी आणि
सॅल्युट!
मतला,कोरी चिठ्ठी आणि निरोप...एकाच वाचनात,कायम स्मरणात राहतील असे शेर!
क्लास ! एक एक शेर जबरी ! स ला
क्लास ! एक एक शेर जबरी !
स ला म !!
अप्रतिम... दाद द्यावीशी...
अप्रतिम... दाद द्यावीशी...
मस्तं आहे. खूप आवडली.
मस्तं आहे. खूप आवडली.
केवळ केवळ अप्रतिम. मतला, लाट,
केवळ केवळ अप्रतिम.
मतला, लाट, चिठ्ठी, निरोप, गर्दी.. आरपार आहेत. खूप आवडलीये ही गझल
चांगली झालीय गझल. लाट हा शेर
चांगली झालीय गझल.
लाट हा शेर सर्वाधिक आवडला.
आयुष्याने मारून ठोकर केले खरे
आयुष्याने मारून ठोकर केले खरे शहाणे
सारी अक्कल काही शाळा शिकून आली नाही
क्या बात है !
सर्वच शेर बढीया : सलाम
सर्वच शेर बढीया : सलाम
मस्त गझल !
मस्त गझल !
सहजच होता पाण्याला मी स्पर्श
सहजच होता पाण्याला मी स्पर्श एकदा केला
एक लाट जी गेली मागे फिरुन आली नाही>> व्वा!
सुंदर गझल..
>>>इकडे चुकतो ठोका तिकडे उचकी
>>>इकडे चुकतो ठोका तिकडे उचकी लागत असते
प्रेमाची ही भाषा तेंव्हा कळून आली नाही
त्या मातीला तसा देखणा स्पर्श मिळाला होता
उगाच काही तिथे अबोली उगून आली नाही
सणासुदीला लेकीवाचुन सुने वाटते अंगण
निरोप येतो ‘‘निरोप नव्हता’’ म्हणून आली नाही
जरी नोकरी संसाराचे अवघड गणित जुळवते
तरी असे दाखवते की ती दमून आली नाही
हंबरडा फोडत गोठ्याशी गायी कधीच आल्या
गुरे चारण्या गेलेली ती अजून आली नाही<<<
एक से एक शेर! उत्तम गझल, उत्तम जमीन!
सुरेख गझल शाम!
सुरेख गझल शाम!
क्या बात है !!
क्या बात है !!
केवळ अप्रतिम.!
केवळ अप्रतिम.!
वा सुंदर
वा
सुंदर
अप्रतिम....
अप्रतिम....
खुपच सही... आवडली..
खुपच सही... आवडली..
छान
छान
मस्त सगळेच शेर दाद
मस्त सगळेच शेर दाद देण्यासारखे
धन्यवाद दोस्तांन्नो!!!
धन्यवाद दोस्तांन्नो!!! _/|\_
वाह!!! आवडलीच.
वाह!!! आवडलीच.
आहा हा! भारीच!
आहा हा! भारीच!
थॅंक्यू सामो गझल वर काढल्याबद्दल!
निव्वळ अप्रतिम
निव्वळ अप्रतिम
वाह!
वाह!
वाह ! अप्रतिम...
वाह ! अप्रतिम...
अहाहा! भारीच!
अहाहा! भारीच!
थॅंक्यू सामो गझल वर काढल्याबद्दल!
सामो, खरंच धन्यवाद!
सामो, खरंच धन्यवाद!
माबोवरचं जुनं निवडक वाचायचय मला..
मस्तच
मस्तच
शाम ए गझल .......अत्युत्तम
शाम ए गझल .......अत्युत्तम
लाट !
लाट !
Pages